संसर्ग वर्गातिल आजार , लक्षणे , कारणे , उपाय

१)पोलियो :-
अथवा पोलियोमायलिटिस हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलियोमायलिटिस या शब्दाची व्युत्पत्ती ग्रीक भाषेमधील पोलियो (πολίός) म्हणजे ग्रे अथवा भुरा, मायलॉन (µυελός) म्हणजे मज्जारज्जू, तर -आयटिस (-itis) म्हणजे सूज या शब्दांपासून झाली आहे. पोलियोच्या उपसर्गाच्या ९०% घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाहीत, परंतु विषाणूनी रक्तप्रवाहामध्ये प्रवेश केल्यास पोलियो रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. १% पेक्षा कमी रुग्णांच्याबाबतीत हा विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये प्रवेश करतो व शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभूत असणाऱ्या 'गतिप्रेरक न्यूरॉनना' अपाय करतो. याचे पर्यवसान स्नायू दुर्बल होण्यामध्ये व शेवटी पक्षाघातामध्ये होते
वर्णन : एकूण तीन पोलिओच्या विषाणूमुळे पोलिओ होत असल्याचे माहीत आहे. एंटेरोव्हायरस या एकाच जातीमधील या विषाणूचे तीन प्रकार हे अन्नमार्गामधील विषाणू आहेत. टाइप वन या पोलिओ विषाणूमुळे आलेल्या साथीने बहुतेक रुग्णाना पक्षाघात होतो. एरवी हा विषाणू निरुपद्रवी मानवी परजीवी आहे.याचे संख्याशास्त्रीय अंदाज थोडे भिन्न आहेत. काहीं जणांच्या म्हणण्यानुसार दर २०० रुग्णांपैकी एकामध्ये पक्षाघाताची लक्षणे तर दुसऱ्या अंदाजानुसार दर १००० संसर्गापैकी एका रुग्णास विषाणू मध्यवर्ती चेता संस्थेपर्यंत पोहोचल्याने पक्षाघात होतो. जेंव्हा विषाणू मध्यवर्ती चेता संस्थमध्ये प्रवेश करतो तेंव्हा मज्जारज्जूमधील प्रेरक चेतापेशींच्या आवरणाला दाह होतो. प्रेरक चेतापेशी नष्ट होतात. यामुळे स्नायूकडे संवेद पाठविणे थांबते. स्नायूंकडे आलेले संवेद थांबल्यामुळे स्नायू आकुंचन पावणे थांबते. स्नायू शिथिल होतात. पोलिओमधील हा नेहमीचा प्रकार आहे. पोलिओ विषाणूमुळे किती चेतापेशी बाधित झाल्या आहेत त्यावर पक्षाघाताची तीव्रता अवलंबून आहे. बहुतेक वेळा अवयवांच्या स्नायूवर परिणाम होतो. पोटाचे आणि पाठीचे स्नायू बाधित झाले असल्यास उभे राहण्याची ढब बदलते. मानेच्या स्नायूवर परीणाम झाला असल्यास मान हलवणे आणि डोके उचलणे कठीण होते. चेहर्‍याच्या स्नायूंचा पक्षाघात असल्यास चेहरा वेडावाकडा होणे आणि पापण्या खाली पडणे असे परिणाम दिसतात. घशाचा पक्षाघात झाल्यास श्वासोच्छ्वास थांबून मृत्यू ओढवतो.
भारतातील प्रशिक्षित स्वयंसेवक बालकांना लशीचे दोन थेंब देत असे. मुख्य म्हणजे या लशीचा प्रभाव जन्मभर टिकणारा आहे. पल्स पोलिओचा डोस द्यायच्या दिवशीच काही बालके रेल्वे आणि बसच्या प्रवासात असत. अशा वेळी स्वयंसेवक गाडीत शिरून चटकन पोलिओच्या लशीचे थेंब बालकांच्या जिभेवर ठेवायचे. एकूण पाच डोस द्यायची योजना होती. त्यात खंड पडू नये, म्हणून उत्साही तरुण स्वयंसेवकांनी मनोभावे या मोहिमेत भाग घेतला. सव्वाशे कोटी लोकसंख्या, अस्वच्छता, पाणीटंचाई, अंधश्रद्धेचा पगडा, खडतर हवामानाचे उंच-सखल भूभाग, पर्वतीय-वाळवंटी प्रदेश असे अडथळे पार करून भारत पोलिओमुक्त झालाय. जगातील ८० टक्के नागरिक आता "पोलिओविरहित‘ देशांमध्ये राहतात.
कारणे आणि लक्षणे:-
आधीच संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क झाल्याने पोलिओ पसरतो. क्वचित रुग्णाच्या विष्ठेने दूषित झालेले अन्न आणि रुग्णाच्या लाळेशी संबंध आल्याने पोलिओ होऊ शकतो. थोडक्यात पोलिओ दूषित पाणी आणि अन्नामधून पसरतो. घाण गटारी, आणि दूषित अन्न यामधून पोलिओचा प्रसार होतो. तोंडावाटे शरीरात शिरलेल्या विषाणूची पुढील वाढ घशातील लसिका ग्रंथीमध्ये होते. एक आठवडाभर विषाणू येथेच असतो. या कालखंडामध्ये विषाणू अन्नमार्गाच्या रक्त आणि रसवाहिन्यामधून शोषला जातो. त्याची पुढील वाढ येथेच होते. यास सर्वाधिक सतरा आठवड्यांचा काळ लागतो. एकदा षोषला गेल्यानंतर विषाणू शरीरभर पसरतो. शरीरामधून मज्जारजू आणि केंद्रीय चेतासंस्थेमध्ये त्याचा प्रवेश होतो. एकाकडून दुसऱ्याकडे विषाणू पसरण्याचे एक कारण म्हणजे अस्वच्छ हात. जेवण्यापूर्वी जेवल्यानंतर, शौचानंतर हात घुतल्याने पोलिओ विषाणूचा प्रसार थांबतो. जोपर्यंत विषाणू घाणीत आहे तोपावेतो विषाणू घशात किंवा शौचामध्ये जिवंत राहतो. आजाराचे दृश्य परिणाम दिसण्यास तीन ते एकवीस दिवस लागतात.पण लक्षणे दिसू लागल्यानंतर सात ते दहा दिवसात पोलिओ होतो. विषाणू संसर्गाच्या दोन पद्धती आहेत. एक सौम्य आजार निर्माण करणारा आणि एक गंभीर आजाराचा . (पक्षाघातनज्य आणि पक्षाघात विरहित). सौम्य आजार 80-90% टक्के व्यक्तीना होतो. बहुतेक रुग्ण लहान मुले असतात. आजाराच्या लक्षणामध्ये थोडा ताप, अशक्तपणा, घसा खवखवणे आणि उलट्या होतात. ही लक्षणे विषाणू संसर्ग झाल्यानंतर तीन ते पाच दिवसात दिसू लागतात. सौम्य आजार २४ ते ७२ तासांत बरा होतो. पूर्वीच्या सौम्य आजाराची लक्षणे आधी दिसत असल्यास गंभीर स्वरूपाचा पोलिओ होतो. शक्यतो मोठ्या वयाच्या मुलाना आणि प्रौढाना गंभीर आजार होतो.
पोलिओची लागण झालेल्या १० टक्के व्यक्तींमध्ये तीव्र डोकेदुखी, मान आखडणे, पाठीत वा मानेमध्ये वेदना सुरू होतात. ही लक्षणे दिसण्याचे कारण म्हणजे मेंदूआवरण दाह. मेंदूआवरण मज्जारज्जू आणि मेंदूवरील चिवट आवरण आहे. या प्रकारास ‘आसेप्टिक मेंनिंजायटिस’ म्हणतात. याला आसेप्टिक म्हणण्याचे कारण म्हणजे हा मेंदूआवरण दाह विषाणूजन्य किंवा जिवाणूजन्य आहे. थोड्या दिवसात यामधून रुग्ण पूर्णपणे बरा होतो.
उपचार:-
पोलिओवर नेमके उपचार नाहीत. फक्त लक्षणावरून उपचार करण्यात येतात. रुग्णास वेदना कमी करता येतील आणि स्नायूंना आराम मिळेल एवढे उपचार शक्य आहेत. श्वास घेण्यासाठीच्या स्नायूवर परिणाम झाला असल्यास कृत्रिम श्वासयंत्रावर रुग्णास ठेवावे लागते. पोलिओचे नक्की निदान झाले असल्यास रुग्णास कडक बिछान्यावर झोपविण्याचा सल्ला दिला जातो. रुग्ण बरा होत असता भौतिक चिकित्सा आणि उपचारांचा रुग्णास फायदा होतो.
यर्सिनिया पेस्टिस, (Bacterium Yersinia pestis) या जंतूंमुळे हा रोग होतो. प्लेग : सामान्यतः वन्य व घरगुती कृंतक (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या) प्राण्यांत आढळणाऱ्या यर्सिनिया पेस्टिस नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गित पिसूद्वारे मानवात संसर्ग होणाऱ्या, तीव्र व गंभीर संसर्गजन्य रोगाला ‘प्लेग’ म्हणतात. प्लेगाच्या सूक्ष्मजंतूला पूर्वी पाश्चुरेला पेस्टिस किंवा बॅसिलस पेस्टिस अशी नावे होती. फ्रेंच सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ ए. ई.जे. येर्सँ (यर्सिन) यांनी १८९४ मध्ये या सूक्ष्मजंतूचा शोध लावल्यामुळे नव्या वर्गीकरणात त्याला यर्सिनिया असे संबोधण्यात येते. शिबासाबुरो किटाझाटो या जपानी सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञांनी त्याच वर्षी स्वतंत्र रीत्या हे सूक्ष्मजंतू ओळखले होते.
कधीकधी प्लेगाने मेलेली घूस हाताळतानाही तीवरील संसर्गित पिसवा चावून मानवात प्लेग उद्भवतो. साथ प्रामुख्याने संसर्गित घरगुती घुशींपासून सुरू होते. संसर्गित वन्य प्राण्यांवरील पिसवा मानवी वस्तीत येऊन घरगुती घुशींत रोगाचा फैलाव करू शकतात. पिसूनिर्मित प्लेग मुख्यतः गाठीच्या (वंक्षण अथवा जांघ, काख व मान या शरीरभागांत लसीका ग्रंथिशोथाने गाठ येणाऱ्या) प्रकारचा असतो. या प्रकाराचा फैलाव फक्त पिसवा चावण्यामुळे होत असल्याने इतरांना त्याचा फारसा धोका नसतो. याउलट फुप्फुसदाहक प्रकारात रोग्याच्या कफातून बिंदुक संसर्ग (कफातील छोटे थेंब हवेत लोंबकळत्या स्थितीत राहून होणारा संसर्ग) पसरण्याचा गंभीर धोका असतो व ग्रहणशील समाजात साथ झपाट्याने पसरते. घरगुती घुशींमुळे उत्पन्न झालेली साथ सर्व वयांतील स्त्री-पुरुषांत सारख्याच प्रमाणात पसरते. वन्य प्राण्यामुळे उत्पन्न झालेली साथ रानात काम करणाऱ्या लोकांपुरती मर्यादित राहू शकते. दाट लोकवस्ती व घुशींची भरमसाट वाढ यांच्या जोडीला जेव्हा सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव उत्पन्न होतो तेव्हा घुशींवरील पिसवांना मानवांना चावण्याची संधी मिळते. वन्य प्लेग समूळ नष्ट करणे अशक्य असल्यामुळे त्याचा नागरी भागात पसरण्याचा धोका कायम असतो.
रोगजनन : संसर्गित घुशींच्या रक्तातील सूक्ष्मजंतू चाव्यामुळे पिसूच्या शरीरात शिरतात व तिच्या जठरात वाढतात. या वाढीमुळे तिच्या अन्नमार्गाचा पुढचा भाग बंद होतो. पिसू नव्या रक्तशोषणाकरिता जेव्हा चावा घेते तेव्हा पूर्वी शोषिलेले काही रक्त व सूक्ष्मजंतू चाव्याच्या जागी ओकते आणि चाव्याच्या जखमेतून सूक्ष्मजंतू मानवी शरीरात शिरतात. असे सूक्ष्मजंतू जवळच्या लसीका ग्रंथीकडे नेले जातात आणि तीमध्ये शोथ उत्पन्न होऊन गाठ तयार होते.
पिसूच्या आंत्रमार्गात (आतड्यात) शिरलेले सूक्ष्मजंतू ३ ते ६ आठवड्यांपर्यंत आपली तीव्रता टिकवून धरतात व या कालावधीनंतर ते तिच्या विष्टेतून बाहेर पडतात. विष्ठादेखील चाव्याच्या जागी सूक्ष्मजंतू प्रवेशास कारणीभूत होते. संसर्गित पिसू योग्य परिस्थितीत दोन महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकते. प्लेगाने घूस मरताच तीवरील पिसवा नव्या जिवंत घुशी पोषणाकरिता शोधतात व अशा प्रकारे रोग घुशींतून पसरतो पोषणाकरिता घुशींची संख्या कमी पडताच पिसवा मानवी रक्त पोषणाकरिता शोधतात व रोग मानवात पसरतो.
लक्षणे : -
रोगाची सुरुवात बहुधा खूप ताप येऊन होते. कसकस, अस्वस्थता व व्याकुळता, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे यांबरोबरच ताप ३९०.५ से. ते ४०० से.पर्यंत चढतो. काही तासांतच लालबुंद चेहरा, चिंताग्रस्तता व इतर गंभीर आजाराची लक्षणे दिसतात. वाढत्या आजाराबरोबरच संभ्रमावस्था, मुग्धभ्रांती (भ्रम, शारीरीक अस्वस्थता, असंबद्धता इ. लक्षणे असलेली व सापेक्षतः अल्पकाळ टिकणारी मानसिक क्षोभावस्था) व मनोदौर्बल्य उत्पन्न होतात. चिंतेची जागा विषण्णता घेते. रोगाचे अनेक प्रकार ओळखले जातात. त्यांपैकी (१) गाठीचा प्लेग, (२) फुप्फुसदाहक अथवा प्लेगजन्य न्यूमोनिया आणि (३) जंतुविषरक्तता या तीन प्रमुख प्रकारांविषयीच येथे माहिती दिली आहे.
प्रतिबंध व नियंत्रण : वैयक्तिक प्रतिबंधात्मक उपायांमध्ये:- प्रतिबंधात्मक लस टोचणे महत्त्वाचे असते. दोन प्रकारची लस याकरिता वापरतात : (१) मृतजंतूंपासून बनविलेली आणि (२) हतप्रभ (जिवंत परंतु रोगोत्पादकता क्षीण बनविलेल्या) सूक्ष्मजंतूंपासून बनविलेली. पहिल्या प्रकारची लस भारतात ‘हाफकीन लस’ म्हणून ओळखली जाते व तिच्या एक मिली. मध्ये एक अब्ज मृत जंतू असतात. ती दोन मात्रांमध्ये आठवड्याच्या अंतराने १ मिलि. मात्रेत टोचतात. जरूरीप्रमाणे व वेळ कमी असल्यास एकाच मात्रेत दोन्ही भाग म्हणजे एकाच वेळी २ मिलि. मात्रा टोचतात. ही लस टोचल्यानंतर काहीशी सौम्य प्रतिक्रिया (ज्वर येणे वगैरे) निश्चितपणे उत्पन्न होते व टोचून घेणाऱ्या सर्व व्यक्तींना तशी पूर्वसूचना देणे जरूर असते. मूळ हाफकीन लसीमुळे जेवढी जोरदार प्रतिक्रिया येईल तेवढी एस्. एस्. सोखी या शास्त्रज्ञांनी रुपांतरित केलेल्या लसीमुळे येत नाही. जिवंत सूक्ष्मजंतू असलेली लस एकाच मात्रेत टोचतात व तीमुळे ५ ते १० दिवस टिकणारा ज्वर येतो. लसीच्या दोन प्रकारांपैकी पहिला प्रकार अधिक वापरात असून दोन्हीमुळे उत्पन्न होणारी प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता) ६ ते ८ महिने टिकते.
इतर उपाय : -
संसर्गित घुशी, संसर्गित पिसू व मानव यांच्या एकत्र येण्यानंतरच मानवात साथ पसरते हे निश्चित आहे म्हणून घुशींचा व पिसवांचा नाश करणे अत्यावश्यक आहे. प्लेग नियंत्रण घूस, पिसू व मानव या त्रिकोणाशी निगडित आहे. पिसवांच्या नाशाकरिता कीटकनाशके व घुशींच्या नाशाकरिता कृंतकनाशके वापरतात. कीटकनाशकांचा उपयोग प्रथम करावा व नंतर कृंतकनाशके वापरावी. १०% डीडीटी भुकटी किंवा ५% डीडीटी विद्रावाचा फवारा कीटकनाशक म्हणून उपयुक्त असतो. अलीकडे पिसवा डीडीटी प्रतिरोधक बनल्याचे आढळले आहे म्हणून साथीच्या भागातील पिसवांची कीटकनाशक सुग्राह्यता प्रथम अजमावून मगच योग्य ते कीटकनाशक वापरावे लागते. १.५% डिल्ड्रीन किंवा २% अल्ड्रिन असलेली भुकटी घुशींच्या बिळांतून व घरांच्या जमिनीवर फवारण्याने सर्व पिसवा मरतात व तिचा परिणाम १ ते १२ आठवडे टिकतो. कृंतकनाशक म्हणून सोडियम फ्ल्युओरोअसिटेट (१,०८०), आर्सेनिक ट्राय-ऑक्साइड, आल्फानॅप्थील, थायोयूरिया (अँटू) व वारफेरीन यांसारखी क्लथनरोधके (रक्तसाखळण्यास रोध करणारी वा विलंब लावणारी द्रव्ये) वापरतात.
साथीच्या वेळी वरील उपायांशिवाय रोग्याला अलग ठेवणे, प्रतिबंधात्मक औषधे सूक्ष्मजंतु-प्रतिरोधक बनली आहेत किंवा कसे हे ठरविणे व त्यानुसार औषध योजना करणे, रोग लक्षात येताच योग्य त्या आरोग्याधिकाऱ्यांना सूचना देणे (आंतरराष्ट्रीय सार्वजनिक स्वच्छता कायद्याप्रमाणे प्लेग हा रोग अधिसूचनीय आहे) या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. रशियामध्ये हतप्रभ सूक्ष्मजंतूंपासून बनविलेली लस फवाऱ्याच्या स्वरुपात नाक व घसा या ठिकाणी वापरून प्लेगजन्य न्यूमोनियास प्रतिबंध करण्यात यश आले आहे.
उपचार:-
स्ट्रेप्टोमायसीन किंवा टेट्रॅसायक्लीन या सारख्या औषधांचा रोगाच्या प्राथमिक अवस्थेत उपयोग केला तर ८५% रोगी तरी बरे होऊ शकतात.

२)मलेरिया :-
हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. प्लाझमोडियम वायवॅक्स या विषाणूंमुळे हा रोग होतो. का प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे.
प्लाझमोडियम' या जातीच्या डासांमुळे होणारा हा रोग तसा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकात हिपोक्रॅटिस यांना मलेरिया सदृश्य आजार माहीत होता. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात, जैलुइट लोकांनी पेरू देशात सिंकोना ही वनस्पती आणली होती. या सुमारास जेव्हा युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ आली होती. तेव्हा या सिंकोना वनस्पतीचा त्या तापावर उपचार करण्यात आला होता. या उपचारांमुळे मलेरिया आणि अन्य प्रकारचे ताप यांतील फरक सिडनर्हेम आणि अन्य वैद्यांना ओळखणे शक्य झाले. इ.स. १८८० मध्ये लेव्हेरान यांनी मलेरिया निर्माण करणाऱ्या डासांचा शोध लावला, परंतु या डासांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत त्याचा शोध त्यावेळी लागला नव्हता.
डासांमुळे मलेरिया होत असावा असा काहीसा तर्क त्यापूर्वी एक शतक आधी करण्यात आला असला, तरी त्यावर पुरेसा प्रकाश टाकण्यात आलेला नव्हता. मलेरिया नेमका कसा होतो, कसा पसरतो व त्याला प्रतिबंधक कसा करता येईल याबद्दल त्यावेळी निश्चित स्वरूपाची काहीही माहिती उपलब्ध नव्हती.
आजारात मुख्यतः खालील लक्षणे आढळतात.:-
थंडी वाजण्याचा त्रास सुमारे १५ मिनिटे ते तासभर चालतो.
थंडी वाजून ताप येतो. ताप थोडा वेळ टिकतो.
ताप कमी होताना घाम येऊन उतरतो.
ताप सहसा दुपारनंतर येतो. ताप सहसा दिवसाआड किंवा रोज येतो.
तापाबरोबर खूप डोकेदुखी,- अंगदुखी, कंबरदुखी, थकवा, इत्यादी लक्षणे जाणवतात. पण हे वेळापत्रक अगदी पक्के नसते. याबरोबर पाठही दुखते.
मलेरिया सौम्य असेल किंवा उपचार अर्धवट झाले तर लक्षणे सौम्य असतात. कधीकधी फक्त अंगावर काटा येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे एवढीच लक्षणे असतात. अशा तक्रारी खूप असतात. रक्तनमुना तपासल्याखेरीज याचा नक्की निर्णय करणे अवघड असते.
मलेरियाच्या तापामुळे काही वेळा मेंदूला सूज येऊन झटके येण्याची शक्यता असते. ही शक्यता बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
प्लास्मोडियम फाल्सिपॅरम प्रकाराच्या जंतूंमुळे रुग्ण कोमात जायची व दगवण्याची शक्यता असते.
काही रुग्णांत मूत्रपिंड निकामी होऊन लघवीत फुटलेल्या लाल रक्तपेशी दिसून येतात.
उपचार:-
मलेरियावरील उपचार आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. यात मुख्यतः क्लोरोक्विन, प्रायमाक्विन, क्विनाईन, आरर्टिमिसिन ही मलेरिया विरोधी औषधे वापरली जातात. रुग्णात काही जटिलता नसल्यास तोंडाने औषधे दिली जातात व जटिलता असल्यास शिरेवाटे औषधे टोचतात.

३)रेबीज :-
 हा उष्ण रक्ताचे प्राणी (जसे की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. याच रोगास जलसंत्रास असेही नाव आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो
साधारणपणे २ ते १२ आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी रोग्यात लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो व जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्वा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो. वास्तविक कुत्रा चावला म्हणून असा आवाज येतो असे काही नाही. पण काही अशिक्षित माणसे असा विचार करून कुत्र्यांना मारतात.
उपचार:-
प्राणी चावल्याने जखम झाल्यावर लवकरात लवकर साबण व स्वच्छ पाण्याने धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते. शक्य असल्यास त्यावर अँटिसेप्टिक मलम लावावे व त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीजवर पीईपी (पोस्ट एक्‍स्पोजर प्रोफायलॅक्सिस) ही प्रभावी लस उपलब्ध असून कुत्रे चावल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ती घेणे योग्य आहे.
पेशंटने मानवी रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकरात लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशंटने जखम व्हायच्या आधीच लसीकरण घेतले असेल त्याने इम्युनोग्लोबुलीनचा डोस नाही घेतला तरी चालतो. त्याने जखम झाल्या नंतरचे लसीकरण जखम झाल्यावर व दोन दिवसांनी घ्यावे.
पाळीव कुत्र्याचे रेबीजपासून संरक्षण :-
वयाचे तीन महिने झाल्यानंतर दर सहा महिन्यांनी आपल्या कुत्र्याला रेबीज ची लस द्या.
पाळीव कुत्र्याला कुठल्याही प्रकारे भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका.
कुत्र्यात वेगळे असे काही जाणवल्यास पशुवैद्यांशी संपर्क साधा.
भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास संतती नियमन शस्त्रक्रिया करा .
वटवाघळांपासून आपल्या कुत्र्याला दूर ठेवावे.
कुत्र्यांमधील लक्षणे -:
सतत लाळ गळणे, मलूल पडून राहणे, हालचालींवर ताबा नसणे, ताप येत राहणे, डोकेदुखी, निद्रानाश पाण्याची भीती वाटणे, आणि नाकातून डोळ्यांतून आणि कानांतून पस तत्सम घाण पाणी बाहेर येणे आणि, उगाचच भुंकणे अथवा भुंकायचा प्रयत्न करणे ही रेबीज ह्या रोगाची लक्षणे आहेत.
प्राण्यातील आक्रमकता वाढणे मध्य युगीन माणसे रेबीज झालेल्या कुत्र्याचा प्रतिकार करत आहेत.
रेबीज मध्ये प्राणी अस्वस्थ आणि बेचैन होतो, आवाज आणि उजेडाचा त्याच्यावर लवकर प्रभाव पडतो, तो तहानभूक सर्व विसरून जातो व कोणतीही वस्तू चावण्याचा प्रयत्न करतो. या रोगात प्राण्याची खूप लाळ गळते, त्याचे डोळे भयानक दिसतात, त्याला पाण्याची भीती वाटते, त्याला ताप येतो व तो कश्याही उड्या मारू लागतो. या प्रकारात प्राण्याला कधी कधी लकवा येतो व मानेचे स्नायू कडक होतात; प्राणी त्याचे शेपूट मागील दोन पायात घालून चालतो.

४)खरूज :-
(इंग्लिश: Scabies) ही शरीराला येणारी एक प्रकारची खाज आहेअशी खाज सरकॉप्टस स्कॅबीई (करcoptes scabiei) या जीवाणूमुळे होते. हा जीवाणू आठ पायांचा असून परजीवी आहे. हे जीवाणू आकाराने खूपच लहान असतात. ते सारखी त्वचा खोदत असतात.त्यामुळे त्वचेच्या त्या भागावर खूप खाज सुटते. रात्री ही खाज अजूनच वाढते. हे जीवाणू माणसाच्या सामान्य नजरेला दिसत नाहीत, परंतु भिंगाच्या किंवा सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने बघता येतात.
खरूज कशी पसरते ?
खरजेचे किडे खूपच संवेदनशील असतात. बहुतांश स्थितींमधे ते रोगी माणसाच्या शरीरावर २४ ते ३५ तास जगतात. दोन माणसांदरम्यान त्यांच्या त्वचेच्या प्रकारानुसार या किड्यांचा प्रसार होतो. मनुष्याला ज्या किड्यांचा संसर्ग होतो त्यापेक्षा भिन्न किड्यांचा संसर्ग कुत्रा/मांजरांना होत असल्याने या प्राण्यांपासून माणसाला रोगसंसर्ग होत नाही.
लक्षणे :-
खरजेमुळे बोटांच्या मधल्या भागात, मनगटांवर आणि कोपरांच्या मागच्या बाजूला, गुप्तांगाच्या जागी आणि गुडघ्यांवर तसेच पार्श्वभागावर छोटे उंचवटे आणि फोड येतात. खाज होणे हे खरजेचे सर्वात सामान्य लक्षण आहे. दिवसेंदिवस ही खाज तीव्र होत जाते.
साधे उपाय :-
बिछान्यावरील चादरी इत्यादी कपडे गरम पाण्याने धुवावेत म्हणजे त्यांतील जंतू नष्ट होतील.
अचूक निदान आणि उपचारासाठी एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

५)गोवर :-
 हा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात एक्झॅन्थम या नावाने ओळखले जाणारे पुरळ त्वचेवर येतात. गोवर हा रुबेला, पाच दिवसाचा करार किंवा हार्ड मीझल्स या नावानेसुद्धा ओळखला जातो.
वर्णन :-
 गोवर हा जगभर आढळणारा आजार आहे. सध्याच्या गोवर लसीकरणाच्या प्रथेआधी दर दोन किंवा तीन वर्षानी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गोवराची साथ येत असे. एक वर्षाआड येणारी लहान गोवराची साथ ही सामान्य बाब होती. तान्ह्या मुलापासून ते आठ महिन्यापर्यंतच्या मुलामध्ये गोवराविरुद्ध नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते. ही प्रतिकारशक्ती मातेच्या गर्भाशयातील पेशींमधून मुलास मिळालेली असते.
माणसाला कोणत्याही वयात एकदा गोवर होऊन गेला की त्याला तो पुढच्या आयुष्यात परत होत नाही.
कारण आणि लक्षणे :-
गोवराचे कारण पॅरामिक्झोव्हायरस नावचा विषाणू. अति संसर्गजन्य प्रकारातील हा विषाणू आहे. ज्यास गोवर झाला आहे त्याचा खोकला, शिंका यातून विषाणू पसरतो. ८५% गोवर या प्रकारे पसरतो. एकदा गोवराच्या विषाणूचा संसर्ग झाला की आठ ते पंधरा दिवसात विषाणूचा संसर्ग झालेल्या ९५% व्यक्तींना गोवर होतो. गोवराची लक्षणे दिसण्यापूर्वी तीन ते पाच दिवस गोवर विषाणूचा संसर्ग झालेला असतो. नंतरच्या चार दिवसात गोवराचे पुरळ अंगावर येण्यास प्रारंभ होतो.
गोवराचे पहिले लक्षण म्हणजे ताप, नाक वाहणे , डोळे तांबडे होऊन डोळ्यातून पाणी येणे आणि खोकला. काहीं दिवसात तोंडामध्ये गालाच्या आतील बाजूस पुरळ उठतात. ते वाळूच्या आकाराचे पांढरे पुरळ तांबूस उंचवट्यावर असतात. या पुरळांस कॉप्लिक पुरळ असे म्हणतात. हे गोवराचे नेमके लक्षण आहे. घसा सुजतो, तांबडा होतो आणि खवखवतो.
कॉप्लिक पुरळ आल्यानंतर गोवराचे पुरळ येण्यास प्रारंभ होतो. डोके, चेहरा आणि हातापायावर टप्प्याटप्प्याने पुरळ येतात. पुरळ प्रारंभी सपाट तांबड्या रंगाचे असतात. पण कालांतराने त्यावर उंचवटा दिसू लागतो. पुरळ आल्या ठिकाणी खाज सुटते. पुरळ आल्यानंतर ताप येतो. ताप ४०.५ से. (१०५ फॅ.) असतो. सोबत मळमळ, उलट्या, अतिसार, आणि लसिकाग्रंथीना सूज अशी लक्षणे दिसतात. पुरळ पाच दिवस राहतात. खोकल्याने रुग्ण बेजार होतो. पुरळांचा रंग बदलून तपकिरी झाल्यानंतर त्वचा कोरडी होते. पुरळ आलेल्या ठिकाणी खपली पडते. पाच ते दहा टक्के रुग्णामध्ये जीवाणू संसर्गाची गुंतागुंत होते. लहान मुलांच्या मध्ये कान, नाकाची पोकळी (सायनस) आणि न्यूमोनिया होण्याची शक्यता अधिक असते. इतर विषाणुजन्य आजारांमध्ये क्राउप(घसा आणि स्वरयंत्रास होणारा विषाणू संसर्ग, घसा दाह, श्वासनलिका दाह वगैरे), विषाणुजन्य न्युमोनिया, यकृत दाह, अपेंडिक्स दूषित होणे, पोटातील लसिकाग्रंथींची सूज, असे आजार होऊ शकतात. क्वचित हृदय किंवा वृक्क दाह, आणि रक्तक्षय होऊ शकतो. . रक्तपेशींची संख्या कमी झाल्यास रक्त गोठण्यामध्ये अडचण येते. जुनाट क्षयाने गोवरामध्ये डोके वर काढल्याची उदाहरणे सामान्यपणे दिसतात.
उपचार:-
गोवरावर नेमके उपचार नाहीत. उपचार रुग्णास आराम वाटावा यासाठी केले जातात. इतर जीवाणू संसर्ग झाल्यास प्रतिजैविके देण्यात येतात. ताप उतरण्यासाठी असिटॅमिनोफेन देण्यात येते. गोवर झालेल्या लहान मुलाना कधीही अ‍ॅस्पिरिन देऊ नये. यामुळे एक दुर्धर आणि जीवघेणा रेय सिंड्रोम होण्याची शक्यता असते. वाफाऱ्यामुळे घसा मोकळा होतो. रुग्णास भरपूर द्रव पदार्थ पिण्यास द्यावेत. तापामुळे शुष्कता येऊ नये म्हणून ही खबरदारी घ्यावी. गोवर झालेल्या काहीं लहान मुलाना एन्सिफलायटिस झाल्यास अ जीवनसत्त्वाचा मोठा डोस दिल्याचा फायदा झाल्याचे दिसले.

६)चिकुनगुनिया :-
 हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप (CHIKV)विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. रोगाचे पहिले निदान १९५३ मध्ये टांझानिया येथे झाले.
लक्षणे :-
एडीस इजिप्ती डास
ताप येणे, तसेच तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकुनगुनियाची लक्षणे आहेत. या रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात. त्यामुळे रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो, सांध्यांना सूज येते. रोग बरा झाला, तरी ही लक्षणे कमी होण्यास काही आठवडे लागतात. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात. स्नायू, कंबर, डोके दुखणे, प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे आदी लक्षणेही आहेत.
चिकनगुनियाची लक्षणे जरी डेंग्यूसारखी असली तरीही haemorragic fever ची अवस्था मात्र या रोगात त्यात जवळजवळ कधीच दिसत नाही. त्यामुळे चिकुनगुनियामुळे सहसा मृत्यू ओढवत नाही

७)डांग्या खोकला
डांग्या खोकला हा संसर्गजन्य रोग आहे. बोर्डेटेला पेर्तुसिस नांवाच्या विषाणूमुळे हा रोग होतो. श्वासातून पडणा-या थेंबावाटे हा विषाणू पसरतो, रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा हे थेंब उडतात. नाकातून वाहणा-या पातळ पदार्थाचा स्पर्श झाल्यानेदेखील हा रोग पसरतो.
लक्षणे :-
संसर्नांनतर सात ते दहा दिवसांत रोग-लक्षणे दिसू लागतात. पहिल्या अवस्थेत सर्दी, पडसे व थोडा ताप असतो. नंतर पाच-सात दिवसांनी दुसरी अवस्था सुरू होते. खोकला येऊ लागतो. प्रथम खोकला कोरडा असतो. पुढे खोकल्याच्या उबळी सुरू होऊन श्वास आत घेताना. 'हुप' असा आवाज येतो. म्हणून यास माकडखोकला असे म्हणतात. उबीच्या शेवटी चिकट कफ पडतो. कधी कधी कफ परत घशात जाऊन तो गिळला जातो. कधी कधी उलटी होते. उबळी दररोज पंधरा वीस अगर जास्तही वेळा येतात. उबळीच्या जोराने चेहरा लाल होतो. नाकातून एखादे वेळी रक्तस्त्राव होतो. कोणाकोणाच्या डोळ्यात रक्त उतरते. अशक्त रोग्याला खोकला झाला तर तो बरा होणे कठीण असते. या विकारात ताप येऊन न्युमोनिया होऊन मूल दगावण्याची शक्यता असते. तिसऱ्या अवस्थेत उबळी कमी होत जाऊन रोगी बरा होतो. रोगाचे निदान
प्रतिबंध :-
डांग्या खोकल्याची लस घेण्याची शिफारस सर्व बालकांसाठी केली जाते. ही लस सामान्यतः डीटीपी (घटसर्प, धनुर्वात, आणि डांग्या खोकला) अशी संयुक्तपणे दिली जाते. पूर्वीचे संसर्ग किंवा लसीकरण यांच्यामुळे आयुष्यभर प्रतिकारक्षमता मिळत नाही. तथापि, वयाच्या सहाव्या वर्षानंतर, संसर्गाचा उद्रेक होत नाही तोवर लसीचे बूस्टर डोस देण्याची शिफारस करण्यात येत नाही.

८)न्युमोनिया' :-
हा फुफ्फुसांचा सांसर्गिक आहे. ह्यामध्ये फुफ्फुसांच्या आतील अल्वोली - म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये वायूच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये द्रव साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते व त्यात कफसारखा द्रव जमुन रहातो. न्युमोनियामध्ये एक किंवा दोन्ही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो.
न्यूमोनिया हे लक्षण आहे. नेमक्या आजाराचे नाव नाही. पण डॉक्टर न्यूमोनिया फारसा काळजी करण्यासारखा आजार असल्याचे सांगतात. या आजारात प्रचलित असलेली आणखी एक वैद्यकीय शब्द म्ह्णजे डबल न्यूमोनिया- म्ह्णजे दोन्ही फुफ्फुसामध्ये संसर्ग पोहोचल्याचे लक्षण. दोन्ही फुफ्फुसामध्ये संसर्ग होणे ही सामान्य बाब आहे. न्यूमोनियामध्ये फुफ्फुसामध्ये जिवाणू, विषाणू किंवा कवकांचा संसर्ग होतो. फुफ्फुसाच्या वायुकलिकामध्ये द्रव किंवा पू साठतो. यामुळे वायुकलिकामधून पुरेसा ऑक्सिजन शरीरास मिळत नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पेशींचे कार्य नीट्से होत नाही. योग्य उपचार केले नाहीत तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे व्यक्तीचा मृत्यू ओढवतो.
न्यूमोनियाची लक्षणे :-
ताप,थंडी वाजणे,खोकला ,श्वास जलद होणे (गति वाढणे )श्वास घेताना धाप लागणे,छातीतआणिपोटातदुखणे,शक्तिपात,उलट्या,जिवाणूजन्य न्यूमोनिया हळुवारपणे किंवा एकाएकी उत्पन्न होतो.
गंभीर न्यूमोनिया रुग्णामधील लक्षणे :-
हुडहुडी भरणे.,तीव्र ताप,छातीत दुखणे, अपुरा श्वास ,खोकल्यातून हिरवा, पिवळा किंवा तपकिरी कफ
विषाणूजन्य न्यूमोनियाची प्रारंभीच्या काळातील लक्षणे फ्लूसारखी असतात. ताप, कोरडा खोकला, डोकेदुखी, अंग दुखी आणि अशकतपणा .याशिवाय 12-36 तासात रुग्णास अधिकाधिक श्रेणीमध्ये श्वास लागतो. श्वसन अपुरे होते, कफ़ तीव्र होतो, थोडा कफ पडतो. ताप वाढतो.श्वास घेणे कठीण होते. आणि ओठ निळे पडतात. टोकाच्या गुंतागुंतीमध्ये जिवाणू संसर्ग होतो.

९)पटकी (महामारी अथवा कॉलरा) :-
हा एक संसर्गजन्य रोग आहे. व्हायब्रियो कॉलरी नावाच्या जीवाणूंच्या उपसर्गाने अन्ननलिका व आतड्यांध्ये विषजन्य प्रथिनांच्या निर्मितीमुळे कॉलर्‍याची लागण होते. कॉलर्‍याचा संसर्ग आणि प्रसार मुख्यत्वे दूषित पाणी अथवा अन्नग्रहण केल्याने होतो.
पटकी (कॉलरा):-
 हा आतड्याना होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग आहे. स्वल्पविराम चिन्हासारखा आकार असलेल्या व्हिब्रिओ कॉलेरी या जिवाणूमुळे हा रोग होतो. ज्या व्यक्तीना पटकीची लागण झाली आहे त्यांची विष्ठा पाण्यात किंवा अन्नात संदूषित झाल्यामुळे कॉलर्‍याचा फैलाव होतो. कॉलरा या शब्दाचे मूळ भारतीय असावे. ग्रीक भाषेमध्ये कॉलरा या शब्दाचा अर्थ ‘पित्त’असा होतो. भारतातून उगम पावलेला हा रोग आता सर्व जगभर पसरलेला आहे.
पटकी रोगाच्या लक्षणामध्ये तीव्र पाण्यासारखे जुलाब आणि उलट्यांचा समावेश होतो. पटकीची लागण दूषित पाणी आणि अन्नामधून होते. उलट्या आणि जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता ओढवून निर्जलीकरण होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्वरित उपचार न झाल्यास मृत्यू ओढवतो. प्राथमिक उपचारामध्ये तोंडावाटे क्षार आणि पाणी देणे आणि ते शक्य न झाल्यास सलाइनवाटे शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण पूर्ववत करावे लागते. इ.स. २०१०मध्ये जगभरात सुमारे साठ लाख व्यक्तींना पटकीची लागण झाली होती, त्यांतील एक लाख तीस हजार व्यक्ती मरण पावल्या.
पटकीच्या जिवाणूंचा शरीरामध्ये संसर्ग झाल्यानंतर एक ते पाच दिवसामध्ये भाताच्या पेजेसारखे जुलाब होतात. उपचार केले नाहीत तर दिवसाकाठी दहा ते वीस लिटर पाणी जुलाब आणि उलट्यांवाटे शरीरातून बाहेर पडते. जुलाबास माशासारखा वास येतो. फक्त तीन टक्के व्यक्तीमध्ये पटकीची लक्षणे दृश्य स्वरूपात दिसतात. इतर व्यक्ती पटकीच्या वाहक असतात. वेळीच उपचार चालू केले नाहीत तर झपाट्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी होण्याच्या प्रकारास वैद्यकीय भाषेमध्ये जलशुष्कता (डीहायड्रेशन) असे म्हणतात. जलशुष्कतेमुळे रक्तदाब कमी होतो, नाडी वेगाने चालते, व्यक्तीचे डोळे खोल जातात आणि त्वचेवर सुरकुत्या पडतात.
पटकीचे जिवाणू निसर्गत: पाण्याच्या साठ्यात असतात. निरोगी व्यक्तीमध्ये शंभर दशलक्ष जिवाणू अन्ननलिकेत गेल्यास पटकीची लक्षणे दिसतात. ‘ओ’ रक्तगटाच्या व्यक्तीमध्ये पटकीचा धोका अधिक असतो. काहीं कारणाने जठराची आम्लता कमी झाल्यास पटकीच्या संसर्गाचा धोका वाढतो. चार ते पाच वर्षाच्या मुलामध्ये पटकीच्या संसर्गाची शक्यता अधिक असते. पटकीचे जिवाणू जठरामध्ये असलेल्या आम्लामुळे नष्ट होतात. पण काहीं शिल्लक राहिलेले जिवाणू लहान आतड्यामध्ये पोहोचल्यानंतर लहान आतड्याच्या अंतःत्वचेतील पेशीमध्ये प्रवेश करतात. तेथे शरीरातील लवक प्रथिन तयार करण्याचे थांबवून शरीरामधून जीवविष प्रथिनाच्या स्वरूपात बाहेर टाकतात. या जीवविषामुळे H2O, Na+, K+, Cl−, HCO3− आयने लहान आतड्याच्या पोकळीमध्ये साठतात. याबरोबर आतड्याच्या अंतःत्वचेच्या पेशींचा नाश होतो आणि जुलाब चालू होतात.
पाण्याच्या साठ्यामध्ये मलमूत्र येणार नाही याची काळजी घेतल्यास पटकीचा प्रादुर्भाव होत नाही. निसर्गत: सागरी कवचधारी प्राण्यांच्या शरीरावर व्हिब्रिओ कॉलेरी जिवाणू आढळतात. त्यामुळे सागरी खेकडे, तिसर्‍या आणि खुबे यांच्याबरोबर पटकी जिवाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी ते स्वच्छ पाण्यात धुवून घेतात. पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यावरील क्लोरिनीकरणामुळे पटकी जिवाणू नष्ट होतात. त्याचप्रमाणे विषाणू आणि जिवाणू प्रतिबंधक अतिनील किरण उपचार, आधुनिक फिल्टर सारख्या उपायामुळे पटकी जिवाणूंचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सार्वजनिक आरोग्य खाते यासाठी अधूनमधून पाण्याच्या साठ्याची पाहणी करते. पटकी झाल्यानंतर जलसंजीवनी, शिरेतून सलाइन आणि नॉरफ्लॅसॉसिन, इरिथ्रोमायसिन, क्लोरेरफिनेकॉल टेट्रासायक्लिन सारखी प्रतिजैविके वेळीच दिल्यास रुग्ण वाचतो. आता कॉलर्‍याची साथ नसल्यास पटकीची लस दिली जात नाही.
या रोगात जिवाणू आतड्याला सूज आणतात त्यामुळे आतड्यातील पेशींकडून अनियंत्रितपणे पाणी सोडले जाते व खूप जुलाब होतात. यामुळे शरीरातील पाणी कमी होते. शरीरातील पाणी खूप कमी झाले तर गुंतागुंत होते. होतात व १ आठवड्यात रुग्ण मरू शकतो. कॉलरा झाल्यानंतर रुग्णाला प्रथमतः उकळलेले पाणी दिले पाहिजे. रुग्णाची त्वचा चिमटीत घेऊन सोडावी. जर ती परत पूर्ववत होत असेल तर शरीरातील पाण्याचा स्तर योग्य आहे असे समजावे. अन्यथा अजून पाणी द्यावे. रुग्णाला उलट्यासुद्धा होऊ शकतात. अशा वेळी त्यास डॉक्टरांकडे घेऊन जावे व सलाईन द्वारे पाणी द्यावे.

१०)क्षय रोग :-
हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात.
क्षय रोगाची लक्षणे  :-
कमी होणारे वजन ,
थकवा श्वास घॆण्यास त्रास होणॆ ,ताप ,रात्री येणारा घाम ,भूक न लागणे ,
आजार टाळण्याचे उपाय "
क्षय रोगासाठी बी.सी.जी नावाची लस वापरली जाते.हि लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते.पण मोठ्यांना लस टोचून घेतल्यावरहि हा रोग होण्याची शक्यता आहे.
क्षय रोगासाठी एक लस उपलब्ध आहे .ती म्हणजे बी. सी.जी. ही लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते, पण मोठ्या माणसांना मात्र लस टोचल्यावरही हा रोग होऊ शकतो.
क्षय रोग टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती म्हणजे पौष्टिक आहार घेऊन रोग प्रतिकारकशक्ती वाढवणे.क्षय रोग तपासण्या करून घेणे क्षय रोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे ,तोंड झाकणे
क्षयरोगाच्या रुग्णांची लक्षणे :-
दोन आठवडय़ांहून अधिक काळ
बेडकायुक्त खोकला (२१ दिवसांपेक्षा जास्त काळ असणारा ),
हलकासा परंतु रात्री येणारा ताप ,
घटणारे वजन ,भूक कमी होणे ,
बेडक्यातून रक्त पडणे ,थकवा छातीत दुखणे ,रात्री येणारा घाम ,मानेला गाठी येणे ,क्षय रोग होण्याची जास्ती शक्यता असलेले लोक ,जास्ती वय असलेले लहान बाळे ,दुसऱ्या कोणत्यातरी कारणांनी ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली आहे असे कमी पोषकता
दारूच्या आहारी गेलेले ,जास्ती गर्दीच्या ठिकाणी राहणारे गरीब लोक ,
अस्वच्छतेत राहणारे
उपचार :-
सहा ते नऊ महिन्यांकरिता विविध औषधोपचाराच्या पद्धती
औषधोपचार खूप कालावधीसाठी चालतो कारण ह्या रोगाचे जीवाणू खूप हळूहळू वाढतात व अौपधोपचाराने खूप हळूहळू मरतात.
जीवाणू कमी करण्यासाठी विविध औषधे घ्यावी लागतात.
आजारपणातील घ्यावयाची काळजी
खोकताना तोंडावर हातरूमाल धरणे.
खूप कफ पडत असल्यास एका कपात जंतुनाशक (डेटॉल, सेव्हलॉन, इ.) घालून त्यातच थुंकावे; इतरत्र कुठेही न थुंकणे महत्त्वाचे.
रुग्णाच्या राहण्याची व कामाची जागा हवेशीर ठेवावी,लहान मुलांचा व रुग्णाचा संपर्क टाळणे,घरात इतरांनीही टीबीची काही लक्षणे वाटल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असते.
उपलब्ध उपचार :-
क्षयरोगाच्या उपचारासाठी प्रभावी व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. दोन, तीन किंवा चार औषधे एकत्रितपणे व कमीत कमी सहा महिने घ्यावी लागतात. रायफामपिसिन, आयसोनिआझिड, पायराझिनामाईड, इथॅमबूटॉल, स्ट्रेप्टोमायसिन ही काही प्रतिजैविक औषधे आहेत मात्र ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. उपचारांच्या पहिल्या एक ते दीड महिन्यातच रुग्णाला चांगला गुण येतो. खोकला कमी होतो, वजन वाढू लागते, ताप येणे बंद होते. पण उपचार अर्धवट सोडून देऊ नयेत. असे केल्यास नवीन प्रकारचे क्षयरोगाचे जीवाणू तेथे येतात औषधांना दाद न देणारा, घातक स्वरूपाचा रेझिस्टंट क्षयरोग होतो.
औषधांचे दुष्परिणाम :-
या औषधांचे काही दुष्परिणाम दिसू शकतात. उदा.- सांधेदुखी, हाता-पायांना जळजळ, बधीरता, काविळ, दृष्टीदोष, कमी ऐकू येणे, लघवीस लाल रंग, मळमळ, उलटी इत्यादी. पण सहसा रुग्ण औषधांना सरावतात व फारसे दुष्परिणाम न होता उपचार घेऊ शकतात. पण कुठल्याही दुष्परिणामाची थोडी जरी शक्यता वाटली तरी स्वतःच उपचार बंद करू नयेत. त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य असते.

११)कांजिण्या :-
हाही प्रामुख्याने लहान मुलांचा आजार आहे. हा आजार एकदा येऊन गेला, की परत होत नाही. पण काही व्यक्तींमध्ये हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात आणि प्करावस्थेत 'नागीण' या रोगाद्वारे प्रकट होतात.
कारणे :-
हा आजार व्हेरिसेला झोस्टर(Varicella zoster virus (VZV) या विषाणुंमुळे होतो. कांजिण्या (चिकन पॉक्स) हा एक सामान्य पण वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. बहुतेक वेळा याची लागण लहान मुलाना होते. पण प्रौढाना सुद्धा कांजिण्याची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कांजिण्यामधे खाजणारे बारीक पुरळ त्वचेवर येतात. हे पुरळ आठवडभर राहतात. रुग्णास त्याबरोबर तापही येतो. एकदा कांजिण्या झाल्या म्हणजे रुग्णामध्ये कांजिण्याविरुद्ध आयुष्यभर टिकून राहील एवढी प्रतिकारशक्ती तयार होते. कांजिण्या झाल्याचे लक्षणावरून त्वरित घ्यानात येते. रुग्ण दिसायला विचित्र दिसला तरी ठरावीक कालावधी मध्ये तो बरा होतो. सहसा रुग्णास हॉस्पिटलमधे दाखल करावे लागत नाही. घरी उपचार केले तरी चालतात. आजारामध्ये गुंतागुंत झाल्यास वैद्यकीय मदतीची गरज भासते.
कांजिण्या हा वॅरिसेल्ला- झोस्टर या विषाणूमुळे ( हर्पिस विषाणू कुलातील ) होणारा आजार आहे. रुग्णाशी प्रत्यक्ष संपर्क येणे किंवा हवेमधून याचा प्रसार होतो. संसर्ग झाल्यानंतर विषाणूचा परिपाक काल 10-21 दिवसांचा आहे. त्यानंतर आजाराची लक्षणे दिसू लागतात. अंगावर पुरळ येण्याआधी दोन दिवस रुग्णापासून इतराना संसर्ग होऊ शकतो. अंगावर पुरळ येऊन त्यावर खपली धरेपर्यंत रुग्ण विषाणूचा वाहक असतो. पुरळ ये ऊन त्यावर खपल्या धरेपर्यंतचा काल सु. सात दिवसांचा असतो. प्रौढामध्येहा कालावधि अधिक असतो. कांजिण्या झालेल्या मुलाना सात दिवस शाळेपासून दूर ठेवण्याचा सल्ला यामुळे दिला जातो. अंगावरील पुरळांच्या सर्व खपल्या पडून जाईपर्यंत थांबण्याची फारशी गरज नसते.
वाढत्या मुलांच्या आयुष्यामधील कांजिण्या हा एक सामान्य आजार आहे. नागरी भागामधील नऊ ते दहा वयोगटातील 80-90% मुलाना कांजिण्या येऊन गेलेल्या असतात . सध्या कांजिण्यावरील लसीला नागरी भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागातील मुलाना कांजिण्याची प्रतिकारशक्ती तयार झालेली नसते. कारण कांजिण्याची तीव्रता कमी अधिक असली तरी एकदा कांजिण्या हो ऊन गेल्यानंतर आयुष्यभर पुन्हा कांजिण्या होत नाहीत. प्रौढामध्ये कांजिण्याची तीव्रता अधिक असते. कधीकधी प्रौढामधील कांजिण्यामुळे गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात. कांजिण्यामुळे झालेल्या मृत्यूमधील निम्म्याहून अधिक व्यक्ती प्रौढ असतात.
कारणे आणि लक्षणे :-
कांजिण्या कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दिसणारा आजार आहे. बरे ना वाटणे आणि थोडा तापाने त्याची सुरवात होते. काहीं तासात किंवा एकदोन दिवसात डोके, मान किंवा शरीराच्या वरील भागामध्ये तांबूस रंगाचे लहान पुरळ येण्यास प्रारंभ होतो. पुढील 12ते 24 तासात पुरळावर खाज सुटते,पुरळ पाण्याने भरतात. दोन ते पाच दिवसात त्यांच्या संख्येत वाढ होते. त्वचेवर जुन्या पुरळाबरोबर नवे येतच राहतात. कधी कधी शरीराच्या सर्व त्वचेवर पुरळ उठतात. काही रुग्णामध्ये तोंडाच्या आतील बाजूस, नाकामध्ये, कानामध्ये आणि योनिमार्ग आणि गुदमार्गात पुरळ उठतात. काहीं रुग्णामध्ये पुरळांची संख्या कमी असते. पण शरीरावर 250-500 पुरळ येणे ही सर्वसामान्य बाब आहे. कालांतराने पुरळावर खपली धरते. खपल्या पडून जातात. पुरळ खाजविले नाहीत तर त्वचेवर डाग पडत नाहीत. खाजविल्याने पुरळामध्ये जंतुसंसर्ग होतो. कधीकधी पुरळ आलेल्या ठिकाणी त्वचा अधिक काळवंडते. खाजेचे प्रमाण कमी अधिक असते. काही कांजिण्याच्या रुग्णामध्ये डोकेदुखी, ताप , पोटदुखी अशी लक्षणे दिसतात. पाच ते दहा दिवसात रुग्ण पूर्ण बरा होतो. प्रौढ रुग्णामध्ये रोगाची तीव्रता वाढते.
कांजिण्या हा काळजी करण्यासारखा आजार नसला तरी कधी कधी रुग्णामध्ये गुंतागुंत होऊ शकते. पुरळामध्ये न्यूमोनिया, अतिसार, मेंदू ज्वर, आणि काविळीचा संसर्ग झाल्यास गंभीर परिस्थितिओढवू शकते. 1. अर्भक- एका वर्षाहून लहान अर्भकास कांजिण्या झाल्यास रुग्ण गंभीर स्थितीत जातो. या वयातील रुग्णामध्ये कांजिण्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता असते . काहीं वेळा आईस प्रसूतिपूर्वी कांजिण्या झाल्यास अर्भकास मेंदूची वाढ पुरेशी न होण्याने बालकाच्या मृत्यूची शक्यता असते. गर्भधारणेनंतर लगेचच आईस कांजिण्या झाल्यास बालकाच्या वाढीवर परिणाम होतो. अशा बालकामध्ये जन्मजात दोष उद्भवण्याची शक्यता असते. 2. प्रतिकारशक्ति विरहित बालके- जनुकीय घटकामुळे , वैद्यकीय उपचाराने किंवा आजारामुळे ज्या बालकांची प्रतिकारशक्ति झाली आहे अशा रुग्णामध्ये कांजिण्याचे गंभीर स्वरूप होतात. कांजिण्यामुळे झालेल्या मृत्यूचे हे दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे. 3. प्रौढ आणि 15 वर्षाहून अधिक वयाचे रुग्ण- कांजिण्या झालेल्या प्रौढ रुग्णामध्ये आजारचे स्वरूप गंभीर असल्याने आजाराची गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. अधिक संवेदनशील असणा-या वरील रुग्णांची उपचारादरम्यान अधिक काळजी घ्यावी लागते.
उपचार :-
कांजिण्यावर उपचार घरीच करता येतात. उपचारामध्ये ताप कमी करणे आणि बरे होण्यास मदत करणे एवढ्या दोन बाबींचा समावेश आहे. कांजिण्या हा विषाणूजन्य आजार असल्याने प्रतिजैविके अँेटिबायोटिक्स देऊन उपयोग होत नाही. अंगावर ओल्या कापडाच्या पट्ट्या ठेवणे किंवा रुग्णास थंड अथवा कोमट पाण्याने स्नान घालण्याने अंगाची खाज कमी होण्यास मदत होते. आंघोळीच्या पाण्यात शंभर ग्रॅम खाण्याचा सोडा ( हे प्रमाण टबभर पाण्याचेआहे ). आणि दोन कप ओट मील घालून स्नान करावे. ( भारतामध्ये बादलीभर पाण्यात एक चहाचा चमचा खाण्याचा सोडा आणि चमचाभर डाळीचे पीठ घालावे. सौम्य साबणाचा वापर करावा. अंघोळीनंतर अंग टिपून घ्यावे. पुसू नये. कॅलॅमिन सारखे लोशन लावल्यास खाज कमी होते. खाजविल्यानंतर जंतुसंसर्ग होत असल्याने रुग्णाची नखे कापून घावीत. मोठ्या वयाच्या मुलाना खाजवू नका अशी सूचना द्यावी. अगदी लहान मुलांच्या हातास मऊ कापड बांधून ठेवावे.
तोंडामध्ये पुरळ उठल्यास पाणी पिणे किंवा अन्न गिळणे कठीण होते. अशा वेळी थंड पेये, सरबते,मऊ खीर, लापशी असे सहज गिळता येतील असे पदार्थ खाण्यास द्यावेत. डॉक्टरच्या सल्ल्याने योनिमार्ग किंवा शिश्नावरील पुरळावर जंतुनाशक क्रीम लावावे. पुरळामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास प्रतिजैविके वैद्यकीय सल्ल्याने वापरावीत. ॲेसीटॅमिनोफेन किंवा इतर तत्सम ॲस्पिरिन विरहित औषधाने ताप कमी होतो. ॲयस्पिरिन किंवा इतर सॅलिसायलेट गटातील औषधे कांजिण्याच्या रुग्णाना देऊ नयेत. ॲ स्पिरिनच्या वापराने कांजिण्याच्या रुग्णामध्ये ‘ रेये सिंड्रोमची लक्षणेदिसू लागतात. रुग्णास नेमके कोणते औषध द्यावे यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा. जन्मजात प्रतिकारशक्ती क्षीण असलेल्या रुग्णाना ॲेसिक्लोव्हिर हे विषाणूप्रतिबंधक औषध देतात. झोव्हिरॅक्स सुद्धा अपेक्षित परिणाम साधते. पण झोव्हिरॅक्स च्या सार्वजनिक वापरावर अजून तज्ञांचे एकमत झालेले नाही.
**************************


1 comment: