अंतराळवीर

निल आर्मस्टाँग
नील आर्मस्ट्राँग जन्म ५ऑगस्ट  १९३० हा एक अमेरिकनअंतराळयात्री, अंतरीक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता. आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाउल ठेवणारा जगातील पहिला मानव होता.नासाचे अपोलो ११ हे अंतराळयान आर्मस्ट्राँगने २० जुलै, इ.स. १९६९ रोजी २०:१७:३९ यूटीसी ह्या वेळेला चंद्रावर उतरवले व त्यानंतर काही तासांत (२१ जुलै, १९६९, २:५६ यूटीसी) त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाउल टाकले. आर्मस्ट्राँग हे दोन तास ३२ मिनिटे आणि आल्ड्रिन हे त्यांच्यापेक्षा १५ मिनिटे कमी काळ चंद्रावर होते. त्यांनी अमेरिकेचा ध्वज तिथे फडकावला. "ते मानवाचे एक छोटे पाऊल, सर्व मनुष्यजातीसाठी मोठी झेप आहे,' असे आर्मस्ट्राँग यांनी पृथ्वीवासीयांना रेडिओ संदेशाद्वारे सांगितले होते.मृत्यू २५ ऑगस्ट, २०१२ (८२ वर्ष)मृत्यूचे कारण हृदयशस्त्रक्रियोत्तर गुंतागुंत झाल्याने
**************************************
राकेश शर्मा 
राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.
भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयां साठी खुले केले.राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.पतियाळात जन्मलेला राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होता.नंतर च्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला.
***************************************
कल्पना चावला 
कल्‍पना चावला (मार्च १७ इ.स. १९६२:कर्नाल, हरयाणा -- फेब्रुवारी १ इ.स. २००३:टेक्सासवर अंतराळात) ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.व्यक्तिगत माहिती-कल्पना बनारसीलाल चावला यांचा जन्म कर्नाल, हरयाणा येथे झाला.
शिक्षण-कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अर्लिङ्ग्टनच्या टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण करून घेऊन, त्यांनी कोलोराडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली.
कार्य- डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला.
मृत्यू -१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्‍या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
*************************************
सुनिता विल्यम्स 
सुनीता विल्यम्स (सप्टेंबर १९, इ.स. १९६५ - हयात) ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहेत. तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे.
शिक्षण-• नीडहॅम हायस्कूलˌ नीडहॅम, १९८३.• बी.एस., पदार्थ विज्ञान, यू.एस. नेव्हल अकॅडेमी, १९८७.
• एम.एस., अभियांत्रिकी व्यवस्थापनˌ फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीˌ १९९५.
**************************************
अंतराळतिल प्रवास 
अंतराळ प्रवाशांचे अवकाशातील जीवन
सामान्यत:अंतराळ प्रवासी नळीद्वारे आपले अन्न घेतात.ही नळी तोंडात धरून दाबावी लागते.तर पाणी पिताना स्प्रेचा वापर करावा लागतो.आंघोळ म्हणजे ओल्या टॉवेलने अंग पुसून घेणे.अंतराळ यानात टेबल,खुर्च्या पक्के बसवाव्या लागतात नाही तर त्या यानात तरंगू लागतील.स्वत:अंतराळ प्रवाशांना देखील खुर्चीला पायाने घट्ट पकडून ठेवावे लागते अथवा बेल्टने बांधून घ्यावे लागते.
झोपण्यासाठी एक खास‘स्लिपिंग बॅग’यानास जोडलेली असते.तीत शिरून चेन पूर्णपणे बंद करूनच झोपावे लागते.कधीकधी अंतराळ यानाच्या दुरुस्तीसाठी यानाच्या बाहेर जाऊन काम करावे लागते अशावेळी अंतराळात चालावे लागते.यासाठी विशेष‘स्पेस सूट’चा वापर करावा लागतो.हा पोशाख त्यांना पृथ्वीवरील वातावरणासारखे वातावरण पुरवितो.हा पोशाख विविध स्तरांनी तयार केलेला असतो.त्वचेलगत पाण्यामुळे गार राहणाºया वस्त्रांचा थर असतो ज्यामुळे अतिरिक्त उष्णतेपासून बचाव होतो.वरचा थर मजबूत असा दाब नियमित असतो यातून प्राणवायुचा पुरवठा होत असतो आणि या सर्वांच्या वर‘कव्हर सूट’व डोक्यावर‘हेलमेट’.हे सर्व अंतराळातील घातक वस्तू व उत्सर्जनापासून रक्षण करतात.

********************

No comments:

Post a Comment