८ वी शिष्यवृत्ती परिक्षा अभ्यासक्रम

१) मराठी 
             येथे क्लिक करा 
********************

२) गणित 
             येथे क्लिक करा 
********************

३) इंग्रजी 
             येथे क्लिक करा 
*********************

४) बुध्दिमत्ता चाचणी 
                     येथे क्लिक करा 
***********************
        
***************************
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीच्या
विद्यार्थ्यांसाठी “शिष्यवृत्ती मार्गदर्शिका”प्रकाशित
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई दि. १९ जुलै- “प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र” हा कार्यक्रम महाराष्ट्रात सध्या चालू आहे. या कार्यक्रमातून शैक्षणिकदृष्टया अप्रगत विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे, या बरोबरीनेच अतिप्रगत प्रज्ञावान विद्यार्थ्यांकडे महाराष्ट्र शासनाने विशेष लक्ष देण्याच्या उद्देश्याने आणि शिष्यवृत्ती परीक्षा ही अशा प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणारी असावी, या अर्थाने त्याचा अभ्यास युगानुकुल असावा या विचाराने ही मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे. या मार्गदर्शिकेचे प्रकाशन आज  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या बरोबरीने www.mscepune.in  या संगणक स्थळावर शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम upload करण्यात आला.
सध्याचे युग हे स्पर्धात्मक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यकाळात अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. त्या परीक्षांचा पाया म्हणजेच शालेय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेतून विद्यार्थ्यांची गुणवत्ता पारखता येते.बदलत्या काळानुरुप आपला विद्यार्थीही प्रगल्भ झाला पाहिजे यासाठीच अश्या प्रकारची मार्गदर्शिका शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच तयार करण्यात आल्याचे श्री.विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सन २०१६-१७ पासून पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८वी) साठी घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, हे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून प्रथमच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या साहाय्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांसाठी “शिष्यवृत्ती मार्गदर्शिका”शासनाने तयार केली आहे. सर्व वितरकांकडे हि पुस्तके उपलब्ध होतील तसेच प्रत्यक्ष बालभारती व परिक्षा परिषदेतही ही पुस्तके विक्रीस उपलब्ध आहेत अशी माहिती परिषदेचे संचालक श्री. म्हमाणे यांनी दिलीⓂ🚩🅿विनयकुमार केंडे
***************************
***************************************

No comments:

Post a Comment