10 मूल्य

* श्रमप्रतिष्ठा  * 
**********************************
व्यक्ती, समाज व राष्ट्र यांच्या निकोप विकासासाठी कराव्या लागणाऱ्या श्रमांना सर्वांची मान्यता असणे व ती मान्यता आचरणात आणणे यास श्रमप्रतिष्ठा म्हणतात.कोणतेही काम कमी गर्जाचे न मानता मन लावून करणे व श्रम करणाऱ्यांबद्दल आदर दाखवणे म्हणजे श्रमप्रतिष्ठा होय.
       आपल्या रोजच्या जीवनातील स्वतःची कामे स्वतः करणे, समाजात वावरताना श्रम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या व समाजाच्या विकासासाठी श्रमप्रतिष्ठा आवश्यक आहे. आपले  घर, आपली शाळा, आपला परिसर आपण स्वतः स्वच्छ ठेवला पाहिजे. श्रम करण्यात कसला कमीपणा !                                                   सुभाषिते
श्रम करणा-या श्रमिकांच्या चेह-यावर जे तेज असते ते अन्यत्र नसते.
वैभव आणि उत्कर्ष देणारा, दारिद्र्य आणि दैन्य नष्ट करणारा श्रमावाचून दुसरा कोणी नाही.
 N•R•Sable           अपेक्षित वर्तनबदल

विद्यार्थी आपल्या भोवतालचा परिसर (घर, वर्ग, मैदान, शालेय परिसर) स्वच्छ ठेवतो. या स्वच्छतेत त्याचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. स्वतः काम केल्यावर किंवा करत असताना तो अव्य विद्यार्थ्यांना आपल्या कृतीद्वारे श्रमाचे महत्त्व सांगत असतो.
दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांचा ज्या-ज्या श्रमजीवी लोकांशी संबंध येतो, त्या-त्या व्यक्तींकडून विद्यार्थी श्रमयुक्त जीवनाची माहिती जाणून घेतो. त्यांच्याशी वागताना आदराची भावना व्यक्त करतो.
शालेय उपक्रम (अभ्यास व अभ्यासेत्तर) सार्वजनिक उपक्रम (स्पर्धा, सहली) यांत विद्यार्थी स्वयंसेवक होण्याची जबाबदारी घतो.
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तो सेवाकार्यात सहभागी होतो. भूकंप, महापुराच्या वेळी लोकांना मदत करतो.
शारीरिक श्रमातून शरीर व मन सुदृढ राहते, याचे त्याला महत्त्व वाटते.
 N•R•Sable            शारीरिक कष्ट करणाऱ्यांना एक फायदा आपोआपच मिळत असतो व तो म्हणजे त्यांची पचनशक्‍ती उत्तम असते. या फायद्याचा उपयोग करून घेऊन जर वेळेवर व पौष्टिक ताकद देणाऱ्या गोष्टींनी युक्‍त आहार घेतला, तर त्यामुळे श्रमप्रतिष्ठा वाढविण्यास निश्‍चितच मदत मिळेल. जठराग्नी चांगल्या स्थितीत असला, की खाण्या-पिण्यातही विविधता राखता येऊ शकते. शारीरिक कष्ट करणाऱ्यांनी आहारात लसूण, शेंगदाणे, जवस, तीळ, चण्याची डाळ यांसारख्या शरीरपोषक; पण एरवी पचण्यास थोड्या अवघड वाटणाऱ्या गोष्टी योग्य प्रमाणात आहारात ठेवल्या, तर उत्तम असते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शांत झोप लागणे दुरापास्त होऊ लागले आहे; पण श्रमकरी व्यक्‍तींना मात्र शांत झोप आपसूकच लागते. सहसा या लोकांना बौद्धिक ताणही फारसा नसतो. त्यामुळेही शांत झोपेचे वरदान अशा लोकांना आपसूकच मिळत असते. शांत व पुरेशी झोप श्रम सहन करण्याची ताकद वाढविण्यास मदत करत असते.

श्रमकरी व्यक्‍तींनी आहार योजना करताना पुढील मुद्द्यांकडे लक्ष ठेवायला हवे.
* जेवायच्या वेळांकडे लक्ष ठेवणे. विशेषतः सकाळचा नाश्‍ता व दुपारचे जेवण हे वेळेवर घ्यायला हवे. न खाता शारीरिक श्रम करणे म्हणजे वातप्रकोपाला आमंत्रण देणेच होय.
* भूक लागूनही न खाणे किंवा भूक लागली असता काहीतरी कोरडे, निःसत्त्व पदार्थ खाऊन वा नुसते पाणी, चहा पिऊन भूक मारणे आवर्जून टाळणे.
* आहारात सकस व पौष्टिक गोष्टींचा अंतर्भाव असू देणे. भेळ, वडापाव किंवा तत्सम निःसत्त्व पदार्थ जेवण म्हणून खाणे किंवा वारंवार खाणे टाळणे.
* आहारात लसूण, शेंगदाणे, तीळ, मूग, मटकी, मसूर वगैरे डाळी, दूध, उडीद यांचा समावेश करणे. बऱ्याच वेळा शारीरिक कष्ट करणाऱ्यांना तात्पुरती स्फूर्ती यावी म्हणून तंबाखू, गुटखा, विडी, दारू वगैरेंची सवय लागते; पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, 
 N•R•Sable श्रमाचे काम करणाऱ्यांना शारीरिक शक्‍ती भरून आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. शारीरिक श्रम करणाऱ्यांना सप्तधातूंपैकी मांसधातू व अस्थिधातू मजबूत राहण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. अति व्यायाम, अति शारीरिक श्रम, अतिशय चालणे, पळणे, ओझी वाहून नेणे, प्रवास करणे ही सर्व कारणे वाताचा प्रकोप करणारी असतात. 

श्रमाचे काम करणाऱ्यांना यातील कोणती तरी गोष्ट करावी लागणे स्वाभाविक असते म्हणूनच श्रम करणाऱ्यांना वातदोषाला संतुलित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.
भारत हा शेतीप्रधान देश असल्याने आपल्याकडे श्रमकरी व्यक्‍तींमध्ये शेतात काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याखेरीज मोठ्या कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार, बांधकाम व्यवसायात काम करणारे मजूर, गवंडी, मिस्त्री, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, वाहनचालक यांसारख्या अनेक पद्धतींच्या श्रमकरी व्यक्‍ती असतात. 

श्रमकरी व्यक्‍तींना कामाच्या स्वरूपानुसार निरनिराळे त्रास होऊ शकतात. उदा.- सातत्याने उभे राहून काम करणाऱ्यांना पायाच्या शिरा फुगण्याचा त्रास होतो, पाय दुखू शकतात, पायात गोळे येऊ शकतात. त्यांना खूप चालावे लागणाऱ्यांनाही अशाच प्रकारचा त्रास होऊ शकतो. 

पायाच्या तळव्यांना भेगा पडू शकतात. वजन उचलणाऱ्यांना, ओझे ओढणाऱ्यांना मान अवघडणे, कंबरेत उसण भरणे, पाठ दुखणे यांसारखे त्रास होताना दिसतात. उन्हात काम लागणाऱ्यांचे डोळे तळावतात, डोके दुखू शकते. 


श्रम करणे, काम करणे हे खरे तर शरीर निरोगी राहण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. फक्‍त काम करण्यामुळे शरीरशक्‍ती प्रमाणाबाहेर खर्च होणार नाही आणि खर्च झालेली शक्‍ती पुन्हा भरून येईल याकडे लक्ष ठेवायला हवे.
**********************************
👦🏻संवेदनशिलता👧🏻        काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. टी.व्ही. वर एक नाचाचा कार्यक्रम सुरु होता. एक चिमुरडा मुलगा अतिशय लवचीकपणे सुंदर नाच करीत होता. त्याचा नाच झाल्यावर स्टेजवरील मान्यवरांनी त्याला प्रश्न केला की तुला नाचाची प्रेरणा कशी मिळाली आणि इथ पर्यंतचा प्रवास कसा केला. त्यावेळी त्या चिमुरड्याने जे उत्तर दिले ते ऐकून स्टेजवर बसलेल्या जरा संवेदनशील मंडळींनी डोक्यालाच हात लावला. त्याने सांगितले जोवर मी दिवसातून दोन-दोन तासांची तीन वेळा प्रक्टिस करीत नाही तोवर माझी आई मला जेवायला देत नाही. त्यावर त्याच्या आईची प्रतिक्रिया तर अजूनच असंवेदनशील होती.
*********************************
👧🏻सर्व धर्मसमभाव👦🏻

समजा, मी इहवादी आहे. माझा परलोक वगैरेवर विश्‍वास नाही. त्यामुळे अर्थातच कोणत्याही अवतारावर नाही. त्याचप्रमाणे मला माझ्या कुळाचा अभिमान नाही. मी कुळामुळे एखाद्या जातीत व धर्मात पडत असल्यामुळे त्या जातीचा वा धर्माचाही मला अभिमान नाही. मी लौकिक अर्थाने धार्मिक माणूस नाही. मला कुळाचा अभिमान नाही याचा अर्थ मी माझ्या कुळाला इतरांच्या कुळाहून श्रेष्ठ मानत नाही. माझा भर समतेवर आहे. सर्व समान असावेत व श्रेष्ठकनिष्ठभाव मानवी व्यवहारात कोठेही नसावा असे मला मनापासून वाटते. मी तशा आचरणात कमी पडत असेन, पण समानतेचे तत्त्व मूल्य म्हणून मला मान्य नाही असे नाही.
*********************************
* राष्ट्रिय एकात्मता * 
********************************* 👧🏻सांप्रदायिक एकता पर नारे👦🏻

1) सभी धर्म की एक पुकार, एकता को करो साकार.
2) अनेकता में एकता यही भारत की विशेषता.
3) ‘ह’ से हिन्दू, ‘म’ से मुसलमान और हम से सारा…. हमारा हिंदुस्तान
4) जाती पाती तोड़ दो, भेदभाव तूम छोड दो.
5) हमारा हे एक ही नारा, भाईचारा भाईचारा.
6) जात – पात के बंधन तोड़ो, भारत जोडो भारत जोडो.
7) देश हमारा हिंदुस्तान, रखेंगे हम उसकी शान.
8) हमलावर खबरदार, हिंदुस्तान हैं तैयार.
9) घर घर से आयी आवाज, बनायेंगे हम नया समाज.
10) करें हम ऐसा काम, बनी रहेगी देश की शान.

👦🏻 स्वतंत्रता सेनानियों के नारे👧🏻

11) शांति मानव का धर्म हैं, अशांति अधर्म हैं.
12) अमरावती हो या अमृतसर, सारा देश अपना घर.
13) गौतम, गाँधी और नेहरू का यह देश, एकता का देता सन्देश.
14) जब तक हैं बाकि प्राण, रखेंगे हम देश की शान.
15) हम सब प्रान्तवासी, बंधू सखा हैं भाई – भाई.
16) राष्ट्रिय एकता – जिंदाबाद, हमारा नारा – भाईचारा.
17) भिन्न भाषा भिन्न वेश, भारत हमारा एक देश.
18) अनेकता में एकता, यही भारत की विशेषता.
19) जाती पाती तोड दो, भेदभाव छोड़ दो.
20) स्वाधीन राष्ट्र के तीन निशान राष्ट्रध्वज, राष्ट्रभाषा, राष्ट्रमान.
21) हमारी ताकत न्याय स्वतंत्रता और एकता.
22) कश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी.
23) विश्व स्नेह का ध्यान करे, सबका सब सम्मान करे.
 *******************************
 N•R•Sable              हमारा भारत देश राष्ट्रीय एकता की एक मिशाल है । जितनी विभिन्नताएँ हमारे देश में उपलब्ध हैं उतनी शायद ही विश्व के किसी अन्य देश में देखने को मिलें । यहाँ अनेक जातियों व संप्रदायों के लोग, जिनके रहन-सहन, खान-पान व वेश-भूषा पूर्णतया भिन्न हैं, एक साथ निवास करते हैं । सभी राष्ट्रीय एकता के एक सूत्र में पिरोए हुए हैं ।

जब तक किसी राष्ट्र की एकता सशक्त है तब तक वह राष्ट्र भी सशक्त है । बाह्‌य शक्तियाँ इन परिस्थितियों में उसकी अखंडता व सार्वभौमिकता पर प्रभाव नहीं डाल पाती हैं परंतु जब-जब राष्ट्रीय एकता खंडित होती है तब-तब उसे अनेक कठिनाइयों से जूझना पड़ता है । हम यदि अपने ही इतिहास के पन्नों को पलट कर देखें तो हम यही पाते हैं कि जब-जब हमारी राष्ट्रीय एकता कमजोर पड़ी है तब-तब बाह्‌य शक्तियों ने उसका लाभ उठाया है और हमें उनके अधीन रहना पड़ा है ।

इसके विपरीत हमारी राष्ट्रीय अवचेतना से ही हमें वर्षों की दासता से मुक्ति मिल सकी है । अत: किसी भी राष्ट्र की एकता, अखंडता व सार्वभौमिकता बनाए रखने के लिए राष्ट्रीय एकता का होना अनिवार्य है । भारत जैसे विकासशील देश के लिए जो वर्षों तक दासत्व का शिकार रहा है वहाँ राष्ट्रीय एकता की संपूर्ण कड़ी का मजबूत होना अति आवश्यक है ताकि भविष्य में उसकी पुनरावृत्ति न हो सके ।


देश में व्याप्त सांप्रदायिकता, जातिवाद, भाषावाद, क्षेत्रीयता आदि सभी राष्ट्रीय एकता के अवरोधक तत्व हैं । ये सभी अवरोधक तत्व राष्ट्रीय एकता की कड़ी को कमजोर बनाते हैं । इन अवरोधक तत्वों के प्रभाव से ग्रसित लोगों की मानसिकता क्षुद्र होती है जो निजी स्वार्थ के चलते स्वयं को राष्ट्र की प्रमुख धारा से अलग रखते हैं तथा अपने संपर्क में आए अन्य लोगों को भी अलगाववाद के लिए उकसाते हैं ।
*********************************
👧🏻वैज्ञानिक दृष्टिकोन👦🏻        N•R•Sable                एखादी घटना अभ्यासताना तिचा कार्यकारणभाव समजून घेऊन प्रयोगांच्या आधाराने ती सिद्ध करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन होय. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कोणत्याही घटनेकडे पाहण्याचा बुद्धिनिष्ठ दृष्टिकोन होय. विशिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून ते उद्दिष्ट सिद्ध करण्यासाठी प्रयोग करणे, प्रयोगैचे निरीक्षण करणे, निष्कर्ष काढणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन होय.
         वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणा-या व्यक्तीच्या ठिकाणी खालील गुण असतात.
मनमोकळेपणा
चिकित्सक विचारसरणी
निरीक्षण क्षमता
पूर्वग्रहरहित दृष्टिकोन
बौद्धिक प्रमाणिकपणा
जिज्ञासू वृत्ती
नवीन कल्पनांचा स्वीकार करण्याची तयारी
सत्याचा आग्रह
वस्तुनिष्ठ दृष्टिकोन
कार्यकारणभाव जाणून घेण्याची वृत्ती
अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवण्याची वृत्ती
साधार मत मांडणे
समस्या निराकरण करण्यासाठी तर्कशुद्ध विचारसरणीचा वापर
       खगोलशास्त्रज्ञांच्या शोधांमुळे ग्रहमालेबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, ग्रहणे आणि धूमकेतू आपल्यावर संकटे आणतात इत्यादी समज खोटे ठरले. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे खगोलशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र इत्यादी विषयांत अनेक शोध लागले                                       👦🏻अपेक्षित वर्तनबदल व उपक्रम👧🏻

        माणसाचे वैशिष्ट्य म्हणजे अपेक्षित वर्तनबदल व उपक्रम आपल्यासमोर असणा-या प्रत्येक समस्येचा तो विचार करतो, त्यावर प्रयोग करतो, मागील अनुभवांशी ताडून बघतो, मगच स्वतःला योग्य वाटेल तो निर्णय घेतो. प्रत्येक समस्येला तो कधी ? का ? कसे ? काय ? केव्हा ? असे प्रश्न विचारतो. यातच मानवाचे वेगळेपण दडले आहे. शालेय वयापासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्येच हा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
                        N•R•Sable        👧🏻अपेक्षित वर्तनबदल👦🏻

विद्यार्थी आसपासच्या घटनांचे निरीक्षण करून त्याच्या नोंदी करू लागतात.
कोणत्याही घटनेला सहा ककार प्रश्न विचारून कार्यकारणभाव जाणण्याचा प्रयत्न करतात.
कोणत्याही मतासाठी आधारशोध व बोलताना साधार बोलतात.
स्व-मतांच्या संदर्भात नवे विचार, नव्या कल्पना स्वीकारण्याची तयारी आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून वैयक्तिक व सामाजिक आरोग्य जपू लागतात.
शालेय जीवनातील समस्यांची सोडवणूक वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या साहाय्याने करतात.
वैज्ञानिक प्रदर्शनात भाग घेऊन नवी उपकरणे समोर आणतात.
अधिकाधिक प्रगतीकडे जाण्याचा प्रयत्न करतात.
वैज्ञानिक दृष्टिकोनाला पूरक असणा-या साहित्याचा प्रसार करतात.
*********************************
👦🏻राष्ट्रिय एकात्मता👧🏻                 साबळ॓ एन आर         

देशात एकात्मता, बंधूभाव कायम राहणे प्रगतीबरोबर निकोप समाज निर्मितीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरते. पण अलीकडे देशात जातींमध्ये, धर्मांमध्ये तेढ वाढत आहे. जाती-पातीचे राजकारण सुरू आहे. कोणत्याही गोष्टीचे राजकारण करण्याकडेच कल दिसून येतो. त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी तीव्र होत आहेत. आसाममधील घुसखोरांच्या समस्येबाबत असेच झाले. मग  देश वेगाने प्रगती करत असल्याचा ढोल बडवण्यात काय अर्थ आहे?
देशात एकात्मता, बंधूभाव कायम राहणे प्रगतीबरोबर निकोप समाज निर्मितीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरते. पण अलीकडे देशात जातींमध्ये, धर्मांमध्ये तेढ वाढत आहे. जाती-पातीचे राजकारण सुरू आहे. कोणत्याही गोष्टीचे राजकारण करण्याकडेच कल दिसून येतो. त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी तीव्र होत आहेत. आसाममधील घुसखोरांच्या समस्येबाबत असेच झाले. मग  देश वेगाने प्रगती करत असल्याचा ढोल बडवण्यात काय अर्थ आहे?

सद्यस्थितीत देशातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात बर्याच उलथापालथी घडत आहेत. त्यामुळे देशाची शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे. हे कोणत्याही परिस्थितीत परवडण्यासारखे नाही हे लक्षात घ्यायला हवे. कोणत्याही देशाची प्रगती सामाजिक एकता, बंधूभाव याच बळावर वेगाने होत असते. त्यादृष्टीने विचार करायचा तर अलीकडच्या काळात देशात जाती-जातीतील, धर्मा-धर्मातील तेढ वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत. जातीपातीचे राजकारण मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. भाषावाद, प्रांतवाद डोके वर काढत आहे. आसाममधील घुसखोरांच्या प्रश्नाचे गंभीर रूप धारण केले आहे. त्यातून निष्पापांवरील हल्ले वाढत आहेत. आसामचे रहिवाशी असलेल्या पण शिक्षण, नोकरी या निमित्ताने अन्य भागात गेलेल्यांमध्ये असुरक्षिततेची भावना मोठय़ा प्रमाणावर वाढीस लागली आहे. हे सारे निश्चितच चिंताजनक चित्र आहे. 
********************************
👦🏻वैज्ञानिक दृष्टिकोन व स्ञी-पुरूष समानता👧🏻                                       साबळ॓ एन आर       

देशाने बदलत्या काळाची गरज अचूक ओळखून आधुनिकतेकडेही वाटचाल सुरू ठेवली यात शंका नाही. त्यातून गेल्या काही वर्षात विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात देशाने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. पूर्वी संवादाची साधने उपलब्ध नव्हती. पण दूरक्षेत्रातील क्रांतीमुळे संवाद साधणे सोपे झाले. आता तर अगदी खेडोपोडी आणि झोपडय़ांमध्येही मोबाईल दिसू लागले आहेत. दूरदर्शनबाबत असेच झाले. त्यामुळे सामान्य जनतेसाठीही खर्या अर्थाने जग जवळ आले. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती महत्त्वाची ठरली. विविध क्षेत्रातील विकासाचा दर वाढवायचा तर पायाभूत सुविधांवर भर देणे भाग पडते. हे ओळखून तसे प्रयत्न वेगाने सुरू झाले. शिवाय स्त्रियांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने टाकण्यात आलेली पावलेही महत्त्वाची ठरतात. याचाच परिणाम म्हणून पंचायत राज व्यवस्थेत जवळपास दहा लाख स्त्रिया वेगवेगळय़ा पदांवर कार्यरत असल्याचे पहायला मिळते. महाराष्ट्रात तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. याचाही लाभ अनेक महिला घेत आहेत. अवकाश संशोधन क्षेत्रातही आपल्या देशाने बाजी मारली आहे. स्वातंत्र्यानंतरचा हा सारा प्रवास निश्चितच आशादायक राहिला. पण ही नाण्याची एक बाजू ठरते. दुसर्या बाजुला दिसणारे वास्तव चिंताजनक आहे.

कोणत्याही देशात प्रगतीची गंगा वाहते तेव्हा तिचे लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचावेत अशी अपेक्षा असते. खरे तर यातच संपूर्ण देशातल्या जनतेचे हित सामावलेले असते. स्वातंत्र्यानंतर जनतेला अन्न, वस्त्र, निवारा या गरजा प्राप्त होतील अशी आशा होती. पण 60 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी बहुतांश गोरगरिब जनता भुकेली आहे. देशातील जवळपास 60 टक्के लोक अजूनही दारिद्रय़रेषेच्या खाली रहात असल्याचे दिसून येत आहे. अर्जुन सेनगुप्ता समितीने काढलेला हा निष्कर्ष लक्षात घ्या
********************************
👦🏻राष्ट्रिय एकात्मता👧🏻              साबळ॓ एन आर                  सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा सारे जहा से अच्छा हे गीत कवि इकबाल यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात लिहिले होते.तेव्हा खरच अखंड भारतात एकी,मैत्री,शांति सतत नांदत होती.पण आपल्या या स्वतंत्र भारताला कुणा नालायकाची दृष्टी लागली.आणि अधूनमधून अशांती, द्वेष ,मत्सर निर्माण होऊ लागले. यावर खरच विचार करण्याची गरज भासायला लागली आहे.राष्ट्र ही माझी माता आहे या भूमीत मी जन्म घेतला आहे. याच त्रुन मी कस फेडू शकते हीच गीतेतील भक्ति असू शकते,ग्रंथसाहेब मधील पवित्रता असू शकते,हीच महावीरांची खरी अहिंसा ठरू शकते या जगात जगताना प्रत्येक धर्मियाने आपल्या धर्माच आचरण करायलाच पाहिजे कारण प्रत्येक धर्माच तत्व एकच सांगत "मानवतेशिवाय कोणताही मोठा धर्म असू शकत नाही".
********************************
👦🏻वक्तशिरपणा👧🏻                    साबळ॓सर                                             एक जुनी आठवण.
ब्रिटिश माणसाच्या रक्तात वक्तशीर पणा भिनलेला आहे
७१-७२ साल असेल..नोकरीला लागून १.१/२ वर्ष झाले असेल..
कंपनी नवा प्रॉडक्ट तयार करणार होती..त्या साठी इंग्लंडला जाण्या साठी माझी निवड झाली
त्या काळात परदेशगमन म्हणजे अप्रूप असायचे..
माझी पाहिलीच खेप(वेळ)..शिक्षण झाले अन लगेचच नोकरीला लागल्याने प्रवासाचा अनुभव नव्हता,,
इंग्लंड तिथल्या लोकल्स ट्रेन बद्दल माहिती घेत होतो..त्या वेगवान असतात इत्यादी
एक तर प्रॉडक्ट शिकून तो इथे तयार करून दाखवणे याचा ताण होता.
बाथ नावच्या गावात कारखाना होता,तिथे एका त्याच कंपनीतल्या एकाच्या परिवारात राहण्याची सोय झाली होती..
ट्रेनिंग सुरू झाले..व त्याचाच एक भाग म्हणून कोव्हेन्ट्री शहरात एका मशीनं टूल्स बनवणा~या कारखान्यात पण १ आठवडा जाण्याचा प्रोग्राम ठरला होता...
ट्रेन चा प्रवास होता... मित्र स्टेशनवर सोडायला आला होता..तिकिट काढलेले होतेच..पण मी अस्वस्थ होतो..
मित्राने ते ओळखले व "काय" असे विचारले?
मी त्याला मनातली बाळबोध भीती सांगितली " की गावाच्या नावाच्या पाट्या फलाटाच्या शेवटी असतात..ट्रेन फास्ट..गाव आले कळले नाही तर व भलत्याच ठिकाणी उतरलो तर परदेशात फजिती.."
त्या वर तो हसला व हातानेच थांब अशी खूण केली..तिकिट खिडकीवर गेला व आला व म्हणाला.
"फलाटावरल्या घड्याळाशी तुझे घड्याळ जुळवून घे कोव्हेंट्री स्टेशनवर गाडी ११.२६ मिनिटाने पोहोचते...घड्याळ बघ ११.२६ ला जे स्टेशन येईल तिथे उतर ते कोव्हेंट्रीच असेल..:"
त्याचा सांगण्यामुळे मनावरचे दडपण कमी झाले..
अर्थात नंतर गाडीत एक सहप्रवासी भेटला तो पण कोव्हेंट्री ला चा जाणारा होता...त्या मुळे प्रश्न आला नाही तो भाग निराळा...
कोव्हेंट्री आले मी उतरलो व फलाटावर पाहिले घड्याळात ११.२६ वाजले होते..

मनातल्या मनात ब्रिटिश वक्तशीर पणाला सलाम केला
******************************-***
👧🏻राष्ट्रभक्ती👦🏻                                  राष्ट्रभक्ती ले हृदय मे हो खडा यदि देश सारा
संकटो पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा ॥
क्या कभी किसने सुना है सूर्य छिपता तिमिर भय से
क्या कभी सरिता रुकी है बांध से बन पर्वतों से
जो न रुकते मार्ग चलते चीर कर सब संकटोंको
वर्ण करती कीर्ती उनको तोड कर सब असुर दल को
ध्येय-मन्दिर के पथिक को कन्टकों का ही सहारा ॥
हम न रुकने चले है सूर्य के यदि पुत्र है तो
हम न हटने को चले है सरित की यदि प्रेरणा को
चरण अंगद ने रखा है आ उसे कोइ हटाए
बहकता ज्वालामुखी यह आ उसे कोइ बुझाए
मृत्यु की पी कर सुधा हम चल पडेंगे ले दुधारा ॥
ज्ञान के विज्ञान के भी क्षेत्र मे हम बढ पडेंगे
नील नभ के रूप के नव अर्थ भी हम कर सकेंगे
भोग के वातावरण मे त्याग का संदेश देंगे
त्रास के घन बादलोंसे सौख्य की वर्षा करेंगे

स्वप्न यह साकार करने सन्घठित हो हिन्दु सारा ॥
*********************************
👦🏻मूल्यशिक्षण चारोळ्या👧🏻

👧🏻सौजन्यशिलता👦🏻            
खालील गुण जेथे मिळती
तेथे कर माझे जुळती...
जेथे असे आदर,प्रेम ,नम्रता
तेथे दिसून येते सौजन्यशिलता.
👦🏻राष्ट्रिय एकात्मता👧🏻          
जिथे दिसती एकतेत बंधुता
एकसंघ राहुनी बनवुया भारत भाग्यविधाता.
रुजेल तेव्हाच देशसेवेची अस्मिता
तीच खरी ठरेल राष्ट्रीय एकात्मता .
👧🏻श्रमप्रतिष्ठा👦🏻                  
कोणतेही काम..मानू नये छोटे वा मोठे
कामावर ठेवावी निष्ठा .
मनापासून काम करुन
घडेल श्रमप्रतिष्ठा.
👦🏻राष्ट्रभक्ती👧🏻                   
देश अमुचा आहे महान
सर्व भारतीयांची आन,बान,शान
देश रक्षण्या सारेच व्यक्ती
जागवतील देशभक्ती .
👦🏻निटनेटकेपणा👧🏻              
निट,स्वच्छ ,सुंदर कार्य
हा मंत्र प्रत्येकाने जाणा.
वस्तूंची काटकसर,पुनर्वापर
तेथेच दिसतो निटनेटकेपणा.
👦🏻वक्तशिरपणा👧🏻               
Time is money
म्हणून करावी वेळेची व्यवस्थापना .
करुन नियोजन वेळेचे
रुजवूया वक्तशिरपणा.
👧🏻संवेदनशिलता👦🏻             
प्राणी ,वेली,अपंग ,गरजू
भावना त्यांच्या मनात शिरता.
दुःख त्यांचे आपुले वाटता.
दृष्टी पडते संवेदनशिलता.
👧🏻वैज्ञानिक दृष्टिकोन👦🏻      
प्रयोग,तर्क ,अनुमान यांची सांगड
असलेले विचार पसरवतील लोण.
अनिष्ट,रूढी,परंपरा मोडून
दाखवू वैज्ञानिक दृष्टिकोन .
👧🏻स्ञी-पुरूष समानता👦🏻    
स्त्री अथवा पुरूष
करू नका भेदभाव ..हा मंत्र जाणता.
समान हक्क,संधीने
येईल स्त्री पुरूष समानता .
👧🏻सर्व धर्म समभाव👦🏻         
सर्व धर्मांचा करुन आदर
मिटवू मनातील कटूता.
नांदू प्रेमभराने.

हवी सर्वधर्मसहिष्णुता.
*********************************

No comments:

Post a Comment