मानवी ह्रदय

मानवी ह्रदय 
**************************************
*************************"*************
मानवी हृदय मानवी हृद याचे वजन 250-350 ग्रॅम असून त्याचा आकार हाताच्या वळलेल्या मुठीएवढा असतो. उरोस्थीच्या मागे आणि पाठीच्या कण्याच्या पुढे उरोपोकळीमध्ये हृदय स्थित असते. हृद्य दोन पदरी हृदयावरणाने वेढलेले असते. बाह्य हृदयावरण तंतुमय असून हृदयाचे संरक्षण उरोपोकळीमध्ये हृदय स्थिर ठेवणे आणि हृदयामध्ये अधिक रक्त साचण्यास प्रतिबंध करते. मानवी हृदय तीन स्थरानी बनलेले असते. हृदयालगतचा हृदयावरण थर हे हृदयाचे पहिले आवरण बाह्य हृदयावरण आणि हृदयालगतचे हृदयावरण यामध्ये एक जलीय पदार्थ असतो. त्यामुळे ह्रदयाची हालचाल होताना घर्षण होत नाही. हृदयाचे मधला थर हृदयस्नायूनी बनलेला असतो. हृदयाचा सर्वात आतील थर हृदंतस्तर या नावाने ओळखला जातो. हा एक पेशीय थर रक्तवाहिन्यांच्या अंत:स्तराशी संलग्न असतो. हृदंतस्थर हृदयाच्या झडपा आणि हृदयाच्या पोकळ्या आच्छादतो. माशाचे हृदय आद्य मत्स्यवर्गीय पृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय एकापाठोपाठ चार कप्प्यानी बनलेले असते. माशाचे हृदय सस्तन प्राण्यांच्या चार कप्प्यांच्या हृदयासारखे मुळीच दिसत नाही. पहिला कप्पा शीर कोटर (सायनस व्हिनॉसस) या नावाने ओळखला जातो. या कप्प्यामध्ये शरीरातील शिरामधून कमी ऑक्सिजनयुक्त रक्त जमा होते. शीर कोटरातून रक्त अलिंदामध्ये जाते. अलिंदामधून ते निलयामध्ये आणि निलयामधून महाधमनी शंकूमध्ये (कोनस आर्टेरिओसस) महाधमनी शंकू महाधमनीमध्ये उघडतो. निलय स्नायूयुक्त असते. महाधमनीमधील रक्त क्लोमामध्ये जाते. क्लोमाभोवती असलेल्या पाण्यातील ऑक्सिजन अभिसरणाने रक्तामध्ये मिसळतो. इतर चार कप्प्याच्या हृद्यामध्ये अधिक ऑक्सिजनयुक्त रक्त निलयामध्ये येते आणि शरीराच्या विविध भागामध्ये पोहोचते. पण माशाच्या हृदयामधील रक्त महाधमनीच्या विविधशाखावाटे शरीराच्या सर्व भागामध्ये पोहोचते. प्रौढ माशाचे हृदय सरळ नलिकेऐवजी इंग्रजी ‘एस’ च्या आकारासारखे दिसते. प्रारंभीचे दोन कप्पे अधर बाजूस तर पुढील दोन कप्पे आधीच्या कप्प्यांच्या ऊर्ध्व बाजूस असतात. (चतुष्पाद प्राण्यामध्ये अधर महाधमनीच्या दोन शाखा होतात एक फुफ्फुस धमनी आणि दुसरी ऊर्ध्व धमनी.) अस्थिमत्स्यामध्ये महाधमनीशंकूचा आकार लहान असतो. पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या ह्र्दयामध्ये शीर कोटर आणि महाधमनी शंकू या भागांचा अभाव असतो.
हृदय हा अवयव अभिसरण संस्था असलेल्या सर्व प्राण्यामध्ये आढळतो. स्नायूनी बनलेल्या हृदयामुळे रक्तवाहिन्यामधून रक्त लयबद्ध रितीने वाहून नेले जाते. इंग्रजीमध्ये ‘कार्डियाक’ हा हृदय संबंधी आलेल्या शब्दाचा उगम ग्रीक भाषेतील कार्डिया (हृदय) शब्दाशी आहे. पृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय हृदयस्नायूनी बनलेले असते. हृदयस्नायू अनैच्छिक असून त्यांच्या पृष्ठभागावर सूक्ष्म दर्शकाखाली पट्टे दिसतात. हृदय प्रामुख्याने हृदयस्नायूनी आणि थोड्या संयोजी उतीनी बनलेले असते. सामान्यपणे मानवी हृदय दर मिनिटास 72 वेळा आकुंचन पावते. सरासरी सहासष्ट वर्षांच्या आयुष्यातील कालखंडामध्ये हृदय पंचवीस लक्ष वेळा अकुंचन पावते. स्त्रियामध्ये हृद्याचे सरासरी वजन 250-300 ग्रॅम आणि पुरुषामध्ये 300-350 ग्रॅम असते. अपृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय म्हणजे एक लहान आकाराची पिशवी किंवा आकुंचन पावणारी नलिका असते. यामधून शरीरास प्रथिने,मेदाम्ले आणि कर्बोदके वाहून नेली जातात. कीटकांचे रक्त रंगहीन असून त्यामधून श्वसनवायूंचे वहन होत नाही. संधिपाद खेकड्यासारख्या प्राण्यामध्ये आणि कोळी आणि मृदुकाय गटातील नळ, म्हाकूळ आणि ऑक्टोपस सारख्या प्राण्यामधील रक्तामध्ये तांबे असलेले हीमोसायनिन नावाचे श्वसनवायू वाहून नेणारे निळ्या रंगाचे रक्तद्रव्य असते. हीमोसायनिन युक्त रक्ताचे वहन या प्राण्यांच्या हृदयामार्फत होते. 
संरचना
एक स्वस्थ मनुष्य का हृदय लगभग 13 सेमी लम्बा तथा 9 सेमी चौड़ा होता है। सामान्यतः इसका आकार बन्द मुट्ठी के समान होता है। हृदय का भार लगभग 300 ग्राम, रंग गहरा लाल या बैंगनी होता है। हृदय हृदयावरण से घिरा रहता है। इस थैली में हृदयवरणीय द्रव भरा रहता है। जो बाहरी आघातों से हृदय की रक्षा करता है।
बाह्य आकारिकी

मनुष्य का हृदय शंक्वाकार पेशीय अंग होता है। इसका ऊपरी भाग कुछ चौड़ा तथा निचला भाग कुछ नुकीला तथा कुछ बाईं ओर झुका रहता है। हृदय के अगले चौड़े भाग को अलिन्द तथा पिछले नुकीले भाग को निलय कहते हैं। दोनों भागों के मध्य अनुप्रस्थ विभाजन रेखा हद खाँच कोरोनरी सल्कस पाई जाती है।
*************************************
*************************************
मानवी हृदय कार्य

हृदय त्याकडे आलेले रक्त आत घेत व बाहेर टाकते. हृदयाकडे रक्त आणले जाते व हृदय ते बाहेर फेकते. हृदयाला चार कप्पे (वर दोन कणिर्का-Auricles व खाली दोन जवनिका-Ventricles) असतात. उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते व डाव्या बाजूला शुद्ध रक्त असते. हृदय हे सतत आकुंचन व प्रसरण पावत असते. त्याचा वेग मिनिटाला ६० ते १०० ठोके असतो. उजव्या बाजूला शरीराकडून आलेले रक्त फुफ्फुसाकडे पाठवले जाते. फुफ्फुसामध्ये रक्तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जाउन प्राणवायू शोषला जातो. हे रक्त हृदयाच्या डाव्या कर्णिकेत आणले जाते. आणि तेथून ते डाव्या जवनिकेतुन शरीरभर पोहोचवले जाते. विविध शरीराची कामे करण्यासाठी प्राणवायू, साखर व इतर मूलद्रव्ये ही रक्तामार्फत शरीरभर नेली जातात. शरीर लागेल त्याप्रमाणे ऑक्सिजन व इतर पौष्टिक पदार्थ घेते व परत अशुद्ध रक्त हृदयाकडे पोहचवते. रक्त जेव्हा धमन्यातून वाहते तेव्हा धमन्यांचा त्याच्यावर दाब पडतो त्याला रक्तदाब असे म्हणतात.
हृदयाला काम करण्यासाठी त्यातील काम करणाऱ्या स्नायूंना शर्करा व प्राणवायू या मूलभूत ऊर्जा निर्माण करणाऱ्या घटकांचा सतत पुरवठा होणे अत्यंत आवश्यक असते. शर्करा आणि प्राणवायू हे रक्तातूनच मिळतात आणि ते रक्तवाहिन्यांद्वारे हृदयाच्या सर्व भागांत पोहोचविले जातात. हृदयाच्या स्नायुंना प्रसरन काळात रक्तपुरवठा होत असतो. हृदयाला सतत स्पंदन निर्माण करणाऱ्या एका विद्युतस्त्रोताची आवश्यकता असते. हा विद्युतस्त्रोत कर्णिकेच्या पेशीभित्तीमध्ये असतो. विद्युत स्पंदन हे हृदयाच्या कर्णिकेत तयार होऊन सर्व हृदयभर पसरविले जाते. त्यामुळे हृदयाच्या आकुंचन पावण्याची क्रिया होऊन हृदयाचा पंप काम करू लागतो. त्यासाठी सतत असा विद्युतस्त्रोत आवश्यक असतो. मानवीहृदय मिनिटाला सरासरी ७२ वेळा आकुंचन प्रसरण पावते.
कप्पे व कार्य
उजवी कर्णिका
डावी कर्णिका
उजवी जवनिका
डावी जवनिका
हृदयाला चार झडपा (वॉल्व्ह) असतात:
२ डाव्या बाजूला (मिट्रल आणि एऑर्टिक)
२ उजव्या बाजूला (पल्मनरी आणि ट्रायकस्पीड), ज्यामुळे रक्त प्रवाह एका दिशेला वाहतो.
कर्णिकांमध्ये धमन्यांमार्फत आणलेले रक्त जाते. कर्णिका व जवनिकांमध्ये झडपा असतात. प्रथम कर्णिका आकुंचन पावतात. त्यामुळे झडपा उघडून रक्त कर्णिकेतून जवनिकेत येते.
आता रक्त जवनिकेत मध्ये आल्यावर कर्णिका प्रसरण पावते व जवनिका आकुंचन पावते. त्याच वेळा झडपा बंद होवून रक्त परत मागे फेकले जात नाही व एकाच वेळेला फुफ्फुसाकडे आणि शरीराकडे रक्त पोहोचवले जाते.
यामधले डाव्या बाजूचे दोन कप्पे फुफ्फुसाकडुन ऑक्सिजन घेऊन आलेले रक्त हाताळतात. तर उजव्या बाजूचे दोन कप्पे शरीराला ऑक्सिजन पुरवून आलेले व फुफ्फुसाकडे नेण्यासाठी कार्बन डायऑक्साईड सोबत आणलेले रक्त सांभाळतात.
या प्रक्रियेत बिघाड झाल्यावर हृदयविकाराला सुरूवात होते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीन प्रमुख रक्तवाहिन्या(circulation) असतात. या धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल, कॅल्शियम, रक्तातल्या लघुपेशी, पांढर्‍या रक्त पेशी काही ठिकाणी जमा होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतात. यालाच धमनी काठिण्य असे म्हणतात.
हृदयाचे आजार
जन्मजात आजार
जवनिकेच्या पडद्याला असणारे छिद
कणिर्केच्या पडद्याला असणारे छिद
हृदयाच्या झडपा आकुंचित असणे.
हृदय उजव्याबाजुला असणे[१].
जोरजोरात श्वास घेणे , त्वचेवर, ओठांवर, बोटांच्या टोकांवर वा नखांवर निळ्या रंगाची छटा असणे आणि रक्त पुरवठा कमी असणे अशा प्रकारच्या लक्षणांचा समावेश असतो.
शरीरक्रिया व शरीरविकृती विज्ञान
हृदय शरीराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना परिहृद् धमनी (कोरोनरी आर्टरी )असे म्हणतात.
चरबीचा पापुद्रा तयार होऊन रक्तवाहिन्या चिंचोळ्या होण्यारे अथेरोस्क्लेरोसिस
आपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्त वाहिन्यांमध्ये आतून रक्तातील चरबी कोलेस्ट्रॉल चे थर साठू लागतात, ज्यात परिहृद् धमनी (कोरोनरी आर्टरी)चा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चरबीचा पापुद्रा तयार होऊन रक्तवाहिन्या चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. अशाच एखाद्या चिंचोळ्या परिहृद् धमनीत (कोरोनरी आर्टरी) रक्तगुठळी अडकल्याने रक्तपुरवळा मंदावतो किंवा प्रसंगी खंडीत होतो.
जर धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाच्या स्नायुंना रक्त मिळत नाही व त्यातील पेशी मरतात व ह्र्दयाचे कार्य मंदावते यालाच हृदयविकार म्हणतात.
हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायूंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायुंमुळे हृदयाला होणाऱ्या रक्त पुरवठ्याचा वेग कमी होतो, त्याला रक्तसंलयी हृदय विफलता (कंजेस्टीव हार्ट फेल्यूअर) म्हणतात व त्यामुळे पावलांना घाम फुटून श्वसनाचा त्रास होतो.
जोखिमा
महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला स्त्री-संप्ररके इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमूळे सुरक्षित आहेत. ह्याचा प्रभाव कमीतकमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो. भारतासहित अनेक आशियाई विकासनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो. ज्यात खालील कारणांचा समावेश आहे :
धूम्रपान करणे
मधूमेह
उच्च रक्तदाब
लठ्ठपणा
उच्च कोलेस्ट्रॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्ट्रॉल
शारिरीक श्रमाची कमतरता
आनुवंशिकता

तणाव, रागीटपणा आणि चिंता
*********************************
***************"*********************
लक्षणे
काहीवेळा लक्षणे ओळखणे फार अवघड असते आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. सामान्यतः
छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो.
घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे ही देखील काही लक्षणे आहेत.
साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात.
उलट्या
अस्वस्थता
कफ
कंप

अशी आहेत व ह्या वेदना सुमारे २० मिनिटापेक्षा जास्त काळ टिकतात. काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, रक्तदाब एकदम कमी होऊन रक्तसंलयी हृदय विफलता येऊन मृत्यू येतो.
उपचार
हृदयविकारावर झटकन उपचार मिळाल्यास जीवन वाचवता येते.
जोपर्यंत वैद्यकिय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे.
जर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरीत ऑक्सिजन द्यावे.
जर नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरबिटरेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरीत त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी.
पाण्यात ढवळून अ‍ॅस्प्रीन द्यावे.
हृदयविकारावर झटकन वैद्यकिय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते. पहिले काही मिनीटे आणि तास जरा संकट पूर्ण असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात.
डॉक्टर रुग्णाची सूक्ष्म तपासणी करतात आणि हृदयाची स्पंदने मोजतात आणि रक्तदाब पाहतात.
इलेक्ट्रोकारडिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो ज्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते.
ईसीजी मुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते. मात्र प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परिक्षणात दिसून येते.
छातीचा एक्सरेदेखील घेतला जातो.
हृदयाच्या माहितीसाठी इकोकारडिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कँन चाचणी आहे ज्यात हृदयाच्या समुचित कार्याची माहिती मिळते.
कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी एंजियोग्राम काढला जातो व हा निर्णायक शाबीत होतो.
हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षित स्पंदने आढळली तर त्यावर उपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते.
जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात.
प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन ऊपचार पद्धती ठरवली जाते.

कित्येक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. ह्यात कोरोनरी एंजियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा कोरोनरी बायपास सर्जरीचा उपयोग केला जातो.
प्रतिबंध
हृदयविकारापासून ज्यांना धोका आहे किंवा वाचायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत : जीवन शैलीत परिवर्तन:
आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मीठ कमी असावे, फायबर आणि जटिल कर्बोदके उच्च मात्रेत असावेत.
वजन जास्त असणाऱ्यांनी वजन कमी करावे. 3.शारिरीक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे.
धूम्रपान करु नये व करत असल्यास त्वरित बंद करावे.
मधूमेह, रक्तदाब किंवा जास्त कॅलेस्ट्रोल असणाऱ्यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास अटोक्यात ठेवावे.
अ‍ॅस्पिरीन च्या किंवा इतर रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या.
स्टॅटिन प्रकारातील चरबी नियंत्रित ठेवणाऱ्या औषधी.

आहारात संतृप्तचरबी ऐवजी असंतृप्त चरबी प्रकार वापरावे.
********************************

No comments:

Post a Comment