आरोग्य

🌺म्हातारपण आणि आरोग्य🌺
वार्धक्य (म्हातारपण) ही प्रत्येक व्यक्तीमध्ये कालांतराणे सामान्यतः वयाच्या 60 ते 70 वर्षानंतर उत्पन्न होणारी एक सामान्य अवस्था असते.
वृद्धावस्थेत शरीरातील बल धातू स्मृती यांचा क्षय झाल्याने वृद्ध व्यक्तीमध्ये अनेक रोग उत्पन्न होतात.

यामध्ये प्रामुख्याने खालील विकार अधिकतेने आढळतात.
हूद्यरोग, संधिवात, मधुमेह, दुर्बलता, कॅन्सर, निद्रानाश, स्मृतिनाश, पक्षाघात, नेत्रविकार, मोतिबिंदू इ.

वार्धक्य आणि आहार –
वय जसे वाढत जाते तसे आहाराची गरज कमी कमी होत जाते.
● आहारात फळे, पालेभाज्या, दूध, तांदूळ, गहू यांचा समावेश करावा.
● आहारातील साखर, मीठाचे प्रमाण कमी करावे. यामुळे अनुक्रमे मधुमेह आणि उच्च-रक्तदाब यासारखे विकार होण्यापासून दूर राहता येते.

वृद्धत्व आणि विहार –
● मोकळ्या हवेत सकाळी फिरावयास जावे.
● समवयस्कांमध्ये मिसळावे त्यांच्याशी गप्पा माराव्यात.
● आध्यात्म आणि निसर्गाच्या सानिध्यात जावे.
● कौटुंबिक वादविवादापासून अलिप्त रहावे. कोणावरही आपले मत लादू नये. वैचारिक मतभेदातून परिवारामध्ये खटके उडण्याची शक्यता असते. या वेळी आपण तटस्थ राहून मार्गदर्शकाची भुमीका पार पाडणे गरजेचे असते.

वृद्धाश्रमांची वाढती संख्या ही काही देशाची गौरवाची गोष्ट नाही.
व्यवहारीक जगामध्ये वृद्धव्यक्तींकडे भुर्दंड म्हणून न पाहता आधार म्हणून पाहिले पाहिजे.
                        N•R•Sable             🌺मद्यपान व्यसनाधीनता आणि आरोग्य🌺 :
मद्यपानाचे व्यसन हे आज अत्यंत गंभीर अशी समस्या बनली आहे. जगामधील 5 ते 10% लोकसंख्या ही मद्यपानाच्या आहारी गेली आहे. तर भारतातील 20 ते 30% लोकसंख्या ही मद्यपानाच्या विळाख्यात आलेली आहे.

मद्यपान आणि वय –
बहुतांश तरुणपिढी मद्यपानाच्या जाळ्यात अडकली आहे.
गतीशील जीवनशैलीमुळे पालकांचे मुलांकडे पुरेसे लक्ष न दिल्याने किशोरवयीन मुलांमध्येसुद्धा मद्यपान व्यसनाचे प्रमाण वाढत आहे.
जी व्यक्ती 15 वर्षापेक्षा कमी वयापासूनच दारु पिण्यास सुरवात करते त्यांना मद्यपानाचे व्यसन जडण्याची शक्यता सर्वात जास्त असते.

मद्यपान आणि लिंग –
जगभरात मद्यपानाचे व्यसन पुरुष आणि स्त्री यादोहोंमध्येही आढळते. आपल्या संस्कृतीमुळे मद्यपानापासून स्त्रीया काही प्रमाणात दुर आहेत.
मद्यपानाचे व्यसन स्त्रीयांसाठी अत्यंत घातक असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. मद्यपान करणाऱया स्त्रियांचा मृत्युदर अधिक आढळतो.

गर्भावस्था आणि मद्यपान –
गर्भावस्थेत मातेद्वारा मद्यपान केल्यास तिच्या बालकामध्ये Alcoholic syndrome विकसित होण्याची शक्यता अधिक असते.
तसेच अशा बालकामध्ये मानसिक मंदत्व येण्याचा धोका असतो. तर गर्भीणीमध्ये आकस्मिक गर्भपाताचा धोका निर्माण होतो.

मद्यपानामुळे होणारे रोग –
मद्यपान व्यसनाचा घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. मद्यपानामुळे यकृताचे विविध विकार उत्पन्न होतात. यामध्ये हिपाटायटिस, यकृत संक्रमित होणे, यकृताचा सिरोसिस, लिव्हर फेल्युअर, लिव्हर कैन्सर इ. यकृताचे विकार उत्पन्न होतात.

याशिवाय मद्यपान करणाऱयांमध्ये हृद्रोग, हार्ट अटॅक, किडन्या निकामी होणे, फुफ्फुसाचा कर्करोग, पोटाचा कैन्सर तसेच विविध मानसिक विकार होण्याचा धोका अधिक असतो
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
योग हा शब्द मुळात संस्कृत भाषेतून आलेला आहे. संस्कृतच्या युज आणि योक या दोन शब्दांनी मिळून योग हा शब्द तयार झाला आहे. युजचा अर्थ जोडणे, बांधणे असा होतो तर योकचा अर्थ एकाग्रचित्त, मनाची एकाग्रता, विचार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे असा होतो.
योग म्हणजे शरीराचे अवयव, मनातील भावना आणि अध्यात्म यांचा समन्वय होय. योग आपल्या जीवनातील मानसिक ताण-तणाव कमी करून आपल्या शरीरातील सर्व नाड्यांचे शुद्धीकरण करतो. योग ही आध्यात्मिक वाट असून त्या वाटेवर चालून आपण आपले ध्येय गाठू शकतो. अर्थातच, ते ध्येय गाठण्यासाठी त्या वाटेवरचे नियम पाळावेच लागतील.
सात्त्विक जीवनशैली, संस्कारक्षम नियंत्रित मन आणि सात्त्विक विचार या तिघांचा एकत्रित परिणाम आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळेच परिमाण देतो. जो मनुष्य या तीनही नियमांचा विचारपूर्वक उपयोग करतो, अर्थातच त्याचा स्वत:च्या मनावर पूर्णत: ताबा असतो. एकदा का त्याचे मन शांत झाले, की शरीरसुध्दा पूर्णत: त्याच्या ताब्यात असते.
योग करण्याने सात्त्विक वैचारिक पातळीचा उच्चांक गाठला जातो, जो त्याच्या बदललेल्या जीवनशैलीत उठून दिसतो.
योगाचे मूळ 
योगाचे मूळ दोन गोष्टींमध्ये सामावलेले असते. एक शारीरिक आणि दुसरे आध्यात्मिक. शारीरिक मुळात आसन, क्रिया, आणि प्राणायाम यांचा समावेश असतो. या सर्वांचा योग्य अभ्यास शरीरास योग्य आध्यात्मिक यश दोतो. योग गुरू या सर्वांचे एक जिवंत उदाहरण आहे.
या विशेष सदराद्वारे आम्ही आपणास एकामागोमाग एक तीस आसनांची माहिती देणार आहोत. प्रत्येक आठवड्यात तुम्हाला एका नवीन आसनाची माहिती दिली जाईल. चला तर मग एका आरोग्यदायी 
                  Sable Sir             आणि तंदुरुस्त जगाच्या दिशेने प्रवास सुरू करू या.
योगासनाने शरीरात उर्जा वाढतेच तसेच ती नियमित केल्याने विविध आजारांवर देखील नियंत्रण ठेवता येते. आजारानुसार त्यांच्यावर उपयोगी आसने खालीलप्रमाणे-
*
एसिडीटीसारख्या पित्ताच्य
ा आजारावर शलभासन, नाडी शोधन, शीतळी शितकरी आणि प्लविनी प्राणायामाने फायदा होतो.
*
निद्रानाशावर-
सर्वांगासन, सूर्यभेदी प्राणायाम, शीतली शीतकरी व योगनिद्रेचा फार फायदा होतो.
*
पोटाच्या विकारात
सर्वांगासन, बध्दपद्‍मासन, पश्चिमोत्तासन, सर्पासन, चक्रासन, मत्स्येद्रासन, उंटासन व पोटाचे व्यायाम लाभदायी ठरतात.
*
कंबरदुखीसाठी-
पाठीच्या कण्याचे व्यायाम, योगक्रिया, सुखासन, पद्‍मासन, त्रिकोणासन, उत्कटासन, अर्धमत्स्येद्रासन, गोमुखासन, वज्रासन, सुप्‍तवज्रासन, मत्स्यासन, उष्ट्रासन, भुजंगासन, धनुरासन, एकपाद, शंक्खासन, नौकासन गुणकारी आहेत. पाठदुखीवरही या आसनांचा उपयोग होऊ शकतो.
*
बध्दकोष्टतेसाठी-
शलभासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन, चक्रासन, भुजंगासन, अर्धत्स्येद्रासन, उष्टासन, हलासन, सर्वांगासन ही आसने करावीत. अथवा डावी नाकपुडी बंद करून उजवी मोकळी ठेवा. मुलबंध बांधून 100 पावले चाला. (शौचाची क्रिया रोखण्यासाठी स्थिती) किंवा चार ग्लास पाणी पिऊन ताडासन, स्कंधासन, तिर्थक भुजंगासन, शंखासन आदी आसनांच्या दररोज एक एक आवृत्ती कराव्यात
*
करपट ढेकरांवर
सर्वांगासन, ‍शीर्षासन, जानुशिरासन, भुजंगासन, चक्रासन, बध्दपद्‍मासन, उष्टासन, कर्णपिडासन आदी आसने उपयुक्त आहेत. यापैकी सर्वांगासन व ‍शीर्षासन अधिक लाभदायी आहेत. तात्काळ फायदा होण्यासाठी मत्स्यासन, अर्धमत्स्यासन, उर्ध्वपद्‍माससारख्या आसनांचा अभ्यास करावा.
*
कातडीचे विकार
दूर करण्यासाठी प्रार्थनेबरोबरच शंखपद्‍मासन व नाडीशोधन करावे.
*
मांडी 
                     Sable                  तसेच जांगेतील
आजारांसाठी सर्वांगासन, जानुशिरासन, पश्चिमोत्तासन, अर्धमच्छेंद्रासन, सूर्यभेदी प्राणायाम नेतीजलनेती करावी तसेच वरील आसन अधुनमधून करत राहिल्यास सर्दीपासून संरक्षण मिळते.
*
सुरकुत्यांवर कर्णी
योगमुद्रा, शवासन, योगक्रियांचा उपयोग होतो.
*
तीव्र रक्तादाबावर
वज्रासन, पवनमुक्तासन, शशांकासनाबरोबर शीतली, शीतकरी आणि भ्रामरी प्राणायामाचा उपयोग होतो. शवासनानेही ताण, थकवा दूर झाल्याने रक्त दाब आटोक्यात येतो.
*
दमा तसेच श्वासाच्या
आजारावर शवासन, मत्स्यासन, शलभासन, सुप्‍तवज्रासन, भुजंगासन, उष्ट्रासन, शंखपक्षालन, भस्त्रिका, कपालभाती, उज्जाई प्राणायाम प्राणप्रयोग यांचा उपयोग होतो.
*
नाक, कान व घशाच्या
विकारावर सिंहासन, मत्स्यसनाबरोबर जलनेती प्राणायाम व यौगिक क्रिया उपयोगी आहेत.
*
जुलाबाव
र सर्वांगासन, हलासनाबरोबर मुलबंध कार्योत्सर्गँ शितली प्राणायाम करावेत.

*
पचनासाठ
ी पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मयुरासन, शलमासन, ताडासन, उडियानासन, वज्रासन, त्रिकोणासन, अर्धमच्छेंद्रासन आदी आसने लाभदायी ठरू शकतात.
*
पोटदुखीव
र उत्तानपादासन, पवनमुक्तासन, वज्रासन, मच्छेद्रासन, भुजंगासन, उडियान योगमुद्रा रेचन करावे.
*
पायांसाठ
ी पद्‍मवीरासन, पर्वतासन, महावीरासन, अर्धबध्दपद्‍मासन, पश्चिमोत्तासन व योगक्रिया कराव्यात.
*
बहिरेपणासाठी-
सिंहासन, शीर्षास
                     Sable Sir बहिरेपणासाठी-
सिंहासन, शीर्षासनाबरोबर भ्रामरी प्राणायाम नेतीक्रिया, यौगिक क्रिया कराव्यात.
*
हातासाठ
ी धनुरासन, बकासन, चक्रासन, उर्ध्वपद्‍मासन, हस्तभुजासन, कुक्कुटासन, वज्रासन, लोलासन फार उपयोगी ठरतात.
मधुमेहासाठ
ी इष्टवंदन, हलासन, सर्वांगासन, जानुशीरासन, पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मत्स्यासन, अर्धमच्छेंद्रासन, सुप्‍तवज्रासन, शशांकासन, गोमुखासन, ताडासन, योगमुद्रासन, मुलबंध बांधुन भस्त्रिका भ्रामरी नाडी शोधन शीतकरी आणि शितली प्राणायाम करावे.
* जाडेपणा कमी
करण्यासाठी धनुरासन, पश्चिमोत्तासऩ सर्वांगासन, त्रिकोणासन, हलासन, शलभासन, अर्धमच्छेंद्रासन, पादहस्तासन, योगमुद्रेबरोबर, उडियान आणि नाडी शोधन प्राणायाम, योगिक क्रिया व मेरूदंडाचे व्यायाम करावे.
*
यकृतदोषांवर -
पश्चिमोत्तासन, शलभासन, सर्वांगासन, हलासन, धनुरासन, भुजंगासन, बध्दपद्‍मासन, शशांकासन, हस्तपादोत्तानासन, उष्ट्रासनाबरोबर वीर वंदन किंवा परमेष्टी वंदानाने अधिक लाभ होतात.
*
रक्ताच्या कमतरतेव
र- सर्वांगासन, हलासन, शलभासन, पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मत्स्यासन, नाडी शोधन प्राणायाम व शितली प्राणायामाने रक्तशुध्दी व रक्तवृध्दीस लाभ होतो. कमी रक्तदाबावरही योगासनामुळे नियंत्रण ठेवता येते. त्यासाठी वज्रासन, योगमुद्रा हकली आसने आणि नाडी शोधन कायोत्सर्ग यासारखी आसने करावीत.
*
स्लिपडिस्
क - नौकासन, धनुरासन, शलभासन, भुजंगासन व मकरासनाने अधिक लाभ होऊ शकतो.
*
सुज आल्यास-
शरीरावर सुज आलेल्या भागाच्या आतल्या नसांना ताणणारे प्रकार लाभदायक ठरतात. उर्ध्वसर्वंगासन व शीर्षासन यामुळे सुज येण्याची प्रक्रिया कमी होते.
*
तोतरे बोलण्याव

र नौकासन, सिंहासन, उत्थितपद्‍मासनाबरोबर शीतकरी, शितली आणि भ्रामरी प्राणायामाने तोतरेपणा कमी होतो.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

No comments:

Post a Comment