भूकंप

भूकंप
भूकंप - भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती "भूकंप लाटा" तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा गोष्टी घडतात. भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ हादरते.
भूकंप : पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने क्षोभ उत्पन्न होऊन तेथील खडकांना एकाएकी धक्का बसला म्हणजे धक्क्याच्या स्थानापासून कंपने निर्माण होऊन ती सभोवार पसरतात, त्यालाच भूकंप म्हटले जाते. शांत जलाशयात खडा टाकल्यावर खडा पडलेल्या जागेपासून पाण्याच्या पृष्ठावर लाटा उत्पन्न होतात व त्या सर्व दिशांना पसरतात, तसेच भूकंपतरंगाचेही होते. भूकंपाचे तरंग पृथ्वीच्या पृष्ठावरून प्रवास करताना जमीन हादरते. मूळ धक्क्याचा जोर व उगमस्थानापासूनचे अंतर यांनुसार हे हादरे निरनिरळ्या ठिकाणी कमीअधिक प्रमाणात जाणवतात.
भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती'भूकंप लाटा'तयार होवून पृथ्वी च्या पृष्ठभागाची हालचाल होण्यात होते.यामूळे जमीन थरथरणे,हलणे,जमीनीला मोठ्या भेगा पडणे अशा गोष्टी घडतात.
भुकंपाची तिव्रता मोजण्याच्या यंत्रास'सिस्मोग्राफ'अथवा'सिस्मोमिटर'असे नाव आहे तसेच भुकंप मोजण्यासाठी"रिष्टर स्केल"ह्या एककाचा वापर केला जातो.३ रिष्टर स्केल वा त्या पेक्षा कमी तिव्रतेचे भुकंप धोकादायक नसतात.तिव्रता ७ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रचंड प्रमाणात हानी होवू शकते.समुद्राच्या तळाशी झालेला मोठा भुकंप प्रलयांकारी सुनामी निर्माण करू शकतो.
भुकंपाचे मुख्य कारण जरी भूगर्भ-चकत्यांमधील घर्षण हे असले तरी खालील पैकी कोणत्याही कारणाने भूगर्भातील हालचालीमुळे भुकंप होवू शकतो.
*ज्वालामुखी जागृत झाल्याने
*खाणींमध्ये केलेले कृत्रिम स्फोट
*अणूचाचण्या
भूगार्भाच्या आत ज्या ठिकाणी भूकंपाची सुरुवात होते त्याला‘फोकस किंवा भूकंपाचा केंद्रबिंदू असे म्हणतात.हा केद्रबिंदू भुगर्भाच्या आत पृष्ठभाग‘एपिसेंटर’म्हणून ओळखला जातो.पृथ्वी च्या गर्भात होणाऱ्या कंपांना‘सर्फेस वेव्हज्’असे म्हणतात.निरनराळ्या क्षमतेचे हजारो भूकंप पृथ्वीवर होत असतात.
**************************
*

No comments:

Post a Comment