विशेष महाराष्ट्र

जय महाराष्ट्र 
***********
*********** 
▪ " महाराष्ट्रा "बाबत माहिती▪
🌺🌅👧🏻🌺🌅👦🏻🌺

👉 स्थापना-01 मे 1960
👉 राज्यभाषा - मराठी
👉 एकूण तालुके-353
👉 पंचायत समित्या 351
👉 एकूण जिल्हा परिषद-33
👉 आमदार विधानसभा 288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा-720 किमी
👉 नगरपालिका- 230
👉 महानगरपालिका-26
👉 शहरी भाग - 45%
👉 ग्रामीण भाग 55%
👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
👉 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
👉 पहिला संपूर्ण संगणीकृत     जिल्हा -नांदेड 

🌺🌅👦🏻🌅🌺👧🏻🌺
******************************
==========================
औरंगाबाद चा दौलताबाद किल्ला 
**********************************

👧🏻दौलताबाद किल्ला👦🏻
(दौलताबाद, जि. औरंगाबाद)
दौलताबाद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव असून येथेच हा एक किल्ला आहे. १२९६ मध्ये अल्ला‍उद्दिन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने प्रथम दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दिनाच्या कार्याची पूर्ती केली आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली..
🗞-इतिहास-🗞
🔸देवगिरी हा एक अपूर्व दुर्ग आहे.एखादा डोंगर पोखरून एक बेलाग दुर्ग आपल्या मध्ययुगीन शिल्पज्ञानी निर्मिलेला आहे.यादवांची हि एकेकाळची राजधानी खलजी सुलतानांच्या ताब्यात गेली.पुढे १४ व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीच्या मुहमद्द तुघलकाने तर दिल्लीची राजधानी हलवून ती देवगिरीला आणली.तोपर्यंत या देवदुर्गाचे नामकरण दौलताबाद करण्यात आले होते.पुढे निजामशाहीची राजधानी म्हणून देवगिरी प्रसिद्ध होताच. शिवप्रभूंच्या मातोश्री जिजाबाई यांच्या वडील आणि तीन भावांचे खूनही याच दुर्गात झाले.
🔸सभासदाच्या बखरीत शिवप्रभूंच्या मुखी 'पृथ्वीवर दौलताबाद चखोट खरा ..!' असे शब्द आहेत.
देवगिरीचे सारेच न्यारे आहे.दुर्गाचा खंदक हा डोंगराचा उतरता भाग पोखरून काढून केला आहे.तशीच ती अंधारी ! राष्ट्रकुट सत्ताधीशांनी दुर्गावर जाण्यासाठी कातळ पोखरून गोलाकार अंधारी वाट केली आहे. त्या वाटेशिवाय दुर्गावर जाताच येत नाही. त्या गडद अंधाराच्या वाटेने जात असताना चुकून प्रकाश दिसतो; पण त्या प्रकाशाची वाट आपल्याला खंदकात भिरकावून देते.पूर्वी त्या अजस्त्र खंदकात मगरी सोडलेल्या असत.१७५६-५७ मध्ये या दुर्गाचा ताबा मराठ्यांकडे आला होता.
🔸देवगिरी हा मिश्रदुर्ग आहे.म्हणजे दुर्ग जमिनीवरही आहे आणि डोंगरावरही आहे. नुसताच गिरिदुर्ग किंवा फक्त स्थलदुर्ग नव्हे. दुर्गाच्या दोन बाजूला तिहेरी तटबंदी आहे. अंबरकोट,महाकोट आणि कालाकोट अशी त्यांची नावे आहेत. अंबरकोट हे नाव कदाचित निजामशाहीचा वजीर मलिक सर्कमलिक अंबर याच्या नावावरून पडले असावे. तटबंदीत चीनलेले देवालयांचे दगड जागोजाग दिसतात.खंदक,बुरुज,तट,झरोके यांची रेलचेल आहे.मात्र,देवगिरीचे सर्वात अदभुत म्हणजे खंदक आणि अंधारी.काळ्या फत्तराचा ६०-७० मीटर उंचीचा दगड कोरून काढला आहे.खांदकाची रुंदीही चांगली १५-२० मीटर आहे.खंदकावरचा कडा छीन्नी लावून गुळगुळीत केला आहे. सुरुंग लावला असेल का,हा प्रश्न आहेच;पण अंधारीत तर फक्त छीन्नीच्याच खुणा दिसतात..
अंधारीच्या वाटेचे प्रवेशद्वार एखाद्या लेणीच्या द्वारासारखेच आहे.त्यावरील कलाकुसर राष्ट्रकुटाच्या लेणीशी साधर्म्य दर्शवते.आत गडद अंधार आहे.मशाली,पलिते घेतल्याखेरीज आतले काहीच दिसत नाही.
🔸कसे केले असेल हे काम ? मार्ग वळणाचा आहे. ठोकळमनाने त्याचे तीन भाग पडतात.पहिले भुयार २५ मीटर लांब आणि १० मीटर रुंद आहे.दुसरे १० मीटर लांब आणि तेवढेच रुंद आहे.तिसर्या भागाला मोठी अंधारी म्हणतात.त्यातून ३० मीटरचा कडेलोटहि आहे.मोठ्या अंधारीत जागोजाग १०० खोदीव पाय-या आहेत.त्यापुढे लोखंडी तवा पेटवण्याची जागा आहे.हे सारे अपूर्व आहे.देवगिरी डोंगरातून सुमारे ८० लाख टन दगड काढून टाकून दुर्ग बळीवंत करण्यात आला आहे..
🌺👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
==============================
औरंगाबाद - खुलताबाद 
हनुमान मंदिर / इतर माहिति 
*********************************

👦🏻🌺🌅👧🏻🌅🌺.
🕌भद्रा मारूती हनुमान मंदिरे
खुलदाबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारूती संस्थान ह्यासाठी देखील विशेष परिचित आहे.[१]भद्रा मारूती ह्या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे असून दुसरे खुलताबाद आहे व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे. खुलताबाद येथे दरवर्षी हनुमान जयंती निमित्त भव्य यात्रा भरते. त्या दिवशी खुलताबाद येथे हजारो लोक औरंगाबाद व आसपासच्या गावातून पायी चालत येतात.
 इतिहासविषयक लेख➖
⛩सुफी संत
फार पूर्वी ह्या गावाचे नाव रौझा असेही होते; त्याचा अर्थ स्वर्गातील नंदनवन असा होतो.[ संदर्भ हवा ]. तसेच ह्या गावास संतांची दरी/भूमी किंवा शाश्वत निवासस्थान असेही संबोधले जायचे. ह्याचे कारण १४ व्या शतकात अनेक सुफी संत ह्या ठिकाणी वास्तव्यास होते व तदनंतर त्यांच्या मृत्युपश्चात त्यांचे खुलदाबाद येथेच दफन करण्यात आले.

👉खुलताबाद येथील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू
🕍मुघल सम्राट औरंगजेब ची कबर

🔸खुलताबादमध्ये दफन करण्या आलेले सुफी संत आणि 
🔸मोगल राजे
मोगल सम्राट औरंगजेबची कबर
🔸आझम शाह आणि त्याच्या पत्‍नीची कबर
🔸झैन उद दिनचा दर्गा
🔸बुरहान उद दिनची मशीद
🔸निझाम-उल-मुल्क असफ जाहची कबर
🔸बानू बेगमचा मकबरा
🔸खान जहानची लाल बाग
🔸मलिक अंबरची कबर
🔸झर झरी झर बक्ष आणि
 🔸गंज रवन गंज बक्ष दर्गे
 तसे. 

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
********************************
=============================

No comments:

Post a Comment