मनोरंजक खेळ

मनोरंजनात्मक खेळ 
*******-**********-****************
👧🏻 मनोरंजक खेळ👦🏻
विद्यार्थ्यांना अध्ययन निरस वाने वाटू नये म्हणून आपण अधून मधून काही मनोरंजक खेळ घ्यावेत .
तसेच या खेळातून त्यांना अध्ययनाचे धडे देण्याचा प्रयत्न करावा.
त्यासाठी काही खेळ मी आपल्यासमोर मांडत आहे.
👦🏻

01 .) स्मरण खेळ –

विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतो. हा खेळ घेताना टेबलावर २० – २५ लहान लहान वस्तू ठेवाव्यात.
उदा. मोबाईल , पेन , पेन्सील ई. आणि त्या वस्तू मुलांना दाखवाव्यात. मुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात. नंतर त्या वस्तू
कापडाने झाकून ठेवाव्यात.
नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू लिहायला सांगाव्या. त्या वस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा लागेल.
जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल.
👧🏻
02 ) ओंजळीने ग्लास भरणे –

मुलांना या खेळात फार आनंद मिळतो. प्रथम आपण १० – १२ मुलांचे गट करावेत. नंतर समान आकाराचे गटातील संख्ये नुसार ग्लास
घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे. त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या. मुलांना त्या बादलीतील
पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल. ओंजळीने पाणी नेउन त्यांना आपला ग्लास
भरावा लागेल.
या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल. यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पण
मदत होईल.
👦🏻
03. ) ठराविक वेळेत गणिते सोडवणे –

मुलांना आपण २०-२५ बेरीज , वजाबाकी किवा इतर कोणत्याही प्रकारची २०-२५ लहान लहान कोणत्याही प्रकारची गणिते देऊ शकतो
आणि ४-५ मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण विद्यार्थ्यांना सोडवायला लाऊ शकतो. त्या वेळेत गणिते उत्तरासह सोडवणे अपेक्षित आहे.
सुरुवातीला १ अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला सराव झाल्यास अंक वाढवत जावे. अश्याप्रकारे खेळातून गणिताचा सराव घ्यावा.
या खेळत १००% मुलांना सहभागी करावे.
👧🏻
04. ) एकमेकांना हसवणे –

मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या वेळेस हा खेळ घ्यावा. काही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणि बसलेल्या मुलांपैकी एकाने
येउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावा. मात्र त्यांना हसवताना हात लावायचा नाही. वेगवेगळे हावभाव , वेगवेगळे आवाज काढून , विनोद
सांगून त्यांना हसवावे. जे मुले हसतील त्यांना खाली बसवावे आणि जे मुले हसणारच नाहीत त्यांना या खेळाचा विजेता घोषित करावे.
👦🏻
05. ) आवाज ओळखणे –

एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकी वर्गातल्या / गटातल्या मुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणि त्या मुलाला नाव घेऊन बोलवावे.
त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने कोणी आवाज दिला ते सांगावे . जर त्याने बरोबर ओळखले तर त्याला एक गुण द्यावा .
असे सर्व मुले होई पर्यंत खेळ सुरु ठेवावा . ज्याला जास्त गुण मिळतील तो विजयी घोषित करावा.
👧🏻
06.) खोक्यातील वस्तू ओळखणे –
एक मोठे खोके घ्यावे . त्यात लहान लहान बॉल , पेन , पेन्सिल अश्या १०-१२ वस्तू भराव्या . त्यानंतर त्या खोक्याचे तोंड बंद करावे . त्या खोक्याला एका बाजूने मुलांचे हात आत जातील एव्हडे मोठे छिद्र पाडावे. नंतर एका – एका मुलाने त्या खोक्यात हात घालून हाताने चाचपडून वस्तू ओळखाव्या .
👦🏻

07.) वासावरून वस्तू ओळखणे –

बाजारात प्लास्टिक चे ग्लास मिळतात ते आपण आणावे . पण ते ग्लास पारदर्शक नसावेत.नंतर एका – एका ग्लासात कांदा , लसुन अश्याप्रकारे वेगवेगळ्या वस्तू भराव्यात आणि ग्लासला एक एक कागद चिटकवावा. त्या वर चिटकवलेल्या कागदाला सुईने लहान – लहान छिद्र पाडावे आणि मुलांना त्या छीद्रातून वास घेऊन वस्तू ओळखण्यास सांगावे.
👧🏻

08.) फुगे फोडणे –

लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो . या खेळात आपण काही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगे फुगवताना त्यात थोडी कमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचा प्रयत्न करावा. पण न हात पाय लावता आणि ३० सेकंदात फुगे फोडावे. असा नियम ठेवावा. दिलेल्या वेळेत जो मुलगा जास्त फुगे फोडेल तो विजेता घोषित करावा.
👦🏻

09.) बॉल फेकून मारणे –

या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावे. एक वर्तुळ आखून वर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्या गटातील मुलांना ठराविक अंतर घेऊन उभे करावे. त्यांच्या हातात ३ प्लास्टिक चे बॉल द्यावेत. प्रत्येकाला ३-३ बॉल मारता येतील. तो बॉल त्यांनी वर्तुळातील मुलांना फेकून मारावे आणि वर्तुळातील मुलांनी त्या येणाऱ्या बॉल पासून आपला बचाव करावा. जेवढे बॉल वर्तुळातील मुलांना लागतील तेवढे गुण बॉल फेकणाऱ्या मुलांना द्यावेत. सर्व मुले संपल्यावर गट बदलावा.
👧🏻

10.) नेमबाजी –

ठराविक अंतरावर एखादी वस्तू ठेऊन मुलांनी त्या वस्तूला बॉल ने नेम मारावा . प्रत्येकाला ३-३ संधी द्याव्यात जेवढ्या वेळा मुलाचा नेम लागेल तेवढे गुण त्या मुलाला द्यावेत. जास्त गुण घेणारा मुलगा विजेता घोषित करावा.
👧🏻

11.) विद्यार्थी ओळखणे –

एका ओळीत ठराविक १०-१५ विद्यार्थी उभे करावे आणि एका मुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिले आहेत ते पाहायला लावावे . आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने उभे असलेल्या मुलांची नावे सांगावी. नावाचा क्रम चुकल्यास तिथून पुढचे सगळे चुकीचे ठरवावे. अश्याप्रकारे जो मुलगा जास्त विद्यार्थी क्रमाने सांगेल तो विजेता ठरवावा.
👦🏻

12.) बादलीत चेंडू टाकणे –

एक मोठी बदली घेऊन ठराविक अंतरावर ठेवावी आणि फुटबॉल / vollyball घेऊन त्या बादलीत टाकण्यास सांगावे. प्रत्येक मुलाला तीन संधी द्याव्यात . मुलाने किती वेळा बॉल बादलीत टाकला आणि बॉल बादलीत थांबला यावर क्रमांक ठरवावा.
👧🏻

13.) संदेश पोचवणे –

या खेळात १०-१५ मुलांना एका ओळीत बसवावे आणि आपण समोर बसलेल्या मुलाला जवळ बोलवून त्याला एखादे व्याक्य सांगावे. त्या मुलाने जाग्यावर जावून त्याच्या मागे बसलेल्या मुलाच्या कानात ते वाक्य सांगावे. अश्याप्रकारे मुलांनी आपापल्या मागील मुलाला ते वाक्य सांगावे आणि सगळ्यात शेवटी बसलेल्या मुलाने ते वाक्य सगळ्यात पुढे येवून सांगावे. आपण पहिल्या मुलाला सांगितलेले वाक्य आणि शेवटच्या मुलाचे वाक्य फार वेगळे येते.

14.) आंधळी कोशिंबीर –

हा खेळ खेळताना एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे.बाकीच्या मुलांनी एक वर्तुळ करून आत थांबावे. डोळे बांधलेल्या मुलाने वर्तुळातील एखाद्या मुलाला पकडावे आणि कोणाला पकडले ते ओळखावे . वर्तुळातील मुलांनी डोळे बांधलेला मुलगा वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याला वेळोवेळी सूचना द्याव्यात. पट्टी बांधलेला मुलगा ज्या मुलाला पकडेल व ओळखेल त्या मुलाच्या डोळ्यावर नंतर पट्टी बांधावी आणि खेळ पुढे सुरु ठेवावा.
👦🏻

15.) विष – अमृत –

एक मोठे वर्तुळ आखावे . त्यात सर्व मुले पळतील. त्यांना एक मुलगा शिवायला जाईल. तो ज्या मुलाला शिवल त्या मुलाला विष मिळाले असेल त्यामुळे त्याने खाली बसावे. दुसऱ्या मुलांनी त्या बसलेल्या मुलाला शिउन अमृत द्यावे. अमृत मिळाल्यास तो बसलेला मुलगा उठून पळू शकतो. विष देणाऱ्या मुलाने त्यांना अमृत देण्यापासून थांबवावे.

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
*********************************
=============================
👨🏻मनोरंजनात्मक खेळ👧🏻

👧🏻गोणपाट शर्यत 👨🏻
एकेका संघात १० ते १५ विद्यार्थी घ्यावे ( समान चार संघ पाडावे) पहिल्या दोन विद्यार्थ्यांजवळ गोणपाटे  द्यावीत समोरच्या बाजूला सुमारे २५ फुटावर खुणा ठेवाव्या. गोणपाटात दोन्ही पाय घालून गोणपाटाचे तोंड कमरेजवळ धरावे व धावत किवा उड्या मारत त्या खुणेपर्यंत जावे व खुणेस वळसा घालून व जागेवर यावे. त्यानंतर पुढच्याने जावे. याप्रमाणे प्रत्येक संघासाठी दोन दोन पोती देऊन हि शर्यत घ्यावी. अंतिम विजयी संघ घोषित करावा.  
👨🏻तीन पायी शर्यत 

 संघ पडावेत विद्यार्थ्यांचे समान चार. दोघांच्या जोड्या कराव्या, एकाचा उजवा व एकाचा डावा पाय असे घोट्याजवळ रूमालांनी बांधावे. त्यांनी मधले हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवावे शिट्टी मारताच समोर धावत जावे व खुणेला वळसा घालून परत यावे. त्यानंतर त्यांच्या पुढच्या जोडीने जावे, अशा प्रकारे शर्यत खेळावी. अंतिम फेरीनंतर विजयी संघ जाहीर करावा,
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
👨🏻आंधळी कोशिंबीर 👧🏻
१५ ते २० त्रिज्येचे वर्तुळ आखावे. २० ते २५ विद्यार्थी खेळायला घ्यावेत एकाचे डोळे बांधावेत व स्वत: भोवती हळुवार फिरवावे व सोडून द्यावे. त्याने इतर विद्यार्थ्यांना शिवण्याचा प्रयत्न करावा. जो सापडेल त्याच्यावर पुढील डाव द्यावा. खेळातील गंमत वाढविण्यासाठी २/३ लोकांचे डोळे बांधून देखील सोडता येतील. अशा वेळी त्यांनी हात लांब करून चाचपडावे म्हणजे टक्कर होवून दुखापत होणार नाही.                            
👧🏻चमचा लिंबू शर्यत  👨🏻

विद्यार्थ्यांना प्रमाणानुसार गट करावे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडात १ चमचा व १ लिंबू द्यावा. विद्यार्थी एका ओळीत उभे करावेत पुढे ठराविक अंतरावर दुसरी रेषा आखावी. सर्वात आगोदर जो विद्यार्थी चमचातील लिंबू एकदाही पडू न देता ती रेषा पार करील तो विजयी. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांच्या गटांना संधी द्यावी व अंतिम फेरीनंतर विजयी संघ घोषित करावा,
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
👧🏻 रस्सीखेच👨🏻
       दोन पसरवून ठेवावा मध्याच्या दोन्ही बाजूंस दहा-दहा फुटांवर मैदानावर रेषा आखाव्या मध्यावर लाल फीत बांधून ठेवावी व मध्यातून दोन्हीकडे दहा फूट अंतरावर हिरव्या फिती बांधाव्या दोर ओढायचा इशारा केल्याबरोबर दोन्ही संघांनी दोर ओढायला सुरूवात करावी.  मधली लाल फीत मैदानावरील 10 फुटांच्या रेषापर्यंत आली की,  दुसर्‍या संघास ओढून आणणारा संघ विजयी होईल.  नंतर बाजूंची अदलाबदल करावी तीन वेळा संधी घ्यावी.  दोनदा विजय मिळविणारा संघ विजयी म्हणून जाहीर करावा. 

👨🏻संगीत खुर्ची👧🏻

        खो-खो खेळणारे बसतात त्याच प्रमाणे उलटसुलट तोंडे करून खुर्च्या ठेवाव्यात.  ( हा खेळ खुर्च्या गोलाकार मांडून सुध्दा खेळता येईल) पेटी किंवा बासरी  वाजविणारा मध्ये बसवावा.  त्याला खेळणारे दिसणार नाहीत अशी व्यवस्था करावी.  इशार्या बरोबर सर्वांनी खुर्च्या भोवती गोलाकार धावावे. त्यावेळी पेटी वाजविणे सुरू करावे. पेटीचा आवाज थांबविल्या बरोबर प्रत्येकाने एकेका खुर्च्यावर बसावे,  ज्याला खुर्ची मिळणार नाही तो बाद.  धावणाऱ्यां पेक्षा खुर्च्या कमी ठेवाव्यात.  प्रत्येक वेळी खुर्च्या कमी करीत जावे.  शेवटी जो राहिल तो विजयी होईल.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
👧🏻संगीत टोपी👨🏻

सर्व खेळाडू वर्तुळाकार बसतील. जो मध्यभागी असेल त्याचेजवळ वाद्य वाजवायला द्यावे. वाद्य वाजून लागताच वर्तुळावरील खेळाडूंनी एक टोपी वर्तुळाकार पुढील गड्यास देत जावी. स्वत: जवळ टोपी येताच ती पुढच्याकडे द्यावी. वाद्य बंद झाल्यावर ज्याच्या हातात टोपी असेल त्यास गमतीदार शिक्षा द्यावी.

👧🏻गोलात चेंडू मारणे👨🏻


भिंतीवर ६ इंच त्रिजेचे एक वर्तुळ आखावे दहा फुटांवरून त्यात चेंडू मारावा. तीन वेळा संधी द्यावी चेंडू गोलात लागला तर एक गुण याप्रमाणे तीन संधीत जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न करण्यास सांगावे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
🌺 राक्षसाला खडे चारणे 🌺

  पुठ्याच्या 2`x 2` चौकोनात राक्षसाचे तोंड काढावे. त्याचे तोंड मोठे म्हणजे आSSS केलेले असावे. तोंडाचा आ केलेला भाग कापलेला असावा. हे चित्र सोयीस्कर जागी टांगून ठेवावे. सुमारे १० फुट अंतरावर उभे राहून त्याच्या तोंडात खडे टाकावे. ३ किवा ५ खडे द्यावे. तोंडात गेलेल्या खड्याला १ गुण याप्रमाणे गुण द्यावेत.

🌺 गाढवाला शेपूट लावणे 🌺


  फळ्यावर गाढवाचे चित्र काढावे. त्याला शेपूट काढू नये. कापडाचे किवा कागदाचे शेपूट तयार करावे. डोळे रुमालाने बांधून त्या चित्रातील गाढवाला शेपूट लावावे. हे काम खडूने देखील करता येईल. जो शेपूट बरोबर लावील त्याला विजयी घोषित करावे.
@@@@@#@@@@@@@@@@@@@@@@

No comments:

Post a Comment