परिपाठ म्हणी

म्हणी 
*************-********************
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे

2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही

3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे

4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे

6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा

7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते

8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो

9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे

10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही

11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**********************************
म्हणी 
**********************************
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे

13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे

14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर

15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही

16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो

17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे

18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो

19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी

22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते

21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ

22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती

23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे

24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण

25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे

26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे

27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे

28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत

29. पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे

30. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये

31. उंटावरून शेळ्या हाकणे – आळस, हलगर्जीपणा करणे

32. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही

33. कोल्हा काकडीला राजी – लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात

34. गाढवाला गुळाची चव काय – अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते

35. घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे

36. डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे

37. भरंवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे

38. वरातीमागून घोडे – एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे

39. पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?

40. खायला काळ भुईला भार – ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो

41. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे

42. नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी

43. हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते

44. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे

45. गर्जेल तो पडेल काय? – पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही

46. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्टाशिवाय यश मिळत नाही

47. वारा पाहून पाठ फिरवावी – वातावरण पाहून वागावे

48. कुंपणानेच शेत खाणे – रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे

49. दगडावरची रेघ- कायमची गोष्ट

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**********************************
==============================
👧🏻अस्सल मराठी म्हणी👦🏻 ... 
1. अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ.
2. अंथरूण पाहून पाय पसरावेत.
3. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
4. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
5. अक्कल खाती जमा.
6. अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
7. अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
8. अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
9. अडला हरी गाढवाचे पाय धरी.
10. अडली गाय खाते काय.
11. अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
12. अती झालं अऩ हसू आलं.
13. अती झाले गावचे अन पोट फुगले देवा
14. अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
15. अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव‌ई डॉक्टर.
16. असतील मुली तर पेटतील चुली.
17. आंधळीपेक्षा तिरळी बरी.
18. आठ हात लाकुड, न‌ऊ हात धलपी.
19. कर नाही त्याला ड़र कशाला?
20. करायला गेलो एक आणि झाले भलतेच.
21. करावे तसे भरावे.
22. कळते पण वळत नाही.
23. कशात काय अन फाटक्यात पाय.
24. कशात ना मशात, माकड तमाशात.
25. कष्ट करणार त्याला देव देणार.
26. काम ऩ धंदा, हरी गोविंदा.
27. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे
 Sablesir    शेपूट वाकडे ते वाकडेच.
28. गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे.
29. गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने.
30. गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर).
31. चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव.
32. चांदणे चोराला, उन घुबडाला.
33. चांभाराची नजर जोड्यावर.
34. चुकलेला फकीर मशिदीत.
35. चोर तो चोर वर शिरजोर.
36. चोर नाही तर चोराची लंगोटी.
37. चोर सोडून संन्याशाला सुळी.
38. चोराच्या उलट्या बोंबा.
39. चोराच्या मनांत चांदणं.
40. चोराच्या वाटा चोरालाच माहीत.
41. चोरावर मोर.
42. चोरीचा मामला हळू हळू बोंबला.
43. जशास तसे.
44. जशी कामना तशी भावना.
45. जशी देणावळ तशी धुणावळ.
46. जशी नियत तशी बरकत.
47. जसा गुरु तसा चेला.
48. जसा भाव तसा देव.
49. जा‌ईचा डोळा नि आसवांचा मेळा.
50. जातीसाठी खावी माती.
51. जावयाचं पोर हरामखोर.
52. जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.
53. जिकडे सु‌ई तिकडे दोरा.
54. जिच्या घरी ताक तिचे वरती
 साबलेसर: 👦🏻म्हणी👧🏻          कानामागून आलीअन तिखट झाली
कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली.
कळते पण वळत नाही.
कर नाही त्याला डर कशाला?
करावे तसे भरावे.
करायला गेले नवस आज निघाली अवस
काळ आला होता पण वेळ नाही.
काखेत कळसा गावाला वळसा.
कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी.
कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ.
कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ.
कोल्ह्याला द्राक्षे आंबट.
कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही.
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
कशात काय अन फाटक्यात पाय.
केवड्याचे दान वाटले आणि गावात नगारे वाजले.
करून गेला गाव आणि कांदळकराचे नाव.
कुठे इंद्राचा ऐरावत,अन् कुठे शामभट्टाची तट्टाणी?
केल्याने होत आहे रे, म्हणून आधी केलेची पाहिजे.
काम नाही घरी अन् सांडून भरी.
कंबरेच सोडला आणि डोक्याला बांधला.
कण्हती कुथती, मलिद्याला उठती.
काजव्याकडून सुर्याची समीक्षा.
काम ऩ धंदा, हरी गोविंदा.
कावळ्याचे दांत शोधण्यासारखे.
कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा.
कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही.
कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं.
कोल्हा काकडीला राजी.
कंड भारी उड्या मारी.
काना मागुन आली तिखट झाली.
कुई म्हणलं तर कुल्ला कापीन.
कळना ना वळना, भाजी भाकरी गिळना.
कुणी सरी घातली म्हणून आपण फास घेऊ नये.
काडीची नाही खबर म्हणे मी अकबर.
मुळाक्षर ख

खाई त्याला खवखवे.
खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी.
खाणा-याचे खपते, कोठाराचे पोट दुखते.
खायला काळ भुईला भार.
खायला कोंडा अन निजेला धोंडा.
खाली मुंडी, पाताळ धुंडी.
खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं
खिशात नाय जाट पण इस्त्री मात्र ताठ
मुळाक्षर ग

गरज सरो,वैद्य मरो.
गरजवंताला अक्कल नसते.
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खल्ली.
गवयाचं पोर सुरात रडतं.
गाढवाला गुळाची चव काय?
गाढवी प्रेम अन लाथांचा सुकाळ
गाता गळा, शिंपता मळा.
गाढवापुढे वाचली गी��
 Sablesir: मनोरंजक ठरतात.

नमुन्यादाखल काही म्हणी पाहू –

अडली गाय फटके खाय – अडचणीत सापडलेल्या माणसाला अपमानास्पद शब्द ऐकून घ्यावे लागतात.
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक – एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते.
कसायाला गाय धार्जिणी – खापट माणसापुढे गरीब माणसे नमतात.
काप गेले पण भोके राहिली – अधिकार व संपत्ती जाते पण त्यापेक्ष्या अंगी बाणलेल पोकळ अभिमान मात्र कायम असतो.
काकडीची चोरी फाशीची शिक्षा – लहानशा अपराधासाठी फार मोठी शिक्षा होणे.
कामापुरता मामा – गरजेपुरता गोड बोलणारा.
कुंपणानेच शेत खाल्ले – रक्षकानेच चोय्रा केल्या.
जी खोड बाळा ती जन्म काळा – जन्मजात अंगी अरलेले गुण अगर दुर्गुण जन्मभर जात नाहीत.
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी – एकाच गावातील लोक एकमेकांना चांगले ओळखतात.

कोरड्याबरोबर ओले जळते – अपराध्याबरोबर निरपराध्यांनाही दोष दिला जातो.
**********************************

No comments:

Post a Comment