मानवी पचनसंस्था

मानवी पचनसंस्था 
प्राण्याच्या शरीरातली पचनसंस्था ही त्याच्या शरीरातील अनेक अवयवांची बनलेली आहे. या संस्थेमुळे खाल्लेल्या अन्नाचे पोषकद्रव्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला पचन असे म्हणतात. ही पोषकद्रव्ये शरीराची वाढ व चलनवलन यांसाठी उपयोगी पडतात.
माणसाच्या पचनसंस्थेत पुढील अवयव असतात:
तोंड, घसा, अन्ननलिका, जठर, स्वादुपिंड, यकृत, पित्ताशय, लहान आतडे, मोठे आतडे, गुदाशय व गुदद्वार.
तोंड 
**********************************
अन्ननलिका
अन्ननलिका ही एक स्नायुयुक्त नलिका असते जी घसा ते जठराचे वरचे मुख यांना जोडते. नलिकेतून अन्न स्नायुंच्या हलचालींच्या साहाय्याने पुढे ढकलले जाते.
शरीरशास्त्र

मानवी अन्ननलिका मानेच्या मणका क्र्.६ ते पाठीचा मणका क्र. १० च्या स्तरापर्यंत असते. तिची लांबी २०-२५ से.मी. पर्यंत असते. अन्ननलिकेची आतील बाजूस स्तरीकृत स्क्वैमस उपकला (Stetified Squamous Epithelium) असते.
***************************************
जठर
जठर (English-Stomach,हिंदी-आमाशय) मानवी पचनसंस्थेतील एक अवयव आहे. जठरातून आम्लयुक्त (acidic) जाठररस स्त्रवतो. त्यामुळे अन्नाचे पचन होते. अन्नाचे पचन, शोषण व रोगजंतूंचा नायनाट करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे अ‍ॅसिड करत असते.
जठर विकार

जाठररसाचे प्रमाणे वाढले की, मग मात्र त्याच्या उपयुक्ततेपेक्षा त्याच्या दाहकतेचा त्रास होतो. यालाच आम्लपित्त असेही म्हणतात. या आम्लपात्ति छातीत पोटात जळजळ, पोटदुखी, अपचन, डोकेदुखी, उलट्या, पित्त उसळी मारून तोंडात येणे, आंबट करपट चव, तोंडास दुर्गंधी, अस्वस्थता अशा स्वरूपात आढळतात. कालांतराने या लक्षणांचे रूपांतर पोटात अल्सर रक्तस्राव यात होऊ शकते.
********************************"******
स्वादुपिंड 
*****************************************
यकृत
यकृत हा असा अवयव आहे, की जो अविरतपणे काम करत राहतो. किरकोळ बिघाड झाला तरी यकृत तो दर्शवत नाही, म्हणूनच सहसा यकृतातील बिघाड लक्षात येतो तोपर्यंत खूप नुकसान झालेले असू शकते.
शरीरशास्त्र :
पचनसंस्थेतील उदरपोकळीतील अन्य अवयवांसह यकृताचे स्थान
प्रौढ अशा मानवाचे यकृत हे १.३ ते ३.० कि.ग्रॅ. इतक्या वजनाचे असते. हे नरम व गुलाबी करडया रंगाचे असते. हे मानवाच्या शरीरातील दुसऱ्या क्रमांकाचे अवयव व सर्वात मोठी ग्रंथी आहे. हे अवयव उदराच्या वरच्या बाजुस बरगड्यांच्या खाली स्थित असते. यकृताला दोन भाग असतात.
उजवा भाग (Right lobe)- हा डाव्या भागापेक्षा मोठा असतो.
डावा भाग (left lobe)
रक्तप्रवाह :
स्प्लेनिक रक्तवाहिनी ही मेसेन्ट्रीक रक्तवाहिनीशी जोडलेली असते. पोर्ट्ल व्हेन द्वारे आतड्यांकडील रक्त यकृताकडे आणले जाते व त्यावर यकृतातील पेशी काम करतात व आवश्यक घटक साठवले जातात.
कार्ये
पचनसंस्थेतील यकृत व पित्ताशय
शरीराच्या विविध क्रिया जसे साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे, जीवनसत्त्वे, लोह, क्षार यांचा साठा करणे अशी कामे यकृत पार पाडते.
तसेच निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे.
आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे.
निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासुन बिलिरुबिन ची निर्मीती करणे.
तसेच पित्त रस तयार करून त्या व्दारे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे.
आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम यकृत करत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्टेरॉल बनवत असतं.
*********************""***************
आकार
याचा आकार नासपतीच्या फळासारखा असतो. हे यकृतास व खालच्या बाजूस लहान आतड्याला जोडलेले असते.
कार्ये
यकृतातील पित्तरसाचे पाण्याचा अंश कमी करून स्निग्धांशाच्या पचना योग्य बनवने व खालच्या बाजूस लहान आतड्याला गरजेनुसार पुरवणे.
पित्ताशयाचे आजार
पित्ताशयातील बिलिरुबिन व कॅल्शियमयुक्त खडे
पित्ताशयातील कॉलेस्टेरॉलयुक्त खडे
पित्ताशयातील खडे- पित्ताशयाच्या पिशवीसारख्या भागात पित्तरसातील पाणी कमी केले जाते, त्यावेळी काही रसायनांचे खडे तयार होतात. हे कॉलेस्टेरॉल किंवा बिलिरुबिन व कॅल्शियमचे खडे तयार होतात.
पित्ताशयाला सुज- पित्ताशयाला जंतुसंसर्गामुळे सुज येते.
पित्ताशयातील पॉलीप
उपचार

पित्ताशयात खडे झाल्यास आणि त्यामुळे पित्ताशायाच्या नलिकेत अवरोध उत्पन्न होऊन कावीळ निर्माण झाल्यास शस्त्रक्रिया करून पित्ताशय काशून टाकावे लागते. कुठलीही शस्त्रक्रिया ना करता आपोआप पित्ताशयातील खडे निघून जाऊ शकतात
**************************************
लहान आतडे
लहान आतड्याचे आद्यांत्र, मध्यांत्र व शेषांत्र
श्लेष्मपटलाच्या वर्तुळाकार घड्या
लहान आतडे (अन्य नामभेद: छोटे आतडे ; इंग्लिश: Small intestine, स्मॉल इंटेस्टाइन हा पृष्ठवंशी प्राण्यांच्या पचनसंस्थेतील एक अवयव आहे. पचनमार्गात जठरानंतर व मोठ्या आतड्याआधी येणाऱ्या या अवयवात पचनाचे व अन्नरस शोषण्याचे कार्य बह्वंशाने होते.
आकार
लहान आतड्याची लांबी सुमारे ६ मी. असते व ते पोटाच्या पोकळीत मध्यभागी वेटोळे करून असते. या पोकळ नळीचा व्यास सुरूवातीस सुमारे ५ सें.मी. असून तो कमी होत शेवटी ३.५ सें.मी. होतो.
लहान आतड्याचे भाग
लहान आतड्याचे आद्यांत्र, मध्यांत्र व शेषांत्र असे तीन भाग आहेत.
आद्यांत्र (Duodenum) या लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाची लांबी सुमारे २५ सें.मी. असते. याचा आकार रोमन लिपीतल्या सी (C) अक्षरासारखा असून ते स्वादुपिंडाभोवती असते. पित्ताशय व स्वादुपिंडातील स्राव त्यांच्या नलिकांद्वारे आद्यांत्रात सोडले जातात.
मध्यांत्र (Jejunum) या मधल्या भागाची लांबी सुमारे २.५० मी. असते.
शेषांत्र (Ilium) हा शेवटचा भाग सुमारे ३.२५ मी. लांब असतो.
संरचना
लहान आतड्याची संरचना चार स्तरांची असते. याचा सर्वांत आतला स्तर म्हणजे श्लेष्मपटल. या स्तरात पाचकरस स्रवणाऱ्या ग्रंथी आपला स्राव सोडतात. श्लेष्मपटलाच्या वर्तुळाकार घड्या असून त्यात बोटासारखे उंचवटे असतात. यानंतरच्या स्तरात पाचक स्राव निर्माण करणाऱ्या ग्रंथी तसेच अन्नघटक शोषणाऱ्या पेशी असतात. या स्तरातील पेशी दर ३-५ दिवसांनी नव्याने निर्माण होत असतात. नंतरचा स्नायुस्तर हा क्रमसंकोची स्नायूंचा असतो. या स्नायूंच्या एकामागोमाग एक होणाऱ्या पद्धतशीर आकुंचनामुळे अन्न पुढे ढकलले जाते. स्नायुस्तराच्या बाहेर संरक्षणात्मक कार्य करणारा बाह्यस्तर असतो.
लहान आतड्यात छोटे छोटे असे अनेक लसिकापेशीसमूह असतात. एकेका समूहात २०-३० लसिका ग्रंथी असतात. यांना पेअर क्षेत्रे (पेअर्स पॅचेस) असे म्हणतात. आतड्यातून होणाऱ्या जीवाणुसंसर्गाचा प्रतिकार करणे हे या ग्रंथीचे मुख्य कार्य आहे.
अन्नाचे पचन व अन्नघटकांचे शोषण हे लहान आतड्याचे मुख्य कार्य होय. या ग्रंथीत निर्माण होणारे स्राव जठराकडून आलेल्या अन्नाबरोबर मिसळतात. स्रावातील विकरांमार्फत (एंझाइमांमार्फत) वेगवेगळ्या अन्नघटकांचे त्यांच्या मूल घटकांमध्ये रूपांतर होते व या मूल घटकांचे लहान आतड्यातील पेशींमार्फत शोषण होते.
लहान आतड्यातील स्रावांमुळे प्रथिनांचे विघटन अ‍ॅमिनो आम्लांत, कर्बोदकांचे साध्या शर्करेत (ग्लुकोज) व मेद घटकांचे मेदाम्लांत रूपांतर होते. दिवसभरात साधारणपणे दीड लीटर स्राव लहान आतडे, यकृत व स्वादुपिंड यांमध्ये तयार होऊन तो लहान आतड्यात अन्नपचनासाठी सोडला जातो.
*************************************
यकृताच्या शुद्धतेसाठी
आपल्या शरीरात अन्न खातो, ते पचते त्यासाठी विविध जैवरसायनांची निर्मिती शरीर करत असते, पण धावपळीच्या आयुष्यात आपले खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल घडून आला. रोजच्या खाण्यात जंक 
फूडचे प्रमाण वाढल्याने हे अन्न पचवण्यासाठी, शरीरक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी आणि शरीरातील चयापचय ही महत्त्वाची क्रिया उत्तम प्रकारे चालण्यासाठी यकृतावर खूप जास्त ताण येतो. त्यामुळे यकृत स्वच्छ राहणे गरजेचे आहे. काही पदार्थांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश केला तर आपले यकृत नैसर्गिकपणे स्वच्छ होते. 
सफरचंद : सफरचंदात अधिक प्रमाणात पेक्टिन इतर काही रासायनिक घटकही आहेत जे यकृताला पचनसंस्थेची स्वच्छता करण्यास मदत करतात. 
कोबी : पचनमार्गातील विषद्रव्यांची स्वच्छता करण्यासाठी यकृताला आवश्यक असणारी एन्झाईम्स कोबीमध्ये असतात. त्यामुळे कोबीचा आहारातला वापर वाढवा. कोबीचे वेगवेगळे पदार्थ खा. सलाड, भाजी खा.
लसूण : लसणामध्ये अलिसिन आणि सेलेनिअम या दोन घटकांचे प्रमाण अधिक असते. हे नैसर्गिक घटक पचनसंस्था साफ करून विषद्रव्य बाहेर टाकण्यासाठी यकृताला मदत करतात.
द्राक्षे : द्राक्षामध्ये अँटिऑक्सिडंट आणि सी व्हिटॅमीन असते. त्यांचा शरीराला खूप फायदा होतो. त्यामुळे पचनसंस्थेतील कार्सिनोजेन सारखी विषद्रव्ये पचनसंस्थेच्या बाहेर टाकण्यास यकृताला मदत करतात.  
ग्रीन टी : झाडातून मिळणारे कॅटेचिन्स नावाचे अँटिऑक्सिडंट ग्रीन टी मधून मिळते. त्यामुळे शरीराच्या स्वच्छता करण्यास यकृताला ते मदत करते. 
हिरव्या पालेभाज्या : शरीरातील घाण बाहेर टाकण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणे हा सर्वात सोपा उपाय आहे. त्या नैसर्गिक क्लिन्झिंग एजंट आहेत. यात वनस्पती जन्य क्लोरोफिल नावाचा घटक शरीरातील विषारी द्रव्ये शोषून घेतो. त्यामुळे शरीर स्वच्छतेसाठी यकृताला याची मदत होते. जंतुनाशके, जड धातू आणि इतर हानिकारक रसायने यांचा परिणाम शरीरावर होण्यास हिरव्या पालेभाज्या होऊ देत नाही त्यामुळे यकृताचे कार्य योग्य प्रकारे सुरू राहण्यास मदत मिळते.
****************************************
******************************************


No comments:

Post a Comment