माहिति महापुरूष विचारवंत

महापुरूष 
************-*********************
नाटककार 
============================
👧🏻🌺🌅👦🏻🌺🌅
विल्यम शेक्सपिअर

 (इंग्लिश: William Shakespeare) (२६ एप्रिल, इ.स.१५६४ (बाप्तिस्मा. जन्मदिनांक अज्ञात) - २३ एप्रिल, इ.स. १६१६) हा इंग्रजी भाषेतला प्रसिद्ध कवी, नाटककार आहे. याने लिहिलेली नाटके व काव्ये इंग्लिश साहित्यात अजरामर आहेत. शेक्सपिअरच्या शोकांतिका विशेष नावाजलेल्या आहेत.

जलद तथ्य: जन्म नाव, जन्म ...

जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपिअर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपिअर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.


जीवन

विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म इंग्लंड देशातील वॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अ‍ॅव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-अ‍ॅव्हन या गावात इ.स. १५६४ साली झाला. त्यांचे वडील जॉन हे स्ट्रॅटफोर्ड गावातील एक व्यापारी होते तर रॉबर्ट आर्डेन नामक एका जमीनदाराची कन्या मेरी ही विल्यमची आई.

वयाच्या सातव्या वर्षी विल्यम स्ट्रॅटफोर्ड गावातील शाळेत जाऊ लागला. त्या काळात लॅटिन भाषा शिकण्याला सर्वाधिक महत्त्व होते. शाळेत भाषेच्या व्याकरणाला महत्त्व जास्त. त्यामुळे विल्यमला लॅटिन, फ्रेंच आणिइटालियन भाषाशिक्षणासह चर्चमधील शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवता येऊ लागले. वयाच्या तेराव्या वर्षी वडील जॉन यांचे निधन झाल्यावर आर्थिक चणचण भासत असल्यामुळे विल्यमचे तेही शिक्षण बंद झाले. त्यांच्या गावातील वडिलांचा व्यापार सांभाळणे हे प्रमुख काम विल्यमच्या मागे लागले. जमेल तसे चर्चचे शिक्षण सुरू ठेवता आले तरी खूप, असे समाधान तो करून घेई. मोठ्या कष्टाने विल्यमने देवाची भक्तिगीते आणि चर्चमधील इतर शिक्षण पदरी पाडून घेतले.

इ.स. १५८२ साली विल्यमने स्वतःपेक्षा वयाने ८ वर्षे मोठ्या असलेल्या अ‍ॅन हॅथवे नावाच्या मुलीशी लग्न केले. इ.स. १५८५ साली त्याने आपले गाव सोडून लंडनगाठले. तेथे लॉर्ड चेंबरलेन यांच्या नाटक कंपनीत एका कलाकाराच्या जागेवर विल्यमला काम मिळाले. नाटकात काम करता करता विल्यमला व्यावहारिक ज्ञान मिळू लागले. हुशार विल्यमने मग त्यावेळी रंगमंचावर सादर होणाऱ्या नाटकांत बदल करायला सुरुवात केली, आणि नाटकाच्या सर्वच विभागांविषयी माहिती करून घेतली.

नाटकीय कारकीर्द

१५८५ पासून शेक्सपिअरची नाटय़कारकीर्द सुरू झाली असे म्हणता येते. त्याने पहिले नाटक केव्हा लिहिले याबद्दल अभ्यासकांत एकमत नाही. काही काळ नाटकात नट, लेखक अशी उमेदवारी केल्यावर १५९४ साली शेक्सपिअरने आपल्या काही मित्रांसमवेत Lord Chamberlain’s Men या नावाची एक नाटय़संस्था निर्माण केली. या संस्थोतर्फेच त्याची नाटके प्रथम रंगमंचावर आली. लवकरच तो अतिशय लोकप्रिय नाटककार म्हणून ओळखला जाऊ लागला. या काळात तो अधूनमधून नाटकात भूमिकाही करीत असे. नाटकाने त्याला केवळ कीर्ती व लोकप्रियताच मिळवून दिली असे नव्हे, तर भरपूर पैसाही मिळवून दिला. त्याने एकंदरीत अडतीस नाटके लिहिली. याशिवाय १५४ सुनीते, दोन दीर्घ कविता आणि काही स्फुट कविता अशी त्याची साहित्यसंपदा आहे.

त्याकाळी नाटकांची छापील आवृत्ती राजरोसपणे बाजारात मिळत नसे. मग अनेकांनी या नाटकांच्या प्रती तयार करण्याचा सपाटा लावला. पण नुसत्या स्मरणाच्या जोरावर तयार झालेल्या अशा नाटकांच्या आवृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दोष राहू लागले. मागणी असल्याचे लक्षात येताच स्वतः विल्यमनेच एक कंपनी स्थापून त्याच्या नाटकांच्या अस्सल प्रती बाजारात विकायला सुरुवात केली.

🌺👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
********************************
==============================
👧🏻पं नेहरू👦🏻         भारताचे १ ले पंतप्रधान
कार्यकाळ
ऑगस्ट १५, इ.स. १९४७ – मे २७, इ.स. १९६४
राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद व सर्वपल्ली राधाकृष्णन
मागील पद स्थापित
पुढील गुलजारी लाल नंदा
१ ले भारतीय परराष्ट्रमंत्री
कार्यकाळ
ऑगस्ट १५, इ.स. १९४७ – मे २७, इ.स. १९६४
मागील पद स्थापित
पुढील गुलजारी लाल नंदा
भारतीय अर्थमंत्री
कार्यकाळ
ऑक्टोबर ८, इ.स. १९५८ – नोव्हेंबर १७, इ.स. १९५९
मागील टी.टी. कृष्णमचारी
पुढील मोरारजी देसाई
जन्म नोव्हेंबर १४, इ.स. १८८९
अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत
मृत्यू मे २७, इ.स. १९६४
नवी दिल्ली, भारत
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी कमला नेहरू
अपत्ये इंदिरा गांधी
व्यवसाय बॅरिस्टर

जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावाने ओळखले जात.
******************************
👦🏻डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन👧🏻

२ रे भारतीय राष्ट्रपती
कार्यकाळ
मे १३, इ.स. १९६२ – मे १३, इ.स. १९६७[१]
मागील राजेंद्र प्रसाद
पुढील झाकीर हुसेन
भारतीय उपराष्ट्रपती
कार्यकाळ
१९५२ – १९६२
जन्म सप्टेंबर ५, इ.स. १८८८
तिरुत्तनी, तमिळनाडू तील एक छोटे गाव, दक्षिण भारत
मृत्यू एप्रिल १७, इ.स. १९७५
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी सिवाकामुअम्मा
अपत्ये पाच मुली व एक पुत्र, सर्वपल्ली गोपाल
व्यवसाय राजनितीज्ञ, तत्त्वज्ञ, प्राध्यापक
धर्म वेदान्त (हिंदू)

सर्वपल्ली राधाकृष्णन' हे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ हाते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन (सप्टेंबर ५, इ.स. १८८८:तिरुत्तनी, तमिळनाडू - १७ एप्रिल १९७५) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृषणन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.
*********************************
👦🏻सरदार वल्लभभाई पटेल👧🏻
पूर्ण नाव वल्लभभाई पटेल
जीवनकाल ऑक्टोबर ३१, १८७५(करमसद, खेडा जिल्हा, गुजरात)
ते
डिसेंबर १५, १९५०()
आई-वडील [लाडबा व झवेरभाई]
पत्‍नी [झवेरबा]
शिक्षण बॅरिस्टर
कार्यक्षेत्र राजकारण
गौरव 'भारताचे लोहपुरूष', 'सरदार' या दोन पदव्या
सरदार वल्लभभाई पटेल (३१ ओक्टोबर १८७५ - १५ डिसेम्बर १९५०) भारताचे एक राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना सरदार ह्या पदवीने संबोधित केले जाई.

वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.


वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली. म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते.
*********************************
👦🏻लालबहादूर शास्त्री👧🏻
2 रे भारतीय पंतप्रधान
कार्यकाळ
जुन ९, इ.स. १९६४ – जानेवारी ११, इ.स. १९६६
राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन
मागील गुलजारी लाल नंदा
पुढील गुलजारी लाल नंदा
३ रे भारतीय परराष्ट्रमंत्री
कार्यकाळ
जुन ९, इ.स. १९६४ – जुलै १७, इ.स. १९६४
मागील गुलजारी लाल नंदा
पुढील सरदार स्वर्णसिंग
जन्म ऑक्टोबर २, इ.स. १९०४
मुगलसराई, भारत
मृत्यू जानेवारी ११, इ.स. १९६६
ताश्केंत
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी ललिता देवी
धर्म हिंदू

लालबहादूर शास्त्री (रोमन लिपी: Lal Bahadur Shastri) (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा हृदयविकाराचे दोन झटके येऊन मृत्यू झाला.
*********************************

No comments:

Post a Comment