वाक्प्रचार

वाक्प्रचार व वाक्यात उपयोग 
********--*************************
वाक्प्रचार व वाक्यात उपयोग
📝📝📝📝📝📝📝📝📝
वाक्प्रचार

अटक करणे :- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली.
अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच, अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले.
अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.
अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला.
अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला.
अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.
अठराविश्व दारिद्र्य : कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते.
अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात.
अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.
अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.
अवलंबून असणे :- शिष्य नेहमी गुरूच्या ज्ञानावर अवलंबून असतो.
अवगत होणे :- एक महिने अभ्यासाने कॉम्प्युटर कसा चालवावा, याची कला राजेशला अवगत झाली.
अंगवळणी पडणे :- सुरुवातीला सायकल चालवताना मोहन घाबरला होता; पण हळूहळू सायकल चालवणे त्याच्या अंगवळणी पडले.
अंगी बाळगणे :- माणसाने दुसऱ्याकडचे चांगले गुण नेहमी अंगी बाळगावेत.
अंगीकार करणे :- महात्प्रयासाने स्वातीने सासरच्या चालीरीतींचा अंगीकार केला.
अंग चोरणे :- आपले अंग चोरून महादूने मालकांना वाट करून दिली.
अंत होणे :- पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांचा अंत झाला.
अंतर ण देणे :- शेठजींनी दामू या आपल्या नोकराला कधीही अंतर दिले नाही.
अंदाज बांधणे :- मोहनच्या पडलेल्या चेहऱ्यावरून तो नाराज झाला आहे, असा आईने अंदाज बांधला.
आकलन होणे : काकांनी समजावून सांगितले की, बऱ्याचशा कठीण गोष्टींचे मला आकलन होते.
आदर बाळगणे : लहान मुलांनी नेहमी थोरामोठ्यांचा आदर बाळगावा.
आनंदाचे भरते येणे : पहिल्यांदा समुद्रकिनारा पाहिल्यामुळे नीताला आनंदाचे भरते आले.
आरोळ्या ठोकणे :- क्रिकेटमध्ये जिंकल्यावर मुलांनी आनंदाने आरोळ्या भोकल्या.
आव्हान देणे :- गुप्त कारस्थान करणाऱ्या शत्रूला भारतीय सेनेने आव्हान दिले.
आयात करणे : जावा-सुमात्रा बेटावरून भारत मसाल्यांच्या पदार्थांची आयात करतो.
आवाहन करणे : 'पूरग्रस्तांना मदत करा' असे चाळ कमिटीने प्रत्येक भाडेकरूला आवाहन केले.
आळशांचा राजा :- रमेश काहीच काम करत नाही, दिवसभर लोळत असतो. तो म्हणजे आळशांचा राजा आहे.
आश्चर्य वाटणे :- या दिवाळीत गावामध्ये खुप फटाके फुटल्याने मला आश्चर्य वाटले.
आश्चर्याने तोंडात बोटे घालणे :- अपंगांची शर्यत पाहून रोहण आश्चर्याने तोंडात बोटे घातली.
आश्चर्यचकित होणे :- सर्कशीतील नाचणारा हत्ती बघून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले.
आज्ञा पाळणे :- आईवडिलांची व गुरुजनांची आज्ञा पाळावी.

औक्षण करणे : दिवाळीला अभ्यंगस्नान केल्यावर आईने मला औक्षण केले.
***********--**********************
औक्षण करणे : दिवाळीला अभ्यंगस्नान केल्यावर आईने मला औक्षण केले.
इलाज नसणे : अतिरेक्यांनी भारताचे एवढे नुकसान केले की त्यांच्यावर कडक कारवाई करण्याशिवाय सरकारकडे इलाज नव्हता.
उत्कट प्रेम असणे :- माझे माझ्या शाळेवर उत्कट प्रेम आहे.
उत्कंठेने वाट पाहणे :- वाऱ्याच वर्षांनी माहेरी येणाऱ्या नलूची राधाबाई उत्कंठेने वाट पाहत होत्या.
उगम पावणे :- त्र्यंबकेश्वराच्या डोंगरात गोदावरी नदी उगम पावते.
उचलली जीभ लावली टाळ्याला :- राजेश प्रत्येक गोष्टीत आपल्याला ज्ञान आहे अशीच वागते. म्हणतात ना, उचलली जीभ लावली टाळ्याला.
उत्तीर्ण होणे :- प्रमोद एम.बी.बी.एस. परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला.
उदरनिर्वाह करणे :- कमालीचे कष्ट उपसून दामू आपला उदरनिर्वाह करत होता.
उन्हे उतरणे :- उन्हे उतरताना आई शेतातून घरी आली. 
ऋण फेडणे :- गरिबांची सेवा करून प्रत्येकाने समाजाचे ऋण फेडले पाहिजे.
एकजीव होणे :- गावातील रस्ता तयार करताना गावकऱ्यांनी एकजीव होऊन काम केले.
एकटा पडणे :- वर्गात वीरुशी कोणी बोलत नसल्यामुळे तो एकटा पडला.
एक होणे :- सर्व भारतीयांनी एक होऊन दहशतवादाचा बीमोड केला पाहिजे.
ऐट दाखवणे :- नवीन कपडे घालून छोटा राजू सर्वांना ऐट दाखवत होता.
कदर करणे :- बादशहाने बिरबलाच्या चातुर्याची नेहमी कदर केली.
करुणा उत्पन्न होणे : रामूचे दारिद्र्य पाहून सर्वांच्या मनात करुणा उत्पन्न झाली.
कमाल करणे :- नाटकात सुंदर अभिनय करून विनिताने अगदी कमाल केली.
कच खाणे :- माथेरानला दरीत उतरताना चंदूच्या मनाने कच खाल्ली.
कचरणे :- रात्रीच्या वेळी जंगलातून प्रवास करायला पर्यटकांचे मन कचरले.
कपाळमोक्ष होणे :- गच्चीवरून कोसळल्यामुळे गच्चीत काम करणाऱ्या कामगाराचा कपाळमोक्ष झाला.
कलाटणी मिळणे : मधुकर नौदलात भरती झाला आणि त्याच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली.
कष्टाचे खाणे :- शेतकरी शेतात राब राब राबतो व कष्टाचे खातो.
कळी खुलणे :- आजीने आणलेली सुंदर सुंदर खेळणी पाहून लहानग्या शीतलची कळी खुलली.
कंबर कसणे :- भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून सोडवण्यासाठी क्रांतीकारकांनी कंबर कसली.
काबाडकष्ट करणे :- मामीने आपल्या मुलाला काबाडकष्ट करून शिकवले.
काटकसर करणे :- तुटपुंज्या पगारात महिन्याचा खर्च करताना रेखाकाकू काटकसर करत होत्या.
कातड्याचे जोडे घालणे :- सुरज नोकर सावकारांना म्हणाला, "माझ्या मुलीच्या लग्नासाठी तुम्ही पैसे दिलेत, तर मी तुम्हांला माझ्या कातड्याचे जोडे घालीन."
काबीज करणे :- छत्रपती शिवाजी महाराजांनी कुमारवयातच तोरणा गड काबीज केला.
कागाळी करणे :- सुचिताने पुस्तक फाडले, अशी नीताने आईकडे कागाळी केली.
कानात वारे शिरणे :- बऱ्याच दिवसांनी मोकळ्या मैदानात आणल्यावर कुत्र्याच्या पिलाच्या कानात वारे शिरले.
कामगिरी करणे :- बाजीप्रभू देशपांडेंनी पावनखिंड लढवून शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर सोपवलेली कामगिरी बजावली.
कालबाह्य ठरणे :- दूरदर्शनच्या वाढत्या प्रसारामुळे हल्ली रेडिओ कालबाह्य ठरू लागला आहे.
काहूर उठणे : पृथ्वीवर धूमकेतू आदळणार, या अफवेचे लोकांमध्ये काहूर उठले.
कामाचे चीज होणे :- मिडलस्कूल परीक्षेत राहुल प्रथम आल्यामुळे त्याने रात्रंदिवस केलेल्या कामाचे चीज झाले.
काया झिजवणे :- मदर तेरेसांनी अनाथ बालकांसाठी आयुष्यभर आपली काया झिजवली.
काळजी घेणे :- छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेची मुलाप्रमाणे काळजी घेत होते.
काळजात चर्र होणे :- कोसळलेल्या इमारतीची बातमी वाचून सुनंदाच्या काळजात चर्र झाले.
काळजाला हात घालणे :- मेधा पाटकर यांनी धरणग्रस्तांची बाजू कळकळीने मांडून लोकांच्या काळजाला हात घातला.
    
कृतघ्न असणे :- स्वतः कष्ट करून राधाबाईने रामला शिकवले, पण त्यांच्या म्हातारपणी दूर जाऊन तो कृतघ्न ठरला.
कैद करणे :- शाळेतील मुलांनी अभ्यास होण्या साठी स्वताला कैद करून घतले.
किंमत करणे :- पोशाखावरून नाही; पण एखाद्या माणसाच्या बोलण्यावरून त्याची किंमत करावी.
कुवत असणे :- न थकता दहा किलोमीटर धावण्याची राजेशची कुवत होती.
कुशल चिंतणे :- देवाला नवस करून कुमारकाकींनी आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी कुशल चिंतीले.
कुरकुर करणे :- सहलीला जायला मिळाले नाही; म्हणून राजू दिवसभर कुरकुर करत होता.
कुरवाळणे :- संध्याकाळी परतलेल्या गाईला वासुदेव मायेने कुरवाळतो.
कूस धन्य करणे :- छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापून जीजामातेची कूस धन्य केली.
कोरडे ठणठणीत पडणे :- आमच्या गावचा ओढा भर उन्हाळ्यात कोरडा ठणठणीत पडतो.
कौतुक वाटणे :- मुग्धा एवढ्या लहान वयात उत्तम गाते याचे सर्वांना कौतुक वाटते.
खजील होणे :- चोरी उघडकीस आल्यावर रामू खजील झाला.

ख्याती असणे :- उत्तम
*********************************
=============================
👦🏻वाकप्रचार👧🏻    आवळ्याची मोट बांधणे – एकमेकांशी न जमणाय्रा लोकांना एकत्र आणणे.
सध्याच्या काळात सर्व विरोधी पक्षांनी एका झेंड्याखाली येणे म्हणजे आवळ्याची मोट बांधण्यासारखे आहे.

उखळ पांढरे होणे – खूप पैसा मिळणे.
दुष्काळाच्या दिवसात बरेच व्यापारी आपले उखळ अगदी पांढरे करुन घेतात.

अंधारात घाव घालणे – नकळत नुकसान करणे.
चीनने पाकिस्तानशी संगनमत करुन भारतवर अंधारात घाव घातला.

कोंबडे झुंजविणे – भांडण लावून मजा पहाणे.
गावच्या जमेत कोंबडे झुंजवण्याची नुसती स्पर्धा सुरु असते.

गाढवाचा नांगर फिरवणे – पूर्ण वाटोळे करणे.
मध्ययुगात जहांगीरदार आपल्याविरुध्द वागणाय्राच्या घरादारांवरुन गाढवाचा नांगर फिरवीत.

आता काही वाक
 Sablesir  गाई पाण्यावर येणे – रडायला येणे.
घर बसणे – एखाद्या कुटुंबाचा पूर्ण नाश होणे.
घोडे मारणे – आगळीक करणे.
चौदावे रत्न दाखविणे – खूप मार देणे.
झाडा देणे – परिणाम भोगणे.
डोके देणे – धीराने तोंड देणे.
तुपाच्या आशेने उष्टे खाणे – फायद्यासाठी अपमान सहन करणे.
नशीब सिकंदर असणे – काळ अनुकूल असणे.
धूळ चारणे – मानभंग करणे.
नाकात काड्या घालणे – खिजवणे.
पैसा पासरी असणे – मुबलक असणे.
नाकातले केस गळणे – मनाला झोंबेल असे बोलणे.
पाणी लागणे – अंगी गुण येणे.
पाणी पाजणे – नुकसानीत आणणे.
पोट बांधणे – उपाशी राहणे.
पोटाची दामटी वळणे – खूप भूक लागणे.
बाहुली प्रमाणे नाचवणे – आपल्या तंत्राप्रमाणे वागविणे.
मिशीला पीळ देणे – बढाई मारणे.
मिशांना तूप लावणे – उगीच ऐट करणे.
लांडगेतोड करणे – शत्रूवर तुटून पडणे.
खेडी उडवणे – फजिती करणे.
वाघाचे कातडे पांघरणे – मुद्दाम ढोंग करणे.
वेसण घालणे – मर्यादा घालणे.
सोन्याचा धूर निघणे – खूप संपत्ती असणे.
शंभर वर्ष भरणे – नाशाची वेळ येणे.
हातावर शीर घेणे – जिवावर उदार होणे.
हात ओला करणे – जेवावयास घालणे.

तोंडपाटीलकी करणे – काहीही कृती न करता नुसती बडबड करणे.
*********************************


No comments:

Post a Comment