९ वी इतिहास

घटक - प्राचिन व मध्ययुगिन संस्कृती 
अ ) ग्रीक 
🌺 ग्रीक संस्कृती चा उदय इ.स.पूर्व १५०० च्या सुमारास युरोप खंडाच्या आग्नेय दिशेला असणाऱ्या लहान-लहान बेटांमध्ये झाला. येथील लोक 'ग्रीक' म्हणून ओळखले जातात आणि त्यांची संस्कृती म्हणजे 'ग्रीक संस्कृती' होय. ग्रीसमध्ये विशिष्ट प्रकारची संस्कृती उदयास येण्यास तेथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरली. ग्रीसच्या उत्तरेला पर्वतांच्या रांगा आहेत. इतर तिनही दिशांना भूमध्य समुद्र आहे. त्यामुळे तेथील लोक उत्तम दर्यावर्दी बनले. तुटक डोंगराळ प्रदेश व शेकडो लहान-लहान बेटे यामुळे तेथे लहाल-लहान नगर राज्ये उदयास आली. मात्र प्रबळ मध्यवर्ती सत्ता उदयास येऊ शकली नाही.
🌺( N•R•Sable)            राजकीय व्यवस्था

ग्रीक संस्कृती
डोंगराळ प्रदेश, शेकडो लहान लहान बेटे, मर्यादित शेतजमीन यामुळे ग्रीक समाज छोट्या-मोठ्या समूहामध्ये विभागला गेला होता. कालांतराने या समूहामधून नगरराज्ये उदयास आली. या नगराज्यामधून ग्रीक संस्कृती विकसीत झाली. सर्वसाधारणपणे या या नगरराज्यांमध्ये लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्था होती. काही ठिकाणी राजसत्ता होती. मात्र तेथे राजे निवडून दिले जात असत. लोकशाहीची कल्पना ही ग्रीक संस्कृतीने जगाला दिलेली देणगी मानली जाते.

पुढे कालांतराने आपापंसातल्या युद्धामुळे ग्रीक नगरराज्ये दुर्बळ बनली. इ.स.पूर्व ३३८ मध्ये मॅसिडोनियाचा राजा फिलिप याने ग्रीक नगरांज्यावर आक्रमण करून ती आपल्या राज्यात समाविष्ट केली.

सामाजिक जीवन
                                   🌺( N•R•Sable) ग्रीक नगरराज्ये भौगोलिकदृष्ट्या छोट्यछोट्या बेटांमध्ये विभागली गेली असली तरी त्यांची समाजरचना, त्यांच्या धर्मकल्पना व त्यांची जीवनपद्धती यांमध्ये बरेच साम्य होते, म्हणून या नगरराज्यांच्या एकत्रित संस्कृतीला ग्रीक संस्कृती असे म्हणतात. ग्रीक समाजात दोन प्रमुख घटक होते. एक ग्रीक नागरिकांचा व दुसरा गुलाम, युद्धकैदी इत्यादींचा. राजकीय, आर्थिक, सांस्कृतीक व धार्मिक क्षेत्रातील अधिकार फक्त ग्रीक नागरीकांनाच होते. गुलाम, युद्धकैदी त्यापासून वंचित होते. ग्रीक समाजव्यवस्था पित्रृसत्ताक होती. स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. शिक्षण, संपत्ती व वारसा याबाबत स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच समान अधिकार होते. मात्र त्यांना पुरुषांप्रमाणे राजकीय अधिकार नव्हते.
                          🌺आर्थिक जीवन
( N•R•Sable)                भूमध्य सामुद्रिक हवामान व तेथील भौगोलिक परिस्थिती यांचा ग्रीकांच्या आर्थिक जीवनावर महत्त्वपुर्ण परिणाम झाला. ग्रीसमध्ये फळफळावळ व लाकूड यांची उत्तम पैदास होत असे. फळांच्या बागा हे ग्रीकांच्या उत्पनाचे महत्त्वाचे साधन होते. ग्रीक लोक या फळांपासून उत्तम प्रकारचे मद्य बनवित. फळे, मद्य व ऑलिव्ह तेल हे त्यांच्या निर्यातीचे प्रमुख घटक होते. ग्रीसमध्ये चांगल्या प्रतीचे मुबलक लाकूड उपलब्ध होते. त्याचबरोबर विपूल सागरी किनारपट्टी लाभल्यामुळे जहाजबांधणीचा उद्योग येथे विकसीत झाला. ग्रीसमधील डोंगराळ प्रदेश व मर्यादित शेतजमीन यामुळे तेथील लोक मेंढ्यापालनाचा व्यवसाय करत. कापूसापासून सूत कातने, कापड विणने व लोकरीचे कपडे तयार करणे इत्यादी कामे स्त्रिया करीत असत. निसर्गामध्ये संगमरवरी दगड निर्यात करणे हाही एक मोठा उद्योग होता.
🌺कला व स्थापत्य
                                        ( N•R•Sable)              निसर्गाचे वास्तववादी चित्रण हे ग्रीक कलेचे वैशिष्ट्य होय. ग्रीकांनी बांधलेल्या मंदिरातून त्यांच्या कलात्मकतेची व भव्यतेची जाणीव होते. ग्रीक वास्तुतज्ज्ञांनी स्तंभाच्या विविध प्रकारांचा मोठ्या कुशलतेने व कलात्मकतेने वापर केला आहे. ग्रीकांनी अनेक मनमोहक शिल्पे तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी संगमरवरी दगडाचा वापर केला. ग्रीक शिल्पांची वौश्ष्ट्ये पाहतांना त्यांची प्रमाणबद्धता यामधून दिसणारे शरीररचनेचे सूक्ष्म दर्शन व मानवी भाव-भावनांचा अविष्कार करण्याचे त्यांचे कौशल्या या बाबी दिसून येतात. ग्रीक वास्तुकला व शिल्पकला या बऱ्यात अंशी ग्रीकांना महत्तवपूर्ण वाटणाऱ्या पुराणकथांवर आधारलेल्या आहेत.
🌺धर्मकल्पना
झूस हा ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव होय. याबरोबर ग्रीक लोक हेरा, अपोलो, ॲथेना, व्हिनस, मर्क्युरी या देवतांची पूजा करत. ग्रीक संस्कृतीत प्रत्येक नगराची एक स्वतंत्र्य देवताही असे. प्रत्येक देवताला एक परंपरा असून त्याचा संबंध भौगोलिक परिस्थितीचा व समाजजीवनाशी होता. देवतांना पशुबळी दिला जात असे. धार्मिक विधीमध्ये प्रामुख्याने स्त्रिया पौरोहित्य करत. तसेच ग्रीकांचा मरणोत्तर जीवनावर व स्वर्ग-नरक या कल्पनांवरही विश्वास होता.


क्रीडा                         🌺:( N•R•Sable)           क्रीडा क्षेत्रात ग्रीकांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. दर चार वर्षांनी सर्व ग्रीक नगरराज्यातील खेळाडू ऑलिम्पिया या ठिकाणी एकत्र येत. तेथे त्यांच्यात विविध खेळांच्या स्पर्धा होत. या सामन्यांसाठी आॅलिपिंया येथील वनश्रीयुक्त जागेची निवड करण्यात येऊन तेथे ग्रीकांचे मुख्य दैवत झूसचे भव्य मंदिर बांधण्यात आले. मंदिरात झूसचा १२.१९ मीटर उंचीचा सुवर्ण व हिरेमाणकांचा पुतळा उभारला. दर चार वर्षांनी उन्हाळ्याच्या मध्यात झूसच्या उत्सवार्थ ऑलिम्पिक सामने भरवण्यात येत. सामन्यात धावने, भालाफेक, थाळीफेक, कुस्ती, कसरती इत्यादींचा समावेश असे. या आॅलिंपिक क्रीडा स्पर्धांच्या काळात सर्व युद्धांना बंदी घालण्यात येई. आॅलिंपिक क्रीडा स्पर्धा म्हणजे सदभावना, मैत्री व शांतता यांचे प्रतीक मानले जाई. आजच्या ऑलिम्पिक स्पर्धांचे मूळ प्राचीन ग्रीक कथेत आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
ब ) भारत 
हडप्पा संस्कृती 
: हडप्पा संस्कृती
हडप्पा संस्कृतीकालीन शिल्पकला
हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पूर्व २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात.
उत्खननात हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोळावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले.
🌺नगररचना
 हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे, जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते. प्राचीन इजिप्त व मेसोपोटेमिया या समकालीन संस्कृतींच्या अगदी विरुद्ध हडप्पामध्ये कोणतीही भव्य मंदिरे किंवा तत्सम बांधकामे नव्हती. हडप्पाकालीन नगराची विभागणी प्रशासकीय इमारती व लोकवस्ती अशा दोन घटकांत करण्यात आलेली होती. शहराच्या लोकवस्तीचा भाग बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे किंवा जाळीप्रमाणे विविध प्रभागांमध्ये विभागला होता. नगर बांधणीसाठीच्या विटा ४:२:१(लांबी:रुंदी:उंची) या प्रमाणातच असत.[१]
                                           🌺घरे
 हडप्पा संस्कृतीत प्रत्येक प्रभागात २० ते ३० घरे असत. ती पक्क्या विटांची असून प्रशस्त होती. प्रत्येक घरामध्ये स्नानगृह असे. काही घरांच्या परसात विहिरी आढळल्या आहेत. घरांच्या मध्यभागी, जसे आजही वाड्यांच्या व इतर भारतातील पारंपरिक घरांमध्ये असते, तसे.अंगण असे. [२] घरे एक किंवा दोन मजली असत. फारच क्वचित याहून अधिक मजले असत.
तटबंदी

हडप्पाकालीन नगरांना संरक्षक तटबंदी असे. तटबंदी रुंद असून तिचे बांधकाम पक्क्या विटांचे असे. तटबंदीला बुरूज होते. यावरून हडप्पा संस्कृतीने नगराच्या संरक्षणाकडे लक्ष दिल्याचे दिसते.
रस्ते
 शहराच्या प्रभागाकडून जाणारे रस्ते मुख्य रस्त्यांना जोडलेले असत. रस्ते पुरेसे रुंद असून ते एकमेकांना काटकोनांत छेदणारे होते. रस्त्यांच्या कडेला सापडलेल्या लाकडांच्या अवशेषांवरून रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय असावी असे दिसते.
सांडपाण्याची व्यवस्था

हडप्पा संस्कृतीत सांडपाणी व पावसाचे पाणी गावाबाहेर वाहून नेण्यासाठी एक मीटर खोल भुयारी गटारांची व्यवस्था होती. ही गटारे दगड व पक्क्या विटांनी बांधलेली होती. कोणत्याही समकालीन संस्कृतीमध्ये न आढळणारी सांडपाण्याची व्यवस्था हडप्पा संस्कृतीत पाहावयास मिळते.
                                      🌺  (N•R•Sable)   🌺महास्नानगृह व जहाजाची गोदी

मोहनजोदडो येथे उत्खननात सापडलेले महास्नानगृह
हडप्पा संस्कृतीत सार्वजनिक स्नानगृहे होती. मोहनजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. स्नानगृहाचे वापरलेले पाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती. यावरून हडप्पा संस्कृतीतील लोक आरोग्याबाबत किती दक्ष होते हे दिसून येते.
लोथल येथील उत्खननामध्ये एका प्रचंड गोदीचे अवशेष सापडले. या गोदीची लांबी २७० मीटर तर रुंदी ३७ मीटर आहे. या गोदीवरून जहाजबांधणी, व्यापार, व्यापारीमार्ग यांची माहिती या संस्कृतीमधील लोकांना होती असे दिसून येते. येथे सापडलेल्या एका मुद्रेवर जहाजाचे चित्र कोरले आहे. तसेच लोथल येथे पक्क्या विटांनी बांधलेली धान्य कोठारे सापडली आहेत. यावरून कृषी व व्यापार क्षेत्रातील त्यांची प्रगती लक्षात येते.
🌺( N•R•Sable)            🌺 समाजरचना

हडप्पा संस्कृतीत कुटुंबसंस्था महत्त्वाची होती. नगररचनेच्या अवशेषांवरून समाजात राज्यकर्त्यांच्या वर्ग, व्यापारी वर्ग व सर्वसामान्यांचा वर्ग असल्याचे दिसते. नद्यांच्या काठी सुपीक प्रदेशात ही संस्कृती विकसित झालेली असल्याने शेती हा समाज जीवनाचा कणा होता.
वेशभूषा-केशभूषा

हडप्पा संस्कृतीधील मातीच्या भांड्यांवर मिळालेले कापडाचे ठसे, मृण्मयमूर्तीवर दाखवलेले वस्त्र, उत्खननात मिळालेल्या विविध आकारांच्या सुया यावरून लोकांना वेशभूषेचे चांगले ज्ञान असल्याचे दिसते. तसेच तत्कालीन मूर्तींवरून केशभूषेची माहिती मिळते. पुरुष दाढी कोरत, मधोमध भांग पाडत तर स्त्रिया विविध प्रकारची केशरचना करत असत.
सौंदर्यप्रसाधने
 हडप्पाकालीन संस्कृतीच्या उत्खननात एक शृंगारपेटी मिळाली. यामध्ये ब्राॅन्झचे आरसे, हस्तिदंती कंगवे, केसासाठी आकडे, पिना, ओठ व भुवया रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगाच्या कांड्या मिळाल्या. हडप्पाकालीन लोकांना सौंदर्यप्रसाधनांप्रमाणेच अलंकाराची आवड होती. उत्खननामध्ये मण्यांचे व सोन्याचे हार, बांगड्या, अंगठ्या, वाक्या, कमरपट्टा इत्यादी अलंकार मिळाले तसेच नर्तकीचा ब्राँझचा पुतळा मिळाला. तिच्याही हातात बांगड्या व गळ्यात हार आहे.
करमणुकीची साधने

हडप्पाकालीन लोकांची सोंगट्या, फासे ही करमणुकीची साधने होती. नृत्य, गायन, शिकार व प्राण्यांच्या झुंजी इत्यादींमधून करमणूक केली जाई. लहान मुलांसाठी भाजक्या मातीची सुबक खेळणी बनवली जात. डोक्याची पुढेमागे हालचाल करू शकणारा बैल, बैलगाडी, पक्ष्यांच्या अाकाराच्या शिट्या, खुळखुळे इत्यादींचा यात समावेश होतो.
                                        🌺( N•R•Sable) 🌺धर्मकल्पना
हडप्पा संस्कृतीत उत्खननात सापडलेल्या विविध मुद्रा, मूर्ती, अग्निकुंड, मृतांना पुरण्याची पद्धत यावरून त्यांच्या धार्मिक कल्पनेची माहिती मिळते. लोकांची प्रामुख्याने शेतीवरती उपजीविका असल्याने लोक भूमातेस मातृदेवता मानत. त्यांच्या धार्मिक जीवनात निसर्गशक्तीस महत्त्वाचे स्थान होते. सूर्य, जल, अग्नी, वृक्ष यांची ते पूजा करत. कालिबंगन येथे सापडलेल्या अग्निकुंडावरून ते अग्निपूजा करत असल्याचे दिसते. निसर्गदेवतेप्रमाणेच पशुपती, नाग, वृषभ म्हणजे बैल यांचीही ते पूजा करत होते. लोक मूर्तिपूजक होते, मात्र हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळली नाहीत. तेथील लोक मृतदेहाचे विधिपूर्वक दफन करत. दफन करते वेळी त्यांचे सोबत अलंकार व भांडी ठेवली जात.

🌺( N•R•Sable)     🌺आहार

तेथील लोकांचा प्रमुख आहार गहू होता. त्याचबरोबर जव, तीळ, वाटाणा, यासारखी दुय्यम धान्ये सुद्धा पिकवीत असत. खजुराचा उपयोगही ते अन्न म्हणून करीत असत. येथील लोक पशू बाळगीत त्यामुळे दूधदुभत्यांचा पुरवठा त्यांच्याकडे होत असावा. तसेच मांसाहारही केला जात असे.
खेळणी

मुलांच्या खेळण्यात हत्ती, निरनिराळे प्राणी, तसेच चाकांच्या मातीच्या गाड्या इत्यादी आढळून आल्या. त्यामुळे प्रत्यक्षात वाहतुकीला योग्य अशा गाड्या अस्तित्वात असाव्यात असा तर्क केला जातो.
वजन आणि मापे

येथील लोक अनेक प्रकारच्या वजनांचा उपयोग करीत. त्यांत दोराने उचलण्याच्या वजनापासून ते सोनाराने उपयोगात आणलेल्या लहानशा वजनापर्यंतचा समावेश होता.
                                    🌺( N•R•Sable)      🌺घरगुती उपकरणे

कुंभाराच्या चाकावर बनवलेली सुंदर मातीची भांडी येथे आढळली. त्यांवर नक्षीकाम केलेले होते. याशिवाय तांबे, ब्रांझ आणि चांदीची भांडी सापडली, परंतु याचे प्रमाण मात्र अत्यल्प होते.
कुटुंब पद्धती

हडप्पा संस्कृतीचा विनाश

या संस्कृतीच्या विनाशाची अनेक कारणे सांगितली जातात.
१) नैसर्गिक संकटामुळे -

नदीला आलेला पूर/अतिवृष्टी भूकंप हवामानात होणारा बदल[३] जमिनीची सुपिकता घटली थर वाळवंट विस्तारल्याने सरस्वती नदी लुप्त होणे [४]
२) बाह्य आक्रमणे -
आर्यांचे आक्रमण युयुत्सु लोकांचे आक्रमण
३) तंत्रज्ञानावरील मक्तेदारी संपली.
४) राजकीय विघटनामुळे नाश
५) आर्थिक विघटनामुळे नाश
६) कायदा व सुव्यवस्था नसावी
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
२ ) वैदिक संस्कृती 
🌺 हडप्पा) संस्कृतीचा काळ इ.स.पू ३२०० ते १६०० पर्यंत सांगीतला जातो, व साधारण ई,स.पू २००० ते १६०० मध्ये पर्यावरणामध्ये प्रतिकुल बदल होत होत सिंधु-सरस्वती घाटीची सभ्यता नष्ट झाली असे मानले जाते.

* सिंधू (हडप्पा) संस्कृतीचा काळ इ.स.पू ३२०० ते १६०० असा मानला तर ऋग्वेदाचा काळ १६०० च्या पुढे निश्च्ति केला जातो, कारण ना ऋग्वेदा मध्ये सिंधु परिस्थितिचा संदर्भ येतो आणि ना सिंधु काळामध्ये काही वैदीका प्रमाण मिळतात.

* ऋग्वेदाची रचना सरस्वती नदी अस्तित्वात असताना झाली आहे हे स्पष्टच आहे , आणि सरस्वती नदीच्या खालच्या भागातील पाणी इ.स.पू २००० पासुन आटू लागले याचाच अर्थ ऋग्वेदाची रचना ई.स.पू २००० पुर्व झाली असली पाहीजे हे स्पष्ट होते.
* पण काही विद्वान ऋग्वेदाचा काळ इ.स.पू १६०० च्या पुढे असावा असे मानत नाहीत , ऋग्वेद काळ बरेचजण ई.स.पू ४००० ते १०००० इतका मागे नेतात. [ काही जन भुगर्भशास्त्राचे प्रमाण देवून ऋग्वेदाचे काही श्लोक हे २५०००० वर्षापुर्वीचे असावेत असे मत मांडतात हे इथे प्राकर्शाने मांडावे वाटते ]

* ऋग्वेदाचा काळ हा सिंधु / हडप्पा संस्कृती नंतरचा असे मानन्यात अडचण ही आहे की जेथे वातावरणातील आणि पर्यावरणातील प्रतिकूल बदलामुळे हडपा संस्कृतीतील सिंधु-सरस्वती वासीयांना स्थलांतरीत होण्यात भाग पाडले ( काळ साधारन ई.स.पू १७०० - १६०० ) त्याच काळानंतर म्हणजे पर्यावरण प्रतिकुल असतानाच त्याच ठिकाणी ( सिंधु-सरस्वतीचे खोरे ) वैदीकांनी आपले वस्थिस्थान वसवले हे पटत नाही व त्यानंतर रामायण महाभारतादी घडले असे जर मान्य केले तर पुरातत्विय उत्त्खननांमध्ये कोणतेही वैदीक अवषेश (Archaeological evidence) आढळलेले नाहीत, पण त्याच्यापेक्षाही जुण्या हडप्पा संस्कृतीचे अवषेश सापडतात , असे का? .

* आणि असे जर असेल तर रामायण महाभारतादी काव्हे ही फक्त मिथक आहेत असे मानावेल लागेल , 
🌺आर्याच्या भारतप्रवेशानंतर सुमारे १५०० वर्षे त्यांचा अनार्याबरोबर संघर्ष, लढाया आणि ‘आर्य व अनार्याचा सम्मीलित समाज तयार होण्याची प्रक्रिया’ चालू होती. याच दीर्घ काळात हिंदू धर्मात ज्यांना अपौरुषेय व पूज्य मानले जाते, त्या चार वेदांच्या रचना झाल्या व त्या पाठांतराने टिकविण्यात आल्या. (कारण आर्याजवळ लिहिण्याची लिपी नव्हती.) पुढील ५०० वर्षांत वेदांचेच विस्तार मानले जाणारे ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे हे ग्रंथ रचले गेले. त्यापैकी उपनिषदांना वेदान्त असे म्हटले जाते. हा सर्व सुमारे दोन हजार वर्षांचा काळ इ.स.पू. ३००० पासून इ.स.पू. १००० पर्यंत असावा. यालाच वेदकाळ किंवा ऋग्वेदकाळ असेही म्हणतात. कारण चार वेदांपैकी ऋग्वेद हा प्रमुख, सर्वात मोठा, प्रथम रचना सुरू झालेला व पूर्णत: स्वतंत्र वाङ्मय असलेला आहे.
या काळाच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये भारतात आर्य लोकांच्या वस्त्या सात नद्या ओलांडून, गंगेच्या खोऱ्यापर्यंत पसरलेल्या होत्या. त्यामुळे विशेषत: उत्तर भारतात त्या काळी काय घडून गेले असावे ते समजण्यासाठी आपल्याला ऋग्वेदाचा आधार उपलब्ध आहे. वेगवेगळ्या पिढय़ांतील सुमारे ४०० ऋषींनी सुमारे १५०० वर्षांत रचलेला हा ऋग्वेद, मानवजातीचा ‘आद्य ग्रंथराज’ ठरतो. पण त्याच्या फार प्राचीन भाषेमुळे तो काहीसा दुबरेधही झालेला आहे. अलीकडेच कालवश झालेले रघुनाथ द. जोशी या मोठय़ा वेदाभ्यासी पंडिताने अत्यंत चिकित्सक बुद्धीने व ऐतिहासिक दृष्टी ठेवून रचलेला ‘अनोखा परिचय ऋग्वेदाचा आणि उपनिषदांचा’ हा ‘टिळक विद्यापीठ पुरस्कारप्राप्त’ ग्रंथ आधारभूत मानून संकलित केलेली काही माहिती मी खाली देत आहे.
                                    🌺( N•R•Sable)              १) इ.स.पू.१२००-१३००च्या सुमारास होऊन गेलेल्या व्यास (म्हणजेच वेदव्यास) या वेदवेत्त्याने, त्याच्या काळापर्यंतच्या सुमारे दीड हजार वर्षे पठणात असलेल्या सर्व वेदवाङ्मयाचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद असे चार भाग केले असे मानले जाते. व्यासांनी ज्या ऋचांचा संग्रह ऋग्वेद म्हणून निश्चित केला त्याला ऋग्वेद संहिता असे म्हणतात.
२) ऋग्वेद संहितेतील दहा मंडलांमध्ये, दहा हजारांहून अधिक ऋचा, हजाराहून अधिक (१०२८) सूक्तांमध्ये विभागलेल्या आहेत. त्यापैकी बहुतांश सूक्ते १) इंद्र या प्रमुख देवावर २) अग्निदेवतेवर ३) ‘सोम’ या उत्तेजित करणाऱ्या एका पेयावर आणि ४) सूर्य, मरुत, उषा इत्यादी देवतांवर आहेत. सर्व ऋषींनी मानवी जीवनाशी संबंधित नैसर्गिक घटनांना विविध देवता व त्यांची कृत्ये असे मानून त्यांच्याकडे केलेल्या मागण्या हेच बहुतेक सूक्तांचे विषय आहेत. त्या मागण्या बहुश: संततीसाठी, अन्नासाठी, संरक्षणासाठी व धनासाठी म्हणजे ऐहिक जीवन सुखी होण्यासाठी आहेत. आर्य लोक निसर्गपूजक, सूर्यपूजक व अग्निपूजक होते. शिवाय ते जीवनातील साध्यासुध्या वस्तूंनाही देवत्व देत असत. त्यांची कसलीही मंदिरे नव्हती व त्यांच्या पुढील काळांतील वंशजांप्रमाणे ते मूर्तिपूजकही नव्हते.
: ३) आर्याच्या आणि नंतर सम्मीलित झालेल्या संमिश्र समाजातही स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान नसावे. त्यांनी स्त्रियांची सामाजिक प्रतिष्ठा शूद्रांसारखी कमी मानलेली होती. त्यांच्या दानवस्तूंमध्येसुद्धा स्त्रिया असत.
४) सर्व देवांच्या मागे एकच सर्वश्रेष्ठ शक्ती किंवा मूलतत्त्व असावे असे काही वेदकर्त्यां ऋषींना तरी वाटत होते. सर्व देवांकडे पोचण्याचा यज्ञ हा त्यांचा जादूसारखा मार्ग होता. यज्ञात अर्पिलेली आहुती, अग्नी त्या त्या देवाकडे पोचवितो असे त्यांना वाटत होते. त्यांच्या वेदऋचांमध्ये मोठे सामथ्र्य असून, वेदमंत्रयुक्त यज्ञ करून पाऊस पडतो. पुत्रकामेष्टी यज्ञ करून निश्चयाने पुत्रप्राप्ती होते, गायत्री मंत्राने सिद्धी प्राप्त होतात, महामृत्युंजय मंत्राने मृत्यूवर विजय मिळतो अशा त्यांच्या अंधश्रद्धा होत्या. तत्कालीन मनुष्यजातीच्या भौतिक शास्त्रविषयक अज्ञानपातळीमुळे वेदमंत्र सामर्थ्यांवरील त्यांचा विश्वास क्षम्य म्हणता येईल.

५) सूर्याभोवती पृथ्वी नव्हे, तर पृथ्वीभोवती सूर्य फिरतो असे तत्कालीन ऋषींना वाटत होते, असे ऋग्वेदांतील काही ऋचांवरून स्पष्ट दिसून येते.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
जैन धर्म 
🌺 जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व 599 मध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला होते. बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात पूर्वीचे वैशाली होते. 
भगवान वर्धमान यांच्या भावाचे नाव नंदिवर्धन तर बहिणीचे नाव सुदर्शना होते. त्यांचे बालपण राजेशाही थाटात गेले. आठ वर्षांचे असताना त्यांना शिक्षण व शस्त्रविद्येचे ज्ञान घेण्यासाठी शाळेत पाठविण्यात आले.
श्वेतांबर पंथाच्या म्हणण्यानुसार भगवान वर्धमान यांनी यशोदा यांच्याशी विवाह केला होता, तर दिगंबर पंथाच्या म्हणण्यानुसार त्यांनी विवाह केला नसून ते ब्रम्हचारी होते. महावीरांचे कुटुंबीय जैनांचे तेवीसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते.
भगवान महावीर 28 वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली. त्यानंतर बहुतांश वेळ ते ध्यानात मग्न असत. काही दिवसांनी त्यांनी पूर्ण आत्मज्ञान झाले. त्यांनी बारा वर्षांपर्यंत मौन पाळले होते. हटयोग्याप्रमाणे त्यांनी शरीराला खूप कष्ट दिले.
शेवटी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांनी त्यावेळी लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अर्धमागधी भाषेचा आधार घेतला. इंद्रिय व व विषय वासनांचे सुख दुसर्‍याला दुःख देऊनच मिळवता येते, असे त्यांचे मत होते.
त्यामुळेच त्यांनी जैन धर्माच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या बाबींमध्ये ब्रम्हचर्याचाही समावेश केला. त्याग, संयम, प्रेम, करूणा, शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहे. त्यांनी चतुर्विध संघाची स्थापना करून समता हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितले.
देशात ठिकठिक
                            🌺(साबळे सर)                 के लिए पाँच व्रत बताए गए है। तीर्थंकर आदि महापुरुष जिनका पालन करते है, वह महाव्रत कहलाते है [2]-

अहिंसा - किसी भी जीव को मन, वचन, काय से पीड़ा नहीं पहुँचाना।
सत्य - हित, मित, प्रिय वचन बोलना।
अस्तेय - बिना दी हुई वस्तु को ग्रहण नहीं करना।
ब्रह्मचर्य - मन, वचन, काय से मैथुन कर्म का त्याग करना।
अपरिग्रह- पदार्थों के प्रति ममत्वरूप परिणमन का बुद्धिपूर्वक त्याग।[3]
मुनि इनका सूक्ष्म रूप से पालन करते है, वही श्रावक स्थायी रूप से करते है।
 🌺सम्यक् दर्शन
सम्यक् ज्ञान
सम्यक् चारित्र
यह रत्नत्रय आत्मा
🌺जैन धर्म
प्रार्थना आणि प्रतिज्ञा
नवकार मंत्र · अहिंसा ·
ब्रम्हचर्य · सत्य · निर्वाण ·
अस्तेय · अपरिग्रह · अनेकान्तवाद
कळीच्या संकल्पना
केवलज्ञान · त्रैलोक्यविज्ञान · संसार ·
कर्म · धर्म · [[मोक्ष|]] ·
गुणस्थान · नवतत्व
प्रमुख व्यक्ती
२४ तिर्थंकर · रिषभ ·
महावीर · आचार्य  · गंगाधर ·
सिद्धसेन दिवाकर · हरीभद्र
क्षेत्रानुसार जैन धर्म
भारत · पाश्चिमात्य
पंथ
श्वेतांबर · दिगांबर · तेरापंथी ·
Early Jainist schools · स्था
                                     🌺( N•R•Sable)             🌺 पंचमहाव्रते


सत्य - सत्य म्हणजे नेहमी खरे बोलावे. अहिंसा - अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाची हत्या करू नये. अस्तेय - अस्तेय म्हणजे चोरी करू नये. अपरिग्रह - अपरिग्रह म्हणजे द्रव्यसंग्रह करू नये, स्वार्थी वृत्तीचा त्याग करावा. ब्रह्मचर्य - मनामध्ये कामवासना बाळगू नये.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
बौध्द धर्म  
गौतम बुध्द 

गौतमबुद्धांच्या जन्म विसाव्या शतकातल्या इतिहासकारांच्या मते, इ.स.पू. ५६३ ते इ.स. पू. ४८३ हा त्याचा जीवन काळ असावा. अलीकडील काळातील संशोधक विद्वानांनी ठामपणे व्यक्त केलेल्या मतानुसार, बुद्धाच्या मृत्यूचा सन इसवी पूर्व ४०० च्या जवळपास असावा.
शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) -हे गौतमाचेच दुसरे नाव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ. त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने, आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतमबुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले . गौतमद्धांच्या मानल्या जाणार्‍या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली.
                                     🌺( साबळे सर)                    सिद्धार्थाचे जन्मस्थळ- लुंबिनी आणि त्याचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी , सध्याच्या नेपाळ मध्ये आहे. त्याची मातृभाषा पाली होती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. बौद्ध धर्मीय वाङमयानुसार, त्याचा पिता राजा शुद्धोदन शाक्य या कोशल प्रांतात निवास करणारा राजा होता. लोक कथेनुसार शुद्धोदन हा सूर्यवंशीय इक्ष्वाकू घराण्याचा वंशज होता. राजा शुद्धोदनाची पत्‍नी राणी महामाया ही सिद्धार्थाची आई. शाक्यांच्या चालीरितींनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली. हा दिवस थेरवाद राष्ट्रे वेसक म्हणून साजरा करतात. सिद्धार्थ जन्मानंतर काही दिवसांनी महामायेचे निधन झाले. बाळाचे नांव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले.
                                         ,🌺(साबळे सर)                   🌺राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजान्तवैभव आणि राजसुलभ अशा सुखवैभवाचा जणूकांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केला होता. त्याने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ इच्छा होती.
सोळावे वर्ष प्राप्त झाल्यावर शुद्धोदनाने सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी लावून दिला. यथावकाश, तिने एका मुलास जन्म दिला. त्याचे नांव राहुल असे ठेवण्यात आले. धनवैभव, मानमरातब, प्रेमळ पत्‍नी, राजस पुत्र. सौख्यास कांहीही कमी नाही असे २९ वर्षांचे आयुष्य, सिद्धार्थाला त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत चालले होते.
                                    🌺 (साबळे सर )           🌺लोककथा सांगतात की एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. त्याच्या सारथ्याच्या -चन्नच्या अडविण्यास न जुमानता, हाती रथाचे सूत्र घेऊन, सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघालेला योगी खर्‍या जगाकडे रथ दौडत निघाला. त्याच्या आयुष्याचा सांधा बदलायची वेळ आली होती. आजवर त्याची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती. पण आज त्याने त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले वास्तव पाहिले. घर भरून उरणारे दारिद्र्‍य त्याने पाहिले. प्रथमच, जीर्ण शरीराचा रुग्ण पाहिला, जराजर्जर वृद्धत्व पाहिले. एक प्रेतयात्रा त्यास दिसली. चन्नने त्यास सांगितले, की या सार्‍या जीवमात्राच्या अटळ अशा स्वाभाविक अवस्था आहेत. त्याच्या मर्यादित जगाच्या संदर्भात या जाणिवांना जागाच नव्हती. या गोष्टींचा त्याला अर्थ लागेना. तो सुन्न होऊन गेला. आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात आकंठ बुडालेले आहे हा त्याला साक्षात्कार झाला. त्यानंतर त्याने एक संन्यासी त्याने पाहिला आणि त्याची झोप उडाली, सुखात मन रमेनासे झाले. आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटळ असेल तर कठीण आहे असे त्याच्या मनाने घेतले. यांतून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरविले. २९व्या वर्षी एका पावसाळी रात्री, प्रिय पत्‍नी यशोधरेचे ओझरते, अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुंबून सिद्धार्ध राजवाड्याबाहेर निघाला. त्याच्या सोबतीला सारथी चन्न कंथक नामक घोड्यासह उभा होता. चन्‍नाने कंथकाच्या टापांचा आवाज होऊ नये म्हणून त्याचे खूर कापडात बांधले होते.
🌺 (साबळे सर )                    सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला. या संन्याशाला मगध देशाच्या राजा बिंबिसाराच्या सैनिकांनी ओळखले. राजा बिंबिसाराने त्याची थोरवी जाणून त्याला आपले सिंहासन नजर केले. त्यास नकार देत सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन दिले.
ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एकापाठोपाठ दोन गुरूंचे शिष्यत्व पत्करले. अध्यात्ममार्गातील त्याची प्रगती पाहून, दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले. परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणार्‍या सिद्धार्थाने त्या दोघांसही नकार दिला आणि आपला आत्मशोधाचा मार्ग तो चालू लागला.
सिद्धार्थ आणि इतर पाच सहसंन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला. ऐहिक सुखाचा पूर्णं त्याग हे सूत्र त्यांनी धरले. अन्नपाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेषी हा मार्ग अतिशय बिकट होता. अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले. शरीर क्षीण होऊन गेले. एके दिवशी स्नान करीत असता झोक जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला, तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली.या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्याने आता ध्यानाचा मार्ग पत्करल   🌺धर्मग्रंथ-
बौद्ध धर्माची मूळ तत्वे ही आहेत- चार आर्य सत्ये, अष्टांगिक मार्ग, निर्वाण. बुद्धाने आपली शिकवण पाली भाषेत दिली. ती त्रिपिटीकामध्ये संकलित केली आहे. त्रिपिटक तीन भागात आहे. विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. या पिटकांमध्येही अनेक उपग्रंथ आहेत. सुत्तपिटकमध्ये धम्मपदे आहेत. धम्मपदे लोकप्रिय आहेत.
बौद्ध तीर्थ-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
अष्टांग मार्ग
१) सम्यक दृष्टी (अंधविश्‍वासापासून व भ्रमापासून मुक्त असलेली दृष्टी)
२) सम्यक संकल्प (बुध्दिमान मनुष्याला योग्य असे उच्च विचार)
३) सम्यक वाचा (सत्ययुक्त, दयेने भरलेली आणि निष्कपट असलेली वाणी)
४) सम्यक कर्म (शांत, प्रामाणिक व शुध्द असलेले कर्म)
५) सम्यक आजीव (कुणालाही दु:ख न देणारी व प्रामाणिक अशी उपजीविका)
६) सम्यक व्यायाम (स्वत:ला वळण लावण्याचा व स्वत:वर ताबा मिळविण्याचा प्रयत्न)
७) सम्यक स्मृती (मन नेहमी जागृत आणि सावध ठेवणे.)
८) सम्यक समाधी (जीवनातील सत्याविषयी सखोल मनन-चिंतन करणे)
- गौतम बुध्द
तत्त्वज्ञानाची योग्यताच अशी आहे की, त्यावर राजकीय सत्ता चालू शकणार नाही. उलट ते मात्र आपला सर्वत्र अंमल बसवील.
           Sable Sir
१. पहिले आर्यस्त्य - दुःख 
दुःख तथा विफलता दैनंदिन जीवनातील प्रश्नांशी निगडीत आहे. जन्म वृद्धत्व, आजार, मृत्यु, क्लेष आणि सर्वप्रकारचे वैफल्य म्हणजे दुःख होय. अनावश्यक वस्तुची प्राप्ती तथा आवश्यक वस्तुची अप्राप्ती म्हणजे दुःख होय. हे प्रश्न इच्छा नसणारे प्रश्न आहेत. लोक हे प्रश्न टाळण्यासाठी त्यांच्यापरीने प्रयत्न करतात व त्यापासुन मुक्तता मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. हे आर्यसत्य समस्यांशी निगडीत आहे. हे आर्यसत्य प्रतीपादन करुन.समस्याविषयक परिस्थीती व तिचे आकलन विषयी मदत करते. ह्या करीता प्रथन आत्मपरिक्षण आवश्यक आहे. आत्मपरिक्षणा शिवा हे सत्य पुर्ण होत नाही. काळजीपुर्वक निरिक्षणावरुन स्पष्ट होते की जीवन हे अस्थिर आहे.
२. दुसरे आर्यसत्य - दुःखाचे मुळ

बुद्धाने दुःखाच्या उगमस्थानाविषयी सांगितलेले आहे की, प्रत्येक दुःखाच्या मुळा शी उत्कट इच्छा (तृष्णा) असते. त्याचा परिणाम म्हणजे अज्ञान व भ्रांती होय. उत्कट इच्छा आनंद प्राप्तीकरीता, अस्तित्वाकरीता किंवा आत्मनाशाकरीता असु शकते.
आपली तीव्र इच्छा हिच मुळ दुःखाचे कारण होय. उदा. राहुलला मोटारकार हवी आहे, तो त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो, १५, १६ तास अविश्रांत काम करतो. पैसा मिळवितो. श्रम पडल्यामुळे आजारी पडतो, त्याला दुःख होते. यावरुन तीव्र इच्छा ही मुळ दुःखाचे कारण आहे. सामान्य माणसाने आहे त्यात आनंद मानुन जीवन प्रवाह चालु ठेवावा. म्हणजे गरीबांनी गरीबच राहावे असे नाही, तर मध्यम मार्गाचा अवलंब करावा...
             Sable Sir
३. तिसरे आर्यसत्य - दुःख निररोध
बुद्ध धम्माचा मुळ उद्देश आहे तो दुःख निरोध. लोभ द्वेष व भ्रम यांचा शेवट करणे हा मुळ हेतु आहे. जेव्हा तृष्णा तथा उत्कट इच्छेची जागा निर्वाण घेईल त्यावेळी शाश्वत आनंद प्राप्त होतो. लोभ, द्वेष व भ्रम यांना क्षीण करण्यासाठी मनुष्याने धम्म जाणला पाहिजे, तो आचसणात आणला पाहिजे. आर्य अष्टांगिक मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्याशिवाय तृष्णा क्षीण होत नाही.

४. चौथे आर्यसत्य - दुःख निरोधासाठी मार्ग शोधणे 

बुद्धधम्म जीवनाचा मार्ग दर्शवितो. धम्म म्हणजे निती होय आणि नितीचा विकास म्हणजे दुःख निरोधन होय. केवळ नितीच आपल्याला निश्चित उद्दिष्टापर्यंत पोहोचवु शकते. आर्य सांगतात कि जगात दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखाचे निरोध केला पाहिजे आणि दुःखाच्या निरोधासाठी मार्ग आहे, त्यालाच धम्म शिकवणुकीप्रमाणे आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात. त्यात आठ घटकांचा समावेआहे.
*****************************************
N•R•Sable               इस्लाम धर्म

इस्लाम धर्माची स्थापना हजरत मुहम्मद पैगंबर यांनी ६१० साली सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात केली. इस्लाम अथवा मुसलमान हा एक अब्राहमीक धर्म असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांची संख्या आजमितीस अंदाजे १५० कोटी आहे. व लोकसंख्येनुसार जगातील दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील १३ कोटी इस्लाम धर्मीय भारतात आहेत व भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मुस्लीम लोकसंख्येचा देश आहे.
इस्लामची तत्वे

अल्लाह हा एकच इश्वर असून कोणीही त्यापेक्षा वरचढ नाही. ( ला इल्ह् हिल्लल्लाह् ) मुहम्मद हे अल्लाहचे शेवटचे प्रेषीत आहेत. (महम्मदे रसूल-अल्लाह) अल्लाह निराकार असून इस्लाममध्ये अल्लाहला इतर कोणत्याही स्वरुपात पूजणे मना आहे. दिवसातून पाच वेळा नमाज पढणे आयुष्यातून एकदा मक्केला भेट देणे. (हज) आपल्या मिळकतीतील १/४० मिळकत गोरगरीबांसाठी दान करणे. (जकात)
इस्लाम हा शब्द अरबी भाषेतील असून मूळ शब्द अस्लम ( अस् + अलम) असा आहे, ज्याचा शब्दश: अर्थ शरणागती पत्करणे व भावार्थ परमेश्वरापुढे श‍रणागती पत्करणे व त्या परमेश्वराला सर्वशक्तीमान म्हणून पुजणे. इस्लामच्या साधकाने इस्लामवरची श्रद्धा ही दाखवलीच पाहिजे त्यासाठी साधकाने परमेश्वराला पुजले पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत व अन्य कोणत्याही देव देवतांना ( अनेकेश्वरवाद) पुजले नाही पाहिजे.
मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे कि परमेश्वराने ( अल्लाहने) मुहम्मद पैगंबरा करवी कुराण उलगडवले. याकामी जिब्रराइल् या देव दूताने मदत केली व अश्या रितीने कुराण व मुहम्म्द पैंगबरांच्या चाली रिती व बोली ( सुन्नाह) इस्लामनुसार मूळ प्रमाण मानले जातात. तसेच इस्लाम हा नवीन धर्म नसून मुहम्मद पैंगबराकरवी अल्लाह ने अनादी कालापासूनच्या एकेश्वर धर्माचे पुनरुत्थान केले अशी मान्यता आहे.
                         N•R•Sable                 इस्लामनुसार मूळ प्रमाण मानले जातात. तसेच इस्लाम हा नवीन धर्म नसून मुहम्मद पैंगबराकरवी अल्लाह ने अनादी कालापासूनच्या एकेश्वर धर्माचे पुनरुत्थान केले अशी मान्यता आहे. इस्लामच्या आगोदरचे एकेश्वरवादी अब्राहमीक धर्म जे आज यहुदी व ख्रिस्ती धर्माने ओळखले जातात त्यांनी परमेश्वराने पाठवलेल्या आज्ञांचा, साक्षात्कारांचा चुकीचा व सोईचा अर्थ लावून पुर्वीचे धर्म ग्रंथ बदलले असे मानतात व खऱ्या एकेश्वर धर्माची मुहम्मद द्वारे पुनरुत्थान झाल्याचे इस्लामचे साधक मानतात.

इस्लाम मध्ये अनेक चालीरिती आहेत. इस्लामच्या साधकांना इस्लामचे पाच स्तंभ पाळावे लागतात. जी प्रमुख पाच कर्तव्ये आहेत ज्यांनी संपूर्ण मुस्लीम समाजाला बांधले आहे. या पाच स्तंभापलिकडे इस्लाम मध्ये इस्लामी समाजासाठी काळानुसार कायदे प्रणाली तयार झाली आहे ज्याला शरीयत कायदेप्रणाली असे ओळखले जाते. शरीयत कायदेप्रणाली मध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच चालिरिती व समाजाच्या सर्व अंगांना इस्लामी कायद्याच्या चौकटीत बसवून समाज जीवन शिस्तबद्ध केले आहे असे इस्लामचे साधक मानतात.

इस्लामचे दोन प्रमुख पंथ आहेत. शिया व सुन्नी. यातील सुन्नींचे प्रमाण जास्त असून एकूण इस्लामी लोकसंख्येच्या ८५ टक्के आहेत. तर उर्वरित १५ टक्के शिया व इतर पंथात मोडतात. या पंथातही अनेक उपप्रकार आहेत. शिया व सुन्नी ही मुहम्मद पैंगबराच्या म्रुत्यूनंतर इस्लाममध्ये धार्मिक व राजकिय वारसदार कोण याचा प्रश्न उद्भभवला होता.चारही खलीफांना मानणारे सुन्नी पंथाचे झाले तर चौथे खलीफांना मानणारे शिया पंथिय बनले.

No comments:

Post a Comment