अर्थशास्त्र

अर्थशास्त्र 
**********************************
👧🏻अर्थशास्त्र👦🏻

अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'एकॉनॉमिक्स'(Economics) म्हणतात. अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात ॲडम स्मिथ यांच्या इ.स. १७७६ मधील वेल्थ ऑफ नेशन्स पासून झाली. अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषानुसार पाडले गेले आहेत. उदा. समग्रलक्षी (Macro) व अल्पलक्षी (Micro). समग्रलक्षी अर्थशास्त्र मोठ्या आर्थिक प्रश्न, देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे आर्थिक व्यवहार प्रश्न इत्यादींबाबत चर्चा करते तर अल्पलक्षी अर्थशास्त्र एखादा माणुस, कुटुंब किंवा एखादी आर्थिक संस्था इत्यादींचे व्यवहार प्रश्नांबाबत माहिती देते.

👦🏻अर्थव्यवस्था👧🏻

अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.

👦🏻चलनवाढ👧🏻

महागाई मोजणाचं परिमाण म्हणजे चलनवाढ आहे. एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय. चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात, मात्र चलनाची क्रयशक्ती कमी होत असते. चलनवाढीमुळे रोजगारनिर्मितीची क्षमता वाढते.

👦🏻वार्षिक दरडोई उत्पन्न👧🏻

वार्षिक दरडोई उत्पन्न प्रति व्यक्ती उत्पन्न दरडोई अत्पन्न सकल वार्षीक उत्पन्नास संबधीत लोकसंख्येने भाग दिल्या नंतर उपलब्ध होते.

👦🏻दारिद्र्यरेषा👧🏻

एखाद्या विशिष्ट प्रदेशात (सहसा देशभरात) पुरेश्या राहणीमानाने राहण्यासाठी लागणारे कमीतकमी दैनिक उत्पन्न म्हणजे दारिद्र्यरेषा आहे.या उत्पनापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्ति अथवा कुटुंब हे दारिद्र्यरेषेखाली तर या पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्ति अथवा कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर समजण्यात येतात.

सहसा अविकसित व विकसनशील देशांपेक्षा विकसित देशात हे उत्पन्न खूप जास्त असते

👧🏻जागतिक व्यापार संघटना👦🏻

स्थापना १ जानेवारी १९९५
मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड
सदस्यता १५९ सदस्य राष्ट्रे
अधिकृत भाषा इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश
वेबसाईट wto.org
जागतिक व्यापार संघटना ही एक आंतरराष्ट्रीय संघटना जगामधील देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेखीचे काम करते. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे, तंट्यांचे निवारण करणे इत्यादी डब्ल्यू.टी.ओ.ची प्रमुख कामे आहेत. भारतासह जगातील १५९ देश ह्या संघटनेचे सदस्य तर २५ देशांनी सदस्यत्व मिळवण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. आजच्या घडीला १४ देश डब्ल्यू.टी.ओ.चे सदस्य किंवा निरिक्षक नाहीत.

👦🏻आर्थिक विकासदर👧🏻

आर्थिक विकासदर म्हणजे एखाद्या अर्थव्यवस्थेमधील सेवांच्या आणि उत्पादित मालाच्या मूल्याच्या वाढीचा दर होय. आर्थिक विकासदर साधारणपणे त्या अर्थव्यवस्थेच्या वार्षिक सकल उत्पन्नामधील वाढीच्या टक्केवारीच्या दरात मोजतात. हा दर चलनवाढीच्या दराला अनुरूप करून घेतात. अर्थात, सेवा व मालाच्या मूल्यामधून चलनवाढीचा परिणाम बाजूला काढून हा दर मोजतात. आर्थिक विकासदर हा सर्वसाधारणपणे एखाद्या देशामधील सरासरी राहणीमानामधील होणाऱ्या सुधारणेचा दर्शक आहे.
येथील जागतिक बँकेच्या मुख्यालयाची इमारत.

👦🏻जागतिक बँक👧🏻

( World Bank, वर्ल्ड बँक) ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. हीची स्थापना डिसेंबर २७, इ.स. १९४4 मध्ये झाली. ब्रेटन वुडस् पद्धती / समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देश व विकसनशील देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.

गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.

👦🏻जागतिक बँकेची उद्दिष्टे👧🏻

सरकारांचे सबलीकरण व सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
अर्थव्यवस्थांचा विकास
भ्रष्टाचार निर्मूलन
गरीबी हटाव
संशोधन व शिक्षण

👦🏻अविकसीत देश👧🏻

अविकसित देश म्हणजे असे देश ज्या देशाचा आर्थिक विकास नसल्याने सामान्य जनतेला पायाभूत सुविधा, जसे, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, सांडपाण्याच्या सुविधा आदी न पुरवू शकलेले देश. जसे आफ्रिका खंडातला सोमालिया व आयव्हरी कोस्ट हे देश.

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**********************************

No comments:

Post a Comment