शेती आणि शेतकरी

शेती आणि शेतकरी 
===============
**************** 
=*=*=*=*=*=*=*= 
Sable•N•R: 🌺🌅👧🏻🌺🌅👦🏻🌺

* उन्हाळी हंगामातील काकडी, कारली, दोडका, दुधी भोपळा, भेंडी इत्यादी फळांची तोडणी सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा करावी. 
* रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा पिकाच्या ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त माना पडल्या असतील तर कांदा काढणी करून सुकवावा. 
* गवार व इतर फळपिकांना जमिनीच्या प्रतीनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फळ पोसण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये. त्यामुळे फळ पोषणावर परिणाम होतो आणि वजनात घट येते. 
* टोमॅटो पिकात पर्णगुच्छ (लीफ कर्ल) हा रोग पांढऱ्या माशीमार्फत आणि टोमॅटो पिकातील "ग्राऊंडनट बड नेक्रॉसीस व्हायरस' हा रोग फुलकिड्यामार्फत होत असल्याने, त्याचे वेळीच नियंत्रण होणे गरजेचे आहे. 
* टोमॅटोवर येणाऱ्या फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन १%+ ट्रायझोफॉस ३५ ई.सी. (हे संयुक्त कीटकनाशक) २० मि.लि. किंवा क्विनॉलफॉस १० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
* टोमॅटोवरील नागअळीसाठी रोपे लागवड करताना लागण झालेल्या रोपांची कीडग्रस्त पाने काढून वरच्यावर ४% (४ किलो निंबोळी पावडर प्रति १०० लिटर पाणी ) निंबोळी अर्काचा फवारा करावा. या अळीचे प्रमाण वाढल्यास थायामेथोक्‍झाम ४ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* मिरची पिकावर सध्या फुलकिडे व कोळी या किडीचे प्रमाण वाढून "लीफ कर्लिंग' (बोकड्या) ची लक्षणे दाखवणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी डायमेथोएट ३०%(१५ मि.ली. प्रति १० लिटर पाणी) अधिक पाण्यात विरघळणारे गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात गरजेनुसार फवारणी करावी. 
* भेंडी पिकामध्ये बऱ्याच वेळा मावा, तुडतुडे, पांढरी माशी व लाल कोळी या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येत असतो. या रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी ) पिकाभोवती मका या पिकाची लागवड करावी. रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच इमिडाक्‍लोप्रिड ४ मि.लि. किंवा थायामेथोक्‍झाम ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारणी करावी.🌅🌺👦🏻🌺👧🏻🌅

 Sable•N•R: 🌺👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺

शेतकरयासाठी केंद्रसरकारची फळबाग लागवड योजना 
५ एकर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकरयासाठी National Horticulture board मार्फत (NHB) विशेष योजना सुरु केले असून त्यामध्ये फळबाग लागवड,विहीर, बोर, पाईपलाईन,शेततळे, शेततळे कागद, कंपाउंड,फार्म हाउस,पाण्याची टाकी ट्रक्टर व अवजारे इ.चा समावेश होतो.जमीन ५ एकर पेक्षा जास्त लागते.
या योजनेत डाळिंब,सीताफळ,चिकू,अॅपल बोर सह १६ फळांचा समावेश करण्यात आला असून प्रकल्प खर्चाच्या ४०% पर्यंत अनुदान मिळते.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी - 7744 02 1244 या क्रमांकावर संपर्क साधावा.
🌅🌺👦🏻🌺👧🏻🌅

 Sable•N•R: 🌺🌅👦🏻🌺👧🏻🌅🌺 

जार न पड़ने एक समस्या 
आपली गाय किंवा म्हैस , शेळी व्यालीनंतर जार वेळेवर न पडल्यास गर्भाशयमधे इन्फेक्शन होते .
1. जार हाताने काडावा लागतो त्यामुळे गर्भाशयत जखमा होउ शकतात 
2.नेहमीपेक्षा दुधाला खुपच कमी येतात 
3.मेट्रिटिस व् पयोमेट्रा होतो 
4. गर्भासय पूर्वस्थितित येण्यास उशीर होतो त्यामुळे माजावर लवकर येत नाहीत
* त्यामुळे आपली गाइला, म्हसीला, शेळीला  व्याण्याच्या आगोदरच 1-2 दिवस युट्रेविव टॉनिक घरी आणून ठेवा 
यूट्रेविव म्हणजे व्यालीनंतर जार पडन्यासाठी पाजतात ते टॉनिक तसेच यूट्रेविव व्यल्यानंतर लगेच पाजावे त्यामुळे जार वेळेवर पडतो. गर्भास्यतील इन्फेक्शन कमी होते. गाय/म्हैस दुधाला वाढते तसेच लवकर माजावर येऊन भरल्यानंतर गाभण राहाते.
 व्यलीनंतर गर्भासय स्वछ्तेसाठी  पाजा 
Utrevive 1Ltr
दररोज 200ml असे 5 दिवस.
आणि जार अड्कल्यास दर 3 तासाने Utrevive 100 ml सप्मुर्ण जार पड़ेपर्यंत
🌺👧🏻🌅🌺👦🏻🌺

 Sable•N•R: 🌅🌺👧🏻🌺👦🏻🌅🌺 

शास्त्रोक्त पद्धतीने कापूस लागवड करून भरपूर उत्पादन घ्या भाग-४
-रामेश्वर चांडक, कृषी अधिकारी अक्राणी जि.नंदुरबार

पेरणीसाठी वाणांची निवडः- कापूस लागवड करतांना त्या वाणांचा कालावधी लक्षात घेवूनच त्यांची निवड करावी. सर्व वाण बाजारामध्ये बीटी स्वरूपात उपलब्ध आहेत. परंतु कीड प्रतीकरशक्ती वाढत असल्यामुळे फक्त बीटी-२ चाच वापर करावा. बीटी-१ वाणांमध्ये सर्वच ठिकाणी शेंदरी बोंडअळी व इतर पाने खाणा-या आळ्यांचा प्रादुर्भाव वरचेवर वाढत असल्यामुळे यापुढे संरक्षक नॉन बीटी वाण किंवा तुरीचे संरक्षण लावणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये जास्त कालावधीचे म्हणजेच १८० ते २१० दिवसांमध्ये निघणारे, १५० ते १८० दिवसांत निघणारे आणि १५० दिवसांमध्ये निघणारे असे तीन प्रकारचे वाण बाजारात आहेत. वाणांची निवड करतांना कोणत्या कालावधीमध्ये लागवड होणार आहे त्या प्रमाणे वाण घ्यावा.

1. पूर्वहंगामी (२५ मे ते १० जून) – या काळात जास्त कालावधीच्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. यावाणांचे वैशिष्ट्य म्हणजे यात ४५ दिवसांनी पाते लागते, ७० दिवसांनी फुल लागते, १०० दिवसांत बोंड तयार होते व १३० दिवसांत बोंड फुटते. बाजारात उपलब्ध असणारे हे वाण म्हणजे पारस ब्रम्हा, महिकोचे एमआरसी-७३५१, राशी-२, अजित-११, जेके-९९, गब्बर, छत्रपती, इत्यादी.
2. हंगामी (१० जून ते ३० जून) – या कालावधीमध्ये लागवडीसाठी मध्यम मुदतीचे वाण निवडावेत. या वाणांचे वैशिष्ट्य म्हणजे यात ३५ दिवसांनी पाते लागते, ५५-६० दिवसांत फुले लागतात, ९० दिवसांत बोंडे तयार होतात व १२० दिवसांत बोंड फुटते. यासाठी बाजारात उपलब्ध असणारे वाण म्हणजे अजित-१५५, मल्लिका (एनसीएस-२०७), महिको- डॉक्टर ब्रेन्ट, बन्नी, महाशक्ती, कॅश, कृषीधन-९६३२, प्रतिक, मार्गो, सिग्मा-६, एन्काऊंटर, दुर्गा, विश्वनाथ, जगन्नाथ, इत्यादी.
3. उशिरा लागवड (१ जुलै ते १५ जुलै) – या कालावधीमध्ये कमी कालावधीचे वाण लागवडीसाठी निवडावेत. या वाणांचे वैशिष्ट्य म्हणजे यात २७-२८ दिवसांत पाते, ४५ दिवसांत फुल, ८०-८५ दिवसांत बोंड तयार होते तर ११० दिवसांत बोंड फुटते. यामध्ये बाजारात उपलब्ध असणारे वाण म्हणजे महिको-६३०१, किसान अर्ली, डायना, नांदेड-४४, इत्यादी.
4. इतर सुधारित वाणांमध्ये एलआरए-५१६६, रजत, जीएलए-७९४, बीएन (बीटी)-१, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या नॉन बीटी वाणांच्या विविध जाती सेंद्रिय व साध्या पद्धतीने कापूस लागवडीसाठी उपलब्ध आहेत.


"शेकरु" इंस्टॉल करा आणि मिळवा शेतीसाठीच्या योजनांची, कार्यक्रमांची व सेवा हमी कायद्याची माहीती मोफत!!!
यासाठी हि लिंक वापरा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.solution.shekru 
किंवा प्ले स्टोर वर shekru सर्च करा.
🌺👦🏻🌺👧🏻🌅🌺🌅

 Sable•N•R: 🌅🌺👦🏻🌅🌺👧🏻🌺 

आजचा शेती सल्ला:आंबा काळजी


कालच्या पावसाच्या हलक्या सरी व या ढगाळ वातावर्णामुळे आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. फळमाशीच्या नियंत्रणासाठी आंबा बागेत विद्यापीठाने शिफारस केलेले रक्षक सापळे हेक्‍टरी ४ या प्रमाणात लावावेत. फळे काढणीच्या किमान आठ दिवस झाडावर कोणतेही कीडनाशक फवारू नये. 
आंब्यामध्ये काही ठिकाणी अंडाक; ती फळे व मोठ्या आकाराची काढणीची फळे अशी अवस्था आहे. तयार फळे सकाळी दहाच्या आधी व दुपारी चारनंतर झेल्याच्या साह्याने ८० ते ८५% पक्वतेच्या अवस्थेत काढावीत. काढलेल्या फळात साका होणे टाळण्यासाठी व उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सावलीत ठेवावीत. शिफारशीनुसार रासायनिक प्रक्रिया देऊन पिकवावीत. 
आंब्यांची वाहतूक शक्‍यतो रात्रीच्या वेळी करावी. 
आंबा फळवाढीच्या अखेरच्या काळात विविध बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे काळे डाग पडण्याची शक्‍यता असते. काळे डाग असलेला आंबा काढणीनंतरही त्यावरील काळ्या डागांचे प्रमाण वाढते किंवा पिकत असताना फळे कुजतात. अशा रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. 
एकाच झाडावरील आंबा फळे काढणीसाठी ३-४ वेळा जसजसे तयार होतील तसतसे तोडावेत. निर्यातीसाठी ८५% तयार आंबे काढावेत. आंबे काढल्यास पिकल्यावर त्यामध्ये योग्य ती चव आणि स्वाद निर्माण होण्यासाठी ७५% पक्वता आवश्यक आहे. आंबा फळ तोडताना देठ विरहित काढल्यास झालेल्या जखमेतून चिक बाहेर येऊन तो फळांवर पसरतो. अशा चिकामुळे पिकल्यावर फळांवर करपे डाग दिसतात व फळांची प्रत कमी होते. 
देठासहीत काढलेले आंबे दोन ते तीन दिवस अधिक टिकतात. आंबे काढल्यावर सुमारे ४-५ सें.मी. देठ ठेवून बाकीचा भाग कापून टाकावा.या साठी नूतन झेला वापर फायदेशीर आहे.

आंबा फळे पक्वतेची लक्षणे:
* आंब्याची चोच अदृश्‍य होणे. 
* आंबा गोलाकार होणे. 
* आंब्यावर पांढरे स्फटिक दिसणे. 
* देठाला खड्डा पडणे, तसेच देठाच्या बाजूचा भाग फुगीर होणे. 
* हिरवा रंग पोपटी होऊन लाल छटा दिसणे. ई.


"शेकरु" इंस्टॉल करा आणि मिळवा शेतीसाठीच्या योजनांची, कार्यक्रमांची व सेवा हमी कायद्याची माहीती मोफत!!!

🌺👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺

No comments:

Post a Comment