भारताचा भूगोल

भारत 
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
भारत देशाचे भौगोलिक दृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.[१]

भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व नैरुत्य दिशेला वेगाने सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. [१] भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला. आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो. [२] [३] गंगेच्या खोर्‍याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो.अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. [४] पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो. [५] दख्खनचे पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे पर्वत आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालमुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी वर्षांपेक्षाही अधिक आहे.[६] भारताला एकूण ७,५१७ किलो मीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किलो मीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ किलो मीटर (१,३०१ मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.[७] भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११ टक्के खडकाळ तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला आहे.[७]

बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाउन मिळतात. [८] गंगेच्या मुख्य उपनद्यांमध्ये यमुना, कोसी, गंडकी इत्यादी आहेत. हिमालयातून जेव्हा सपाट प्रदेशात वाहू लागतात तेव्हा या नद्या मोठा पूर येण्याची शक्यता असते. दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी , कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी महत्वाच्या नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात्. मध्य भारतातून नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते.[९] [१०] पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खार्‍यापाण्याची दलदल आहे त्याला कच्छचे रण असे म्हणतात. गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. [११]. भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्विपसमूह भारताच्या अधिकारात येतात. दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्विप व बंगालच्या उपसागरातील बर्मा व इंडोनेशियाजवळील अंदमान आणि निकोबार. 
👧🏻🌅🌺👦🏻🌅👦🏻
**********************************
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
12 ) भारतीय हवामान हे हिमालय व थारचे वाळवंटाने प्रभावित आहे. हिमालय उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखून धरतो तर थारचे वाळवंट आणि हिमालय हे दोघेही भारतात मोसमी पाऊस पडण्यास जवाबदार आहेत. थारचे वाळवंट दक्षिणेकडील हिंदी महासागरातून बाष्प आकर्षित करते, या प्रभावामुळे मोसमी वारे वाहतात. जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैरुत्य मोसमी वार्‍यांमुळे संपूर्ण भारतभर पाउस पडतो तर इतर वेळ कोरडे हवामान असते. [१३] हिमालय कोरडे थंड वारे रोखून धरतो त्यामुळे भारताचे हवामान वर्षभर उष्ण असते. अगदी कडक हिवाळ्याच्या महिन्यातही दिवसाचे सरासरी तापमान जास्तच असते. [१४][१५] [१३] ढोबळमानाने चार विविध प्रकारचे हवामान भारतात आढळून येतात विषवृतीय आद्र हवामान, विषवृत्तीय शुष्क हवामान, समविषववृतीय आद्र हवामान व हिमालयीन प्रकारचे हवामान.
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
**********************************
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
भारत हा एक प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेला देश आहे. उत्तर भारतातील आर्यांच्या वास्तव्यामुळे यास आर्यावर्त म्हटले जाते. भरत राजाच्या आर्यांच्या शाखेमुळे भारतवर्ष नाव पडले तर वायव्येकडे वाहणा-या नदीस सिंधू नाव पडले. इरानी लोकानी सिंधू नदीचा उल्लेख हिंदू व भारताचा हिंदुस्थान असा केला- ग्रीक लोकांनी सिंधू नदीचा उल्लेख इन्डोस असा केला तर रुमानियन लोकांनी सिंधूस इंडस व भारतात इंडिया असे नाव दिले.

भारताचे स्थान :-

भारत पूर्व गोलार्धात मध्यवर्ती स्थानी आहे, तर दुस–या प्रकारे तो उत्तर गोलार्धात येतो. भारताच्या प्रचंड आकारामुळे त्यास उपखंड म्हणतात. भारतीय उपखंडात भारत, मालदिव, पाकिस्थान भुतान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका यांचा समावेश होतो. भारताची मुख्य भुमी आशिया खंडाच्या दक्षिणेस ८०४ उ. ते ३७०६ उ. अक्षांश ६८०७ पू. ते ९७०२५ पू. रेखावृत्तापर्यंत पसरलेली आहे. भारताचे अति दक्षिणेचे टोक म्हणजे इंदिरा पॉइंट ( ग्रेट निकोबार ) ६०३० उत्तर अक्ष वृत्तावर आहे. कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते. ( गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, प. बंगाल, त्रिपूरा, व मिझोराम ) भारताचे दक्षिण टोक विषुववृत्तापासुन ८७५ कि.मी. अंतरावर आहे. भारताची पूर्व – पश्चिम लांबी २९३३ कि.मी. असून उत्तर दक्षिण लांबी ३२१४ कि.मी. इतकी आहे.

भारताच्या सीमा व क्षेत्रफळ :-

भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. भारताने जगाचे २.४२ % क्षेत्रफळ व्यापले आहे. जगातील सर्वात मोठे देश आकारानुसार १) रशिया २) कँनडा ३) चीन ४) अमेरिका ५) ब्राझील ६) ऑस्ट्रेलिया व ७) भारत

भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी ६१०० कि.मी. आहे, तर एकूण समुद्री किनारपट्टीची लांबी ७५१६ कि.मी. आहे. भारताची जल सीमा किना–यापासुन १२ नॉटिकल मैल लांबी आहे. भारतात सर्वाधिक किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. यानंतर आंध्रप्रदेशाचा क्रमांक लागतो.

भारतास एकूण १५,१६८ कि.मी. लांबीची भू-सीमा लाभली आहे. ती खालील प्रमाणे-

संबंधित देश सीमेचे नाव लांबी संबंधित देश लांबी
चीन मॅकमोहन रेषा ४२५०कि.मी. नेपाल १०५० कि.मी.
पाकिस्थान रॅडक्लिफ लाईन ४०९०कि.मी. भूतान ०४७५ कि.मी.
बांग्लादेश रॅडक्लिफ लाईन ३९१०कि.मी. अफगाणिस्थान ————
ब्रम्हदेश ———— १४५०कि.मी. ———— ————

भारताच्या दक्षिण बाजूस हिंदी महासागर आहे. पश्चिम बाजूस अरबी समुद्र तर पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. समुद्रमार्गे श्रीलंका हा देश भारतास सर्वात जळ आहे. मन्नारचे आखात व पाल्कच्या सामुद्रधुनीमुळ श्रीलंका भारतापासून वेगळी झाली आहे.
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
**********************************
👧🏻भारताची प्राकृतीक रचना👦🏻

भारताचे प्राकृतिक दृष्ट्या खालील पाच भाग पडतात.

१) उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश

२) उत्तरेकडील मैदाने

३) द्विकल्पीय पठार

४) किनारी मैदाने

५) भारतीय बेटे

भारताचा १०.७% भाग पर्वतीय, १८.६% भाग डोंगराळ, २७.७% पठारी व ४३% भाग मैदानी प्रदेशाचा आहे.

भारतीय उपखंडाची निर्मितीः-

भारतीय उपखंड

भारतीय उपखंड

आल्फ्रेड वेगनर याने या विषयी भूखंड वहन सिधांन्त मांडला. सद्याच्या हिमालय व मैदानी भागात पूर्वी टेथिस नावाचा समुद्र होता. टेथिसच्या उत्तरेस लॉरेशिया (अंगारा भूमी) व दक्षिणेस गोंडवाना भूमी होती. या महासागराचा विस्तार भारत-म्यानमारच्या सीमेपासून अटलांटिक महासागरातील गिनीच्या खाडीपर्यंत होता. दोन्ही बाजूच्या जमिनीच्या झीज होऊन ती टेथिस महासागरात जमा झाली. दोन्ही भूखंडाच्या परस्परांकडे सरकण्यामुळे गाळास वळ्या पडून पर्वताची निर्मिती झाली. या पर्वताची झिज होऊन गाळ टेथिस समुद्रात जमा झाली. अशा प्रकारे मैदानांची निर्मिती झाली.

१) उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशः-

पर्वतमय प्रदेश

जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणार्‍या पामिर पठारापासून अनेक पर्वत श्रेणी निघालेल्या आहेत. यातील कुनलून पर्वत श्रेणी तिबेटकडे, तर काराकोरम काश्मिरकडे प्रवेश करते. यातच अक्साईचीनचे पठार आहे. बाल्टोरो व सियाचीन या येथील प्रमुख हिमनद्या आहेत. काराकोरमच्या दक्षिणेस अनुक्रमे लडाख व झास्कर पर्वत रांगा आहेत. कैलास पर्वतावर सिंधू नदी उगम पाऊन लडाख व झास्कर पर्वत रांगातून वायव्येकडे वाहत जाते.

हिमालय पर्वतः- सिंधू व ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्ये असणार्‍या पर्वत श्रेणीस हिमालय म्हणतात. याची लांबी २५०० किमी. असून रूंदी १५० ते ४०० किमी आहे. भारत-म्यानमार सीमेवर यास पूर्वाचल म्हणतात. हिमालयास तरुण पर्वत असे म्हणतात. भारतातून तिबेटकडे जातांना हिमालयाच्या खालील रांगा लागतात.

👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
**********************************
👦🏻सिंधु नदी👧🏻

अ) शिवालिक किंवा उपहिमालयः- ही सर्वात कमी उंचीची पर्वत रांग आहे. मॄदेची सर्वाधिक झीज हिमालयाच्या या सर्वात तरुण भागात होते.याची सरासरी उंची १००० ते १२०० मी व रुंदी १० ते ५० कि.मी. आहे. या रांगेस नद्यांनी अनेक ठिकाणी छेदले असुन त्यास पश्चिमेसडे डून (उदाः- डेहराडुन, कोथरीडून,) व पूर्वेकडे द्वार म्हणतात. (उदाः- हरीद्वार)

ब) लघु हिमालय/ मध्य/लेसर/ हिमालयः- याची सरासरी रुंदी ८० किमी व उंची ४००० ते ५००० मी. इतकी आहे. निसर्ग सौंदर्यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. उदाः- डलहौसी, धर्मशाळा, शिमला, मसुरी, नैनिताल, राणीखेत व दार्जिलिंग इ. यातच काश्मिर खोरे व काठमांडू खोरे आहे. यातील पर्वत उतारावरील गवताळ प्रदेशास काश्मिरमध्ये मग असे म्हणतात. (सोनमर्ग, गुलमर्ग) तर गढवाल हिमालयात यास बुग्याल व पयार म्हणतात. झेलम व बियास नद्यांच्या दरम्यानची पिरपंजाल ही पर्वत रांग लेसर हिमालयातील सर्वांत लांब रांग आहे. तसेच धौलपारु, नांगतिबा, महाभारत व मसुरी या पर्वत रांगा आहेत.

क) बृहत/ हिमाद्री/ग्रेटर हिमालयः- याची उंची सर्वाधिक म्हणजे सरासरी ६००० मी. आहे. येथे जगातील सर्वोच्च असणारे एव्हरेस्ट (नेपाल- ८८४८ मी. पर्वत) आहे. त्यास नेपाळमध्ये सागर माथा असे म्हणतात. इतर नंदादेवी, गंगा पर्वत इ.

ड) बाह्य हिमालय (ट्रान्स हिमालय ):-यात काराकोरम व झास्कर पर्वत रांगा आहेत. के -२ किंवा गॉडविन ऑस्टिन हे जगातील द्वितीय क्रमांकाचे शिखर (८६११ मी.) काराकोरम पर्वत रांगेत आहे. हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे.
शिखर उंची मी पर्वत रांग देश शिखर उंची मी पर्वत रांग देश
माउंट एव्हरेस्ट ८८४८ ग्रेटर हिमालय नेपाळ धौलगिरी ८१७२ बृहत हिमालय भारत
के-२ ८६११ काराकोरम(ट्रान्स) भारत ८१५६ बृहत हिमालय भारत
कांचनगंगा ८५९८ सिक्कीम भारत ८१२६ बृहत हिमालय भारत
———- ——- ग्रेटर हिमालय —— ८४८१ बृहत हिमालय भारत

इ) पूर्वाचलः- यात गारो, खासी, जैतिया, मिझो इ रांगा आहेत. भारत व म्यानमार दरम्यान पत्कोई व लुशाई पर्वत रांगा आहे.

प्रमुख खिंडी-
तिबेट-हिमालय मार्ग जातो – शिपकी ला खिंडीतून (हिमाचल प्रदेश)
भारतातून ल्हासा (तिबेट) पर्यंत जाणारा मार्ग जातो – नाथुला खिंडीतून (सिक्कीम)

लाकडाच्या उतारावरील खिंड – झोझीला (जम्मू काश्मिर)
हिमालयातील इतर खिंडी – बोमडिला (अरुणाचल प्रदेश) जेलपला (सिक्कीम), बारा लापचा ला (हिमाचल प्रदेश) थागला व नितीपास (उत्तराखंड व उ. प्रदेश), चुंबी खिंड (आसाम), खुजेराब (पाक व्याप्त काश्मिर POK) बुराझिल (जम्मू काश्मिर).
👧🏻🌅🌅👦🏻🌅🌺
**********************************
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
२) मैदानी प्रदेशः-

पश्चिमेकडे सतलज नदीपासून पुर्वेकडे ब्रम्हपुत्रा नदीपर्यंत पसरलेला २५०० किमी लांबीचा गाळाच्या संचायापासून तयार झालेला प्रदेश; याची निर्मिती गंगा, सिंधू व ब्रम्हपुत्रा यांच्या उपनद्यांनी केली आहे.
मैदानाचे पूर्व व पश्चिम असे विभाजन करणारा पर्वत – अरवली
शिवालीक उतारावर नद्यांनी वाहून आणलेल्या जाड्या भरड्या दगडांचे वाळू व खडे संचयन – भाबर (कंकर – UP)
भाबरमध्ये लुप्त झालेल्या नद्या प्रकट होतात असा भाबरच्या दक्षिणेकडील दलदलीचा भाग – तराई
मैदानी भागातील गाळाचा जुना थर – भांगर
दरवर्षीच्या गाळाने तयार होणा-या नवीन गाळाचे मैदान – खादर (बेत-पंजाब)
गंगा व ब्रम्हपुत्रेच्या संचयातून तयार झालेल्या जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश – बांग्लादेश
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा उतार – १ किमी ला १२ सेमी.

३) द्विकल्पीय पठारः-

हा भारतीय भूखंडावरील सर्वांत मोठा प्राचीन भाग आहे.
भारतील पठार बनले आहे – अग्निजम्य व रुपांतरीत खडकांचे
पठाराचे उत्तर व दक्षिण भाग झाले आहे – नर्मदा नदीमुळे
पठाराच्या ईशान्येस असणारा भाग –राजमहल टेकड्या
पठारी भागाच्या उत्तर सिमेवरील पर्वत – विंध्यपर्वत
पठाराच्या वायव्य भागात असणारी पर्वतरांग – अरवली
अरवली पर्वताच्या वायव्येचा भाग – मारवाडचे पठार
अरवली व विंध्य पर्वताच्या दरम्यान असणारे पठार – (चंबळचे खोरे, बनास, काली, विंध्य नद्या) – माळव्याचे पठार
उत्तरेकडील पठाराच्या पूर्वेकडील भागास नाव – (दामोदर व सुवर्ण रेखा नदीचे खोरे) – छोटा नागपूरचे पठार
यमुना नदी व विंध्य पर्वतादरम्यानचा भाग – बुंदेलखंड
उत्तरेपासून सातपुडा पर्वतापासून द्विपकालापर्यंतचा प्रदेश – दख्खनचे पठार ( महाराष्ट्र पठार )
दख्खनच्या पठाराची निर्मिती – भेगी उद्रेकाने लाव्हा रसाने थरावर थर साचून झाली.
नर्मदा व तापी नदीस वेगळी करणारी पर्वतरांग – सातपुडा
सातपुडा पर्वताच्या उपरांगा – महादेव, मैकल व राजपिपला
दख्खनच्या पश्चिम किनारी भागाचे नाव – पश्चिम घाट
पश्चिम घाटाची स्थानिक नावे – महाराष्ट्र व कर्नाटक – सह्याद्री, तामिळनाडू, निलगिरी
पठारावरील प्रमुख जलविभाजक – पश्चिम घाट
पश्चिम घाटाची लांबी – १६०० किमी असुन सरासरी उंची १००० मी.
पश्चिम घाटातील डोंगररांगा – सह्याद्री, निलगिरी, अन्नामलाई, कार्डमम
पश्चिम घाटातील उंची – उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते
पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर – अनाईमुदी २६९५ मी. (केरळ)
तेलंगना पठार हे ग्रॅनाईट या अच्छिद्र अग्निजन्य खडकांचे बनले आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर तलावांची निर्मिती झाली आहे.
गोदावरी नदीने या पठाराचे दोन भागात विभाजन केले आहे.
सह्याद्री व निलगिरी पर्वत एकत्र येतात – गुड्लूर जवळ
कर्नाटक पठार (म्हैसुर पठार) दक्षिणेकडील पठाराचा हा तिसरा भाग आहे.
निलगिरी पर्वताच्या दक्षिणेकडून कोचीन मद्रास रेल्वे मार्ग जातो – पाल घाट खिंडीतून
पलनी टेकड्यांवर २१३५ मी. उंची वरील थंड हवेचे ठिकाण – कोडाईकॅनॉल (तामिळनाडू)
केरळ व तामिळनाडूच्या सीमेवर – अन्नामलाई व कार्डमम डोंगर
दख्खनच्या पठाराची पूर्व सीमा – पूर्व घाट
विखंडीत अशा पूर्व घाटाची एकूण लांबी – १०७० कि.मी.
पूर्व घाटाची सरासरी उंची आहे – ६०० मी.
पूर्व घाटातील रांगा – महेंद्रगिरी, नल्लामलाई, खेलिकोंडा, पालकोंडा, पचमलाई
पूर्व घाटातील महानदी गोदावरी खो-याच्या दरम्यानचा भाग – महेंद्रगिरी पर्वत रांग
कृष्णा व पेन्नेरु नद्या दरम्यानची पर्वत रांग – नाल्ला माला

पर्वत रांगा सर्वोच्च शिखर, उंची व राज्य थंड हवेचे ठिकाण
हिमालय (घडीचा) माउंट एव्हरेस्ट – ८८४८ मी. ( नेपाळ ) सिमला, मसुरी, नैनिताल
——- गॉडविन ऑस्टीन – ८६११ मी. ( भारत ) ——-
अरवली पर्वत (अवशिष्ट) सर्वांत प्रचिन रंग, गुरु शिखर – १७२२ मी. माउंटआबू ११५८ मी. ( राजस्थान )
सातपुडा धुपगड – १३५० मी. (होशंगाबाद, मध्यप्रदेश) ——–
——– महाराष्ट्रातील बैराट – ११७७ मी. पंचमढी, तोरणमाळ, चिखलदरा
पश्चिम घाट अनाईमुदी २६९५ मी. (केरळ) उग्दमंडल ( उटी ), तामिळनाडू
निलगिरी पर्वत दोडाबेट्टा २६३७ मी. (तामिळनाडू ) ——–
पूर्व घाट १) दिशाखापट्टनम जिल्ह्यातील शिखर – १६८० मी. ——–
——– २) तिमाई गिरी – १५१५ मी. ——–
——– ३) महेंद्रगिरी – १५०१ मी. ( आंध्रप्रदेश ) ——–
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**********************************
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
३) किनारी मैदानेः-

भारतातील समुद्र किनारा लाभलेले एकूण राज्ये – ९ राज्ये व ४ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभलेले राज्य – १) गुजरात २) आंध्रप्रदेश
कच्छच्या रणापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या पश्चिम किनारपट्टीची सरासरी रुंदी –६४ कि.मी.
पश्चिम किनारपट्टीचा सर्वाधिक रुंद भाग – नर्मदा व तापीचे मुख
पश्चिम किनारपट्टीचे गुजरात मधील नावे –कच्छ त्ट व गुजरात मैदान
पश्चिम किनारपट्टीचे महाराष्ट्रातील नाव – कोकण किनारा
गोवा ते मंगलोर ( कर्नाटक ) पर्यंतच्या पश्चिम किनारपट्टीचे नाव – कानडा/कारवार
मलबार किना-याचे ( केरळ )वैशिष्ट्य – मसाल्याची पिके
मंगलोर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या मलबार किना-याचे वैशिष्ट्य – वाळूच्या दांड्यामुळे झालेले कायले (लंगून)
पश्चिम किना-यावरील प्रमुख बंदरे – कांड्ला ( गुजरात ), मुंबई, न्हावा शेवा (महाराष्ट्र), मार्मागोवा ( गोवा ) मंगलोर ( कर्नाटक ), कोचीन ( केरळ )
सुंदरबन पासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला पुर्व किनारपट्टीची रुंदी – १०० ते १५०
महानदी व गोदावरी खो-या दरम्यानचे किनारपट्टीचे नाव – उत्तर सरकार
कृष्णा व कावेरी नदीच्यादरम्यान नाव - कोरोमंडल किनारा
पूर्व किनारपट्टीच्या मध्यभागाचे नाव – काकिनाडा
महानदीचा त्रिभूज प्रदेश, चिल्का सरोवर ( खारे ) व विशाखापट्टनम बंदरे असणारे मैदान –उत्कल मैदान ( ओरीसा )
कृष्णा व गोदावरी त्रिभूज प्रदेशाच्या दरम्यान असणारे गोड्या पाण्याचे सरोवर – कोलेरु ( आंध्रप्रदेश )
७०० कि.मी. लांबीचे कायले – पुलिकत ( लंगूर ) आंध्रप्रदेश
पूर्व किना-यावरील बंदरे – चेन्नई ( तामिळ्नाडू ), विशाखापट्टनम ( आंध्रप्रदेश ), हाल्दीया, कोलकाता ( प. बंगाल ), पॅराद्विप ( ओरिसा ), येन्नोर, तुतिकोरीन ( तामिळ्नाडू )

३) भारतीय बेटेः-

ज्वालामुखी पर्वताभोवती प्रवाळ किटकांचे संचयन होऊन तयार झालेले अरबी समुद्रातील बेटे – लक्षद्विप
सरासरी ५ मी. उंची व कावरती ( राजधानी ) लखदीव, अमिनी, चेटलाट, मिनीकॉय अशा ३६ बेटांचा हा समूह केरळपासून २८० ते ४८० कि.मी. वर आहे.
बंगालच्या उपसागरातील आरकानयोमा या बुडालेल्या पर्वताची शिखरे म्हणजे – अंदमान निकोबार बेट समुह
निकोबार समुहात २२ बेटे असून सर्वात मोठे बेट – बृहतनिकोबार
सरासरी ७५० मीटर उंची असणा-या या अंदमान निकोबार द्विपसमुहाचे अंतर चेन्नईपासून ११८५ कि.मी. तर कलकत्यापासून १२५० कि.मी. आहे.
पोर्टब्लेअरच्या दक्षिणेस जागृत ज्वालामुखी बेटे – बॅरन व नारकोंडम बेट
समुद्र किना-यावरील बेट – सागर, न्यूमुर, पांबन, श्रीहरीकोटा, हेअर द्विप

भारतातील थंड हवेची ठिकाणे
ठिकाण राज्य ठिकाण राज्य ठिकाण राज्य
माउंट अबु राजस्थान दार्जिलिंग प.बंगाल शिलॉग मेघालय
आल्मोडा उत्तराखंड नैनिताल उत्तराखंड मसुरी उत्तराखंड
कूल, मनाली हिमाचल प्रदेश डलहौसी हिमाचल प्रदेश सिमला हिमाचल प्रदेश
गुलमर्ग जम्मू काश्मिर सोनमर्ग जम्मू काश्मिर पंचमढी मध्यप्रदेश
उद्धगमंदलम (उटी) तामिळनाडू कोडाई कॅनॉल तामिळनाडू कॉलीपॉग प.बंगाल
महाबळेश्वर महाराष्ट्र पाचगणी महाराष्ट्र राणीखेत प.बंगाल
कसौली पंजाब कुन्नूर तामिळनाडू धर्मशाळा हिमाचल प्रदेश
पहलगाम जम्मू काश्मिर कांगडा, मंडी हिमाचल प्रदेश मन्नार केरळ
अनंतगिरी आंध्रप्रदेश नंदी हिल्स कर्नाटक वायनाड केरळ
येरकॉड तामिळनाडू
******-***************************
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
👧🏻जलप्रणाली👦🏻

हिमालयीन नद्या

हिमालयात उगम पावणा-या नद्या बारमाही स्वरुपाच्या आहेत.

१)सिंधू नदी प्रणालीः-

हिचा उगम तिबेटमध्ये कैलास पर्वतावर सेंगेरुबाब येथील मानसरोवरातून होतो. हिची एकूण लांबी २९०० कि.मी. असून भागातून ७०९ कि.मी. वाहते. सतलज, बियास ( व्यास ) रावी, चिनाब, झेलम या हिच्या प्रमुख उपनद्या आहेत. ही ५१८१ मी. खोल घळईतून वाहते. कराची जवळ अरबी समुद्रास मिळते.

लाहूल (हि.प्रदेश) येथे चंद्र व भागा या दोन नद्यांच्या संगमातून तयार होणारी सर्वात मोठी उपनदी – चिनाब
रावी व चीनाब नद्यांचा संगम – मुलतान जवळ (पाकिस्थान)
बियास नदी पंजाबच्या मैदानात प्रवेश करते – मिरताल जवळ
बुलर सरोवरातून वाहणारी व झंग (पाकिस्थान) येथे चिनाब नदीस मिळणारी नदी – झेलम
सिंधू पाणी वाटप करानुसार भारतास मिळणारे पाणी – २०%

२) गंगा नदी प्रणालीः-

गंगा नदी भागिरथी व अलकनंदा यांच्या संगमातून उगम पावते. देव प्रयाग येथे हा संगम होतो. तेथून तिला गंगा म्हणतात. भागिरथी हा मुळ प्रवाह मानतात. तिचा उगम गोमुख (गंगोत्री, हिमनदी, उत्तराखंड) येथून होतो. गंगा नदी हरिद्वार येथे मैदानी प्रदेशात प्रवेश करते. गंगा ही नदी असून तिची लांबी २५१० कि.मी. इतकी आहे. ती हरिद्वार पासून मिर्झापूर पर्यंत आग्रेयेकडे व नंतर पूर्वेकडे वळते. अलाहाबाद (प्रयाग) येथे यमुना येऊन मिळते. गंगेस उजवीकडून यमुना, शोण, दामोदर ह्या उपनद्या तर डावीकडून रामगंगा, गोमती, घाग्रा (शरयू) गंडक, कोसी या उपनद्या येऊन मिळतात.

गंगेची सर्वात मोठी उपनदी – यमुना
गंगा भारतातील पाच राज्यांतून वाहते – उत्तराखंड, उ.प्रदेश, झारखंड, बिहार व प. बंगाल
दामोदर या हुगळीच्या उपनदीस बंगालचे दुःखाश्रु असे म्हणतात
गंगेची सर्वात मोठी दितरिका – हुगळी

अ) यमुना –

ही नदी यमुनेत्री येथे उगम पावते, ताजेवाला येथे मैदानी भागात प्रवेश करते. विंध्य पर्वतातून उगम पावणा-या चंबळ, बेतवा, केन, सिंद या नद्या यमुनेला येऊन मिळतात.

ब) कोसी –

कांचनगंगा (नेपाळ) येथे उगम पावते. सात छोट्या नद्यांच्या एकत्रीकरणातून तयार होते. छतरा येथे मैदानी भागात प्रवेश करते. हिच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. महापूर व अचानक मार्ग बदलणे यासाठी ती प्रसिध्द आहे. गेल्या २०० वर्षात ती ११० कि.मी. पश्चिमेकडे सरकली आहे. सध्या ती कारागोलाजवळ गंगेस मिळते. तिच्या या रुपामुळे तिला बिहारचे दुःखाश्र असे म्हणतात.

क) क्षिप्रा–

क्षिप्रा नदीकाठी उज्जैन येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा होतो. (चंबळची उपनदी)

ड) घग्गर –

हरीयाणात हनुमानगढ येथे लुप्त होते.

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**********************************
👧🏻2)ब्रम्हपुत्रा नदी प्रणाली👦🏻

ब्रम्हपुत्रा नदी तिबेटमधील कैलास पर्वतात मानसरोवर जवळ चोमायांग दुंम येथे उगम पावते. तिबेटमधुन त्सांगपो नावाने वाहते. नामचा बारवा येथून दक्षिणेला वळून भारतात अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते. दिहांग, दिबांग व लोहीत या नद्यांच्या एकत्रित प्रवाहास ब्रम्हपुत्रा असे म्हणतात. गंगा व ब्रम्हपुत्राच्या एकत्रित प्रवाहास पद्मा असे म्हणतात. गंगा व ब्रम्हपुत्रेचा संगम ग्वालंदेजवळ होतो. गंगा – ब्रम्हपुत्रेच्या वितरिका – मधुमती, पद्मा, सरस्वती, हुगळी व भागिरथी ब्रम्हपुत्रेस मोठ्या प्रमाणावर येणा-या पुरामुळे तिला आसामचे अश्रू असे म्हणतात. तर जलवाहतुकीस उपयुक्त असल्यामुळे आसामची जीवनरेषा असे म्हणतात.

पठारावरील नद्या

१) बंगालच्या उपसागरास मिळणा-या नद्याः-

बंगालच्या उपसागरास मिळणा-या नद्या

बंगालच्या उपसागरास मिळणा-या नद्या

अ) गोदावरी – ही पठारावरील सर्वांत मोठी व भारतातील द्वितीय क्रमांकाची नदी आहे. हिला दक्षिण भारताची गंगा किंवा वृध्द गंगा असेही म्हणतात. हिचा उगम त्रंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वतावर होतो. महाराष्ट्रात ती आंध्रप्रदेशमध्ये प्रवेश करते.

ब) कृष्णा – हिचा उगम महाबळेश्वर येथे होतो. पुढे कर्नाटकात प्रवेश करते. आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे तिच्या अनेक शाखा होतात. भारतातील एकुण लांबी १२९० कि.मी. आहे.

क) कावेरी - कर्नाटक मधील कुग जिल्ह्यात ब्रम्हगिरी येथे उगम पावते.कर्नाटक व तामिळणाडू या राज्यातून ६७० कि.मी. वाहत जाउन कावरीपट्टनम जवळ बंगालच्या उपसागरास मिळते. शिव समुद्र जवळ ११० मी. चा धबधबा आहे. या नदीत शिवसमुद्र व श्रीरंगपट्ट्नम ही दोन बेटे आहेत.

ड) महानदी - हिचा उगम छत्तीसगढ राज्यात अमरकंटक रागांत बस्तर टेकड्यांवर होतो. हि ओरिसातील सर्वांत मोठी नदी आहे. ८९० कि.मी. प्रवास करुन कटक जवळ बंगालच्या उपसागरास मिळते.

१) अरबी समुद्रास मिळणा-या नद्याः-

अरबी समुद्रास मिळणा-या नद्या

अरबी समुद्रास मिळणा-या नद्या

अ) लुनी - अरवली पर्वतात नाग डोंगरावर उगम पावून कच्छच्या रनास मिळते. हि वाळवंटातून लुप्त होते.

ब) मही – मध्यप्रदेशातील विंध्य पर्वतावर उगम पावते. ५३३ कि.मी. अंतरपार करुन खंबयतच्या आखातास मिळते.

क) साबरमती – राजस्थानच्या डूंगरपूर जिल्ह्यातील अरवली प्रर्वतात उगम पावून ३०० कि.मी. प्रवास करुन खंबायतच्या आखातास मिळते.

ड) नर्मदा - छत्तीसगढ राज्यात अमरकंटक पठारावर मैकल पर्वतरांगेत उगम पावते. पश्चिमेकडे वाहत जाऊन ती भडोच जवळ अरबी समुद्राला खंबायतच्या आखाताला जाऊन मिळते. प्रवाह मार्गात जबलपूरजवळ ती भेडाघाट येथे धुवाँधार धबधबा निर्माण करते. संगमवरी दगडांतून कपिल धारा धबधबा निर्माण करते. महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातून ५४ कि.मी. वाहते. ती खचदरीतून प्रवास करते. एकूण लांबी १२९० कि.मी. आहे.
*********************************
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
इ) तापी – तापीचा उगम मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यात महादेव डोंगररांगात मुलताई येथे उगम पावते. उत्तरेकडील सातपुडा व दक्षिणेकडील सातमाळा अजिंठा रांगातून वाहते. ही महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करते. महाराष्ट्रात २१० कि.मी. वाहून नंदुरबारमधून गुजरात मध्ये प्रवेश करते. ७२४ कि.मी.चा प्रवास करून सुरतजवळ खंबायतच्या आखातास मिळते.

फ) पेरियार – ही तामिळनाडू उगम पाऊन केरळमध्ये जाते. पेरियार ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे.

सोन नदीची प्रमुख उपनदी - रिहांद
अरवली पर्वताचे विभाजन करणारी नदी - बनास.
पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक – क्यूसेक (घनफुट प्रती सेकंद), क्यूमेक (घनमीटर प्रतीसेकंद)
भारतातील सर्वांत मोठा धबधबा शरावती नदीवर आहे – गिरसप्पा/जोग/महात्मा गांधी धबधबा – २५३ मी. (कर्नाटक)

नदी प्रमुख उपनद्या
सिंधू रावी, बियास, चिनाब, सतलज, झेलम
गंगा यमुना, शोण, दामोदर, घाग्रा, रमगंगा, गोमती, गंडक, कोसी, शारदा, राप्ती
यमुना चंबळ, बेतवा, केन, सिंद, बाणगंगा
चंबळ सिंधू, पार्वती, बनास, काळी सिंधू, क्षिप्रा
ब्रम्हपुत्रा दिहांग, दिवांग, लोहित, मानस, घनसिरी, कापिली, तिस्ता, जयभोरेली
गोदावरी वैनगंगा, इंद्रावती, मांजरा, प्रवरा, कादवा, सिंदफणा, पूर्णा, वर्धा
कृष्णा कोयना, येरळा, दूधागंगा, मलप्रभा, भिमा, तुंगभद्रा, घटप्रभा, मुसी, पंचगंगा
नर्मदा डावीकडून – ब-हनेर, बंजार, शार, शक्कर, दुधी व तवा

उजवीकडून – हिरण, आरसांग, बारणा व कोलार
तापी पूर्णा, पांझरा, गिरणा, अनेर, बोरी, नळगंगा, चंद्रभागा, काटेपूर्णा
नदी काठावरील शहरे नदी काठावरील शहरे
गंगा हरिद्वार, कानपूर, मुंगे, मुर्शिदाबाद, बनारस (वाराणसी) पाटना चंबळ कोटा
तापी सुरत कावेरी तिरुचिरापल्ली, श्रीरंगपट्टनम
ब्रम्हपुत्रा दिब्रूगड, गुवाहाटी यमुना दिल्ली, आग्रा, मथुरा, इटावा
झेलम श्रीनगर शरयू (घाग्रा) अयोध्या
सतलज फिरोरपूर, लुधियाना हुगळी कोलकाता
कृष्णा विजयवाडा गोमती लखनौ
गोदावरी नाशिक, राजमहेंद्री, नांदेड साबरमती अहमदनगर
अलकनंदा उत्तरकाशी महानदी कटक
मुशी हैद्राबाद क्षिप्रा इंदोर
मांडवी पणजी तावी जम्मू
नर्मदा भरुच तुंगभद्रा कर्नुल

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**********************************
👧🏻रस्ते मार्ग👦🏻

वाहतुकीच्या मार्गांपैकी रस्ते वाहतूक सर्वांधिक लवचिक असते. रस्ते मार्गांचे १) राष्ट्रीय महामार्ग २) राज्य महामार्ग ३) जिल्ह्यातील रस्ते ४) ग्रामीण रस्ते असे प्रकार पडतात. रस्ते मार्गाची लांबी एकूण मार्गाच्या ८५% आहे. सध्या ३३ लाख कि.मी. हून जास्त लांबीचे आहे. त्यामध्ये १) राष्ट्रीय महामार्ग – ७०,५८४ कि.मी. २) राज्य महामार्ग – १, २८,००० कि.मी. ३) जिल्हा रस्ते – ४, ७०,००० ४) ग्रामीण रस्ते – २६, ५०,०००कि.मी. होते.
रस्त्यांचे वर्गीकरण करणारी योजना – नागपूर योजना (१९४३)
राष्ट्रीय महामार्ग – यांना देशाचा धमन्या म्हणतात. यांची लांबी ७०,५४८ कि.मी. होती. एकूण रस्त्यांच्या २% लांबी असली तरी देशाच्या वाहतुकीत ४०% वाटा आहे. या मार्गाचे व्यवस्थापन केंद्राच्या अखत्यारीत आहे.
भारतातील सर्वांत जुना महामार्ग ग्रँन्ड ट्रंक मार्ग हा आहे. या रस्त्याने कोलकाता व अमृतसर ही शहरे जोडली आहेत. हा २५०३ कि.मी. चा शेरशहा सुरी याने बांधला.

देशातील प्रमुख महामार्ग

देशातील प्रमुख महामार्ग

देशातील प्रमुख महामार्ग
महामार्ग भारतातील प्रमुख महामार्ग महाराष्ट्रातून जाणारे महामार्ग
क्रमांक कोठून कोठे जातो महामार्ग क्र. कोठून कोठे जातो राज्यातील लांबी
१ दिल्ली-जालंधर-अमृतसर ३ मुंबई-नाशिक-आग्रा ३९१
२ दिल्ली-कोलकाता ४ ठाणे-पुणे-चेन्नई ३७५
४ अ बेळगांव-पणजी ४ ब न्हावाशेवा-कळंबोली-पळस्पे २७
५ बारगोरा-कटक-चेन्नई ६ धुळे-नागपूर-कोलकाता ६६८
१० दिल्ली-फजिल्का ७ वाराणशी-नागपूर-कन्याकूमारी २३२
२४ दिल्ली-लखनौ ८ मुंबई-अहमदाबाद-दिल्ली १२८
९ पुणे-सोलापूर-विजयवाडा ३३६
१३ सोलापूर-चित्रदुर्ग-मंगलोर ४३
१६ निझमाबाद-जगदाळपूर ५०
१७ पनवेल-पणजी-एडापल्ली ४८२
५० पुणे-नाशिक १९२
६९ नागपूर-अद्दल्लागंज ५५
२०४ रत्नागिरी-कोल्हापुर १२०
२११ सोलापूर-धुळे ४००
२२२ कल्याण-परभणी-नांदेड 

भारतातील सर्वाधिक लांबीचे महामार्ग असणारे राज्य – उ.प्रदेश (५,८७४ कि.मी.)
महाराष्ट्रात ४,४७२ कि.मी. लांबीचे महामार्ग असून महाराष्ट्रातून एकूण राष्ट्रीय महामार्गांची संख्या - १६
भारतातील सर्वांत लांब असणारा राष्ट्रीय महामार्ग – वाराणशी-नागपूर-कन्याकूमारी (२३६९ कि.मी.)
भारतातील सर्वात कमी लांब असणारा राष्ट्रीय महामार्ग ० क्र. ४७-ए (विलिंग्टन बेट ते कोचीन बाय पास – ६ कि.मी.)
भारतात सर्वाधिक लांबीचे रस्ते – महाराष्ट्र (३६१८९६ कि.मी.)
भारतातील एकूण महामार्गाची संख्या २२१
२००९-१० मध्ये भारतात प्रति १०० वर्ग कि.मी. ला रस्त्यांची लांबी – घनता (९७ कि.मी.)
भारतातील रस्त्यांची सर्वाधिक घनता असणारे राज्य - दिल्ली (१९९३ कि.मी.), केरळ (५२७ कि.मी.)
रस्त्यांची सर्वाधिक लांबी – १) यूएसए २) भारत
जगातील सर्वात उंचावरील सडक – लेह मनाली मार्ग (४२७० मी.)
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ५४,००० कोटी रु. खर्चाचा महत्त्त्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प (एन.एच.डी.पी.) हाती घेण्याची घोषणा केली. या प्रकल्पात पहिल्या ५६६४ कि.मी. लांबीचा दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता ही महानगरे जोडण्याचा प्रकल्प २००४ पर्यंत पूर्णं होणे अपेक्षित होते. त्याला सुवर्ण चतुःकोण म्हणतात.
दुस-या टप्प्यात ७३०० कि.मी. लांबीचे महामार्ग श्रीनगर ते कन्याकुमारी व पश्चिमेकडील सिल्वर ते पोरबंदर ही भारताची चार टोके जोडते.
याव्यतिरिक्त देशातील ८ प्रमुख बंदरांना जोडणा-या १००० कि.मी. लांबीच्या मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजना जाहिर - २५ डिसेंबर, २००० अपेक्षित खर्च ६०,००० कोटी यानुसार हजार पेक्षा जास्त लोकसंख्येची गावे २००३ पर्यंत रस्त्याने जोडणे व ५०० हून जास्त लोकसंख्येची गावे २००७ पर्यंत जोडणे.
सीमा रस्ते संघटना (बी.आर.ओ) स्थापना १९६०, द्वारे सीमा प्रदेशात कार्यक्षम वाहतुकीसाठी रस्ते बांधणी, देखभाल व वाहतूक नियंत्रण करण्याचे काम केले जाते.

भारतातील ८०% प्रवासी वाहतूक व ६५% वाहतूक रस्त्याने होते.
👧🏻खनिजे👦🏻

 व शक्तीसाधने

१) लोह - जागतिक लोह खनिजाच्या साठ्यांऋपैकी भारतात २५% साठे आहेत. सिंगभूम (झारखंड), केओझार, बोनाई, मयुरभंज, सुंदरगड (ओरिसा), दुर्ग (म. प्रदेश), बैलादिला (छत्तीसगड), बरद्वान व वीभूम (प. बंगाल), बाबा बुदान टेकड्या (कर्नाटक).

प्रमुख उत्पादक राज्य - १) छ्त्तीसगड २) गोवा ३) झारखंड
लोहाचे मॅग्नेटाईट प्रकारचे ७४% साठे कर्नाटकमध्ये आहे.
बस्तरच्या बैलादिला खाणींचा जपानच्या सहकार्याने विकास करुन लोहखनिज विशाखापट्टनम बंदरात आण्ते जाते व तेथून जपानला निर्यात करतात.
लोहखनिज नियात करणारी इतर बंदरे – मार्मागोवा, पराद्विप, कोलाकाता व मंगलोर इ.

२) मॅगनीज – याचा उपयोग पोलाद निर्मितीत करतात. म. प्रदेशामधील प्रमुख खाणी बालाघाट, झाबुआ, छिंदवाडा, मांडला (म. प्रदेश) सिंगभूम (झारखंड), केंदुझारगड, मयुरभंज, तालचेर व सुंदरगड (ओरिसा), नागपूर, भंडारा, गोंदिया (महाराष्ट्र) शिगोगा, चित्रदुर्ग, बेल्लारी (कर्नाटक) इ.

मॅगनीज उत्पादनात भारत जगात तिस-या क्रमांकावर आहे. भारतातील सर्वाधिक मॅगनीज उत्पादन करणारे राज्य हे ओरिसा आहे. प्रमुख उत्पादक राज्ये – १) ओरिसा २) महाराष्ट्र ३) म. प्रदेश

३) टंगस्टन – सिंगभूम (झारखंड), बाकुडा (प. बंगाल) नागपूर इ.

४) बॉक्साईट – बॉक्साईटच्या उत्पादनात भारत पाचव्या क्रमांकाचा देश आहे. यापासून अल्युमिनिअम हा धातू मिळतो. बॉक्साईट रांची, पालाम (झारखंड) जबलपूर, बालाघाट (म. प्रदेश), कोल्हापुर, व सिंधुदुर्ग (महाराष्ट्र), जामनगर व सुरत (गुजरात) इ ठिकाणी सापडते.

प्रमुख उत्पादक राज्ये - १) ओरिसा २) गुजरात ३) झारखंड ४) महाराष्ट्र
क्रोमाईटचे ९५% साठे एकट्या ओरिसा राज्यात आहेत. (२१३ दशलक्ष टन)
आधुनिक फ्रासिसी तंत्रज्ञानावर आधारीत आशियातील सर्वांत मोठा अल्युमिनिअम प्रकल्प – कोरापूत (ओरिसा)
भारत बॉक्साईड निर्यात करतो – जपान व युरोपियन देशांना

५) अभ्रक – अग्निजन्य व रुपांतरीत खडकात सापडते. भाततात जगाच्या ९०% अभ्रक उत्पादन केले जाते. याचा उपयोग विद्युतरोधक म्हणून करतात. आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताच्या अभ्रकाचा ६०% अर्धासाठा झारखंड९हजारिबाग) बिहारच्या गया व मुंगेर जिल्ह्यात सापडतो. तसेच नेल्लोर (आंध्रप्रदेश) व भिलवाडा (राजस्थान) येथेही खाणी आहेत. निर्यातीत ब्राझिल हा भारताचा प्रतिस्पर्धी आहे. प्र्मुख उत्पादक राज्य – १) आं. प्रदेश २) झारखंड

६) तांबे – हा मानवाने शोधलेला पहिला धातू आहे. ताब्याचे उत्पादन राजस्थान राज्यात होते.

७) जिप्सम – याचा उपयोग खते, सिमेंट, कागद व निर्मितीसाठी करतात. राजस्थानमध्ये देशाच्या ९०% जिप्सम चे उत्पादन होते.

प्रमुख उत्पादक राज्ये – १) राजस्थान २) जम्मू काश्मिर ३) गुजरात

८) कोळसा - भारतातील ९८.५% कोळसा गोंडवाना क्षेत्रात सापडतो. भारतात पश्चिम बंगालमधील राणिगंज येथे १७७४ साली पहिली खाण खोदण्यात आली. कोळसा उत्पादनात भारत जगात चीन व अमेरिकेनंतर तिस-या क्रमांकावर लागतो. भारतात सर्वाधिक कोळसा झारखंड राज्यात सापडतो. तेथे बोकारो, गिरिध, करणपूर व झारिया या ठिकाणी तर म. प्रदेशात सिंगरौली, छिंदवाडा, पथरखेडा (बैतुल) व सोहागपूर (शाहदोल) येथे, छत्तीसगढ राज्यात कोर्बा, सरगुजा येथे, प्रदेशात सिंगोरानी येथे, महाराष्ट्रात वर्धा – पेंच – कन्हान नदी खो-यात कोळसा सापडतो. लिग्नाइटच्या सर्वाधिक खाणी तामिळणाडू राज्यात नेवेली क्षेत्रात आहेत.
९) सोने - सोन्याच्या खाणी कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात कोलार व हट्टी येथे आह्ते. कोलार ही जगातील सर्वांत खोल खाण आहे. तसेच रामगिरी, अनंतपुर जिल्हा (आंध्रप्रदेश) येथेही उत्पादन होते. भरत हा जगातील सर्वांत मोठा सोन्याचा उप्भोक्ता देश आहे.


१०) खनिज तेल व नैसर्गिक वायू – भारतात खनिजतेल दिग्बोई, नहरकाटीया, रुद्रसागर, नुनमती, लकवा, सुरमा नदी खोरे (आसास) खंबायत, अंकलेश्वर, ओलपाड, क्लोल, नवगाव (गुजरात), बॉम्बे हाय (मुंबई जवळ) इ. ठिकाणी मिळते. बॉम्बे हाय मुंबईच्या किना-यापासून ११५ कि.मी. वर आहे. जपानहून आलेल्या सागर सम्राट या प्लॅट्फार्मच्या सहाय्याने ८४२ विहिरीतून तेल व १०३ नैसर्गिक वायू शोधले जाते. याशिवाय वसई हाय येथेही तेलक्षेत्र आहे. तसेच गोदावरी कृष्णा कावेरीच्या त्रिभूज प्रदेशात खनिजतेलाचे साठे सापडले आहेत.

👧🏻जलसिंचन👦🏻

जगातील सर्वाधिक क्षेत्र जलसिंचनाखाली असणारा देश - भारत (९.४७ को हे.)
भारतात विहिरीऑ व कूपनलिकेद्वारे होणारे जलसिंचन – ५३.९६%
विहिरी व कूपनलिकेद्वारे गुजरात मध्ये सर्वाधिक ८०% जलसिंचन होते. यानंतर राजस्थानचा क्रम लागतो - ६३%
कालव्यांमुळे राज्याचा एकुण सिचीत क्षेत्रांपैकी सर्वाधिक – जम्मू काश्मिर (९४%)
भारतात तलाव सिंचनाखाली क्षेत्र - ६.१३%
भारतातील सर्वात प्राचीन धरण कावेरी नदीवर – कालानाई (तामिळणाडू २ रे शतक)
तलावांमुळे सिंचीत क्षेत्र एकूण सिंचनाच्या ३४% असणारे राज्य – तामिळनाडू, आंध्रप्रदेश (२६%)

बहूउद्देशीय नदी योजना -

१) दामोदर खोरे योजना – स्वतंत्र भारताची ही पहिली योजना आहे. ही अमेरिकेतील टेनेसी व्हॅली प्रोजेक्ट वर आधारीत आहे. ही योजना १९४८ मध्ये सुरु झाली. या योजनेचे पूरनियंत्रण, विद्युत निर्मिती, जलसिंचन, मृदाधूप नियंत्रण इ. उद्देश होतो. या अंतर्गत दामोदर नदीच्या उपनद्यांवर तालैया, कोनार, मैथान व पांचेत ही धरणे जलविद्युत निर्मितीसाठी बांधली. तर बोकोरो, दुर्गापूर, व चंद्रपूर येथे औष्णिक विद्युत प्रकल्प सुरु होते. दुर्गापूरच्या धरणातून २५०० कि.मी. चा कालवा काढून वाहतुक सिंचनासाठी वापरतात.

२) भाक्रा नानगल योजना – हा पंजाब, हरियाणा व राजस्थानचा संयुक्त प्रकल्प आहे. या अंतर्गत हिमाचल प्रदेशात भाक्रा येथे सतलज नदीवर २२६ मी. उंचीचे व ५१८ मी. लांबीचे भारताती सर्वांत उंच धरण आहे. याच्या जलाशयास गोविंद सागर जलाशय म्हणतात. या धरणापासून ११०० कि.मी. लांबीचे कलवे व ३४०० कि.मि. लांबीच्या वितरीका काढून १४ लाख हेक्टर क्षेत्र सिंचित केले अहे. पंजाब मधील नांगल येथे दुसरे धरण बांधून १२०४ मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्प उभारला गेला आहे.

३) राजस्थानचा कालवा – यानुसार बियास व रावी नदीचे पाणी स्सतलज नदीत सोडले आहे. बियास नदीवर पोंग येथे धरण बांधले आहे. सतलज व बियास नद्यांच्या संगमावर हरिके येथे धरण बांधून राजस्थान कालवा काढला आहे. यामुळे पंजाबचा काही भाग व राजस्थानचा वाळवंटी भागाला पाणी पुरवठा केला जात आहे. याच्या मुख्य कालव्याला इंदिरा गांधी कालवा या नावाने ओळखतात. या कालव्याची लांबी ४६८ कि.मी. असून हा जगातील सर्वांत लांब कलव्यांपैकी एक आहे. 

४) कोसी योजना – बिहारचे अश्रु असणा-या कोसी नदीवर पूर नियंत्रणाच्या उद्देशाने उभारलेला बिहार व नेपाळ सरकारचा संयुक्त प्रकल्प आहे. या अंतर्गत नेपाळमध्ये हनुमान नगर येथे धरण बांधले आहे.

५) हिराकुड योजना – ओरिसा राज्यात संबळपूर जवळ १९४८ मध्ये महानदीवर हा प्रकल्प उभारलेला आहे. या अंतर्गत ४८०० मी. लांब व ६१ मी. उंचीचे धरण बांधले असून दोन्ही बाजूस मिळून २१ कि.मी. संरक्षक भिंती बांधल्या आहेत. हे भारतातील सर्वाधिक लांबीचे धरण आहे.

६) नगार्जुन योजना – आ. प्रदेशात कृष्णा नदीवर हैद्राबादपासून १४४ कि.मी. वर नंदिकोना येथे धरण बाधले आहे. या ठिकाणी प्रचीन मंदिरे होती. ती स्थालांतरित केली होती.

७) चंबळ योजना - ही राजस्थान व मध्यप्रदेश सरकारची संयुक्त योजना आहे. या अंतर्गत मध्यप्रदेश मध्ये गांधी सागर, राजस्थानमध्ये कोटाजवळ धरण व रावताभाटा येथे राणाप्रताप सागर हे कोटापासून २१ कि.मी. वर धरणे उभारली आहेत.

८) फराक्का योजना - या योजने अंतर्गत पश्चिम बंगालमध्ये गंगा नदीवर फराक्का व भागिरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहे. हुगळीचा प्रवाह कायम ठेवून कोलकाता बंदर कायम ठेवण हा या योजनेचा उद्देश आहे.

९) नर्मदा प्रकल्प – या प्रकल्पातील ३००० लहान मोठी धरणे बांधण्यात येणार आहे. मध्यप्रदेशात इंदिरा सागर (नर्मदा धरण) हे निमार जिल्ह्यात व गुजरात राज्यात सरदार सरोवर हे धरण बांधले आहे.

१०) तिहारी प्रकल्प - उत्तराखंडमध्ये भारत सरकार व उत्तराखंड यांच्या सहकार्याने भागिरथी नदी व मिलनगंगा नदीवर तिहारी जिल्ह्यात हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात रशियाने सहाय्य केले आहे. याचा जलाशय रामतिर्थ सागर म्हणून ओळखतात. तिहारी पासून २२ कि.मी. वर कोटेश्वर धरण आहे.

११) जायकवाडी प्रकल्प – जपानच्या सहकार्याने पैठण जवळ गोदावरी नदीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. (१९६५) यातून वीज निर्मिती केल्यानंतर पाणी पुन्हा धरणात सोडले जाते. अशी ही देशातील एकमेव योजना आहे.

१२) पेरियार प्रकल्प – केरळमध्ये पेरियार या पश्चिम वाहिनी नदीवर धरण बांधून पुर्वेकडे वाहणा-या वैगई नदीत पाणी सोडले आहे. या प्रकल्पामुळे तामिळणाडूच्या मदुराई व केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यांना लाभा झाला आहे.

१३) सायलेंट व्हॅली प्रोजेक्ट - पर्यावरणास घातक असल्यामुळे रद्द (केरळ)

१४) नद्या जोडण्याचा प्रकल्प – डॉ. के.एल. राव यांनी १९७२ मध्ये गंगा कावेरी या नद्यांच्या कालव्याने जोडण्याची कल्पना मांडली. १९७७ मध्ये के. दस्तुर यांनी अशाओ प्रकारची योजना माडली. सध्या हिमालयातील १४ व पठारावरील १६ नद्या जोडण्यासाठी सुरेश प्रभु यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट नेमण्यात आला होता. न्यायालयाने ही योजना २०१६ पर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे. यास५, ६०, ००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

१५) रिहांद धरणाच्या जलाशायास नाव आहे – गोविंद वल्लभपंत सागर.
प्रकल्प धरण, नदी व स्थळ सहयोगी राज्य मुख्य उद्देश
श्री शैलेशम् कृष्णा नदी आंध्रप्रदेश वीज
नागार्जुन सागर कृष्णा नदीवर नंदिकोना येथे आंध्रप्रदेश सिंचन
तुंगभद्रा तुंगभद्रा नदिवर मल्लारपुरम येथे आंध्रप्रदेश व कर्नाटक सिंचन
मुचकुंद मुचकुंद नदीवर जलपुत येथे आंध्रप्रदेश व कर्नाटक वीज
पोचमपाड पोचमपाड नदीवर (गोदावरी) आंध्रप्रदेश जलसिंचन

कृष्णराज सागर कावेरी नदीवर कर्नाटक जलसिचन
👧🏻प्राणी संपत्ती👦🏻

भारतात सापडणा-या प्राण्यांच्या जाती – ८१,०००
भारतात सापडणा-या माशांच्या जाती - २५००
भारतात सापडणा-या पक्ष्यांच्या जाती – १२००
भारताचा राष्ट्रीय पक्षी – मोर
भारताचा राष्ट्रीय प्राणी – वाघ
भारताचे राष्ट्रीय फळ - आंबा
भारताचा राष्ट्रीय वृक्ष – बनायान ट्री
भारताचा राष्ट्रीय विरासत प्राणी – हत्ती
भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी – गंगा डॉल्फिन
भारताचा राष्ट्रीय फुल – कमळ
राजस्थान व माळवा प्रांतातून विलुप्त झालेला पक्षी – सोहन (ग्रेट इंडियन बस्टर्ड)
भारतातील जैवविविधतेला सुरक्षित ठेवण्यासाठी स्थापन झालेले पहिले जैव आरक्षित क्षेत्र – निलगिरी (कर्नाटक,  तामिळणाडू) १९८६ (५५०० चौ.कि.मी.)
इतर क्षेत्र - नंदादेवी (१९८८), नोक्रेक (मेघालय), ग्रेट निकोबार, मन्नारची खाडी (तामिळनाडू), मानस (आसाम), सुंदरबन, सिमलिपाल (ओरिसा), दिब्रू-सैखोवा, देहंग-देबंग, पंचमढी, कांचनगंगा, आगस्त मलई, आचाकमार-अमरकंटक असे एकूण १४ क्षेत्र आहेत.
टायगर प्रोजेक्टची सुरुवात – १९७३, वाघांची गणना – दर ४ वर्षांनी होते.
देशात वाघांसाठी आरक्षित क्षेत्र - ३९+८ नविन असे एकूण ३७ क्षेत्रे आहेत.
भारतातील सर्वात लहान व पहिला आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प – पेंच (नागपूर)
वाघांचे सर्वांत मोठे अभायारण्य - नागार्जुनसागर श्रीकौल्यम (आंध्र प्रदेश)
२००६ चा व्याघ्र गणनेत १४११ असणारी वाघांची संख्या २०१० च्या व्याघ्र गणनेत १२% ने वाढून झाली – १७०६
भारतात १०१ राष्ट्रीय उद्याने व ५१५ वन्यप्राणी अभयारण्ये आहेत. वन्यप्राणी अभयारण्ये नष्ट होणा-या प्रांण्यांच्या जातींना संरक्षण देण्यासाठी, तर राष्ट्रीय उद्याने नैसर्गिक टिकवून ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आले आहेत.
भारताचे पहिले सागरी राष्ट्रीय उद्यान - कच्छच्या आखातात.
वन्य जीव संरक्षण अधिनियम तयार केला – १९७२
भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान – कार्बेट नॅशनल पार्क
भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था – कोलकाता (१९१६)
भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था – कोलकाता (१९८०)
डॉ. सलिम अली. पक्षी आणि नैसर्गिक इतिहास केंद्र – कोईमतूर
प्रोजेक्ट क्रोकोडाईल सुरु - १९७४

प्राणी आढळ प्राणी आढळ
हत्ती आसाम, केरळ, कर्नाटक उंट वाळवंट (राजस्थान)
जंगली गाढव कच्छचे रण एकशिंगी गेंडा आसाम व प. बंगाल
सिंह गिरचे जंगल (गुजरात ) वाघ सुंदरबन ( प.बंगाल )
चित्ता हिमालय सकिन (जंगली बकरी) हिमालय
पांडा व हिमचित्ते उंच हिमालयीन प्रदेश पांढरे वाघ बाघेलखंड ( म. प्रदेश)
मोर जम्मू काश्मिर, आसाम —– ——
राष्ट्रीय उद्यान/ अभयारण्ये कशासाठी राखीव ठिकाण व राज्य
एरबिकुलम राजमलय राष्ट्रीय उद्यान —– इदुक्की (केरळ)
बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान हत्ती
👧🏻मृदा👦🏻
(माती)

वनस्पती उगवण्यासाठी व वाढीसाठी आवश्यक असणारा भूपृष्ठाऋचा सर्वांत वरचा थर म्हणजे मृदा होय. यातूनच वनस्पतीस खनिजे व अन्नद्रव्ये मिळतात. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे मृदेचे मुख्य ८ व उपमुख्य २७ प्रकार केले आहेत. यापैकी काही प्रकार पुढीलप्रमाणेः-

१) गाळाची मृदाः- देशातील ४०% भाग या मृदेचा आहे. ही मैदानी व त्रिभूज प्रदेशात आढळते. हि मृदा सर्वाधिक सुपीक असते, यात पोटॅश, चुना, फॉस्फॅरिक आम्ल विपुल प्रमाणात असते. प्रचीन गाळाच्या मृदेस भांगर, नवीन गाळाच्या मृदेस खादर तर प्राचीन भरड व दगड्गोटेयुक्त मृदेस कंकर म्हणतात. या मृदेत नायट्रोजन व जैविक घटाकांची असते. शुष्क प्रदेशात यात क्षार जास्त आढळतात.

२) वाळवंटी मृदाः - यात रेतीचे प्रमाण जास्त व ह्यूमस कमी असते. राजस्थान नैऋत्य पंजाब व नैऋत्य हरियाणात आढळते.

३) काळी (रेंगूर) मृदाः - टिटेनिफेरस मॅग्नेफेरसमुळे या मृदेस काळा रंग प्राप्त झाला आहे. ही मृदा कापसासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हिचे स्थानिक नाव रेंगूर असून ती प्रामुख्याने दख्खनच्या पठारावर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातच्या काही भागात आढळते. हिची निर्मिती बेसॉल्ट ह्या खडकापासून झाली आहे. हिची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जस्त असते. यात कॅल्शिअम कार्बोनेट, मॅग्नेशियम कर्बोनेट, पोटॅश व चूना ही प्रमुख पोषक असतात. परंतु फॉस्फरसची कमतरता असते. हिला उन्हाळ्यात भेगा पडतात. त्यामुळे हवेचे मिश्रण होऊन आपोआप मशागत होते. ही माती ओली असताना मशागत करणे कठीण असते. या मृदेला नॅशनल ऍटलास मध्ये मंडालीय मृदा म्हणतात.

४) लाल मृदाः - ही मृदा काळ्या मृदेच्या विभागाच्या भोवती आढळते. लोहाच्या आधिक्यामुळे लाल रंग प्राप्त होतो. यात फॉस्फरस, सेंद्रिय पदार्थ व नायट्रोजनची कमतरता असते. तर लोह, कॅल्शिअम व अँल्युमिनिअमचे प्रमाण जास्त असते. छोटा नागपूरचे पठार, छ्त्त्तीसगढ, तेलंगना, निलगिरी, तामिळनाडूचे पठार व महाराष्ट्रात कोकणात आढळते. ज्या मृदेचे कण मोठे असतात ती नापीक तर ज्या मृदेचे कण लहाण असतात ती मृदा सुपीक असते. हिला लोम प्रकारची मृदा म्हणतात. या मृदेतील बाजरी हे प्रमुख पीक घेतले जाते.

५) लॅटेराईट मृदाः - उष्णकटिबंधीय जास्त पावसाच्या प्रदेशात मातीचा पोषक तत्त्त्वांचा थर वाहून गेल्यामुळे ही मृदा तयार होते. यात ह्युमसचे प्रमाण कमी असते. त्यामूळे कमी सुपीक असते. मेघालय, पश्चिम किनारपट्टी तसेच तामिळनाडू, ओरिसा व छोटा नागपूरच्या काही भागात आढळते. यात लोह व अँल्युमिनिअम जास्त तर चूना नायट्रोजन, पोटॅश व फॉस्फरस कमी अढळते. उंच भागातील लालमृदा जास्त आम्लयुक्त असतात.

६) पर्वतीय मृदाः- हि मृदा प्रामुख्याने हिमालयीन क्षेत्रात आढळते. हि मृदा अपरिपक्व मृदा म्हणून ओळखली जाते. ही मृदा चहाच्या मळ्यांसाठी उपयुक्त आहे. यातील करड्या रंगाची पॉटझॉल मृदा आम्लधर्मी असते. तसेच तांबूस तपकिरी वनमृदा व अल्पाईन मृदा हे तिचे उप प्रकार आहेत.

मृदा धूप

पाऊस, चराई, चुकीची मशागत, पाण्याचा अति वापर यामुळे मृदा नापीक बनत आहे. सध्या ९० लाख हे. गाळाची मृदा व ७० लाख हे. काळी मृदा आम्लीयता व क्षारतेने ग्रस्त आहे.
मुसळधार पाऊसामुळे हिमालय, पश्चिम घाट अशा पर्वतीय भागातून मातीचा वरचा थर वाहून जातो. ती धुप - भूपृष्ठ धूप
पावासामुळे वनस्पती नसलेल्या भागात खोल ओहोळ तयार होतो. (यमुना व चंचळ खोरे) – घळई धूप
मृदेची होणारी धूप थांबविणे - मृदा संवर्धन

भारत सरकारने यासाठी केंद्रिय भूमी संरक्षण बोर्डची स्थापना केली – १९५३
नैसर्गिक संपत्ती
वनेः-
भारतात असणा-या एकूण वृक्षांच्या जाती – ४९०००
भारतात आढळणा-या वनस्पतींपैकी ४०% जाती तिबेट व चीन मधून आणण्यात आल्या आहे त्यांची जात – बोरिबल
फक्त भारतातच सापडणा-या वनस्पतींच्या जाती – ५०००
पर्यावरणाच्या संतुलनासाठी आवश्यक जंगलांचे प्रमाण - ३३% (१९५२ चे वन धोरणानुसार)
भारतातील एकूण वनाखालील क्षेत्र – ६.३ को.हे. (१९.२७%), प्रत्यक्षात असणारी दाट वने – ४.६ को.हे. (११.५१%)
वनाखाली सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य – मध्यप्रदेश
वनाखाली सर्वाधिक क्षेत्र (टक्केवारी) असणारे राज्य – अरुणाचल प्रदेश (८२.२१)
भारतातील वनाखाली सर्वाधिक क्षेत्र – अंदमान निकोबार (९२.२%)
वनाखाली सर्वांत कमी क्षेत्र असणारे राज्य – गोवा
भारतात वनाखाली सर्वांत कमी क्षेत्र (%) – हरियाणा (३.८२%)
मॅग्रोव्ह जंगलांचे सर्वाधिक प्रमाण असणारे राज्य - पं. बंगाल, गुजरात
भारतात दरदोई सर्वांधिक वनांचे प्रमाण असणारे राज्य – अरुणाचल प्रदेश

भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार प्रशासकीय दृष्टीने भारतीय वनांचे वर्गिकरणः-

१) राखीव वने (Reserved forest) – यांना राष्ट्रीय संपत्ती मानले जाते. वृक्षतोड व चराई यावर कडक प्रतिबंध असतात.

२) संरक्षित वन (Protected forest) - काही नियमांच्या आधारे लाकूड तोड व गुरे चराईला परवानगी असते.

३) अवर्गिकृत वने – काही फी आकारुन लाकुडतोड व गुरे चराईस स्वातंत्र्य असते.

४) इतर वने

वनांचे प्रकार – पर्जन्याची भिन्नता, समुद्र सपाटीपासून ऊंची, हवामानानूसार वनांचे प्रकार -

१) उष्णकटिबंधीय सदाहरित वने – वर्षभर समान तापमान व २०० सेमी पेक्षा पर्जन्याच्या प्रदेशात आढळतात. ही वने मिश्र असतात. पश्चिम घाटाचा उतार, मेघालय, अंदमान, निकोबार, प.बंगाल, ओरिसा ही जंगले आढळतात. ह्या वृक्षांचे लाकुड कठीण असते. उदाः मोहगनी, रोजवूद, आयर्नवूड, रबर, आबनुस, एबोनी, सिंकोना, नारळ, ताड, बांबू इ.

२) उष्णकटिबंधीय मोसमी पानझडी वने – भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतात. १०० ते २०० सेमी. पर्जन्य घडणा-या प्रदेशात आढळतात. या वनांना लवकर आग लागते. आर्थिक दृष्ट्या ही वने महत्वाची आहेत. या वनांत साग, सास्ल, चंदन, शिसव, मोह, पळस, अर्जुन, खैर इ. वृक्ष आढळतात. उन्हाळ्यात ६ ते ८ आठवडे ही वृक्ष पाने गाळतात. प्रत्येक जातीच्या पानळीची वेळ भिन्न असते. ही वने पश्चिम घाटाचा पूर्व उतार, पूर्व मध्यप्रदेश, द. बिहार, ओरिसा, शिवकालिक टेकड्या, पूर्वघाट तसेच आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा, येथे आढळतात.

३) काटेरी वने - ८० सेमी. हन कमी पर्जन्य असणा-या प्रदेशात ही वने आढळतात. सौराष्ट्र ते पंजाब माळवा प्रांत, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सोलापूर, मराठवाडा इ. भागात आढळतात. या वृक्षाची मूळे खोल गेलेली असतात. यात बाभूळ, खजूर, निवडूंग, नागफनी इ. आढळतात.

४) मॅग्रोव्ह वने - हि वने नद्यांच्या त्रिभूज प्रदेशात आढळतात. या भागात सुंदरी वृक्षांचे प्रमाण अधिक असल्याने त्यास सुंद्री वने असे म्हणतात. यात सुंद्री, चिप्पी, मारांडी, निपा, तिबर, उंडल इ. वृक्ष आढळतात. ही वने गोड्या व खा-या अशा दोन्ही पाण्यात वाढतात. यांचा सर्वाधिक विस्तार गंगा-ब्रम्हपुत्रेच्या त्रिभूज प्रदेशात आहे.

५) पर्वतीय वनेः-

१) आर्द्रपर्वतीय वने - १००० ते २००० मी. पर्यंत ही वने आढळतात. यात ओक, चेस्टनट, सफ रचंद, ऎश, बीच ही वृक्षे आढळतात.

२) समशीतोष्ण सूचिपर्णि वने - १६०० ते ३३०० मी. प्रर्यंत ही वने आढळतात. बीच, चीड, सिडार, देवदार, स्प्रुस इ. वृक्ष आढळतात.

३) ३६०० पेक्षा जास्त उंचीवर आल्फाईन वने आढळतात. यात सिल्व्हर, चीड, बर्च, जुनियर इ. वृक्ष आढळतात. यापेक्षाही अधिक उंचीवर गवताळ प्रदेश आढळतो.
श), दक्षिणेश्वर
भारताचे हवामान

भारत हा उष्ण कटिबंधीय मोसमी हवामानाच्या प्रदेशात होतो.
मान्सून या शब्दाची उत्पत्ती मौसिम या अरबी शब्दापासून झाली आहे. याचा अर्थ ऋतू असा होतो. मान्सून प्रदेशातील वा-याच्या दिशेत ऋतूप्रमाणे परिवर्तन होते.
भारताच्या हवामानावर सर्वाधिक परिणाम करणारे घटक – हिमालय, हिंदी महासागर, भुपृष्ठ उठाव.
भारतात सर्वसाधारणपणे आढळणारे ऋतू – चार
भारतातील पावसाळा ऋतूचा कालावधी – जून ते सप्टेंबर
भारतातील एकूण पर्जन्यात नैऋत्य मोसमी वा-यांचा वाटा - ७५ ते ९० %
मान्सून्चा अंदाज घेण्यासाठी मान्सून मॉडेल तयार केले – डॉ. वसंतराव गोवारीकर
मान्सूनच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारा घटक – एल बिनो (द. प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाह)
मोसमी वारे संपूर्ण देशात पोहचल्यानंतर ढगांचा गडगडाट व विजांचा चमचमाट होऊन पाउस पड्तो यास संज्ञा – मान्सूनचा विस्फोट
भारतात पडणारे वार्षिक सरासरी पर्जन्य – १२० सेमी
भारतात (जगातील) सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण – १) माउसिनराम – ११४२० मिमी. (गारो, खासी टेकड्या, मेघालय), २) चेरापुंजी – १०८७ मिमी. ( मेघालय, चेरापुंजीचे नवीन नांव सोहरा असे करण्यात आले आहे.)
पश्चिम घाटाच्या पवनविन्मुख बाजूस म्हणतात – पर्जन्य छायेचा प्रदेश
राजस्थानामधील जैसलमेर येथील वार्षिक पर्जन्य - ९ सेमी.
जगाचे सरासरी वार्षिक पर्जन्य – ९९ सेमी
भारतातील मान्सून परतीचा काळ – ऑक्टोंबर – नोव्हेंबर
मान्सून परतीच्या काळात आद्र जमीन व उच्च तापमान असते यास म्हणतात.
बंगालच्या उपसागरात कमी दाब निर्माण होऊन चक्रीवादळे येण्याचा काळ – नोव्हेंबर
पावसाळा व हिवाळा या ॠतूंचा संक्रमणाचा काळ – ऑक्टोंबर – नोव्हेंबर
भारतातील ईशान्य मोसमी वा-यांचा काळ/हिवाळा – डिसेंबर ते फेब्रुवारी
हिवाळ्यात भूमध्य सागर, इराण, अफगाणिस्थान पाकिस्थान मार्गे भारतात येणा-या पश्चिमी वा-यांमुळे पाऊस पडणारी राज्ये - पंजाब, राजस्थान (पाऊस), हि. प्रदेश, काश्मिर (हिम)
भारतात ईशान्य मोसमी वा-यापासून पाउस पडणारी राज्ये - तामिळणाडू, आंध्रप्रदेश
सार्वाधिक थंडीचा महिना – जानेवारी
भारताती उन्हाळ्याचा कालावधि - मार्च ते मे
उन्हाळ्यात उत्तर भारतात अत्याधिक तापमानामुळे वाहणारे अति उष्ण वारे – लू
केरळ व कर्नाटकच्या किना-यावर होणारी मान्सून पुर्व वर्षा - आम्रवृष्टी/वळवाचा पाऊस
वैशाख महिन्यात बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे व वायव्येकडील उष्ण व कोरडे वारे यांच्या संमिलनातून होणारी गडगडाटी वादळे (पं. बंगाल व ओरिसा) – नॉर्वेस्टर/काल बैसाखी
भारतातील सर्वात शुष्क प्रदेश - लेह (काश्मीर)
भारतातील सर्वाधिक दुष्काळ पडणारे राज्य – कर्नाटक
समुद्र सानिध्य लाभलेला प्रदेशात हवामान वर्षभर – सम असते
समुद्र सनिध्यापासून दूर अंतर्गत भागात हवामान असते – विषम
मान्सून न पोहोचल्यामुळे शुष्क असणारे प्रदेश – किन्नारे व लाहुल (हिमाचल प्रदेश) लडाख (जम्मू काश्मिर)
मोसमी वारे पोहोचुनही वाळवंटामुळे आर्द्रता ग्रहण केली जाऊन शुष्क झालेला भाग - पश्चिम राजस्थान

👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
**********************************
==============================
👧🏻भारतातील राज्य व राजधान्या👦🏻                     साबळ॓ एन आर
भारतातील राज्य व राजधान्या  
१) आंध्रप्रदेश – हैद्राबाद        २) अरुणाचल प्रदेश – इटानगर      ३) आसाम – दिसपूर
४) बिहार - पटना         ५) गोवा – पणजी            ६) गुजरात – गांधीनगर
७) हरियाना - चंडीगड         ८) हिमाचल प्रदेश - शिमला         ९) जम्मू काश्मीर - श्रीनगर
१०) केरळ- तिरुअनन्तपुरम     11) कर्नाटक - बंगळूर             12) मध्य प्रदेश - भोपाल
13) महाराष्ट्र - मुंबई.        14) मणिपूर - इम्फाळ             15) मेघालय – शिलॉंग
16) मिझोरम - ऐझॉल         17) नागालंड – कोहिमा            18) ओरिसा – भुवनेश्वर
19) पंजाब - चंडीगड         20) सिक्कीम - गंगटोक         21) राजस्थान - जयपूर
22) तामिळनाडू - चेन्नई     23) त्रिपुरा – आगरताला                24) उत्तर प्रदेश - लखनऊ
25) पश्चिम बंगाल – कोलकाता    26) छत्तीसगड - रायपुर                          27) उत्तरांचल - देहरादून
28) झारखंड - रांची.
**********************************
*

No comments:

Post a Comment