महापुरूष

महापुरूष = महात्मा फुले
******** 
🌅🌺👦🏻🌺🌅👧🏻🌺

जोतीराव गोविंदराव फुले

👉🏼 टोपणनाव:जोतिबा, ज्योतीबा, 
👉🏼 जन्म:एप्रिल ११, इ.स. १८२७
               कटगुण, सातारा,महाराष्ट्र
👉🏼 मृत्यू:नोव्हेंबर २८, इ.स. १८९०
                  पुणे, महाराष्ट्र
👉🏼 वडील:गोविंदराव फुले
👉🏼 आई:चिमणाबाई गोविंदराव फुले
👉🏼 पत्नी:सावित्रीबाई फुले


महात्मा जोतिबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) 
    हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. 👉🏼त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; 
👉🏼 शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

••• बालपण आणि शिक्षण •••

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदरतालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.

प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

••• सामाजिक कार्य •••

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्‍या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -

“विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।

नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।



जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.



वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईट्‌स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्‌र्‍य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्‍नी सावित्रीबाईंना १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्‍याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्‌र्‍याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

••• साहित्य आणि लेखन •••

'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

🙏🏼🙏🏼 सन्माननीय उपाधी 🙏🏼🙏🏼

पश्चात प्रभाव (लिगसी)

महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.

पिंपरी-चिंचवड महापालिका ही फुले आणि आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते. जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर १९५५ साली आचार्य अत्रे यांनी ’महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपटपुरस्कार मिळाला होता. जोतिबांच्या जीवनावर ’असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.

जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात.

••• जोतिबा फुले यांच्या जीवनावरील ग्रंथ, नाटक, चित्रपट वगैरे••• 

ललित

••• जीवनपट •••



👉🏼 इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा

👉🏼 इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.

इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.

इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.

इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.

इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.

इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.

इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.

सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.

इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.

मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.

इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी

इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.

इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.

इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.

इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .

इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.

इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.

इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.

इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.

इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.

२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.

विद्याध्यायानासाठी ज्यांचा सतत असे प्रयास, 

त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर प्रवास.

स्त्री शिक्षण; हा एकची असे ध्यास, हा एकची असे ध्यास,

या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता.महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते.आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जात असत.कारण ते सामन्यातील असले तरी विचाराने व कर्तुत्वाने असामान्य होते.सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व समता' या दोन ट  शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल.महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते समाजसेवक होते.

🌺👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
🌺🌅👧🏻🌺🌅👦🏻🌺

       💎बाबासाहेब आंबेडकर💎


🔷जन्म : एप्रिल १४, इ.स. १८९१

🔷महापरिनिर्वाण : डिसेंबर ६, इ.स. १९५६

🔷जन्मस्थान: महू, मध्य प्रदेश

🔷पत्‍नी: रमाई भीमराव आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर ऊर्फ माई (माहेरच्या शारदा कबीर)

🔷अपत्ये: यशवंत भीमराव आंबेडकर

🔷आई: भिमाई रामजी आंबेडकर

🔷वडील: रामजी मालोजी आंबेडकर 


🍁हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते.

🍁भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.

🍁सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या ते एक होते. 

🍁कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या.

🔷सुरुवातीचे जीवन

🍀मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. सुभेदार रामजी हे मालोजीरावांचे पुत्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ’नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षित, संस्कारसंपन्न व ज्ञानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला आणि शुद्ध आचाराला मोठे स्थान होते.

🍀डॉ. आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली महू या मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार कुटुंबात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते व त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली.

🍀इ.स. १८९६ मध्ये भीमरावांच्या आईचे-भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यावेळी मातृविहीन भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे मोठे काम आत्या मीराबाईंनी केले. त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठ्या आणि स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या. म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत.

🍀रामजींनी इ.स. १८९८ साली कुटुंब मुंबईला नेले. तेथे आंबेडकर एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.

🍀 इ.स. १९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली व इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यांच्या समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला.

🍀इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर ठरल

🍀अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी २५ रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली. 

🍀इ.स. १९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली व बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केली. याच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला.

🍀कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख करून दिली. इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी आंबेडकरांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे.


🎓शिक्षण

📚पदवी- 
एम.., पीएच. डी,. डी.एस्‌सी, एल्‌एल.डी., बॅरिस्टर अॅट लॉ.


📚प्राथमिक शिक्षण

भीमराव वयाने लहान असल्यामुळे ’कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षरओळख आपोआप होऊ लागली. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे नाव दाखल केले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला.

🎓उच्च शिक्षण

📚बी.ए.
डॉ. बाबासाहेब तथा बी.आर.आंबेडकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. नोव्हेंबर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची परीक्षा दिली. जानेवारी १९१३मध्ये ते बी.ए.च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. 
अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करण्याचा मान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवला.
बडोदा संस्थानचे स्कॉलर म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर परदेशी उच्चशिक्षणासाठी प्रथमतः अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील जगप्रसिद्ध कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले. 

📚एम.ए.
एम.ए.या पदवीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी गेले होते. 
अर्थशास्त्र, राजकारण, मानववंशशास्त्र, नीतिशास्त्र, व्यापार, समाजशास्त्र या विषयांवर प्रभुत्व मिळवायचे होते.या विषयांचा सखोल अभ्यास करून कोलंबिया विद्यापीठला दि. १५ मे १९१५ रोजी अॅडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला. दि. २/६/१९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम.ए.ची पदवी मिळाली.

✴आंदोलने

🌀चवदार तळे सत्याग्रह
इ.स. १९२६ साली आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.

🌀काळाराम मंदिर सत्याग्रह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मुक्कामी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची घोषणा केली. 
२ मार्च १९३० ही सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली. 
रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी शंकरराव गायकवाडावर सोपवण्यात आली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ अशी जोरदार घोषणा देत पाण्यात उडी घेतली. पोलिसांनी त्यांना कुंडाबाहेर काढून बेदम मारहाण केली. आंबेडकरी चळवळीतील तरुणाने रामकुंडात उडी घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ब्रिटिश जिल्हाधिकारी गार्डन रामकुंडावर आले. सत्याग्रहींचा जोश व दृढ निश्चय पाहून त्यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले.


✏पुणे करार (संक्षिप्त मसुदा) 
 यातही तडजोड करण्यात आली व सह्या करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबानी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली.
इतर सर्व सभासदांनीही सह्या केल्या.  नथुराम गोडसे सारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे अत्रे यांना दु:ख होते. 'पुणे करारा'वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी 'पुणे करारा' वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कॉग्रेसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही. आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकांत पराभव केला


🔷शैक्षणिक विचार
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. 
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत. 

🔷हिंदू कोड बिल
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भाग्य हिंदुसमाजाचे! आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करून घेतला.

🔷भारताच्या स्वातंत्र्याबद्दलचे विचार
स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.

🔷भारतीय घटनेचे शिल्पकार
भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला इंग्रज सरकारकडून प्रयत्‍न करण्यात आले. 
१९४६ ला माउंटबॅटनच्या नेतृत्वात एक आयोग भारतात आले. हा आयोग संविधान सभेच्या निर्मितीसाठी शेवटचा आयोग ठरला. या सर्व इतिहासात बाबासाहेबांचे मोठे योगदान राहिले आहे. संविधान निर्मितीच्या पूर्वेतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, अन्य कुणापेक्षाही जास्त आहे. 
 बाबासाहेबांनी संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरून केलेली कामगिरी आणि त्यांची संविधान सभेतील सर्व कलमांवर केलेली भाषणे म्हणजे या देशाचे भवितव्यच होते. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार ठरविण्याचा बहुमान आम जनतेने बहाल केला आहे.

🌀धर्मांतर
बाबासाहेबांना अखेर बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण, सदाचार, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा वाटला म्हणून त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला.त्या दिवशी अशोकविजयादशमी होती(या दिवशी सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता).हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. महास्थविर चंद्रमणी यांचेकडूनत्रिशरण व पंचशील ग्रहण करून त्यांनी धम्मदीक्षा घेतली.व आपल्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञांद्वारे संदेश दिला. 

🌀महापरिर्निवाण
डॉ.आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चात्तापाने अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्‌धारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल.



   🙏बाबासाहेब आम्बेडकर🙏     

 ⭐जीवनेतिहास (थोडक्यात)⭐

🔷 १४ एप्रिल इ.स.१८९१
🔶महू गावी जन्म.
🔷 इ.स.१८९६
🔶आई, भिमाईचे निधन
🔷 नोव्हेंबर इ.स.१९०० 🔶सातार्‍याच्या शासकीय शाळेत प्रवेश.
🔷 इ.स.१९०४
🔶एलफिन्स्टन शाळेत प्रवेश.
🔷 इ.स. १९०६
🔶रमाई यांचेशी विवाह
🔷 इ.स.१९०७
🔶मॅट्रिक परीक्षा, ७५० पॆकी ३८२ गुणांनी पास केली.
🔷 इ.स.१९०८ जानेवारी 🔶एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश.
🔷 इ.स.१९१२
🔶मुलगा यशवंत भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला.
🔷 इ.स. १९१३
🔶बी.ए.ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. ( पर्शियन आणि इंग्रजी हे विषय)
🔷 जून इ.स.१९१५
🔶एम.ए.ची परीक्षा पास झाले.
🔷 जून इ.स.१९१६
🔶कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी.साठी काम पूर्ण करून लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.
🔷 इ.स.१९१७
🔶कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली.
🔷 जून इ.स.१९१७
🔶लंडनहून एम.एस्‌सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.
🔷 इ.स.१९१८
🔶साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष
🔷 नोव्हेंबर इ.स.१९१८
🔶सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ).
🔷 जून ३१ इ.स.१९२०
🔶साप्ताहिक मूकनायक सुरू केले
🔷 मार्च २१ इ.स.१९२०
🔶कोल्हापूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षपदी असलेल्या अस्पृश्य परिषदेत भाषण
🔷 जून इ.स.१९२१
🔶लंडन विद्यापीठाने त्यांना एम.एस्‌सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली.
🔷 मार्च इ.स.१९२३
🔶रुपयाची समस्या हा प्रबंध व डी.एस्‌‍सी.(अर्थशास्त्र) ही पदवी
🔷२० जुलै इ.स.१९२४
🔶बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली, घोषवाक्य – शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
🔷 २० मार्च इ.स.१९२७
🔶चवदार तळे सत्यागृह
🔷एप्रिल ३ इ.स.१९२७
🔶बहिष्कृत भारत नावाचे वृतपत्र सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली
🔷सप्टेबर इ.स.१९२७
🔶समाज समता संघ स्थापन केला.
🔷 इ.स.१९३४
🔶परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती.
🔷 मे २६ इ.स.१९३५
🔶रमाई भीमराव आंबेडकर यांचे निधन
🔷 ऑक्टोबर १३ इ.स.१९३५ 🔶येवला, येथे धर्मांतराची घोषणा
🔷 ऑगस्ट इ.स.१९३६
🔶स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना
🔷 डिसेंबर इ.स.१९४०
🔶थॉट्स ओन पाकिस्तान हे पुस्तक प्रसिद्ध
🔷जुलै इ.स.१९५१
🔶भारतीय बुद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना
🔷मे इ.स.१९५३
🔶मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना
🔷डिसेंबर २५ इ.स.१९५५ 🔶देहूरोड पुणे येथे बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना
🔷डिसेंबर 6 , इ.स.1956
🔶महापरिनिर्वाण


    🌹बाबासाहेब आंबेडकर 🌹

📚यांनी व त्यांच्यावरील  लिहिलेली  काही निवडक पुस्तके📚

📕माझी आत्मकथा - अनुवाद : राजेंद्र विठ्ठल रघुवंशी, रघुवंशी प्रकाशन, पुणे, १९९३.
📗हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान - अनुवाद : गौतम शिंदे, मनोविकास प्रकाशन, मुंबई १९९८.
📘दलितांचे शिक्षण - अनुवाद : देवीदास घोडेस्वार, संपादक: प्रदीप गायकवाड, क्षितिज पब्लिकेशन, नागपूर, २००४
📙आंबेडकर - नलिनी पंडित, ग्रंथाली प्रकाशन. 
📓भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - म.श्री. दीक्षित, स्नेहवर्धन प्रकाशन.
📔महाकवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - वामन निंबाळकर, प्रबोधन प्रकाशन.
📒डॉ. बाबासाहेब आणि आम्ही - आहेर अविनाश, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९६.
📕डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा - इंद्रायणी साहित्य, पुणे.
प्रबुद्ध - खेर भा. द., मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९८९.
📗डॉ. आंबेडकर आणि विनोद : एक शोध - दामोदर मोरे, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, १९९४.
📘गोष्टी बाबांच्या, बोल बाबांचे - कुलकर्णी रंगनाथ, १९९१.
📙डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र - संपादक : धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९८१.
📓आंबेडकर यांचे राजकीय विचार - भ. द. देशपांडे, लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन.
📒आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळी - कृष्णा मेणसे, लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन.
📕डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात - शंकरराव खरात, इंद्रायणी साहित्य.
📔आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना - डॉ. रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
📗आंबेडकर आणि मार्क्स - रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
📘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन
📓बाबासाहेब आंबेडकरांवरील संक्षिप्त संदर्भ सूची - धनंजय कीर.
📙डॉ. आंबेडकरांचे अंतरंग- द. न. गोखले, मौज प्रकाशन.
📒आंबेडकरवाद : तत्त्व आणि व्यवहार - रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
📕डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेचे साहित्य(अध्यक्षीय व इतर भाषणे) - संपादक : अडसूळ भाऊसाहेब, महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषद, मुंबई, १९७७.
📔भीमकालदर्शन (दिनदर्शिका-संपादक सुहास सोनवणे 
📗आंबेडकर आणि मार्क्स - सुगावा प्रकाशन, पुणे, १९८५.
📘ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - काळे वि. र. , वसंत बुक स्टॉल, मुंबई, २००४.
📙डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घटनेची मीमांसा - अमृतमहोत्सव प्रकाशन, मुंबई, १९६६.
📓संसदपटू डॉ. बाबासाहेब आंबेडकर - बी.सी. कांबळे प्रकाशन, मुंबई, १९७२.
📒डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखेरचे संसदीय विचार - बी. सी. कांबळे प्रकाशन, मुंबई, १९७३.
📕मनुस्मृती, स्त्रिया आणि डॉ. आंबेडकर - कांबळे सरोज, सावित्रीबाई ङ्गुले प्रकाशन, १९९९.
📔डॉ. आंबेडकर विचारमंथन, - कुबेर वा. ना., लोकवाङ्‌मयगृह प्रकाशन, मुंबई.
📗पत्रांच्या अंतरंगातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर - खरात माधवी, श्री समर्थ प्रकाशन, पुणे, २००१.
📘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे - खरात, शंकरराव, श्री लेखन वाचन भांडार, पुणे, १९६१.
📙डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे - क्षितीज पब्लिकेशन, नागपूर, २००२.
📓डॉ. आंबेडकर आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान - जाधव नरेंद्र, सुगावा प्रकाशन, पुणे, १९९२.
📒डॉ. बाबासाहेब आणि स्वातंत्र्य चळवळ - जाधव राजा आणि शहा जयंतीभाई, राजलक्ष्मी प्रकाशन, १९९४.
📕भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन, विचार, कार्य आणि परिणाम - यदुनाथ थत्ते, कौस्तुभ प्रकाशन, नागपूर, १९९४.
📔डॉ. बाबासाहेब आंबेडकर-नियोजन, जल व विद्युत विकास: भूमिका व योगदान - थोरात सुखदेव, अनुवाद : दांडगे, काकडे, भानुपते, सुगावा प्रकाशन, पुणे, २००५.
📗डॉ. बाबासाहेब आंबेडकर : मानवतेचे कैवारी, - देशपांडे रा.ह., अनुवाद : गोखले श्री. पु., नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई.
📘डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ - संपादक : दया पवार , महराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९९३.
📙भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - संजय पाटील, निर्मल प्रकाशन, नांदेड, २००४.
📓डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण : एक अभ्यास - शेषराव मोरे, राजहंस प्रकाशन, पुणे, १९९८.
📒डॉ. आंबेडकर : एक चिंतन - मधु लिमये, अनुवाद : अमरेंद्र, नंदू धनेश्वर, रचना प्रकाशन, मुंबई.
📕प्रज्ञासूर्य - संपादक : शरणकुमार लिंबाळे, प्रचार प्रकाशन, कोल्हापूर, १९९१.
📔डॉ. आंबेडकर आणि त्यांचा धम्म - प्रभाकर वैद्य, शलाका प्रकाशन, १९८१.
📗भीमप्रेरणा : भारतरत्‍न बाबासाहेब आंबेडकर यांचे १०० मौलिक विचार - संपादक : अ.म. सहस्रबुद्धे, राजा प्रकाशन, मुंबई, १९९०.
📘संविधान सभेत डॉ. आंबेडकर - जयदेव गायकवाड, पद्मगंधा प्रकाशन.
📙डॉ. बाबासाहेब आंबेडकर - डॉ. सौ. अनुराधा गद्रे, मनोरमा प्रकाशन.
📓 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र - विजय जाधव, मनोरमा प्रकाशन.
📒बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - प्रा. सुभाष गवई, ऋचा प्रकाशन.
📕ज्योतिराव, भीमराव - म. न. लोही, ऋचा प्रकाशन. 
📔चंदनाला पुसा - डॉ. दा. स. गजघाटे, ऋचा प्रकाशन. 
📗डॉ. बाबासाहेब आंबेडकर - सचिन खोब्रागडे, ऋचा प्रकाशन.
📘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - नाना ढाकुलकर, ऋचा प्रकाशन.
📙विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास - कोसारे एच. एल., ज्ञानदीप प्रकाशन, नागपूर.
📓डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (समग्र चरित्र) - एकूण खंड १५, खैरमोडे चांगदेव भवानराव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. ( १ ते ९ खंड महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे प्रकाशित आणि खंड १० वा सुगावा प्रकाशनातर्फे प्रकाशित).
📒आंबेडकर भारत - भाग १ - बाबुराव बागुल, राजहंस प्रकाशन, पुणे.
📕आंबेडकर भारत - भाग २ - बाबुराव बागुल, सुगावा प्रकाशन, पुणे. 
📔आठवणीतले बाबासाहेब, योगीराज बागुल. 
📗डॉ. आंबेडकरांचे मारेकरी-अरुण शौरी - लेखक डॉ. य दि फडके 📘ग्रंथकार भीमराव (संपादक सुहास सोनवणे) 
📙सत्याग्रही आंबेडकर (संपादक सुहास सोनवणे) 
📓बहुआयामी (संपादक सुहास सोनवणे) 
📒शब्दफुलांची संजीवनी (संपादक सुहास सोनवणे) 
📕डॉ. आंबेडकर आणि समकालीन (संपादक सुहास सोनवणे)
📔ग्रंथकार भीमराव (संपादक सुहास सोनवणे)
📗आंबेडकरांचे सत्याग्रह आणि ब्रिटिश सरकार'- प्रा. डॉ. सी. एच. निकुंभे
📘गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
📙The Social Context of an Ideology - Ambedkar's Political and Social Thoughts (Sage publication-1993) (लेखक : डॉ. मा.स. गोरे)
📓Human rights & Indian Constitution : Dr. B.R. Ambedkar : Enduring leagacies (लेखक - डॉ. एस.एस. धाकतोडे)
📒डॉ. आंबेडकर दर्शन (लेखसंग्रह, संपादक मनीष कांबळे)
📕माणूस त्याचा समाज व बदल -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सिद्धान्तन (लेखक : सुधाकर गायकवाड)

---------------------------------------------
🌹भारतरत्न डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांचा कुळ परिचय  🌹
---------------------------------------------

⭐आजोबा: मालोजी सकपाळ 
⭐वडील : रामजी मालोजी सपकाळ 
⭐आई : भीमाताई रामजी सपकाळ 
⭐आईचे वडील: धर्माजी मुरबाडकर 
⭐आत्या : मीराबाई मालोजी सकपाळ 
⭐भाऊ : आनंदराव रामजी आंबेडकर 
⭐बहिण : मंजुलाबाई,तुळसाबाई, गंगूबाई रामजी आंबेडकर 
⭐वहिनी : लक्ष्मीबाई आनंदराव आंबेडकर  
⭐पत्नी : रमाबाई भिमराव आंबेडकर 
⭐दूसरी पत्नी : डॉ सविता भिमराव आंबेडकर  
⭐सासरे : भीकू धोत्रे ( वलंगकर ) 
⭐सासु : रखमा भीकू धोत्रे 
⭐मेहुने : शंकरराव भीकू धोत्रे 
⭐बहिनीचे पति :धर्माजी कोळेकर 
⭐बाबांचे मुले-मूली : यशवंत,रमेश, इंदु, राजरत्न,गंगाधर 
⭐सुन : मिराबाई यशवंत आंबेडकर 
⭐नातवंडे : प्रकाश, रमाताई, भिमराव, आनंद
🙏🏻👦🏻🌺🌅👧🏻🌺🌅
*********************************
============================
छञपती  शिवाजी महाराज 
*******************************
👧🏻छत्रपति श्री शिवाजीमहाराजांच्या आयुष्याचा कालपट👦🏻

वर्ष (कालखंड) शिवाजीमहाराजान्च्या आयुष्यातील् प्रमुख घटना


१९.०२.१६३० ते ३१.१२.१६३६, शिवनेरी शिवाजीमहाराजान्चा जन्म व बालपण

०१.०१.१६३७ ते २८.०२.१६४१, कसबे खेड बापूजी मुद्गल नहेकर यान्च्या वाड्यात वास्तव्य

०१.०३.१६४१ ते २८.०२.१६४२, बन्गळुर

०१.०३.१६४२ ते ३१.०३.१६४७, पुणे व खेडेबारे. 

१६४५ शिवाजीमहाराजांनी हिन्दवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. 

०७.०३.१६४७ दादोजी कोन्डदेवान्चा मृत्यू

०१.०४.१६४७ ते ३१.०५.१६४९, खेडेबारे कोन्ढवा व पुणे.

 शिवाजीमहाराज तोरणा घेतात. ०९.१०.१६४८ शिवाजीमहाराज पुरन्दर घेतात. 

११.०४.१६४९ शिव-समर्थ भेट

०१.०६.१६४९ ते ३१.१२.१६५४, पुणे व चाकण

०१.०१.१६५५ ते ३१.१२.१६५५, पुणे व पुरन्दर

०१.०१.१६५६ ते १५.०९.१६५६, जाव़ळी रायरी.

 १५.०१.१६५६ शिवाजीमहाराज जावळी घेतात. 

६ एप्रिल रायगड सर. प्रतापगड बान्धला. 

मे १६५६ प्रबळगड घेतला.

१६.०९.१६५६ ते ०७.१०.१६५६, सुपे घेतले

०८.१०.१६५६ ते २८.०२.१६५७, पुरन्दर. सकवारबाई गायकवाडांशी याच काळात लग्न

०१.०३.१६५७ ते ३१.०३.१६५७, पुणे

०१.०४.१६५७ ते १५.०५.१६५७, पुणे पुरन्दर् 

१४.०५.१६५७ सम्भाजीमहाराजांचा जन्म

१६.०५.१६५७ ते ३०.०६.१६५७, नौसीरखानाशी युद्ध व जुन्‍नरची लूट

०१.०७.१६५७ ते ३०.०९.१६५७, पुरन्दर

०१.१०.१६५७ ते १३.०१.१६५८, शिवाजीमहाराज कल्याण भिवंडी बाजूस गड पहाण्यास गेले

१४.०१.१६५८ ते ३०.०९.१६५८, प्रथम राजगड व नन्तर पुरन्दरवर वास्तव्य

०१.१०.१६५८ ते ३१.१२.१६५८, शिवाजीमहाराज कर्नाटकात मसलतीस गेले

०१.०१.१६५९ ते ०९.०३.१६५९, शिवाजीमहाराजान्चे राजगडावर वास्तव्य

१०.०३.१६५९ ते ०९.०७.१६५९, शिवापट्ट्ण व राजगड

१०.०७.१६५९ ते ३१.०८.१६५९, जावळीस वास्तव्य सईबाईचा यावेळी मृत्यू

०१.०९.१६५९ ते १७.०९.१६५९, शिवाजीमहाराज राजगडास असावेत

१८.०९.१६५९ ते १०.११.१६५९, प्रतापगडास वास्तव्य. 

१०.११.१६५९ अफजलखानाचा वध

११.११.१६५९ ते ०१.०३.१६६०, पन्हाळा घेतला व विजापूरच्या बाजूस लूट

०२.०३.१६६०.ते १३.०७.१६६०, पन्हाळगडच्या सिद्दी जौहरच्या वेढ्यात

१४.०७.१६६० ते ३१.०७.१६६०, विशाळगडास पलायन. तेथून पुरन्दर व नन्तर राजगडास प्रयाण

०१.०८.१६६० ते १५.०१.१६६१, राजगडास वास्तव्य. 
शाहिस्तेखानाशी तहाची बोलणी

१६.०१.१६६१ ते ०५.०६.१६६१, शिवाजीमहाराज कोकणच्या स्वारीवर. करतलब खानाशी युद्ध. दाभोळ प्रभावळी काबीज. राजापूर शृन्गारपुर घेऊन सन्गमेश्वर चिपळूणकडे गेले, महाड कल्याण भिवंडीला गेले व राजगडास परत

०६.०६.१६६१ ते ११.१०.१६६१, राजगडावर वास्तव्य

१२.१०.१६६१ ते ११.११.१६६१, श्रीवर्धनला वास्तव्य

१२.११.१६६१ ते ३१.०१.१६६२, राजगडास वास्तव्य

०१.०२.१६६२ ते २८.०२.१६६२, नामदार खानावर स्वारी व पेणवर हल्ला

०१.०३.१६६२ ते ३१.०३.१६६३, राजगडास वास्तव्य

०१.०४.१६६३ ते १२.०४.१६६३, शाहिस्तेखानावर हल्ला व सिन्हगडावर प्रयाण

१३.०४.१६६३ ते ३०.०६.१६६३, कुडाळ वेन्गुर्ल्यावर स्वारी

०१.०७.१६६३ ते ३१.०७.१६६३, जावळी येथे मुक्काम

०१.०८.१६६३ ते ०५.१२.१६६३, राजगडास वास्तव्य

०६.१२.१६६३ ते ०४.०२.१६६४, सुरतेच्या पहिल्या स्वारीवर त्या आधी कोकणात गेले

०५.०२.१६६४ ते २९.०५.१६६४, राजगडास वास्तव्य

३०.०५.१६६४ ते ०६.०६.१६६४, सिन्हगड

०७.०६.१६६४ ते ३०.०९.१६६४, राजगडला वास्तव्य

०१.१०.१६६४ ते ०७.१२.१६६४, कुडाळला आगमन. बा़जी घोरपड्यास मारले. खवासखानाचा पराभव. खुदावन्तपूर लुटले. याच सुमारास सिन्धुदुर्ग व हर्णै किल्ले बान्धले

०८.१२.१६६४ ते २५.१२.१६६४, खानापुर व हुबळी ही शहरे लुटली

२६.१२.१६६४ ते ३१.१२.१६६४, राजगडावर वास्तव्य

०१.०१.१६६५ ते १५.०१.१६६५, महाबळेश्वरला वास्तव्य

१६.०१.१६६५ ते ३१.०१.१६६५, राजगडला वास्तव्य

०१.०२.१६६५ ते २२.०३.१६६५, कोकणात जाऊन मग बसरूरच्या स्वारीवर.

 ०८.०२.१६६५ बसरूरवर स्वारी

२३.०३.१६६५ ते २५.०३.१६६५, पुरन्दरला वास्तव्य

२६.०३.१६६५ ते ०८.०६.१६६५, राजगडावर वास्तव्य

०९.०६.१६६५ ते १३.०६.१६६५, जावळिइस प्रयाण. जयसिन्ह व दिलेरखानाची भेट व पुरन्दरचा तह

१४.०६.१६६५ ते ३१.०८.१६६५, राजगडावर वास्तव्य

०१.०९.१६६५ ते ३०.०९.१६६५, विजापुरला प्रयाण. फोन्डा घेण्यात अपयश

०१.१०.१६६५ ते १५.११.१६६५, राजगड. जयसिन्गाच्या मदतीस जाण्याची तयारी

१६.११.१६६५ ते १०.०१.१६६६, विजापूर घेण्यास शिवाजीची मोन्गलास मदत

११.०१.१६६६ ते १६.०१.१६६६, पन्हाळ्यावरील अयशस्वी हल्ला

१७.०१.१६६६ ते ०४.०३.१६६६, राजगडावर वास्तव्य

०५.०३.१६६६ ते ११.०९.१६६६, आग्रा प्रकरण. 

०५.०३.१६६६ शिवाजीमहाराजान्चे आग्र्यास प्रयाण. 

१२.०५.१६६६ शिवाजीमहाराज व औरन्गजेब भेट. 

१९.०८.१६६६ शिवाजीमहाराजांची आग्र्याहून सुटका.

१२.०९.१६६६ ते १०.०४.१६६७, ९.०२.१६६७ पर्यन्त राजगड नन्तर सिन्धुदुर्ग्

११.०४.१६६७ ते १२.०५.१६६७, रान्गण्याचा वेढा शिवाजीमहाराजांनी उठविला

१३.०५.१६६७ ते १५.०६.१६६७, मनोहरगडास वास्तव्य

१६.०६.१६६७ ते ३१.१०.१६६७, राजगडास वास्तव्य

०१.११.१६६७ ते ३०.११.१६६७, कोकणात बारदेशची स्वारी

०१.१२.१६६७ ते १५.१०.१६६८, राजगडास वास्तव्य

१६.१०.१६६८ ते ३०.११.१६६८, शिवाजीमहाराज कोकणात. अष्टमी व राजापुरास मुक्काम. गुप्तपणे गोवे घेण्याचा अयशस्वी प्रयत्न

०१.१२.१६६८ ते २०.१०.१६६९, राजगडास वास्तव्य

२१.१०.१६६९ ते ३१.१०.१६६९, पेणच्या आसपास

०१.११.१६६९ ते ३१.०७.१६७०, राजगडास वास्तव्य. 

२४.०२.१६७० राजाराम महाराजान्चा जन्म. 

०४.०२.१६७० कोन्ढाणा सर केला. नन्तर रायगडात

०१.०८.१६७० ते ०५.०८.१६७०, रायगडास वास्तव्य

०६.०८.१६७० ते ०४.०९.१६७०, जुन्‍नरला वेढा

०५.०९.१६७० ते २०.०९.१६७०, रायगडावर वास्तव्य

२१.०९.१६७० ते ०३.११.१६७०, सुरतेची दुसरी स्वारी. 

१७.१०.१६७० दिन्डोरीची लढाई

०४.११.१६७० ते २१.११.१६७०, नांगावला वास्तव्य

२२.११.१६७० ते २५.११.१६७०, रायगडावर वास्तव्य

२६.११.१६७० ते १५.०१.१६७१, खानदेश व बागलाणच्या स्वारीवर. कारन्जे लुटले. अहिवन्त रवळा जवळा किल्ले घेतले. सालेरीचा किल्ला घेतला

१६.०१.१६७१ ते ३१.१२.१६७१, रायगडास वास्तव्य. 

२६.०१.१६७१ सम्भाजीमहाराजान्कडे कारभार सोपविला

०१.०१.१६७२ ते २०.०१.१६७२, महाड येथे वास्तव्य. दिलेरखानाने चाकण व पुणे घेतल्याने शिवाजीमहाराज कुडाळ वेन्गुर्ला भागातून सैन्य गोळा करीत होते

२१.०१.१६७२ ते ०८.०३.१६७३, रायगडास मुक्काम. उस्टिकने मे महिन्यात व अब्राहम् लेपेकरने जुलै महिन्यात  शिवाजीमहाराजांची भेट घेतली

०९.०३.१६७३ ते १५.०४.१६७३, पन्हाळ्यास वास्तव्य.

 १५ एप्रिल उमराणीची लढाई

१६.०४.१६७३ ते १९.०५.१६७३, रायगडास मुक्काम्

२०.०५.१६७३ ते ०२.०६.१६७३, तीर्थस्नानासाठी गेले

०३.०६.१६७३ ते ०९.१०.१६७३, रायगडास वास्तव्य. 

३ जून निकल्सची भेट

१०.१०.१६७३ ते १५.१०.१६७३, सातायास प्रयाण

१६.१०.१६७३ ते १५.१२.१६७३, कानडा प्रदेशावर् स्वारी

१६.१२.१६७३ ते १४.०४.१६७४, रायगडास् वास्तव्य. 

३ एप्रिल नारायण शेणव्याची भेट

१५.०४.१६७४ ते ११.०५.१६७४, चिपळूणला प्रयाण. 

२२ एप्रिल कारवारला प्रयाण

१२.०५.१६७४ ते १५.०५.१६७४, रायगडास वास्तव्य

१६.०५.१६७४ ते २०.०५.१६७४, प्रतापगडावर भवानीदेवीच्या दर्शनास गेले

२१.०५.१६७४ ते ३०.०९.१६७४, रायगडावर वास्तव्य. 

०६.०६.१६७४ शिवाजीमहाराजान्चा राज्याभिषेक. 

१८.०६.१६७४ जिजाबाईन्चा मृत्यू

०१.१०.१६७४ ते १५.१०.१६७४, कल्याण व नन्तर पाली येथे वास्तव्य

१६.१०.१६७४ ते १५.१२.१६७४, २० व २५ आ.ऑक्टोंबरच्या दरम्यान सातारा बेळगाव बाजूस नन्तर खानदेश व बागलाणवर स्वार्‍या. धरणगाव लुटले

१६.१२.१६७४ ते१४.०३.१६७५, रायगडास वास्तव्य

१५.०३.१६७५ ते ११.०६.१६७५, कोकणात राजापूर कुडाळ 
२२ व २३ मार्च इन्ग्रज व्यापार्‍यांची भेट. फोन्डा शिवेश्वर अन्कोला कारवार ही ठिकाणे घेतली

१२.०६.१६७५ ते ३०.११.१६७५, रायगडास वास्तव्य 

७ व १२ सप्टेम्बर आच्स्टिनची भेट

०१.१२.१६७५ ते २५.०१.१६७६, सातायास आजारी

२६.०१.१६७६ ते ०७.०२.१६७६, कोकणात वास्तव्य

०८.०२.१६७६ ते १५.०२.१६७६, रायगडास वास्तव्य

१६.०२.१६७६ ते २०.०४.१६७६, पन्हाळ्यास वास्तव्य

२१.०४.१६७६ ते ३०.०९.१६७६, रायगडावर वास्तव्य

०१.१०.१६७६ ते ३०.११.१६७६, बेळगावच्या किल्ल्यास वेढा विजापूरकरान्च्या मुलखात लुटालुट सातारा जिल्ह्यातील खटाव ठाणे व कोट घेतला वाईजवळचा मुलुख काबीज

०१.१२.१६७६ ते ३१.१२.१६७६, रायगडास मुक्काम

०१.०१.१६७७ ते १५.०१.१६७७, रायगडाहून बेळगावास प्रयाण

१६.०१.१६७७ ते २८.०२.१६७७, भागानगरकडे

०१.०३.१६७७ ते ३१.०३.१६७७, भागानगरला मुक्काम

०१.०४.१६७७ ते ०३.०४.१६७८, कर्नाटकाची स्वारी. 

१५ मे जिंजी काबीज. २३ मे वेरुळचा ___???वेषा. 
२५ जून शेरखान लोदीचा पराभव. 
१२ जुलै शिवाजी व्यन्कोजी भेट

०४.०४.१६७८ ते १०.०५.१६७८, विजापुरचा कब्जा घेण्यास निघाले मसौदने त्याचा ताबा घेतल्याचे समजल्याने पन्हाळ्यास परत

११.०५.१६७८ ते ०५.०६.१६७८, रायगडाला वास्तव्य

०६.०६.१६७८ ते १०.०६.१६७८, राजापुरास भेट

११.०६.१६७८ ते २८.०२.१६७९, पन्हाळ्यास

०१.०३.१६७९ ते २२.०३.१६७९, विजापूरचा शाहपूरा लुटला

२३.०३.१६७९ ते ३१.०५.१६७९, पन्हाळ्यास वास्तव्य

०१.०६.१६७९ ते २३.१०.१६७९, रायगडावर वास्तव्य

२४.१०.१६७९ ते ३०.११.१६७९, विजापुरकरास मदत करण्यासाठी पन्हाळ्यास आले तेथून विजापूरकडे सेलगूरपर्यन्त गेले नन्तर मोगली मुलखातील जालना व इतर गावे लुटीत पट्टागडास आले

०१.१२.१६७९ ते १५.०२.१६८०, पन्हाळ्यास मुक्काम सम्भाजीची भेट वाकेनवीस टिपणा प्रमाणे ३१ डिसेम्बर ते ४ फेब्रुवारीपर्यन्त शिवाजीमहाराज सज्जनगडास होते

१६.०२.१६८० ते ०२.०४.१६८०, रायगडास वास्तव्य. १४ मार्च राजाराममहाराजान्चे लग्न. शिवाजीमहाराजान्चा मृत्यू
छत्रपति श्री शिवाजीमहाराजांच्या आयुष्याचा काल पट
👧🏻🌺🌅👦🏻🌅🌺👏🏽 
******************************
============================= 
👦🏻लोकमान्य टिळक👧🏻
जन्म: जुलै २३,इ.स. १८५६
रत्‍नागिरी(टिळक आळी), रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: ऑगस्ट १, इ.स. १९२०
पुणे, महाराष्ट्र, भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
पत्रकारिता/ लेखन: केसरी
मराठा
पुरस्कार: लोकमान्य
धर्म: हिंदू
वडील: गंगाधर रामचंद्र टिळक
आई: पार्वतीबाई टिळक
पत्नी: तापीबाई
अपत्ये: श्रीधर बळवंत टिळक[१]
तळटिपा: "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच "
बाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.
**********************************
👧🏻राजेंद्र प्रसाद👦🏻
डॉ. राजेंद्र प्रसाद
भारताचे १ ले राष्ट्रपती
कार्यकाळ
जानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३ इ.स. १९६२[१]
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू
उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५२-१९६२)
मागील पदनिर्मिती
पुढील सर्वपल्ली राधाकृष्णन
जन्म डिसेंबर ३, इ.स. १८८४
जेरादेई, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत (आजचा बिहार)
मृत्यू फेब्रुवारी २८, इ.स. १९६३
पटना
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी राजवंशी देवी
धर्म हिंदू

डॉ. राजेंद्र प्रसाद (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते. पेशाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.
*********************************

No comments:

Post a Comment