सामान्य विज्ञान

* ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.

* ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.

* ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’
शरीरातील
प्रतिकारशक्ती वाढविते.

* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.

*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के
घनपदार्थ
असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश,
३.५ ते
३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व
०.६ ते
०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात,
म्हणून
दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.

* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम
दुधाची आवश्यकता असते.

* ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग
होतो.

* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित
आहे.

* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश
सेल्शिअस
असते.

* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात
केला जातो.

* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.

* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.

* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते.
रक्तामध्ये
मँगेनिज हे द्रव्य असते.

* ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर
कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास
‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.

* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक
जास्त
प्रमाणात असते.

* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.

* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग
करतात.

* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये
कॅफीन हे
अपायकारक द्रव्य असते.

* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ
झाल्यास
ब्लड कॅन्सर होतो.

* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर

कावीळ.

* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व
इन्फ्लुएंझा

* मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे
होतो.

* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व
लॅप्सो स्पायरसी

* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण
दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.

*नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.

* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.

* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.

* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.

* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त
आहे.

* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने
हृदयविकाराचा झटका येतो.

* रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे
कोलेस्टेरॉल
रक्तातून वाहते.

* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे
मोजले
जाते.

* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’
हा घटक करतो
         
काही महत्त्वाची वैज्ञानिक उपकरणे व त्यांचा मानवाला उपयोग

*१)मायक्रोफोन--
               ध्वनिलहरींचे वर्धन करणे.

*२)मॅनोमीटर--
                      वायुदाबमापन करणे.

*३)पेरिस्कोप--
         पानबुडीतुन समुद्रपृष्ठावरील
               जहाजांचे निरीक्षण करणे.

*४)पायरोमीटर--
             उच्च तापमान मापण करणे.

*५)रेडिओ टेलिस्कोप--
           अवकाशातून येणाऱ्या रेडिओ
                 लहरींचा अभ्यास करणे.

*६)सिस्मोग्राफ--
                 भूकंपाची तीव्रता मोजणे.

*७)स्फीरॉमीटर--
             पृष्ठभागाची वक्रता मोजणे.

*८)सॅलिनोमीटर--
        द्रव पदार्थातील क्षारता मापण
                                       करणे.

*९)स्पेक्ट्रोस्कोप--
               वर्णपटाचा अभ्यास करणे.

*१०)टेलिप्रिंटर--
                दूर अंतरावरुन येणाऱ्या
        संदेशांचे तात्काळ टाईप करणे.

*११)टेलिस्कोप--
                   आकाशस्थ ग्रह-गोलांचे
                             निरीक्षण करणे.

*१२)थिओडोलाइट--
                         भूपृष्ठमापन करणे.

*१३)विद्युत मोटर--
                     विद्युत ऊर्जा वापरून
             चक्राकार गती साध्य करणे.

*१४)व्होल्टमीटर--
                विजेचा दाब मापन करणे.

*१५)झेरॉक्स मशीन--
           लिखित व मुद्रित मजकुराचा,
     दस्तऐवजांच्या फोटो प्रति काढणे.
***********************************"****
सामान्य ज्ञान
धरण पाणी आवक जावक माप बघा किती पाणी येते जाते माहिती आहे का ?
1) TMC म्हणजे काय ?
2) Cusec म्हणजे काय ?
3) Cumec  म्हणजे काय ?
सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणं भरत आहेत, काही धरणातून पाणी सोडल्या जात आहे.
इतके tmc पाणी जमा झाले, तितके Cusec पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो.
याचा नेमका अर्थ काय?
आपणास फक्त "लिटर" संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू यात.
१) 01 tmc म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट.
01 tmc = 28,316,846,592 litres
२) 01 Cusec = 01 cubic feet per second = 28.317 litres per second.
३) 01 Cumec =01 cubic meters per second = 1000 litres per second.
उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९७ tmc आहे.
म्हणजे त्यात १.९७x२८.३१७ अब्ज लिटर्स पाणी मावते.
याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.
म्हणजे ५००x२८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.
महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी ०५ धरणे
१)उजनी ११७.२७ tmc
२)कोयना १०५.२७ tmc
३)जायकवाडी ७६.६५ tmc ( पैठण )*
४)पेंच तोतलाडोह ३५.९० tmc
५)पूर्णा येलदरी २८.५६ tmc
व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;
१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] =
१०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] =
४३५६० चौ फुट

१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
**************************************

No comments:

Post a Comment