मानवी मेंदू

मानवी मेंदू 
************************

***************************
मेंदू : एक अचाट अवयव

मेंदू हा आपला सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे. मेंदूमधील सगळ्या रक्तवाहिन्या एकापुढे एक पसरविल्या, तर एक लाख मैल इतक्या लांबीच्या किंवा पृथ्वीला चार प्रदक्षिणा घालण्याइतक्या लांबीच्या होतील. असा हा आपला मेंदू ७७-७८ टक्के पाणी, १० ते १२ टक्के स्निग्ध पदार्थ, ८ टक्के प्रोटीन्स, ९ टक्के कार्बोहायडेट्स, २ टक्के विरघळणारे ऑर्गेनिक्स आणि १ टक्का इनऑरगॅनिक क्षार यांनी मिळून बनलेला असतो.
मानवी मेंदूच्या ३० बिलियन (३० अब्ज) पेशींचे २०० बिलियन (२० अब्ज) पेशींशी कनेक्शन्स आहेत. त्याचे सिमटन्स दर ताशी ३४० किलोमीटर वेगाने जातात. जन्मापासून तो रात्रंदिवस काम करतो. न थांबता, अगदी झोपतेही. फक्त ऑक्सीजन हवा. शरीराच्या २० टक्के मेंदूच्या प्रत्येक पेशीची किमान साठ हजार दुसर्‍या पेशीशी कनेक्शन्स असतात.
आपल्या मेंदूत दररोज सरासरी ७० हजार विचार येत असतात.
मेंदू किंचितसा रबरासारखा असतो आणि रंगाने पांढरट दिसतो. वरवर मशरूमसारख्या एकसंध दिसणार्‍या या मेंदूची आंतररचना प्रचंड गुंतागुंतीची असते.
नवजात अर्भकाच्या मेंदूचे वजन सरासरी ३६० मुलीचे व ३८० ग्रॅम मुलाचे असते. एका वर्षानंतर हेच वजन मुलीचे ९४०, तर मुलाचे ९७० ग्रॅम एवढे असते.
१० ते १२ वर्षे वय असताना ते सगळ्यात जास्त म्हणजे मुलीचे १२६० ग्रॅ्रम, तर मुलाचे १४४० ग्रॅम एवढे असते. ५० ते ६० या वयात ते कमी व्हायला लागते. आणि स्त्रीचे १२५० ग्रॅम ते पुरुषाचे १३६० ग्रॅम एवढे कमी होते. ८१ ते ८५ सालापर्यंत ते आणखीन कमी होऊन स्त्रीचे ११७० ग्रॅम, तर पुरुषाचे १३१० ग्रॅम एवढे होते.
माणसाप्रमाणे वेगवेगळ्या प्राण्यांच्या मेंदूचे वजन वेगवेगळे असते.
उदा ः उंदीर २ गॅ्रम, मांजर ३० ग्रॅम, कुत्रा ७२ गॅ्रॅम, माकड ९५ गॅ्रम, चिपांझी ४२० ग्रॅम, नर हत्ती ६००० ग्रॅम (६ किलो).
मेंदूचे सरासरी वजन १४०० ग्रॅम (१.४ किलोगॅ्रम) किंवा ९ पौंड एवढे असते.
डॉल्फिनच्या मेंदूचे वजन माणसापेक्षा जास्त म्हणजे १.५ किलोगॅ्रम आहे. हत्तीच्या मेंदूचे वजन ६ किलोग्रॅम, तर स्पर्म व्हेलच्या मेंदूचे वजन ७.८ किलोग्रॅम असते. हे सगळे प्राणी हुशार असले, तरी माणसाइतके बुद्धिवान नक्कीच नसतात.
माणसाच्या मेंदूचे वजन शरीराच्या २.५ टक्के असूनही, हृदयातून बाहेर पडणार्‍या रक्तापैकी १५ ते २० टक्के एवढे रक्त मेंदूकडे पाठविले जाते. मेंदूला ऑक्सीजन, ग्लुकोज आणि इतर पौष्टिक पदार्थांची सतत आणि प्रचंड गरज असते. आपल्या हृदयाच्या एकूण कार्यापैकी १५ टक्के कार्य मेंदूसाठी होत असते, तर आपल्याला लागणार्‍या एकूण ऑक्सीजनपैकी २० टक्के ऑक्सीजन आणि २५ टक्के ग्लुकोज आपला मेंदू खातो. आपला मेंदू शरीरातील सर्वांत अधिक शक्ती वापरतो. आपण घेतलेल्या प्राणवायूपैकी पाचवा भाग व खाल्लेल्या अन्नापासून निर्माण झालेल्या शक्तीचा पाचवा भाग तो एकटा वापरतो, त्यापासून स्वत:ची वीजनिर्मिती करतो. आपले कार्य करण्याकरिता मेंदू दहा वॅट बल्बइतकी ऊर्जा उपयोगात आणतो.
आपल्या मेंदूमध्ये १०००० कोटी मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात. आकाशगंगेत असणार्‍या तार्‍यांएवढी ही संख्या असते. दर सेकंदाला एक न्यूरॉन याप्रमाणे आपण मोजमाप करायला लागलो, तर आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला ३१७१ वर्षे लागतील! एका मेंदूतले सगळे न्यूरॉन्स एकापुढे एक मांडले तर त्याची लांबी साधारणपणे १००० कि.मी. एवढी होईल. पण, न्यूरॉन्सची रुंदी फक्त १० मायक्रॉन असल्यामुले ते आपल्याला दिसणारच नाहीत.
मेंदूला ऑक्सीजन, ग्लुकोज आणि इतर पौष्टिक पदार्थांची सतत आणि प्रचंड गरज असते. या गोष्टीचा पुरवठा मेंदपासून जर फक्त आठ ते दहा सेंकद तोडला, तरी माणूस बेशुद्ध पडतो आणि ऑक्सीजनचा पुरवठा जर ३० सेंकदांपेक्षा जास्त तोडला गेला, तर मेंदूमध्ये कायमस्वरूपी बिघाड होतो आणि यापेक्षा जास्त वेळ हे चालू ठेवले तर माणूस मरतोच.
माणसाच्या मेंदूचा डावा भाग उजव्या शरीराच्या भागावर व मेंदूचा उजवा भाग डाव्या शरीराच्या भागावर नियंत्रण करतो. फारच थोडी माणसे त्यामुळे दोन्ही हातांनी लिहू वा चित्र काढू शकतात. म्हणूनच काही माणसे डावखुरी किंवा उजव्या हाताने कामे करतात.
आपल्या श्‍वासोच्छ्‌वासापासून आपल्या सगळ्या भावभावना मेंदू नियंत्रित करतो.
आपला मेंदू आपल्याला पाहायला, ऐकायला व अर्थ लावायला आणि अंतर, वेग ओळखायला मदत करतो. मोटार शर्यत खेळणार्‍या वाहकाला या सर्वांचे संदेश जलद मिळतात. ते संदेश मेंदू भराभर हातांना व पायांना पाठवितो. त्यामुळेच वाहकाचे हात चाकावर व पाय क्लच वा ब्रेकवर असूनही तो मोटारीवर नियंत्रण करू शकतो. दिवसापेक्षा रात्री आपला मेंदू जास्त कार्यक्षम असतो. झोपेमध्ये स्मृतीची उजळणी होत असते.
अशा या बहुगुणी मेंदूला बोलता आलं असतं, तर त्याने अशा प्रकारे कदाचित आपल्या भावना नक्कीच व्यक्त केल्या असत्या-
इश करि! टेन्शन नही लेनेका. मी आहे ना!
मेंदू हे एक भन्नाट गूढ आहे, हे मात्र खरे!
मेंदू क्रांती

आनादी कालापासून मानवाच्या मेंदूत अनेक बदल होत गेले. शास्त्रज्ञांच्या म्हण्यानुसार मेंदूची क्षमता अफाट असून त्याचा वापर मात्र माणूस शंभर टक्के करुन घेत नाही असे लक्षात आले आहे. बालकाच्या मेंदूची वाढ ही पहिल्या तीन वर्षात सर्वात अधिक होते. त्यानंतर वाढीचा वेग कमी होत दहाव्या वर्षापर्यंत स्थिरावतो.
सर्वसाधारण समज आहे की बाळाचे भाषिक ज्ञान शाळेत गेल्यावर सुरु होते परंतु हे खरे नाही. जन्मापासून त्याचे पालक आणि नातेवाईक जेव्हा बाळाशी बोलतात, संवाद साधतात, खेळतात, चित्र काढायला शिकवतात, तेव्हापासूनच 'ब्रेन स्टीम्यूलेशन' चालू होते. लहान बालकाची माहिती साठविण्याची क्षमता नॅशनल आर्काइव्जपेक्षा दसपट असते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेंदू अभ्यासक डॉ. ग्लेन डोमन http://www.internationalparentingassociation.org/Early_Learning/accelerate.html ह्या साईटवर म्हणतात लहान बालकांची शिकण्याची क्षमता अति प्रचंड प्रमाणात असते. वाढत्या वयानुसार ती कमी होत जाते. जसे की एक वर्षाच्या बालकाची शिकण्याची क्षमता सहा वर्षापेक्षा अधिक असते. डॉ. डोमन ह्यांनी नवजात शिशू ते दहा वर्षांच्या बाळांचा विशेष अभ्यास केला त्यासाठी ते जगभर फिरले. त्यात त्यांनी मानसिक अपंग आणि अर्धांगवायू झालेल्या बालकांना त्यांचा खास असा 'ब्रेन डेव्हलपमेंट' प्रोग्रॅम नुसार प्रशिक्षण दिले. आणि काय आश्चर्य त्यातली बहुतेक मुले वाचायला, बोलायला, खेळायलाही शिकली. आपल्या ह्या संशोधनाचा सर्वांना फायदा व्हावा म्हणून डॉ. डोमन ह्यांनी फिलाडेलफिया मध्ये १९५५ साली THE INSTITUTES FOR THE ACHIEVEMENT OF HUMAN POTENTIAL® (http://www.iahp.org/) ह्या संस्थेची स्थापना केली. आज त्यांचे कार्य जगभर पसरले आहे.
प्रत्येक पालकांना वाटते आपल्या बाळाची हुशारी वाढवायची कशी ? त्यासाठी आधी मेंदूचे कार्य आणि वाढ समजावून घेऊ या. गर्भाशयात मेंदूची बांधणी चालू असतांना प्रत्येक मिनीटांना २,५०,००० नवीन 'न्यूरॉन्सची' निर्मिती होत असते. ही निर्मिती जन्माच्या वेळेपर्यंत बरीचशी पूर्ण होते. तरी सुध्दा जन्मानंतरही काहीप्रमाणात न्यूरॉन्सची बांधणी चालूच असते. वयाच्या दोन वर्षापर्यंत माणसाचा ८०% मेंदू विकसीत झालेला असतो.
बालकाच्या जन्मानंतर तुम्ही त्याला नवीन किती गोष्टींचे ज्ञान देता, स्पर्श, गंध, रंग, ध्वनी, चव ह्या पंच अवयवांना वेगवेगळे अनुभव देता त्यावर त्याच्या उरलेल्या न्यूरॉन्सची बांधणी अधिक होते आणि पर्यायाने तुमचे मूल हुशार होते. ह्यामध्ये आहार आणि भावनिक प्रेमालाही खूप महत्त्व आहे. ज्या बाळांना सकस आणि परिपूर्ण आहार दिला जातो, शब्द आणि स्पर्शातून पालकांचे प्रेम मिळते त्या बालकांची न्यूरॉन्सची बांधणी अधिक वेगाने होते. ह्याचाच अर्थ हुशार माणसाच्या मेंदूच्या न्यूरॉन्सचे जाळे हे अधिक दाट असते. 
सर्वसाधारणपणे परिक्षेत चांगले मार्क मिळवणा-या मुलांना हुशार समजले जाते. परंतु हुशारीची व्याख्या फक्त मार्क मिळवण्यापूर्ती संकूचित नसावी. अमेरिकेचे मेंदू शास्त्रज्ञ डॉ.हॉवर्ड गार्डनर ह्यांनी हुशारी किंवा बुध्दांक हा नऊ प्रकारे मोजला जातो हे सर्वप्रथम मांडले.  
निसर्ग, संगीत, तर्क/गणित, मानवी अस्तित्व, भाषिक, खेळाडू/नर्तक, परस्पर सुसंवाद, कलाकृती, स्वत्त्वाची जाणिव ह्या विविध प्रकारे बुध्दांक मोजला जातो. आतातर यशस्वी माणसांसाठी बुध्दांका बरोबर भावनांकही तितकाच महत्त्वाचा आहे. ह्या विषयीची माहिती पुढील साईट्सवर आहे - 
बुध्दांक मोजण्याच्या विविधतेवरुन 'मलटीपल इन्टलिजन्स'ची (Multiple Intelligence) संकल्पना पुढे आली. सर्वसाधारणपणे गणित आणि भाषेत उत्तम असणारया मुलांना 'हुशार' म्हटले जाते. पण डॉ.गार्डनर ह्यांनी हा समज ठामपणे 'मलटीपल इन्टलिजन्सच्या' आधारावर मोडून काढला आहे. त्यांच्या मते गणित, भाषेत हुशार नसणारे एखादे मुल खेळात, संगीतात, चित्रकलेत अगदी निसर्गात रमणारे असेल. गरज आहे त्यातली ही विविध बुध्दीमत्ता ओळखण्याची आणि फुलवण्याची. मलटीपल इन्टलिजन्स समजून घेण्यासाठी पुढील साईट्स उपयुक्त आहेत - 
आपल्या मेंदूचे दोन विभाग आहेत, डावा मेंदू आणि उजवा मेंदू. शाळेत किंवा व्यवहार्य जगण्यात अधिक भर डाव्या मेंदूवर दिला जातो. डावा मेंदू हा भाषा, गणित, व्यवहार, संशोधन आणि अचूकपणासाठी जवाबदार असतो त्या उलट उजवा मेंदू सृजनशिलता, कल्पकता, भावना, नेटकेपणा आणि विविध कलांशी निगडीत असतो. दोन्ही भागांच्या मेंदूचे कार्य विरुध्द परंतु परस्परपूरक आहे. डावा मेंदू माहिती हळूहळू आणि सातत्याने (repetitive) घेतो तर उजवा मेंदू ही माहिती काही क्षणात घेतो व त्याला सातत्याची आवश्यकता नसते. जेव्हा गरज पडेल तेव्हा उजव्या मेंदूला ही माहिती काही सेकंदात आठवते ह्याला 'फोटोग्राफीक मेमरी' म्हणतात. जपानचे डॉ. सिशीदिया मॅकातो ह्यांचा त्यावर गाढा अभ्यास होता व त्यांनी जपानमध्ये प्रिस्कूलर्ससाठी अश्या ३५० संस्था काढल्या आहे. ह्याच अर्थ सहा वर्षाच्या आधी आपण उजव्या मेंदूची वाढ होण्यासाठी प्रयत्न करु शकतो म्हणजेच मलटीपल इन्टलिजन्स आपल्या मुलामध्ये जागवू शकतो. ह्या विषयी अधिक अभ्यापूर्ण माहितीसाठी  
संशोधनात असे सिध्द झाले आहे की अपूरा आणि निकृष्ट आहार, विशिष्ट इन्फेक्शन किंवा औषधे, प्रदुषित वातावरण आणि जास्तीचा स्ट्रेस हा मेंदूच्या वाढीत अडथळे निर्माण करतो. 
मेंदूच्या वाढीसाठी चारवेळा सकस आणि पौष्टीक आहार, योग्य प्रमाणात पाणी आणि कमीतकमी ताणतणाव हे सर्व आवश्यक आहे. पुढील साईट्सवर आहाराचे तक्ते आणि प्रमाण दिले आहे 

मेंदूचे कार्य समजावून घेतल्यावर आपल्या पाल्यांसाठी आपण जरुर उपयोग कराल ही आशा. पुढच्या लेखात आपण 'अर्ली लर्नींग' विषयी जाणून घेणार आहोत.
मेंदू
मेंदू - प्राण्यांच्या शरीरातील एक गुंतागुंतीचा अवयव. हा अवयव डोक्यामध्ये कवटीच्या आत असतो.


शरीरातील सर्व ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया याद्वारेच नियंत्रित केल्या जातात. मेंदूमध्ये सुमारे १०० अब्ज चेतापेशी असतात.आपला मेंदूची डावीबाजू शरिराचया right side control करते
वाढ
आयुष्यभराच्या कालखंडात आपल्या शरीरातील इतर कुठल्याही अवयवापेक्षा मेंदूमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल घडत असतात. या बदलांची ढोबळपणे गर्भावस्थेतील, बाल्यावस्थेतील, पौगंडावस्थेतील, प्रौढावस्थेतील व वृद्धावस्थेतील मेंदू असे पाच टप्प्यात विभागणी करणे शक्य आहे. यातील प्रत्येक अवस्थेतील मेंदू आपल्या वर्तनावर परिणाम घडवणारा असून त्यामुळे आपल्या जीवनशैलीला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता त्यात असते.


पहिला श्वास घेते वेळी आपल्या मेंदूला आठ महिने पूर्ण झालेले असतात. गर्भधारणेच्या चार आठवड्यानंतर मेंदूच्या वाढीची पहिल्यांदा चाहूल लागते. भ्रूणाच्या पेशीतील तीन पदरापैकी एक पदर तंत्रिकानलिकेत (neural tube) परिवर्तित होतो. नंतरच्या एका आठवड्याच्या आत ही नलिका वाकडी होते. व त्यातूनच मेंदूतील अत्यंत मूलभूत असलेल्या अग्रमस्तिष्क, मध्यमस्तिष्क व पश्चमस्तिष्कांच्या (fore, mid and hind brain) रचनेला सुरुवात होते. यानंतरची मेंदूची वाढ व त्याची व्यवच्छेदता (differentiaon) पूर्णपणे जनुकांच्या नियंत्रणानुसार होऊ लागते.
मेंदूविकार

मेंदूशास्त्र - मज्जासंस्था रोग विज्ञान - न्युरॉलॉजी
 मेंदूशास्त्र - न्युरॉलॉजी, हे मज्जासंस्था, मेंदू, त्याची रचना आणि त्याला होणारे विकार/व्याधी ह्या विषयावर काम करणारे वैद्यक शास्त्र आहे. मज्जासंस्था, मेंदू आणि मज्जारज्जूबाहेरील चेतापेशी यांचा आपल्या शरिरातील अन्य अवयवांवर सुद्धा ताबा असतो त्यामुळे मेंदूविकाराचा माणसाचे इतर अवयव, माणसाची वागणूक या विविध गोष्टींवरही परिणाम होऊ शकतो.
मेंदूचा इतर अवयवांशी सततच संबंध असतो त्यामुळे ब-याचदा मेंदूविकारतज्ञ इतर मेडिकल स्पेशालिस्ट्सच्या बरोबरीने काम करतात. उदाहरणार्थ हाडांचे डॉक्टर, फिझिओथेरपिस्ट इत्यादी. मेंदूमधे वेगवेगळ्या भागांमधे वेगवेगळ्या स्वरुपाचे कार्य चालते. उदा. पाठीमागील भाग हा दृष्टी ज्ञानाशी तर दोन्ही बाजूचा भाग हा श्रवणाशी संबंधीत आहे. पाठीमागील परंतु वरचा भाग हा संवेदनांशी तर पुढील वरचा भाग हा कार्यप्रेरकतेशी संबंधित असतात. अगदी पुढील भाग हा विचारांशी तर तळाकडील पुढील भाग हा वासांशी संबंधित असतो. मेंदूच्या तळाचा भाग हा हायपोथॅलॅमस म्हणून ओळखला जातो, व तो अंतस्त्रावी ग्रंथींशी संबंधित असतो. मेंदूतील मानेकडचा भाग ब्रेनस्टेम म्हणून ओळखला जातो. त्यामधे श्वसन ह्रुदय व रक्तवाहिन्यांची कार्य, खोकला, उलटी, शिंक वगैरे प्रतिक्षिप्त क्रीयांशी निगडीत आहे. छोटा मेंदू (सेरेबेलम) तोल सावरणे व कौशल्यपूर्ण हलचालींचे नियंत्रण करणे, यांच्याशी निगडीत आहे. मेंदूतील पूर्ण विकसित व अविकसित अशा भागांच्या मध्ये एक भाग आहे, त्याला लिंबिक सिस्टिम असे म्हणतात. हा भाग नैसर्गिक प्रवृत्ती, भूक, भावना, आनंद, दु:ख, इ. शी संबंधित आहे.
मेंदूचा झटका (मेंदूतील रक्तवाहिन्यांचे आजार)

मेंदूचा रक्तपुरवठा निसर्गाने फार चांगला ठेवलेला आहे. यात अनेक पर्यायी मार्ग असतात. मेंदू व चेतासंस्था ही अत्यंत नाजूक संस्था आहे. रक्तप्रवाहात दोन-तीन मिनिटे खंड पडला तरी मेंदूचा संबंधित भाग कायमचा बिघडू शकतो.
हृदयविकाराच्या झटक्यात दोन-तीन मिनिटांत परत हृदयक्रिया चालू झाली नाही तर पुन्हा हृदयक्रिया चालू होऊनही उपयोग नसतो; कारण मेंदूतल्या पेशी तेवढया काळात मरण पावतात.
हृदयविकारात जसा रक्तप्रवाह खंडित होतो, तसाच मेंदूचा झटका असतो. यातही रक्तप्रवाह खंडित होतो. याची तीन प्रकारची कारणे असू शकतात.
-  रक्तवाहिनीत गुठळी होणे.
-  रक्तस्राव होणे.
-  रक्तदाब अचानक कमी झाला तर मेंदूचा रक्तप्रवाह कमी होणे.
यामुळे मेंदूच्या संबंधित भागातल्या पेशी मरून अवयव निकामी होतात.
या आजाराचा एक प्रकार तात्पुरता असतो. याचे कारण म्हणजे रक्तदाब तात्पुरता कमी होऊन मेंदूच्या पेशींना कमी रक्त पोचणे. संबंधित अवयव (हात, पाय, चेहरा), इ. तात्पुरते (काही मिनिटे) दुर्बल होतात. पण 24 तासांत ही परिस्थिती सुधारते.
लक्षणे
-  रक्तप्रवाहातला खंड तात्पुरता असेल तर नुसती चक्कर येते किंवा शरीराचा संबंधित भाग तात्पुरता बिघडतो. यात झटका येतो किंवा शक्ती जाते.
-  रक्तप्रवाह दीर्घकाळ बंद पडला तर संबंधित भागातली शक्ती, हालचाल जाऊन लुळेपणा येतो.
-  बिघाडाचे प्रमाण फार मोठे असेल तर शरीरात व्यापक बिघाड होतो. यामुळे इतर अंतर्गत संस्था बंद पडणे किंवा बिघडणे, बेशुध्दी, श्वसन किंवा हृदयक्रिया बंद पडणे, इत्यादी गंभीर परिणाम संभवतात.
-  अशा लुळेपणालाच आपण 'अर्धांगवायू' किंवा 'अंगावरून वारे जाणे असे म्हणतो.
-  यामुळे मृत्यूही येऊ शकतो.
कारणे
भारतामध्ये या मेंदू-झटका/अर्धांगवायूचे प्रमाण हजारी लोकसंख्येत 2 इतके आढळते. या व्यक्ती उतारवयातल्या किंवा वृध्द असतात. वाढत्या वयोमानाने या आजाराचे प्रमाण समाजात वाढतच जाणार आहे.
अतिरक्तदाब हे या आजाराचे एक प्रमुख कारण आहे. एक तर या आजारात रक्तवाहिन्या कडक झालेल्या असतात. जादा रक्तदाबाने त्या फुटतात. छोटया रक्तवाहिन्या फुटल्या तर थोडे नुकसान होते व ते भरून येते. मोठया रक्तवाहिन्या फुटल्या तर खूप नुकसान होते.
धूम्रपान, लठ्ठपणा, मधुमेह, उतारवय, रक्तातील मेद वाढणे ही या आजारामागची महत्त्वाची कारणे आहेत. या कारणांमुळे रक्तवाहिन्या फुटणे किंवा गुठळया होण्याची शक्यता निर्माण होते. मेंदूचा रक्तपुरवठा अनेक मार्गांनी होत असला तर सर्वच रक्तवाहिन्या या कारणांनी खराब झालेल्या असतात.
वरचा रक्तदाब 70 पेक्षा कमी झाला तर असा मेंदू घात होऊ शकतो. याला विविध कारणे आहेत. हृदयविकाराचा झटका हे त्याचे प्रमुख कारण असते. तसेच अतिरक्तदाबावर नियमित उपचार करणे हे मेंदू-आघात टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. रुग्णांना हे पटवले पाहिजे.

मेंदूच्या विशिष्ट भागात शरीराच्या विशिष्ट भागांचे नियंत्रण असते. तसेच मेंदू व चेतारज्जूच्या विशिष्ट भागातून संबंधित शरीराच्या संदेशांची ने-आण होत असते. नियंत्रण करणारा भाग किंवा संदेशवहन सांभाळणारा भाग यापैकी कोणत्याही भागात बिघाड होऊ शकतो. या भागामध्ये दाब येणे, रक्तपुरवठा बंद पडणे, पू होणे, मार लागणे यापैकी काही झाल्यास शरीराच्या संबंधित भागात शक्ती कमी होते किंवा लुळेपणा येतो.
**************************************
अर्धांगवायू याप्रमाणे येतो
(अ) उभ्या शरीराचा अर्धा भाग (एक हात व पाय), चेह-याचा अर्धा भाग किंवा
(ब) कमरेखाली दोन्ही पाय, मेंदूच्या एका (डाव्या किंवा उजव्या) भागात बिघाड झाला तर डोक्याखालच्या भागातील शरीराची विरुध्द बाजू बिघडते.
तात्पुरता किंवा कायमचा अर्धांगवायू
अर्धांगवायू कधीकधी तात्पुरता असतो, तर कधीकधी कायमचा. अर्धांगवायूचा झटका आल्यावर पहिल्या दोन-तीन दिवसांत शरीराचा कोणकोणता भाग लुळा पडणार हे ठरून जाते. दोन-तीन महिन्यांनंतर काही रुग्णांमध्ये थोडीथोडी सुधारणा होण्याची शक्यता असते. मात्र काही जणांच्या बाबतीत सुधारणा होत नाही.
मानसिक, शारीरिकदृष्टया खचल्याने बरेच रुग्ण या आजारात दगावतात.
मेंदू आघाताचे वेळीच निदान करण्यासाठी खालील खुणा महत्त्वाच्या आहेत. यातले एकही चिन्ह असल्यास सावध व्हावे; आणि वैद्यकीय मदत मिळवावी.
-  चेह-याचे स्नायू सैलावणे.
-  हात सैल व अशक्त होणे.
-  बोलण्यात बदल -अवघडलेपण
-  रुग्ण बोलू शकत नाही किंवा बोलणे अस्पष्ट होते.
-  रक्तदाब वाढलेला असू शकतो. किंवा अगदी कमीही असू शकतो.
-  त्वचेवर बधिरता - संवेदना कमी होणे.
-  विचित्र वास, चव, ध्वनि किंवा दृष्टीभ्रम होणे.
-  डोळयांच्या पापण्या जडावणे, अर्ध-मिटल्या होणे.
-  गिळण्याची क्रिया अवघड जाणे
-  एका डोळयाची बाहुली विस्फारणे किंवा प्रकाशाला लहान न होणे.
-  तोल जाणे
-  श्वसन अनियमित होणे.
-  चक्कर येणे.
प्रथमोपचार
-  रुग्णाला प्रथम धीर द्यावा.
-  रुग्णाला आडवे ठेवावे, शक्यतो कुशीवर ठेवावे म्हणजे श्वसन सोपे जाते.
-  तात्पुरत्या मेंदू आघाताचा रुग्ण असेल (म्हणजे काही मिनिटे परिणाम टिकून परत नीट झाले असल्यास) ऍस्पिरिनची गोळी द्यावी, यामुळे रक्तप्रवाह पातळ होऊन मेंदूमध्ये रक्त सर्वत्र पोचते. यामुळे पुढील धोका टळतो.
घरी करायची शुश्रूषा
अर्धांगवायूच्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर पुष्कळ काळजी घ्यावी लागते. असा रुग्ण दीर्घकाळ सांभाळावा लागतो. त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली नसते. अचानक आलेला अर्धांगवायूसारखा गंभीर आघात, अंथरुणाला खिळून राहावे लागणे, म्हातारपण, परावलंबित्व ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम होतो. या रुग्णांना खालील समस्या भेडसावतात.
-  दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी येणा-या अडचणी - यात जेवण, लघवी, मलविसर्जन, झोप, हालचाल करण्याची गरज या सर्व बाबी येतात.
-  अंथरुणात पडून राहण्यामुळे पाठ, कंबर, ढुंगण यावर जखमा होतात. या टाळण्यासाठी बरीच काळजी घ्यावी लागते. यात वारंवार कूस बदलणे,शेक देणे, मऊ-हवाशीर अंथरुण, दबाव-बिंदूकडे लक्ष देणे या सर्व महत्त्वाच्या बाबी आहेत.
-  पडून राहिल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे न्यूमोनिया व इतर आजार लवकर होतात.
-  स्नायू दुर्बल होतात. यासाठी व्यायामोपचार करावे लागतात.
-  बरे व्हायला अनेक आठवडे-महिने जातात. काही जण यानंतरही बरे होत नाहीत.
आयुर्वेद व योगोपचार
रक्तवाहिन्यांच्या आजारांमुळे रक्तपुरवठयात अडथळा येऊन मेंदूत बिघाड होतो. अशा आजाराला रक्तचंदन चूर्ण व जेष्ठमध चूर्ण समभाग एकत्र मिसळलेले तीन ते सहा ग्रॅम (एक-दोन चमचे) रोज याप्रमाणे एक दोन महिने घ्यावे. यामुळे रक्तप्रवाह नियमित राहण्यास मदत होते पण अर्थातच प्रारंभिक तीव्र अवस्थेत तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे. रुग्ण रुग्णालयातून घरी आल्यानंतरच वरील उपचार करावेत. अर्धांगवायू झालेल्या रुग्णांना आधी रुग्णालयात दाखल करावे लागते. घरी आणल्यानंतर नस्य, बस्ती, अभ्यंग, वाफा-याचे शेक, आसने व काही औषधे यांच्या मदतीने सुधारणा होऊ शकते. एकदा आजाराची पहिली तीव्रता ओसरली, मलमूत्र विसर्जनाची पूर्वसूचना देणे शक्य झाले की खाटेवर पडल्यापडल्या पवनमुक्तासन करावयास मदत करावी. प्रेम आणि सहानुभूतीने रुग्णास धीर द्यावा.
या बरोबरच महायोगराज गुग्गुळ एक ग्रॅम गोळी तीन वेळा आणि एकांगवीर 500 मि.ग्रॅ. गोळी तीन वेळा ही औषधे सुधारणा होईपर्यंत पोटातून द्यावीत.
हळूहळू इतर आसने शिकवता येतील. शक्याशक्यता पाहून वज्रासन, पद्मासन, भुजंगासन, इत्यादी शिकवता येईल. काही रुग्णांना आसने करताना अवयवांच्या कडकपणामुळे वेदना जाणवते. अशा रुग्णांचे श्वसन तपासावे. फक्त डावी नाकपुडी मोकळी आहे, उजवी बंद अशी स्थिती असल्यास डाव्या नाकपुडीत सुगंधी कापसाचा बोळा ठेऊन ती बंद करावी. या उपायाने उजवी नाकपुडी मोकळी होते. एकदा उजव्या बाजूने श्वसन सुरू झाले, की 15 मिनिटे बोळा तसाच ठेवून, नंतर काही तास बोळा काढावा व नंतर परत बसवून अर्धा तास जाऊ द्यावा. याप्रमाणे हळूहळू दोन्ही नाकपुडयांतून श्वसन एकसारखे चालू होईल अशी काळजी घ्यावी. यामुळे अवयवांचा कडकपणा कमी होतो.
याउलट अवयवांना अगदी शिथिलपणा असेल तर उजवी नाकपुडीच चालू असण्याचा संभव असतो. या परिस्थितीत डावी नाकपुडी चालू करण्याचा प्रयत्न करावा.
आसने करताना एकदम योग्य आसन व्हावे अशी इच्छा अवास्तव आहे.  हळूहळू प्रगती होत जाते. हे सर्व करायला खूप सहनशीलता आणि चिकाटी लागते.

हे उपचार यौगिक परंपरेनुसार सांगितले आहेत. आपण स्वतःही या क्षणी कोणत्या नाकपुडीने आपला श्वास चालू आहे हे तपासू शकतो. सर्वसाधारणपणे कोणती तरी एकच नाकपुडी चालू असते हे अनुभवास येईल. दिवस-रात्र, आजारपण, इत्यादींप्रमाणे विशिष्ट बाजूने श्वसन चालू राहते असा अनुभव आहे.
************************"

No comments:

Post a Comment