चारोळ्या

चारोळ्या

हरवलेल्या गोष्टींच्या शोधात वेडे मन इतके धावले
की गवसलेल्या गोष्टींचा पायाखाली चुराडा झाल्याचे कळलेही नाही.
काही तुडवलेल्या गोष्टींना इतका तडा गेला आहे
की कुठला तुकडा कोणाचा हे सुद्धा आता ओळखू येत नाही.

नियतीच्या या खेळामध्ये बेभरवशी अनेक साथी
आंधळा य हिशोब सगळा मांडला जगाच्या माथी
पुन्हा फिरूनी जन्मा येती जूनीच जाणी,नवीन ओठी
सैलावतसे जुनेच बंधन बांधण्या मग नवीन गाठी..

काव्यलेखनचारोळी5 प्रतिसाद
मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं
तुला शंभर वर्षे आयुष्य आहे.
मरण ही चाट पडलं म्हणालं
काय हा मनुष्य आहे ?

इथे प्रत्येकजण आपआपल्या घरात,
अन प्रत्येकाचं दार बंद आहे
तरी एकोप्यावर बोलणं हा
प्रत्येकाचा छंद आहे


भग्न वाड्यात रोज मध्यरात्री...!!
सूडाच्या स्वप्नात मग्न, तो बसलेला असतो
मृत्यू लादला गेलेला हा मृतयात्री ...!!
भूतकाळाचे भूत, मानगुटीवर घेत "जगतो"
(३) 'विविधतेतील' कथित एकता

या देशाच्या 'विविधतेतील' कथित एकता...
सांगा बरे उरली आहे का आता?
स्वातंत्र्यापासूनच हा देश आहे म्हणतात धर्मनिरपेक्ष!
पण जन्मापासूनच जगतो प्रत्येकजण आरक्षणसापेक्ष!
२१) आजकाल ...

आजकाल, खेळाडू अभिनय करतात
अभिनेते राजकारणात शिरतात
राजकारणी भ्रष्टाचारात मग्न असतात
देशासमोरचे प्रश्न तसेच रहातात
(२२) स्वातंत्र्य

स्वातंत्र्य मिळाले आपल्याला, नावापुरते

गरिबांच्या तोंडाला मीठही नाही, चवीपुरते

मुक्या हुंदक्याचे गाणे कोणाला कळावे,
छळावे स्वता: ला निखारे क्षणांचेच व्हावे......
जडे जीव ज्याचा
त्याच्याच का रे नशीबी असे घाव यावे.......

घट्ट लावुन घेतलेली दारं
बाहेर "वेल-कम"चं तोरण
अहो, हे कसलं घर बंद करुन
स्वागत करायचं धोरण..?

काही नाती अमुल्य असतात
त्यांची किंमत करू नये
जपावं हाताच्या फोड्यासारखं
उगाचचं गंमत करू नये

मनातले त्याला कळले असते

मनातले त्याला कळले असते
तर शब्द जोडावे लागले नसते
शब्द जोड़ता जोड़ता जग
सोडावे लागले नसते ..............

आयुष्य काय असतं
 सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं..

त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं..

आपल्या मनासारखं कधीचघडत नसतं..

हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं..

ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं..

दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं,
दु:खच नसेल आयुष्यात तर मजा घेता येईल का..??

ओलं न होता कधीतरी पावसात भिजता येईल का..
धुंद पाखरांच्या सेव मनसोक्त मन हवेत उडावे वारे जरी बदलत असले तरी बांध संस्कृतीचे सांग कसे तोडावे? आज काल वाटेवरचा मोगारही नेहमीसारखा फुलत नाही, कदाचित त्याला ही समजल असेल, की तू मझाशी बोलत नाही....
 घरात काळोख शिरेल म्हणुन
घरात काळोख शिरेल म्हणुन
मी सगळी दारं लावून बसलो
आणि स्वत:च्या खुळेपनावर
अंधारात बसून हसलो
गावातले सगळे रस्ते
गावातले सगळे रस्ते
रात्री गावाबाहेर पडतात
मला घरीच परतायचं असतं
पण ते मला रानात नेउन सोडतात

जगणं असह्य झाल्यावर
जगणं असह्य झाल्यावर
मरणही उशिरा येते
दुःख अजुन बाकी आहे
हे तेव्हा कळून येते
डोळ्यातून अश्रु ओघळला
डोळ्यातून अश्रु ओघळला
की तोही आपला राहत नाही
वाईट याचंच वाटतं की
दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही।

पाऊस एकदाचा पडून जातो
पाऊस एकदाचा पडून जातो
पावसाचे दिवस असले की
आसवांचं तसं नसतं, ते पुन्हा येतात
एकदा डोळे पुसले की
पावसावरच्या निबंधाला
पावसावरच्या निबंधाला
कधीच पूर्ण मार्क मिळत नाहीत
कारण मार्क देणारा आणि घेणारा
दोघांनाही तो कळत नाही

मनाची तहान
मनाची तहान
पाण्यानं भागत नाही
हे बरं आहे की सगळ्यानाच
मनाची तहान लागत नाही

मला एक सुखी माणूस
मला एक सुखी माणूस
त्याची दु:ख सांगत बसला
आणि माझा दाटून आलेला अश्रु
मी निमुटपणे पुसला
**********************

No comments:

Post a Comment