महाराष्ट्रातिल जिल्हे

🌺ठाणे जिल्हा 🌺

*१) लोकसंख्यावाढीचे दर = ३५.९४ %
.
*२) लोकसंख्येची घनता = ११५७ चौ. कि. मी.
.
*३) पुरुष - महिला प्रमाण = १००० : ८५८
.
*४) एकूण साक्षरता = ८६.१८ %
.
*५) पुरुष साक्षरता = ९०.९० %
.
*६) स्त्री साक्षरता = ८०.७८ %

१) बलसाड (गुजरात), दादरा आणि नगर हवेली, नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड, बृहनमुंबई, तर अरबी समुद्र आहे 
.
*२) नद्या 
बहुतांश नद्या सह्याद्रीत उगम पावून पश्चिमेकडे वाहत येतात व अरबी समुद्राला मिळतात. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणा-या नद्या = सूर्या, पिंजाल, वैतरणा, तानसा, भातसई, काळ, उल्हास. 
.
*३) तालुके
 तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडे, वाडे, पालघर, वसई, भिवंडी, ठाणे, कल्याण, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ व विक्रमगड असे एकूण १५ तालुके आहेत. अंबरनाथ व विक्रमगड हे तालुके २६ जून १९९९ रोजी अस्तित्वात आले. 
.
*४) व्यवसाय 
 शेती हा मुख्य व्यवसाय आहे. ह्या शेती व्यवसायातील भात हे प्रमुख पिक आहे. वसई परिसरात केळीचे उत्पादन तर घोलवड भागात चिकूचे उत्पादन होते.

*५) आदिम जाती - जमाती 
 अंतर्गत डोंगराळ भागात व सह्याद्रीच्या काही भागात वारली, ठाकूर, कातकरी, दुबळाव मल्हार कोळी हे आदिवासी राहतात. शेती, शिकार हे त्यांचे मुख्य व्यवसाय आहेत. 
.
*६) वाहतूक 
मुंबई - आग्रा [ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (३) ] 
.
मुंबई - दिल्ली - अहमदाबाद [ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (८) ] 

ठाणे - पुणे - बेंगलोर - चेन्नई [ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (४) ] 
.
मुंबई - वडोदरा, मुंबई - कल्याण - नाशिक, दिवा - पनवेल - रोहा [ लोहमार्ग ] 
.
*७) हवामान

उष्ण व दमट. दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते तर पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. ठाणे येथे सरासरी २४८ सेमी पाऊस पडतो
*************************************

No comments:

Post a Comment