थोर महिला

थोर महिला 
********-*************************
राजमाता , राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब 
**********************************
: जिजाऊ … जिजामाता … राजमाता जिजाबाई भोसले … मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री … अशा अनेक नावानी आपण यांना ओळखतो. ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत.  

       सिंदखेडचे पाच हजारी मनसबदार लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते. वाढत्या वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या.  पुढे डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. 

       पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला. जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता. 

        शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली होती. शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
साबळे  एन•   आर• ******************
शिवरायांसमवेत जिजाबाईंचा पुतळा
पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले
जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८
सिंदखेडराजा,बुलढाणा.
मृत्यू जून १७, इ.स. १६७४
पाचाड, रायगडचा पायथा
वडील लखुजीराव जाधव
आई म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई
पती शहाजीराजे भोसले
संतती छत्रपती शिवाजीराजे भोसले
संभाजी शहाजी भोसले- (संभाजीराजे भोसले या नावाच्या नातवाशी गल्लत नको)
राजघराणे भोसले
चलन होन
जिजाबाई (जिजामाता, राजमाता जिजाऊ) ([[इ.स. १५९८)]- १७ जून, इ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
साबळे  एन•  आर•    *****************
 शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.

जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.
🌺🌅👦🏻🌅🌺👧🏻🌺
साबळे एन•  आर• *******************
: शिवाजी १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईम्नी नुसत्याच्गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
🌺👧🏻🌅👦🏻🌅🌺
साबळे ऐन् आर् *********************
 (जिजामाता, राजमाता जिजाऊ) ([[इ.स. १५९८)]- १७ जून, इ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.

भोसले व जाधवांचे वैर
पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला [ संदर्भ हवा ].

या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले [ संदर्भ हवा ]. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.

👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
********************************
==(========================== 
अहिल्यादेवी होळकर 
**-****-***************************
👦🏻बालपण 👧🏻

अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते.

बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.

मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. अहिल्याबाईंनी आपल्या राज्याला तुंगांपासून?? वाचवले. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.

एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे.[१] (इ.स. १७२५ - इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेससलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.

अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.

राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात

🌅👧🏻🌺🌅👦🏻🌺
**********************************
==============================
अहिल्या देवींचा कार्यकाल 
*    
👧🏻अधिकारकाळ👦🏻 डिसेंबर ११, इ.स. १७६७ - ऑगस्ट १३, इ.स. १७९५
राज्याभिषेक डिसेंबर ११, इ.स. १७६७
राज्यव्याप्ती माळवा
राजधानी रायगड
पूर्ण नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई खंडेराव होळकर
पदव्या राजमाता
जन्म मे ३१ , इ.स. १७२५
चौंडीगाव , जामखेडतालुका , अहमदनगर , महाराष्ट्र , भारत
मृत्यू ऑगस्ट १३, इ.स. १७९५
महेश्वर
पूर्वाधिकारी खंडेराव होळकर
दत्तकपुत्र तुकोजीराव होळकर
उत्तराधिकारी तुकोजीराव होळकर
वडील माणकोजी शिंदे
राजघराणे होळकर
अहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या उपाधीने संबोधले जाते

👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
*********************************
=============================
Sablesir              👧🏻श्रीमती सरोजिनी नायडू👦🏻      मुंबई येथे १९४६

उत्तर प्रदेशचे राज्यपाल
कार्यकाळ
इ.स. १९४७ – इ.स. १९४९
जन्म १३ फेब्रुवारी, इ.स. १८७९
हैद्राबाद, आंध्र प्रदेश
मृत्यू २ मार्च, इ.स. १९४९
अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
पती श्री.मुत्तयला गोविंदराजुलु नायडु
अपत्ये जयसूर्य, पद्मजा, रणधीर, लीलामणी
धर्म हिंदू
सरोजिनी नायडू (१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९). भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर. अघोरनाथ १८७८ मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते शिक्षणतज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगी रीत्या झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास इलाख्यात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या (१८९२). त्यानंतर सुमारे तीन वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या.
                            Sablesir                     त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगी रीत्या झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास इलाख्यात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या (१८९२). त्यानंतर सुमारे तीन वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले.

सरोजिनी नायडू भारतात परत आल्यानंतर १८९८ मध्ये त्यांनी डॉ. गोविंदराजुलू नायडू या निजामच्या संस्थानी विधुर डॉक्टरशी ब्राह्मोसमाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न केले. हा विवाह बंगाल व मद्रास असा आंतरप्रांतीय व आंतरजातीय होता. त्यामुळे त्या वेळी तो फार गाजला व येथूनच सरोजिनींच्या सामाजिक कार्यास सुरुवात झाली. त्यांना चार मुले झाली : जयसूर्या, पद्मजा, रणधीर आणि लैलामणी. रणधीर पुढे हैदराबादच्या राजकीय चळवळीत प्रसिद्धीस आला, तर पद्मजा बंगालच्या राज्यपाल झाल्या.
                  त्यानंतर सरोजिनी नायडू देशसेवा, समाजसेवा इत्यादी गोष्टींकडे वळल्या. याचे दुसरेही कारण असे होते की, १९०३ ते १९१७ च्या दरम्यान त्यांचा {{मोहंमद अली जिना]], गोपाळ कृष्ण गोखले, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट, सी. पी. रामस्वामी अय्यर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी अशा एक एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींशी या ना त्या निमित्ताने परिचय झाला. या व्यक्तींच्या विचारा आचारांकडे त्या आकृष्ट झाल्या. त्यांनी होमरूल लीगसाठी ॲनी बेझंट आणि सी. पी. रामस्वामी अय्यर यांच्या बरोबर हिंदुस्थानभर दौरा काढला. आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. सरोजिनी नायडूंनी गोखल्यांना गुरुस्थानी मानले आणि महात्मा गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले. हैदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना कैसर– इ– हिंद हे सुवर्णपदक देण्यात आले; पण ते त्यांनी जालियनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केले. रौलट कायदा, माँटेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार वगैरे विविध चळवळींत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसार प्रसार आणि प्रचार केला, मोहिमा काढल्या आणि गांधींच्या असहकार चळवळीत हिरिरीने भाग घेतला. सरोजिनींनी हिंदु – मुसलमान ऐक्य व स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले. होमरूल लीगच्या निमित्ताने त्यांनी देशभर असंख्य व्याख्याने दिली. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने गोखल्यांसारखी श्रेष्ठ माणसेही भारावून गेली.

टिळकांच्या मृत्यूनंतर सरोजिनी नायडू पूर्णतः गांधीवादी झाल्या आणि पेहराव व राहणीमान यांत त्यांनी आमूलाग्र बदल केले. त्यांनी आपले वास्तव्य हैदराबादमधून मुंबईत हलविले. त्या मुंबई महानगरपालिकेत सभासद म्हणून निवडून आल्या आणि पुढे प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या (१९२१). पुढे कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या (१९२५) व काँग्रेस कार्यकारिणीच्या सभासद झाल्या. काँग्रेसच्या सर्व धोरणांत त्या हिरिरीने भाग घेत. कलकत्ता येथे भरलेल्या १९०७ च्या बंगालच्या फाळणी विरोधी सभेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. १९०८ मध्ये विधवाविवाह परिषदेत त्यांनी स्त्रियांच्या चळवळीचा पाया घातला आणि येथूनच त्यांच्या स्त्रीविषयक चळवळीस खरा प्रारंभ झाला.
**********************************
👦🏻मेधा पाटकर👧🏻
जन्म 1 दिसंबर, 1945
जन्म भूमि मुंबई
अभिभावक पिता श्री वसंत खानोलकर और मां इंदु खानोलकर
नागरिकता भारतीय
प्रसिद्धि नर्मदा घाटी आंदोलन में सक्रिय
पद सामाजिक कार्यकर्ता
भाषा हिन्दी, अंग्रेज़ी
शिक्षा टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंस, मुंबई से 1976 में समाज सेवा की मास्टर डिग्री हासिल की।
अद्यतन‎

मेधा पाटकर (अंग्रेज़ी: Medha Patkar, जन्म: 1 दिसम्बर, 1954, मुंबई) भारत की प्रसिद्ध समाज सेविका के रूप में जानी जाती हैं। उन्हें 'नर्मदा घाटी की आवाज़' के रूप में पूरी दुनिया में जाना जाता है। गांधीवादी विचारधारा से प्रभावित मेधा पाटकर ने 'सरदार सरोवर परियोजना' से प्रभावित होने वाले लगभग 37 हज़ार गाँवों के लोगों को अधिकार दिलाने की लड़ाई लड़ी है। उन्होंने महेश्वर बांध के विस्थापितों के आंदोलन का भी नेतृत्व किया। अरूंधती रॉय जैसी लेखिका उनकी निकट सहयोगी रही हैं।
**********************************
Sablesir            👦🏻सिंधुताई सपकाळ👧🏻
जन्म १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे चिंधी
नागरिकत्व भारतीय
पेशा सामाजिक कार्यकर्त्या
पुरस्कार २५८ राष्ट्रीय आणि व काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार

सिंधुताई सपकाळ (१४ नोव्हेंबर, इ.स. १९४७; वर्धा, महाराष्ट्र - हयात) या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या मराठीभाषक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आयुष्यात अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे समाजकार्य केले आहे.
 आणि परिणामी सिंधुताईंचे लग्न वयाच्या ९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी करून दिले गेले. 10 निविदा वयाच्या ती Shrihari Sapkal उर्फ Harbaji , वर्धा जिल्ह्यातील Navargaon गावातून 30 वर्षीय गुराखी लग्न आला . तिने 20 चालू वेळ 3 मुलगे भोक . तिने भारतात इंधन म्हणून वापरले वाळलेल्या शेण गोळा वर गावकर्यांना fleecing आणि गावातील काही कोणाचे न करता, वन विभाग सह संगनमत मध्ये विक्री होता स्थानिक अत्यंत विरूद्ध यशस्वी आंदोलन लावले . तिचे आंदोलन तिच्या गावात जिल्हाधिकारी आणले आणि तिला योग्य होता लक्षात घेऊन वर , तो अत्यंत आवडत नाही जे ऑर्डर झाली . एक गरीब महिलेच्या हस्ते अपमान करून स्टींग चे भू.का. रुप , तो तिच्या गर्भधारणेच्या 9 महिने पलीकडे असताना तिला अंतर देणे तिच्या पती पटवणे व्यवस्थापित . तिने सर्व स्वत: करून , त्या रात्री त्यांच्या घरात बाहेर एक गाय निवारा मध्ये 14 ऑक्टोबर 1973 रोजी बाळ मुलगी जन्म दिला आणि काही किलोमीटर अंतरावर निवारा तिला नकार दिला कोण तिच्या आईच्या ठिकाणी देवा . तिने आत्महत्या विचार बाजूला सेट होते आणि अन्न रेल्वे प्लॅटफॉर्मवर भिकेचा सुरु . ह्या प्रक्रियेत, ती त्यांच्या पालकांना सोडलेले त्यामुळे अनेक मुले आहेत लक्षात आले की तिने स्वत म्हणून त्यांना दत्तक आणि त्यांना पोसणे आणखी अति जलद घडणारी क्रिया भिकेचा सुरु . तिने अनाथ म्हणून तिला आला कोणीही आणि प्रत्येकासाठी एक आई होण्यासाठी ठरविले. ती नंतर फक्त तिच्या कन्या आणि दत्तक विषयावर दरम्यान पक्षपात भावना दूर करण्यासाठी , विश्वास श्रीमंत Dagdu शेठ Halwai , पुणे तिला जैविक मुलाला दान . [ 3 ] ती अनाथ तिला संपूर्ण जीवन दिला आहे
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७ रोजी महाराञ्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. गाव अतिशय मागासलेले असल्याने शहरी सुविधांचा स्पर्श नव्हता. कुणाला शिक्षणाचा गंध नाही, अशीच सगळी परिस्थिती होती. चिंधी (सिंधू) ही सर्वांत मोठी मुलगी. पाठी एक भाऊ, एक बहीण. त्या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील त्यांना घेऊन पिंपरी मेघे गावात आले. मुलीने शिकावे अशी वडलांची इच्छा. पण आईचा मात्र सक्त विरोध. मग ते सिंधुताईंना माईंना गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी त्यांना जेमेतेम मराठी चौथीपर्यंत शिकता आले,

सिंधुताईंचा विवाह वयाच्या ९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाला.आणि चिंधी साठेची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. घरी प्रचंड सासुरवास होता.. ढोरासारखी मेहनत करावी लागे. घरात सगळे पुस्तकद्वेष्टे. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अक्षरांवरून आधाशासारख्या नजर फिरवायच्या.

अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी पण शेण काढणा्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरे
नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला, आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली.

परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले.
                    Sablesir                     सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवठी सिंधुताईंनी स्मशान गाठले.

👦🏻पुरस्कार व गौरव👧🏻

सिंधुताईंना २७३ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांतले काही :-

पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजने दिलेला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार (२०१२).
२०१० - स्त्री व बाल कल्याण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी असलेला महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार.
मूर्तिमंत आईसाठीचा २०१३ सालचा राष्ट्रीय पुरस्कार.
आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार १९९६.
सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
राजाई पुरस्कार.
शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा सामाजिक सहयोगी पुरस्कार १९९२.
सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशन दिलेला रिअल हीरो पुरस्कार (२०१२).
२००८ - दैनिक लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार.
👧🏻 प्रसारमाध्यमांतील चित्रण👦🏻

सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.

सिंधूताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट १६-२-२०१४ रोजी निघाला.

👧🏻झाशीची राणी लक्ष्मीबाई👦🏻                           
टोपणनाव: मनू
जन्म: नोव्हेंबर १९, इ.स. १८३५
काशी, भारत
मृत्यू: जून १७, इ.स. १८५८
झाशी, मध्य प्रदेश
चळवळ: १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
प्रमुख स्मारके: ग्वाल्हेर
धर्म: हिंदू
वडील: मोरोपंत तांबे
आई: भागीरथीबाई तांबे
पती: गंगाधरराव नेवाळकर
अपत्ये: दामोदर (दत्तकपुत्र)
लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३                   Sablesir              👧🏻लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर👦🏻 म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.
                👦🏻बालपण👧🏻

लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.
                         👦🏻वैवाहिक जीवन👧🏻

इ.स. १८४२मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.

दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.

गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३मध्ये गंगाधररावांचे निधन झाले
 पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणार्‍या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणाचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.

परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४ रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.

झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.
                              Sablesir                       👧🏻इ.स. १८५७ चा उठाव👦🏻                  हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणार्‍या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणार्‍या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणार्‍या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्म  दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.

उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणार्‍या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.

शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणार्‍या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.      Sablesir                     राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकार्‍यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’


या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्‍या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.
**********************************
👧🏻मदर तेरेसा👦🏻      Anjezë Gonxhe Bojaxhiu जन्म (२६ ऑगस्ट, इ.स. १९१० अल्बानिया) या भारत रत्न आणि नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या.

नवीन चावला हे मदर तेरेसा यांचे अधिकृत चरित्रकार

त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते.

इ.स. १९७९ मध्ये त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला तेव्हा आणि इ.स. १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की आपल्याला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही.

मदर तेरेसा धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स. १९८२ मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वत: युद्धभूमीवर हिंडल्या. पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता, त्या वेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’चा प्रसार केला. इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला. त्या तिथे गेल्या, ज्या काळात चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली तेव्हाही आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा त्यांनी तिथे जाऊन ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला
                   Sablesir                      मदर तेरेसा ह्यांनी संतपदाची कसोटी असलेली दुस‍ऱ्या चमत्काराची अट पूर्ण केल्यामुळे त्यांना संतपद देण्यात येणार असल्याचे पोप फ्रान्सिस ह्यांनी नुकतेच जाहीर केले. साधारणपणे सप्टेंबर २०१६ मध्ये हे संतपद देण्याचा सोहळा होईल.


मदर तेरेसा ह्यांचा मृत्यू १९९७ साली झाला. त्यांच्या मृत्यूनंतर, संतपद देण्यासाठी २००३ साली पहिला चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आला होता. 'मोनिका बसेरा', नावाच्या पश्चिम बंगाल येथील तरुणीच्या पोटातील कर्करोगाची गाठ मदर तेरेसांच्या फोटोमधून दिव्य शक्ती मिळाल्यामुळे बरी झाल्याचा हा दावा होता. आता विज्ञानाच्या कसोटीवर विचार करायचे ठरवले तर एखादी व्यक्ती मृत्यूनंतर देखील इतर लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते, हीच गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही.
*********************************
👦🏻किरण बेदी👧🏻
जन्म किरण पेशावरिया
९ जून १९४९
अमृतसर, पंजाब
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व पठाण
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.ए., एल्‌एल.बी., पीएच.डी.
प्रशिक्षणसंस्था दिल्ली विद्यापीठ
पेशा पोलिस अधिकारी
पदवी हुद्दा आय.पी.एस.
कार्यकाळ १९७२-२००७
धर्म हिंदू
जोडीदार ब्रिज बेदी (१९७५ पासून)
अपत्ये साईना (कन्या)
वडील परकाश पेशावरिया
आई प्रेम पेशावरिया
पुरस्कार मॅगेसेसे पुरस्कार (१९९४
 Sablesir                  किरण बेदी या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत. त्यांची पोलीस अधिकारी म्हणून पहिली नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरीत झाली. पुढे त्या उत्तर आणि पश्चिम दिल्लीच्या पोलीस आयुक्त झाल्या. दिल्लीतील तिहार जेलच्या त्या मुख्य अधीक्षक (इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन्स) होत्या. तेथे असताना त्यांनी जेलमध्ये अनेक सुधारणा केल्या.


निवृत्तीनंतर अण्णा हजारे यांच्या लोकपालासाठीच्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या
**********************************
Sablesir            👦🏻आनंदीबाई गोपाळराव जोशी👧🏻
जन्म यमुना
३१ मार्च, इ.स. १८६५
पुणे , महाराष्ट्र
मृत्यू २६ फेब्रुवारी १८८७ (वय वर्ष २१)
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण एम.डी (M.D)
प्रशिक्षणसंस्था वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ़ पेन्सिल्व्हानिया
पेशा वैद्यकीय
ख्याती भारतातील पहिल्या महिला वैद्य (डॉक्टर)
धर्म हिंदू
जोडीदार गोपाळराव जोशी

आनंदीबाई गोपाळराव जोशी (मार्च ३१, इ.स. १८६५- फेब्रुवारी २७, इ.स. १८८७) या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या.
          आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी आजोळी, पुण्यात त्यांचा जन्म झाला.आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणार्‍या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांची त्या ज्येष्ठ कन्या. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठे असणार्‍या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपालरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.
 लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परन्तु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०च दिवस जगू शकला . हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली . त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.

गोपाळरावांनी यासंदर्भात अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती, आणि धर्मांतर करणे तर या जोडप्यास मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्‍न सोडले नाहीत . पुढे आनंदीबाईची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित त्यांना भेटलेच. या दोघांना अपेक्षित असेच घडले आणि आनंदीबाईना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी "वीमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ़ पेन्सिल्व्हानिया" मध्ये प्रवेश मिळाला. दरम्यान, नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील एका जोडप्याच्या मदतीमुळे सर्व काही पार पडत गेले.

सुरुवातीला तत्कालीन समाजाकडून या कामाला खूप विरोध केला. आनंदीबाईंनी कलकत्त्यामध्ये एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले, आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदु धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे .

आनंदीबाईचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.
कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईना एम.डी. ची पदवी मिळाली. एम.डी. साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले . हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. पंडिता रमाबाई होत्या. ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून तिची प्रशंसा केली.

स्वप्न पुरे झाले. आनंदी भारतात परतली. एव्हाना तिला क्षयाची बाधा झाली होती. बोटीवर कुणीही गोर्‍या डॉक्टरने तिला बिगर- गौरवर्णीय म्हणून उपचार केले नाही. मायदेशी पोहोचल्यानंतर समुद्रोल्लंघन करून आलेली, त्यातून स्त्री म्हणून हिंदू डॉक्टर किंवा वैद्यही तपासून पाहीनात.
              Sablesir            👧🏻भारतात आगमन 👦🏻

एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले . सर्वत्र अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूर मधील अल्बर्ट एडर्वड हॉस्पिटल मधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.
 👧🏻मृत्यू 👦🏻

वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला. पुढे काही महिन्यातच म्हणजे २६ फेब्रुवारी, इ.स. १८८७ रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला.

केवळ २१ वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुदैर्वाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र 'चूल आणि मूल' म्हणजेच आयुष्य असं समजणार्‍या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला.
********************************
👦🏻कल्पना चावला👧🏻
कल्‍पना चावला (मार्च १७ इ.स. १९६२:कर्नाल, हरयाणा -- फेब्रुवारी १ इ.स. २००३:टेक्सासवर अंतराळात) ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.

व्यक्तिगत माहिती

कल्पना बनारसीलाल चावला यांचा जन्म कर्नाल, हरयाणा येथे झाला
              Sablesir              👦🏻शिक्षण👧🏻

कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अर्लिङ्ग्टनच्या टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण करून घेऊन, त्यांनी कोलोराडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली.

👧🏻कार्य👦🏻

डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला.
👦🏻मृत्यू 👧🏻


१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्‍या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
********************************
👦🏻ताराबाई शिंदे👧🏻                 (१८५०-१९१०)                    ह्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत. १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकाच्या त्या लेखिका होत.

ताराबाई ह्या बुलढाणा येथील रहिवासी होत्या. त्यांचे वडील बापुजी हरी शिंदे हे एक जमीनदार होते. ते सत्यशोधक समाजाचे सभासद होते.ताराबाई शिंदे यांचे भाऊ, रामचंद्र हरी शिंदे जोतिबांच्या कॉन्ट्रक्टिंग कंपनीत भागीदार होते. त्यामुळे ताराबाईंच्या घरात सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे वातावरण होते. 


ताराबाईंनी आपल्या पुस्तकात विधवा-विवाहास उच्च वर्णीयांनी केलेली मनाई, केशवपनासारख्या दुष्ट रूढी, तसेच पुरुषांना अनेक लग्न करण्याची असलेली मुभा या सर्व प्रश्नांवर टीका केलेली दिसते. तत्कालीन महाराष्ट्रातील स्त्री समाजसुधारक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती देखील सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात योगदान दिले.त्यानी स्त्री यांच्या शोषणा विरोधात दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणारा होता
**********************************
👧🏻रमाबाई रानडे👦🏻

रमाबाईंच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतीय टपालखात्याने प्रकाशित केलेले तिकीट
जन्म: २५ जानेवारी, इ.स. १८६२
देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: २६ एप्रिल, इ.स. १९२४
पुणे
चळवळ: स्त्री हक्क, स्त्री शिक्षण, सामाजिक चळवळ
पती: महादेव गोविंद रानडे

रमाबाई रानडे (जानेवारी २५, इ.स. १८६२ : देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत – २६ एप्रिल, इ.स. १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या.
*********************************

1 comment: