व्यायाम

व्यायाम 
🌺व्यायाम🌺

शारिरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम.

नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्यायामाने मानसिक आरोग्यही छान राहते.

नियमित व्यायामामध्ये ताणण्याचे व्यायाम, एरोबिक्स व श्वासाचे व्यायाम यांचा समावेश असावा.

🌺व्यायामाचे प्रकार🌺

१. ताणण्याचे व्यायाम
उदा. योगासने, सूर्यनमस्कार २. एरोबिक्स (रक्ताभिसरणाचे) व्यायाम
उदा. चालणे, धावणे, जॉगिंग, नृत्य, पोहोणे, सायकल चालविणे ३. श्वासाचे व्यायाम
उदा. प्राणायाम ४. शक्तिचे व्यायाम
उदा. वजन उचलणे व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.यामुळे माणूस आनंदी राहायला मदत होते. व्यायाम आपली मानसिक शक्ती तसेच शारीरिक शक्ती वाढते. लहान मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा हि सध्याची गंभीर जागतिक समस्या आहे आणि व्यायामामुळे हि कमी होण्यास मदत झाली आहे.
व्यायामाचे फायदे


वजन नियंत्रित राहण्यास मदत फिटनेस मध्ये वाढ नैराश्याचे प्रमाण कमी
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
🌺 आरोग्य🌺
शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे", अशी आरोग्याची व्याख्या आहे[ संदर्भ हवा ].
                  N•R•Sable           🌺योगासन🌺

शरीर, शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन
                        N•R•Sable     🌺रक्तवहसंस्था🌺
(रक्ताभिसरण या पानावरून पुनर्निर्देशित)
रक्तवहसंस्थेमध्ये हृदय, रक्त, रक्तवाहिन्या यांचा समावेश होतो. रोहिनी रक्तवाहिन्या शुद्ध रक्तवहन करते(अपवाद- फुफ्फुसीय रोहिनी- ही हृदयाकडून फुप्फुसाकडे अशुद्ध रक्त वाहून नेते.) त्या लाल रंगाने दर्शविल्या जातात. नीला रक्तवाहिन्या अशुद्ध रक्तवहन करते(अपवाद-Pulmonary vein- ही फुफ्फुसाकडुन हृदयाकडे शुद्ध रक्त वाहून नेते.) त्या निळ्या रंगाने दर्शविल्या जातात.
                    N•R•Sable         🌺प्राणायाम🌺
प्राण या वैश्विक चैतन्यशक्तीचे नियमन. प्राणायाम ही अष्टांगयोगातील चौथी पायरी आहे.

प्राणाचे विविध अवयवांतील प्रमाण असंतुलित झाल्याने शरिरात रोग उत्पन्न होतात. प्राणायामामुळे प्राण शक्ती संतुलित होऊन रोगांचा नाश होतो.

श्वासोच्छवासाच्या नियमनाने प्राणायाम साधता येतो.
                 N•R•Sable           🌺नियमित व्यायामाचे महत्त्व🌺

कोण किती व्यायाम करतो ह्यापेक्षा किती नियमित पणे करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वत:च्या लग्नाच्या दिवशी व्यायामाचे वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळून हॉलवर जायला थोडा उशीर करणारे एक गृहस्थ बघण्यात आहेत. जास्त व्यायाम करून शरीर पीळदार दिसते खरे, पण अशा पीळदार शरीरयष्टी वाल्यांची रोगप्रतिकार शक्ती तोळामासाच असते, त्यांची बौध्दिक क्षमता बेताची असते, लहानशा अपघातने हाड मोडल्याची उदाहरणे आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतात.


शास्त्रीय दृष्टिकोनातून ह्याचे कारण म्हणजे जास्त व्यायामामुळे आहारापासून मिळणारे सर्व पोषक घटक फक्त मांस धातूच्या पोषणासाठी वापरले जातात, परिणामी शरीरातील इतर यंत्रणा कमजोर राहते. थोडा पण नियमित व्यायाम करणारे दिसायला भले पीळदार दिसणार नाहीत, पण अशा पहेलवानां पेक्षा नक्कीच सर्व बाबतीत वरचढ असतात.
                N•R•Sable           🌺बुध्दीचा व्यायाम🌺



नियमित व्यायाम करण्यामुळे शरीराचे स्नायू सुदृढ आणि बलवान होतात तसेच बुध्दीच्या बाबतीत पण समजले पाहिजे. शारीरिक व्यायाम करतेवेळी विशिष्ट अवयवाची हालचाल ठराविक प्रकारे अनेक वेळा केली जाते त्यामुळे ते ते स्नायू बळकट होतात. बुध्दीच्या योग्य विकासासाठी हाच नियम पाळला पाहिजे. समजलेला विषय पुन्हा पुन्हा वाचावा म्हणजे कधीही न विसरण्या इतका पक्का होतो. अभ्यास शब्दाचा खरा अर्थ आहे ‘तीच तीच गोष्ट वारंवार करणे’. सतत काही काळ एका मंद ज्योतीकडे पापण्या न हलवता एकाग्रतेने बघण्याची सवय (त्राटक) करण्याने एकाग्रता (कॉन्सेंट्रेशन) वाढते, चित्त आणि दृष्टी पण सुधारते.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
🌺व्यायामाचे महत्व🌺

आरोग्य म्हणजे नुसता रोगांचा अभाव नाही तर आजूबाजूच्या परिस्थितीनुसार शरीर व मन कार्यक्षम असणे, आनंदी व उत्साही असणे. उत्साही मन आणि जोमदार शरीर या गोष्टींचा समावेश 'आरोग्य' या शब्दात अभिप्रेत आहे. "शरीर सुखी तर मन सुखी" या तत्वानुसार कोणतेही बौद्धिक काम यशस्वीरीत्या करण्यासाठी मनाची प्रसन्नता, सुदृढ - निरोगी शरीर आवश्यक आहे. शारीरिक क्षमता टिकवण्यासाठी मनोबल आवश्यक आहे. दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत.
Health is Wealth असे नेहमी म्हणतात. पण Health is more than wealth, because wealth can change hands, health cannot.  म्हणून शरीररूपी संपत्ती राखण्यासाठी नियमित व्यायामाची नितांत गरज आहे. शरीराचे आरोग्य राखण्यासाठी नियमांनुसार सर्व अवयवांची शास्त्रशुद्ध हालचाल करण्याच्या क्रियेला 'व्यायाम' म्हणतात.व्यायामामुळे अवयवांची ताकद वाढते. विशिष्ट प्रकारच्या व्यायामामुळे अवयवांच्या प्रमाणबद्धतेला म्हणजेच सौष्ठवाला मदत होते. सुडौल बांधा म्हणजे सौष्ठव. 

व्यायाम हि सुखी, निरोगी दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर- मनाचा निभाव लागावा, संकटांशी सामना करण्यासाठी शक्ती -जिद्द प्राप्त व्हावी यासाठी व्यायामाचा मंत्र जपायला हवा. अगदी रानटी अवस्थेपासून ते आजच्या आधुनिक जगात माणूस आधी स्वसंरक्षणाचा विचार करतो. त्यासाठी शारीरिक ताकद हवी. उत्तम आरोग्य लाभलेल्या माणसापासून सर्व संकटे दूर पळतात. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात - "शक्तीने पावती सुखे ... शक्ती नसता विटंबना... शक्तीने नेटका प्राणी ... वैभव भोगता दिसे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
रोज व्यायाम करणे आवश्यक असते. पण ते शक्य न झाल्यास आठवडय़ातून चार वेळा तरी व्यायाम करावा. तेही शक्य न झाल्यास लिफ्ट न वापरता जिने चढणे, एक स्टॉप आधी उतरून चालणे हे उपाय अवलंबावेत

पोहणे
पोहणे हा संपूर्ण शरीरासाठी एरोबिक व्यायाम आहे. पाण्याच्या उत्प्लावकतेमुळे (Buoancy) ताण आणि इजा होण्याचा संभव कमी होतो. ज्या व्यक्ती संधिवाताच्या दुखण्यामुळे व्यायाम करू शकत नाहीत, अशा व्यक्तींना पोहणे किंवा पाण्यातील व्यायाम फायदेशीर ठरू शकतात.
पोहण्यामुळे संपूर्ण शरीराला व्यायाम घडतो. पोहण्याच्या व्यायामामुळे पाठीचे स्नायू, वक्षीय स्नायू, हात आणि पायांच्या स्नायूंना व्यायाम घडतो.
पाण्यातील व्यायाम हे जमिनीवरील व्यायामापेक्षा कमी कष्टप्रद आहेत. गुरुत्वाकर्षण शक्ती पाण्यात तरंगण्यामुळे कमी होते. त्यामुळे स्नायू-सांधे यांच्यावरील ताण कमी पडतो. पाण्यातील व्यायाम कुठल्याही वयोगटातील व्यक्ती सहजगत्या करू शकतात.
पाण्यात व्यायामासाठी अधिक शक्ती लागत असली तरी पाण्यात हालचाली जास्त सुकर होतात आणि व्यायामासाठी फारसे कष्ट करावे लागत नाहीत. पाण्यातील व्यायामाने शरीराला अधिक फायदे मिळतात. पाण्यातील व्यायामाने शरीराचे तापमान न वाढता अधिक वेळ व्यायाम करता येतो
                        N•R•Sable                   🌺क्रॉस ट्रेनिंग🌺                 
क्रॉस ट्रेिनग म्हणजे तुम्ही करत असलेल्या व्यायामाबरोबर आणखी एखादा जोड व्यायाम करणे. एकदा तुम्ही करत असलेल्या व्यायामास शरीराने जुळवून घेतले, अनुकूल झाले की त्यानंतर तो व्यायाम करायाला शरीराला पुढे फारसे श्रम करावे लागत नाहीत. त्यामुळे त्याबरोबर जोड व्यायाम करणे महत्त्वाचे असते.
चालणाऱ्यांनी वजने उचलण्याचा व्यायाम करणे सयुक्तिक ठरेल. जलद धावणाऱ्यांनी पाण्यातील पोहण्याचे व्यायाम केल्यास अधिक फायदे होतात. थोडक्यात व्यायाम पद्धती, तीव्रता आणि स्नायू गटांचा वापर यात बदल म्हणजे क्रॉस ट्रेनिंग.
वजन घेऊन जलद गतीने चालणे हे सल्लावह नाही. वजन कमी करण्यासाठी काही व्यक्ती असे करताना दिसतात. पण वजन कमी करण्यासाठी अंतर वाढविणे, वेग आणि व्यायामाची वेळ वाढवणे हितावह आहे.
काही व्यक्ती चालताना हाताला वजने किंवा पायाला वजने बांधतात. हा प्रकार शास्त्रीय नाही. यामुळे शारीरिक संतुलन बिघडून, स्नायूंना किंवा सांध्यांना दुखापत होऊ शकते. त्यांवर ताण येऊ शकतो. याकरिता योग्य पद्धत म्हणजे पाठीवर काही वजन घेऊन चालणे किंवा वजनदार बेल्ट वापरणे. यामुळे कमरेच्या स्नायूंनी हे वजन पेलले जाईल. त्या वजनाचे सम प्रमाणात वितरण होईल आणि दुखापत होण्याची संभावना कमी होईल.
ट्रेडमिलवर चालणे
सकाळी उठून बाहेर फिरायला जाणे खूप लोकांना कंटाळवाणे वाटते. त्याऐवजी घरीच ट्रेडमिलवर चालण्याचा व्यायाम करणे त्यांना योग्य वाटते.
ट्रेडमिलच्या नवनवीन मशिन्स सध्या उपलब्ध आहेत. त्यात चालण्याची गती, वेळ, हृदयाची गती आणि किती ऊर्जा ज्वलन झाले (कॅलरीज बर्निग) याची माहिती मिळते.
ट्रेड मिलवर चालण्याचे अनेक फायदे आहेत.
१. तुम्हाला बाहेरच्या हवामानाचा त्रास होत नाही. पावसाळा असो, उन्हाळा की हिवाळा. प्रत्येक ॠतूमध्ये चालण्याचा व्यायाम अखंडपणे करू शकतो.
                          N•R•Sable                         . बाहेरच्या रहदारीचा त्रास, मध्येच थांबून मित्रमंडळींशी संवाद साधण्याने व्यायामात आलेला व्यत्यय टाळता यतो.
३. फावल्या वेळात चालता येतं.
४. चालताना एक गती ठेवता येते. बाहेर चालताना गतीवर नियंत्रण राहात नाही. पण ट्रेडमिलवर चालताना गती नियंत्रण शक्य आहे. बाहेरील प्रलोभनांपासून मुक्त होऊन आपण एकाग्र चित्ताने व्यायाम करू शकतो. सोबत संगीत वगैरेचा आनंददेखील घेता येत असल्यामुळे व्यायामाचा कंटाळा पण येत नाही.
चालण्यास आरंभ करणाऱ्यांनी सुरुवातीला सावकाशच चालावे. मग हळूहळू चालण्याचा वेग, वेळ आणि अंतर वाढवावे. चालताना तुमची गतीची निवड तुम्हीच करायची. इतरांना जे झेपते ते तुम्हाला झेपेलच असे नाही.
चालताना एक सर्वसाधारण नियम असा आहे की, तुमचा श्वासोच्छ्वास जोरात व्हावा पण धाप लागू नये. चालताना बोलण्याची वेळ पडल्यास व्यवस्थित बोलता येईल इतपतच गती असावी.
एकदा का चालण्याची छान सवय झाली की मग जलद किंवा गतिमान चालणे, धावणे सुरू करावे. अशा पद्धतीने आपल्या हृदयाला आणि रक्ताभिसरण संस्थेला चांगला व्यायाम मिळतो. शक्तीयुक्त चालण्याने अधिक ऊर्जेचे ज्वलन होते. शरीर सुडौल होते. स्नायू भरीव दिसतात. आणि एक वेगळाच आत्मविश्वास शरीरात येतो.
काही महत्त्वाचे मुद्दे
व्यायाम सावकाश करावेत.
व्यायामाला सावकाश सुरुवात करा – सुरुवातीला फारच दमछाक होईल अशा प्रकारे व्यायाम करू नका. व्यायामाची सुरुवात तुम्ही जलद चालण्याने करू शकता. व्यायाम नेहमी जलद पण सुखकारक गतीमध्ये करावा.
घाम गाळण्याची कल्पित कथा – व्यायाम करताना घाम गाळणे म्हणजे सर्व काही नाही. दमट हवामानात शरीराला कमी व्यायाम करून सुद्धा जास्त घाम येतो. त्यामुळे घाम हे व्यायामाचे परिमापक नसावे. मुख्यत्वे नाडीची गती हाच व्यायामाचा निष्कर्ष आणि माप असावे.

व्यक्तिगत मर्यादांची जाणीव ठेवा
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
🌺व्यायाम कसा कराल?🌺

माणूस लठ्ठ असो, मध्यम असो वा बारीक; तंदुरुस्तीसाठी प्रत्येकाला व्यायाम आवश्‍यक असतो. तरीही व्यायाम होत नाही आणि प्रकृतीच्या कुरबुरी सुरू होतात. व्यायाम आवश्‍यक आहे, तो करायचा आहे हे प्रत्येकाला पटते, पण कोणता, कसा, किती, कुठे असे प्रश्‍न उभे राहतात, त्याची उत्तरे. 

तीस वर्षांचा दीपक एका आयटी कंपनीत सात वर्षांपासून कामाला आहे. त्याला चालताना धाप लागते आणि रक्तातील साखरही वाढलेली आहे. डॉक्‍टरांनी त्याला व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. पण व्यायाम कसा करावा, कोणता करावा आणि किती करावा याबाबत त्याला काही कळत नव्हते. त्यामुळे व्यायामाला सुरवातच होत नव्हती. दीपकप्रमाणे आपल्यापैकी अनेकांना असे प्रश्‍न पडत असतील. अनेकजण या प्रश्‍नांना वेगवेगळे पर्याय सुचवत असतील. चालणे, पोहणे, पळणे, जिमला जाणे असे एक ना दोन सल्ले मिळत असतील. पण घरच्याघरीच आणि कमीत कमी उपकरणांद्वारे जर आपण आरोग्यवर्धक आणि उत्साहवर्धक व्यायाम करू शकलो तर...? 

व्यायाम कोणी करावा? 
व्यायामाला वयाची अट नाही. लहान मुलांपासून वयाची शंभरी गाठलेले आजोबासुद्धा व्यायाम करू शकतात. काही प्रसंग वगळता कोणीही व्यायाम करायला हरकत नाही. 
- आजारी असताना किंवा शरीरात ताप असताना. 
- गर्भवती महिलांनी शेवटच्या महिन्यात. 
- खूप प्रवास झाल्यानंतर. 
- हृदयरोग, मधुमेह किंवा रक्तदाब (ब्लडप्रेशर) असल्यास वैद्यकीय सल्ल्याने व्यायाम करावा. 
- मासिक पाळीमध्ये महिलांनी हलका व्यायाम करावा.
                         N•R•Sable         🌺व्यायाम कोणता करावा?🌺
- तज्ज्ञांच्या मते व्यायाम नेहमी वयानुसार करावा. याचा अर्थ- लहान मुले जेव्हा खेळतात तेव्हा त्यांचा आपोआप व्यायाम होत असतो. वेगळा व्यायाम करण्याची त्यांना गरज नसते. 
- वाढत्या वयाच्या मुलांनी (15 - 17 वर्षे) पोहणे, बास्केटबॉल, फुटबॉल असे खेळ खेळावेत. ज्यामुळे त्यांची हाडे बळकट होतात आणि उंचीही वाढते. 
- स्नायूंची ताकद वाढविणाऱ्या व्यायामाकडे तरुणांनी जास्त लक्ष द्यावे. त्यासाठी जिममध्ये जाण्याचीही गरज नाही. चालणे, पोहणे, सायकलिंग, ट्रेक, धावणे इत्यादी प्रकारांचा आपल्या व्यायामामध्ये त्यांनी समावेश करावा. 
- तीस ते पन्नास वयापर्यंत जॉगिंग, योग, चालण्याचा व्यायाम करावा. 
- पन्नाशीनंतर- चालणे किंवा जर आधीपासून व्यायामाची सवय असेल तर जॉगिंग किंवा ट्रेकही करू शकता. 
- साठ ते ऐंशी- चालणे किंवा कवायतीसारखे व्यायामप्रकार. 

🌺व्यायाम किती करावा? 🌺
- प्रथमच व्यायाम सुरू करणार असाल तर 10 ते 15 मिनिटांपासून सुरवात करावी. दर आठवड्याला 10 मिनिटे करत हळूहळू 1 तासापर्यंत वेळ वाढवत न्यावी. 
- व्यायामामध्ये पहिली 5 मिनिटे वॉर्म अप, नंतरची 5 मिनिटे स्ट्रेचिंग केल्यानंतरच व्यायाम सुरू करावा. 
- तरुणांनी दोन तास व्यायाम केला तरी चालू शकतो. स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू 3-4 तास व्यायाम करतात. 
- आपल्या वयाला आणि प्रकृतीला जमेल इतकाच व्यायाम करावा. 
- साधारणपणे उत्तम प्रकृती टिकविण्यासाठी आठवड्यात चार तास व्यायाम होणे अपेक्षित आहे. 
व्यायाम कुठे करावा? 

याबाबतीत लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, व्यायाम करण्याची जागा हवेशीर असावी. असे ठिकाण मैदान, बगीचा किंवा घरातही सापडू शकते. सिमेंट किंवा टार रोडवर चालण्याचा व्यायाम शक्‍यतो कोणी करू नये. व्यायामाची जागा ऐसपैस असावी आणि पुढचा किमान एक तास तुमच्या व्यायामात व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्यावी.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
🌺 व्यायाम  कसा करावा? 🌺                                       
व्यायाम कसा करावा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्‍न आहे. यामध्ये व्यायामाची गती किंवा वेग अभिप्रेत आहे. साधारणपणे सुरवात करताना व्यायाम मंदगतीने करावा आणि 10 ते 15 मिनिटांनंतर वेग वाढवावा. यापेक्षाही हार्ट रेट (हृदयाचे ठोके) मोजूनसुद्धा तुम्ही व्यायामाची गती ठरवू शकता. यासाठी तुम्हाला हृदयाचे ठोके मोजता यायला हवेत. आपल्या उजव्या हाताची बोटे डाव्या अंगठ्याखाली ठेवा.. इथे तुम्हाला ठोके जाणवतील, ते एक मिनिटांपर्यंत मोजा. साधारणपणे दर मिनिटाला 70 ते 80 ठोके जाणवतील. हे ठोके 30 ते 40 टक्के वाढतील अशा प्रकारे आपल्याला व्यायाम करायचा आहे. यामुळे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार व्यायाम होईल. 
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे व्यायामाची मजा लुटा आणि तो आनंददायक होईल याची काळजी घ्या
                        N•R•Sable                     सुदृढ शरीरासाठी व्यायाम आवश्यक असतो. लहान मुलांपासून सत्तरी गाठलेले वयोवृद्धही व्यायाम करू शकतात. मात्र, वयाला आणि तब्येतीला मानवेल, एवढाच व्यायाम करावा. व्यायामाला वयाची अट नाही. लहान मुलांपासून सत्तरी गाठलेले वयोवृद्धही व्यायाम करू शकतात. आजारी असताना, ताप असताना, गर्भारपणामध्ये किंवा मोठे ऑपरेशन झाले असल्यास व्यायाम न करण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा, व्यायाम कधीही करायला हरकत नाही. 

खेळत असताना लहान मुलांचा व्यायाम आपोआप होत असतो. त्यांना वेगळा व्यायाम करण्याची गरज लागत नाही. 

तरुणांनी मात्र वाढत्या वयाच्या गरजानुरूप व्यायामाकडे अधिक लक्ष द्यायला हवे. व्यायामामध्ये ट्रेकिंग, धावणे, पोहणे, चालणे या प्रकारांचा समावेश करावा. 

पन्नाशीनंतर चालण्यासारखा व्यायाम हा केव्हाही चांगला. व्यायामाची सवय असेल तर जॉगिंग, ट्रेकही करू शकता व्यायामाची सुरुवात दहा ते पंधरा मिनिटांपासून करून ती तासापर्यंत वाढवत न्यावी. 

सुरुवातीची पाच मिनिटे वॉर्म अप, त्यानंतरची पाच मिनिटे स्ट्रेचिंग केल्यानंतर व्यायामास सुरुवात करावी. 

वयाला आणि तब्येतीला मानवेल, एवढाच व्यायाम करावा
                          N•R•Sable         आठवड्यात किमान तीन ते चार तास व्यायाम करणे अपेक्षित आहे. 

सुरुवातीला व्यायामाचा वेग कमी असावा. 

दहा-पंधरा मिनिटानंतर वेग वाढवावा, खूप जलदरित्या व्यायाम करू नये, टप्प्याटप्प्याने व्यायामाचा वेग वाढवत न्यावा. 

व्यायाम करण्याची जागा मोकळी असावी. डांबरी रस्ते, सिमेंटच्या रस्त्यावर व्यायाम टाळावा. 

व्यायाम करण्याची वेळ निश्चित ठरलेली असावी. त्या ठराविक वेळेची शरीराला सवय होते. 

व्यायामाला योग्य आहाराची जोड द्या, सकस पौष्टिक आहार आणि योग्य व्यायामामुळे शरीर सुदृढ व सक्षम राहण्यास मदत होते. 

*यासाठी व्यायाम हवाच 

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी 

मानेच्या ,कंबरेच्या वा अन्य कोणत्याही सातत्याने होणाऱ्या शारीरिक दुखण्यांपासून दूर राहण्यासाठी. 

शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासाठी. 

शारीरिक व मानसिक ऊर्जा टिकवण्यासाठी.


बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधी दूर करण्यासाठी.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

No comments:

Post a Comment