मराठी लेखक / कवि

विजय तेंडूलकर 
**********************************
****     👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
विजय तेंडुलकरांचा जन्म जानेवारी ६, १९२८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि.बा. मोकाशी, वि.वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही घडवणूक होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. साहजिकच या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. पुण्यात आणि मुंबईत त्यांचे वास्तव्य होते.

१९६६ नंतर मात्र ते मुंबईतच राहिले व तेथे त्यांनी आपली व्यावसायिक कारकीर्द घडवली. १९५५ पासूनच त्यांनी लेखन सुरू केले.

चरितार्थासाठी प्रारंभी त्यांनी पत्रकारितेचा पेशा स्वीकारला. नवभारत, मराठा, लोकसत्ता, नवयुग, वसुधा आदी वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून त्यांनी सदरलेखनाचे आणि संपादनाचे काम केले. १९४८ मध्ये 'आमच्यावर प्रेम कोण करणार' ही त्यांची कथा पहिल्यांदा प्रकाशित झाली. १९५१-५२ च्या सुमारास भारतीय विद्याभवनाने नव्याने सुरू केलेल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने तेंडुलकरांचे नाट्यलेखन सुरू झाले. आकाशवाणीसाठीही त्यांनी नाटके लिहिली. त्यांनी आरंभीच्या काळात निवडलेले नाट्यविषय कौटुंबिक स्वरूपाचे आणि मध्यमवर्गीय जीवनाशी निगडित होते
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**********************************
==============================
प्रल्हाद केशव अञे :- केशवकुमार 
**********************************
==============================
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
जन्म नाव प्रल्हाद केशव अत्रे
टोपणनाव केशवकुमार
जन्म ऑगस्ट १३, इ.स. १८९८
सासवड, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जून १३, इ.स. १९६९
परळ (मुंबई),महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्र
प्रसिद्ध साहित्यकृती डॉ. लागू, झेंडूची फुले, कर्‍हेचे पाणी (आत्मचरित्र)
अपत्ये शिरीष पै, मीना देशपांडे
प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (ऑगस्ट १३, इ.स. १८९८ - जून १३, इ.स. १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.

👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
**********************************
==============================
प्रल्हाद केशव अञे (आचार्य अञे) 
****** *****  *********************
प्रल्हाद केशव अत्रे अर्थात आचार्य अत्रे
मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ञ, चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. अत्रे ह्यांचा जन्म सासवड, जिल्हा पुणे येथे झाला. त्याचे शिक्षण सासवड, पुणे, मुबंई व लंडन या ठिकाणी बी.ए.,बी.टी,टी.डी. पर्यंत झाले. पुण्यातील कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्रथम शिक्षक व पुढे प्राचार्य म्हणून काम केले. नंतर काही काळ पुण्याच्या नगरपालिकेचे ते सदस्य होते. पुढे १९३३ पासून नाट्य व चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला. १९४० मध्ये सुरू केलेल्या साप्ताहिक नवयुगपासून अखेरपर्यंत वृत्तपत्रक्षेत्रातच ते कार्यरत राहिले. याचबरोबरच ‘अत्रे थिएटर्स’ या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशी त्यांचे व्यावासायिक नाते राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी आपली कर्तुत्व आणि लेखणी यांद्वारे मोठे कार्य केले.

साने गुरुजींची ‘श्यामची आई' म्हणजे मराठी साहित्यातील एक सोनेरी पान, असे मानले जाते. त्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी १९५३ साली चित्रपट बनविला. १९५४ साली या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पदक मिळाले. इ.स. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. इ.स. १९२६ मध्ये 'रत्नाकर' व इ.स. १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व इ.स. १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. १९ जानेवारी १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले
अत्रेंचे ’क-हेचे पाणी’ हे पाचखंडातील आत्मचरित्र, चांगुणा, मोहित्यांचा शाप या कांदबरीचे लेखन त्यांनी केले. झेंडूची फुले व गीतगंगा हे कवितासंग्रह लिहिले. अशा गोष्टी अशा गंमती, कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले, बत्ताशी आणि इतर कथा ही कथासंग्रहाची पुस्तके त्यानी लिहिली. अध्यापक अत्रे, आषाढस्य प्रथम दिवसे, इतका लहान एवढा महान, केल्याने देशाटन, क्रांतिकारकांचे कुलपुरुष, चित्रकथा भाग-१, चित्रकथा भाग-२, दलितांचे बाबा, दूर्वा आणि फुले, मराठी माणसे, मराठी मने, महापूर, महाराष्ट्र कालचा आणि आजचा, मी कसा झालो? ह्या त्यांच्या काही उल्लेखनिय कलाकृती. प्रथम ‘मकरंद’ व नंतर ‘केशवकुमार’ या टोपणनावांनी काव्यलेखन त्यानी मराठीत गाजवली. झेंडूची फुले हा त्यांच्या विनोदी व विबंडन-कवितांचा संग्रह. त्यात जुन्या वळणाचे कविता यांतील लकबांचे व वैगुण्यांचे विडंबन केलेले आहे. आधुनिक मराठीतील विडंबन काव्याची परंपरा उपयुक्त काव्यसंग्रहापासून मानण्यात येते. बालकवी व गोविंदाग्रज यांच्या कवितांचा ठळक परिणाम दाखविणारी त्यांची अन्य स्फुट कविता गीतगंगा (१९३५) या संग्रहात आहे.
नाशिक येथे १९४२ मध्ये भरलेल्या २७ व्या महाराष्ट्र साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्ष होते. याशिवाय ३८ वे नाट्यसंमेलन, बेळगाव, १० मराठी पत्रकार-संमेलन आणि बडोदा, इंदूर व ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्यसंमेलने यांची अध्यक्षपदेही त्यांनी विभूषित केली आहेत.
अत्र्यांनी केलेल्या विविध विषयांवर लेखनात अनेक चरित्रे, व्यक्तिदर्शने, मृत्यूलेख, प्रवासवर्णने, वृत्तपत्रीय लेख, साहित्यविषयक लेख आणि भाषणे, शालेय पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश आहेत
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺  
***********************-**-*******
=====================(======
साने गुरूजी 
***********-*******************
============================          👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
टोपणनाव: साने गुरुजी
जन्म: डिसेंबर २४, इ.स. १८९९
पालगड, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: जून ११, इ.स. १९५०
के.ई.एम.रुग्णालय मुंबई
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: राष्ट्र सेवा दल
पत्रकारिता/ लेखन: छात्रालय दैनिक, साधना, साप्ताहिक
प्रमुख स्मारके: वाडघर-गोरेगाव, माणगाव तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
धर्म: हिंदू
प्रभाव: महात्मा गांधी
वडील: सदाशिव
आई: यशोदाबाई
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. 'श्यामची आई', 'नवा प्रयोग', 'सुंदर पत्रे', 'हिमालयाची शिखरे', 'क्रांती', 'समाजधर्म', 'आपण सारे भाऊ' इत्यादी त्यांचे विपूल साहित्य प्रसिद्ध आहे.

👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
**********************************
==============================
साने गुरुजी 
**********************************
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.

इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**-*******************************
==============================
बहिनाबाई  चौधरी 
*********************************
==============================
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
बहिनाबाई चौधरी एक मराठी कवियित्री थीं। उनका जन्म नागपंचमी के दिन २४ अगस्त १८८० को महाराष्ट्र के आसोदे (जळगाव) गाँव में हुआ । यह गाँव खनदेश के जळगाव से ६ कि.मी. की दूरी पर है। उनकी माँ का नाम भिमाई था। वह ब्राम्हण जाती की थी । उनके घमा, घना और गना नाम के तीन भाई थे और अहिल्या, सिता, तुळसा नामक तीन बहने थीं। बहिनाबाई का विवाह १३ वर्ष की आयु (१८९३) मे खंडेराव चौधरी के पुत्र नथुजी से हुआ। उनके ओंकार, सोपानदेव नामक दो पुत्र थे और काशी नामक एक पुत्री थी । वे जन्म भर निराक्षर रहीं, इसिलिए जो कविता वो गाती थी वे पडोस के लोग लिखा करते थे और कुछ कविताये नष्ट भी हो गई। वह मराठी होने के कारण "अहिराणी" भाषा मे लिखती थी। वह निराक्षर थी लेकीन उनकी काव्यरचना के जीवन कि प्रतिभा हैं, जिसमे उनकी खेती के काम, घर के काम, बिदाई के बाद का लडकी का जीवन सारे उनमे समाए रहते हैं। यह सब सुन कर जितना हो सके उतना उनके सुपुत्र सोपानदेव और उनके ममेरेभाई दोन्हों लिखते थे। उनकी मृत्यु (७२) ३ दिसंबर १९५१ को हो गई ।

👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
*********************************
==============================
विष्णु वामण शिरवाडकर 
*********************************
==============================
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.
जागतिक मराठी परिषदेच्या वतीने तसेच मराठी भाषेवर प्रेम करणार्‍या अनेक संस्था-संघटनांच्या वतीने दिनांक २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो

👦🏻🌺🌅👧🏻🌅🌺
**********************************
==============================
पाडगावकर 
*********************************
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
*********************************
👧🏻वाचावीत अशी १०० पुस्तके👦🏻 
०१.) ययाती = वि. स. खांडेकर
०२.) वळीव = शंकर पाटील
०३.) एक होता कार्वर = वीणा गवाणकर
०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले
०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
०८.) तीन मुले = साने गुरुजी
०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
१०.) आय डेअर = किरण बेदी
११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे
१२.) मृत्युंजय = शिवाजी सावंत
१३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे
१४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे
१५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर
१६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद
१७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद
१८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू
१९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
२०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
२१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
२२.) राजयोग = स्वामी विवेकानंद
२३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
२४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी
२५.) योगासने = व. ग. देवकुळे
२६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे
२७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद
२८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री
२९.) रणांगण = विश्राम बेडेकर
३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे
३१.) श्यामची आई = साने गुरुजी
३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे
३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल
३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे
३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड
३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर
३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर
३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर
४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर
४१.) झोंबी = आनंद यादव
४२.) इल्लम = शंकर पाटील
४३.) ऊन = शंकर पाटील
४४.) झाडाझडती = विश्वास पाटील
४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट
४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे
४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे
५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे
५१.) आई = मोकझिम गार्की
५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी
५३.) बलुत = दया पवार
५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर
५५.) स्वामी = रणजीत देसाई
५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे
५७.) पांगिरा = विश्वास पाटील
५८.) पानिपत = विश्वास पाटील
५९.) युंगंधर = शिवाजी सावंत
६०.) छावा = शिवाजी सावंत
६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई
६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले
६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले
६४.) चंगीजखान = उषा परांडे
६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक
६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू
६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती
६८.) वाईज अंड आदर वाईज
६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे
७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे
७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा
७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव
७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे
७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख
७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी
७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते
७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे
७८.) महानायक = विश्वास पाटील
७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर
८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग
८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे
८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे
८६.) हुमान = संगीता उत्तम धायगुडे
८७़.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे
८८.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे
८९.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी
९०.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई
९१.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने
९२.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने
९३.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने
९४.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड
९५.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने
९६.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले
९७.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे
९८.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने
९९.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट

१००.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आपटे. 🌅👦🏻🌺👧🏻🌅🌺
*********************************
👧🏻 बाप झालास ना👦🏻
             👧🏻कवी - भालचंद्र कोळपकर👦🏻

    बाप झालास ना आता 
    तर , बापाच्या इमानास जाग
    बाळांना लाज वाटणार नाही 
    अस, आयुष्यभर वाग

वळवाच्या वादळी पावसागत
कोणावर आता कडाडू नको 
ठासुन भरलेली जवानीची तोफ
उगीच तोंडावाटे धडाडू नको

बायको तुझी आता 
फक्त बायको नाही राहिली 
अरे तुझ्या काळजाच्या तुकड्यांनी
तीच्यात एक जबाबदार आई पाहिली
     म्हणून , जे काही मागायचं ते
     एक पायरी उतरूण माग
     बाप झालास ना आता 
     तर, बापाच्या इमानास जाग

घरट्यातील पिलांची जाणीव 
बेफाम लढणाऱ्या पक्षात असू दे
भांडणात शस्त्र चालवण्यापुर्वी
तू बाप आहे लक्षात असू दे

तुरुंगा पेक्षा तुझी गरज
तुझ्या बाळांना जास्त आहे 
पण , शस्त्रा ऐवजी प्रेमाची भाषा 
खरच , काय जबरदस्त आहे 
    म्हणून घरात असो नाहीतर बाहेर 
    आवरायला शिक तू राग 
    बाप झालास ना आता 
    तर ,बापाच्या इमानास जाग

भरधाव गाडी चालवताना
बाळाला आठवून दाब अँक्सीलेटर 
लूळा पांगळा बाप झालातर
स्वतःच्या नशीबावर फोडतील ते खापर

चुकून व्यसनाची वाट धरली असेल तर
आता तरी सोडून दे बाबा 
तुझ्या बाळाच्या बाळांनाही
धडधाकट मिळूदे आजोबा 
    उगीच घालू नको धोक्यात
    तुझ्या कुटुंबाची नवीन बाग 
    बाप झालास ना आता
    तर,बापाच्या इमानास जाग 

भ्रष्ट कमईच्या तळतळाटावर
बाळांना मोठं व्हायचं नाही 
लुबाडलेल्या प्रतिष्ठीत छताखाली
त्यांना कधीच रहायचं नाही 

म्हणून हे साऱ संसारासाठी करतोय 
हे सांगन्यात काही अर्थ नाही 
स्वाभिमानी बाप होण्यास
ते समजतील तू समर्थ नाही
  
 म्हणून त्याच्या आयुष्यावर पाडू नको 
  तुझ्या पापाचा डाग
     बाप झालास ना आता
     तर, बापाच्या इमानास जाग 
     तुझ्या बाळांना लाज वाटणार नाही 
     असच आयुष्यभर वाग
___     कवी - भालचंद्र कोळपकर 

  🌅🌺👧🏻🌅🌺👦🏻
********************************
👧🏻राम गणेश गडकरी👦🏻
पूर्ण नाव    राम गणेश गडकरी
टोपणनाव    गोविंदाग्रज, बाळकराम
जन्म    २६ मे, इ.स. १८८५
मृत्यू    २३ जानेवारी, इ.स. १९१९
कार्यक्षेत्र    नाटककार, कवी, लेखक
भाषा    मराठी
साहित्यप्रकार    कविता, नाटके, विनोदी कथा
प्रसिद्ध साहित्यकृती    नाटके:' एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन
वडील    गणेश गडकरी

राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (२६ मे, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - २३ जानेवारी, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

👧🏻जीवन👦🏻

गडकर्‍यांचा जन्म २६ मे, इ.स. १८८५ रोजी तत्कालीन मुंबई प्रांतातील नवसारी येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांचे वडील निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकर्‍यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकर्‍यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.

महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कवित, लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.
**********************************


No comments:

Post a Comment