बोधकथा

बोधकथा 
******** 
बोधकथा                    

 दु:खाचा अनुभव
एक गुलाम राजाबरोबर जहाजातून  सागर पर्यटन करित होता. त्याने यापूर्वी  समुद्र कधीच पाहिला नव्हता. समुद्रातील लाटा जहाजावर आदळत होत्या. सगळीकडे पाणीच पाणी  दिसत होते. हे सगळे दृष्य पाहून तो गुलाम घाबरला. मोठ्याने ओरडू लागला. रडू लागला. सगळ्यांनी  त्याला सांगितले, तू घाबरू नकोस, आपण अगदी  सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याचा आरडाओरडा चालूच होता.
राजा गुलामाच्या  या ओरडण्यामुळे हैराण झाला. तो म्हणाला, अरे कुणीतरी या मुर्खाला शांत करा. याने अगदी  सारे आकाश डोक्यावर घेतले आहे. राजाने खलाशांनाही सांगितले पण गुलामास शांत करणे कोणालाच जमले नाही. शेवटी जहाजावरील एक वृद्ध व अनुभवी गृहस्थाने हे आव्हान स्वीकारले. त्याने दोर बांधून त्या गुलामास पाण्यात सोडले. दोनतीन वेळा पाण्यात त्याला डुबविले आणि  नंतर वर खेचून एका कोप-यात बसविले. तो एकदम गप्प बसला. तेव्हा सर्वांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी त्या वृद्धास विचारले हा गुलाम एवढा चुपचाप कसा झाला. तेव्हा तो वृद्ध म्हणाला, जहाजावर सुरक्षिता असतानाही त्याला तसा अनुभव नसल्यामुळे त्याला  ती वाटली  होती. पाण्यात बुडल्यावर काय होते याचा अनुभव जेव्हा त्याने घेतला. तेव्हा त्याला जहाजावरील सुरक्षिततेचे आणि स्वास्थ्याचे महत्त्व पटले. त्यामुळे तो आता शांत झाला. 
💐💐💐💐💐💐

तात्पर्य:- सुख, दु:ख या गोष्टी  सापेक्ष असतात. ज्याने दु:खाचा अनुभव घेतलेला नसतो. तो  ब-याच वेळा सुखालाही  दु:ख  समजतो. सुख दु:ख हे अनुभव आपल्या मनावर अवलंबून असतात. एकावाचून दुस-याला अर्थ व पूर्णत्व नाही.
*********************************
==============================
👦🏻बोधकथा👧🏻

एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता. त्या दिवशी शिकार काही मिळाली नाही. शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्यावर थांबला. हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणी प्यायला लागला,
एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला. तो भीतीने पळायला लागला. वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांन जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली. 
पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण उडाली. वर अस्वल, खाली वाघ! आता काय करायचं ? 

तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको. वर ये. मी तुला काही करणार नाही. मी वाघापासून जीव वाचविण्यासाठीच इथे आलोय." 

माणूस मग वर गेला. वाघ मात्र झाडाखाली बसून होता. रात्र झाली तशी माणसाला झोप लागली. हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला,   "हा परका माणूस. त्याला खाली ढकलून दे. माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही."  पण अस्वलानं तसं केलं नाही. 
थोड्या वेळानं माणसाला जाग आली. मग अस्वलानं जरा डोळे मिटले. वाघानं ही संधी साधली. तो माणसाला म्हणाला,  "अस्वलाला खाली ढकल. माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल." 

माणसानं क्षणाचाही विचार न करता अस्वलाला धक्का दिला. सुदैवाने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले होते. त्यामुळे ते पडलं नाही. 
पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला. ते म्हणालं, 
"मी तुझ्याशी दगा केला नाही. परंतु तू मात्र मला  फसवलंस. "पशूंवर" विश्वास ठेवता येतो, "माणसांवर" नाही, हे मला आज समजलं." 
                   👧🏻बोध👦🏻

 पाठीत खंजर खुपसुन कोणाचेही भले झाले नाही म्हणून  अस्वलाचे हे शब्द खरे ठरवायचे की खोटे, हे आपल्या हातात आहे.  
     ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.
      सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणार्या असतात,याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण  आयुष्यभर संपत नाही...!

🌺👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
********************************
============================= 
👦🏻बोधकथा👧🏻
एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात.
          खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते की,
     "लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत". 
  नवरा म्हणतो साबण संपला असेल. 
   दुसर्‍या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको परत तेच वाक्य म्हणते की, 
"लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत"
    कदाचित तिला कपडे चांगले धुता येत नसतील.
    नवरा फक्त ऐकून घेतो. असे रोजच चालते.
    एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहुन बायको नवर्‍याला म्हणते 
"अहो ऐकलंत का? 
    समोरच्या वहिनी सुधारल्या.
 त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते.
 आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत"
तेवढयात नवरा बोलतो
   "राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या. 
काचा आतून आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात. 
     समोरचे रोजच कपडे स्वच्छ धुवत होते. 
परंतु आपल्या खिडकीच्या काचा खराब असल्यामुळे त्यांची कपडे तुला खराब दिसत होती.
  समोरचे नाही आपणच सुधारलोय.

आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवून आपण दुसर्‍या कडे पाहिले पाहिजे.
        नेहमी नजरिया चांगला ठेवा,
जग खुप सुंदर आहे.
👦🏻🌺🌅👧🏻🌺
*******************************
===========================
**   बोधकथा ** 
👧🏻🌺🌅👦🏻🌺🌅🌺

1 आदमी ने भगवान बुद्ध से पुछा : जीवन का मूल्य क्या है?

बुद्ध ने उसे एक Stone दिया और कहा : जा और इस stone का
मूल्य पता करके आ , लेकिन ध्यान रखना stone को बेचना नही है I

वह आदमी stone को बाजार मे एक संतरे वाले के पास लेकर गया और बोला : इसकी कीमत क्या है?

संतरे वाला चमकीले stone को देखकर बोला, "12 संतरे लेजा और इसे मुझे दे जा"

आगे एक सब्जी वाले ने उस चमकीले stone को देखा और कहा
"एक बोरी आलू ले जा और इस stone को मेरे पास छोड़ जा"

आगे एक सोना बेचने वाले के
पास गया उसे stone दिखाया सुनार उस चमकीले stone को देखकर बोला, "50 लाख मे बेच दे" l

उसने मना कर दिया तो सुनार बोला "2 करोड़ मे दे दे या बता इसकी कीमत जो माँगेगा वह दूँगा तुझे..

उस आदमी ने सुनार से कहा मेरे गुरू ने इसे बेचने से मना किया है l

आगे हीरे बेचने वाले एक जौहरी के पास गया उसे stone दिखाया l

जौहरी ने जब उस बेसकीमती रुबी को देखा , तो पहले उसने रुबी के पास एक लाल कपडा बिछाया फिर उस बेसकीमती रुबी की परिक्रमा लगाई माथा टेका l

फिर जौहरी बोला , "कहा से लाया है ये बेसकीमती रुबी? सारी कायनात , सारी दुनिया को बेचकर भी इसकी कीमत नही लगाई जा सकती ये तो बेसकीमती है l"

वह आदमी हैरान परेशान होकर सीधे बुद्ध के पास आया l

अपनी आप बिती बताई और बोला "अब बताओ भगवान , मानवीय जीवन का मूल्य क्या है?

बुद्ध बोले :

संतरे वाले को दिखाया उसने इसकी कीमत "12 संतरे" की बताई l

सब्जी वाले के पास गया उसने इसकी कीमत "1 बोरी आलू" बताई l

आगे सुनार ने "2 करोड़" बताई lऔर जौहरी ने इसे "बेसकीमती" बताया l

अब ऐसा ही मानवीय मूल्य का भी है l

तू बेशक हीरा है..!!लेकिन, सामने वाला तेरी कीमत,
अपनी औकात - अपनी जानकारी - अपनी हैसियत से लगाएगा।

घबराओ मत दुनिया में.. तुझे पहचानने वाले भी मिल जायेगे।

👧🏻🌺🌅👦🏻🌺🌅🌺
*********************************
==============================
साप आणि विद्यार्थि 
👦🏻🌺🌅👧🏻🌅🌺
एक बोधकथा

 वाचाच एकदा
एकदा एका मुलाने साप पाळला. तो त्या सापावर प्रेम करत होता आणि त्याच्यासमवेतच घरी रहात होता. एकदा साप आजारी पडला. त्याने खाणे-पिणे सोडून अनेक दिवस झाले.त्यामुळे मुलाला त्याची काळजी वाटली. मुलाने त्याला एका पशुवैद्याकडे नेले. पशुवैद्याने सापाला पडताळल्यानंतर पशुवैद्याचे त्या मुलाशी पुढील संभाषण झाले.

पशुवैद्य : साप तुझ्याबरोबरच झोपतो का ?

मुलगा : हो.

पशुवैद्य : साप तुला अगदी चिकटून झोपतो का ?

मुलगा : हो.

पशुवैद्य : रात्री साप संपूर्ण शरीर ताणतो का ?

मुलगा (अतिशय आश्चर्याने ) : हो, वैद्यजी ! हा रात्री शरीर पूर्णपणे ताणतो; पण मला त्याची ही स्थिती पहावत नाही आणि मी कुठल्याही प्रकारे त्याचे हे दुःख दूर करण्यास असमर्थ आहे !

पशुवैद्य : या सापाला कोणताच आजार झालेला नाही. जेव्हा रात्री हा शरीर पूर्णपणे ताणतो, तेव्हा प्रत्यक्षात तो तुला गिळण्यासाठी त्याचे शरीर तुझ्या लांबीएवढे करण्याचा प्रयत्न
करतो. तो सतत अनुमान घेत आहे, तुझे पूर्ण शरीर चांगल्या प्रकारे गिळता येईल कि नाही ....अन् गिळलेच, तर तो पचवू शकेल कि नाही ? ?...

या गोष्टीवरून हे शिकायला मिळते की, जे तुमच्यासमवेत सतत असतात, ज्यांच्यासमवेत तुम्ही खाता-पिता, बसता किंवा
झोपता, ते सगळेच तुमच्यावर तेवढेच प्रेम करतात, असे नाही. त्यातील काही जण तुम्हाला गिळण्यासाठी स्वतःचा आकार हळूहळू मोठा करत असतात आणि तुम्ही भावनिक होऊन
त्यांची स्थिती पाहून द्रवत असता 
तेव्हा 🐍जरा सांभाळून

    तात्पर्य - मैत्रीचा बुरखा पांघरणाऱ्या सापांना जरा दूर ठेवा

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
********************************
=============================
बोधकथा
एका जंगलात एक कावळा रहात होता. आपला दिवस आनंदाने आणि सुखाने घालवत तो आयुष्य काढत होता. आपण अत्यंत सुखी आहोत अस त्याला वाटायचं आणि त्याच आनंदात तो जगत होता. एक दिवस जंगलातल्या तळ्याकाठी बसला असताना त्याला त्या तळ्यात पोहोत असलेला राजहंस दिसला. तो पांढराशुभ्र आणि डौलदार पक्षी पाहून तो थोडा हिरमुसला आणि विचार करू लागला," मी असा काळा कुळकुळीत एकदम आणि हा पक्षी एकदम शुभ्र, खरच हाच जगातला सर्वात सुखी पक्षी असावा, मी उगाचंच मला सुखी समजत होतो " असा विचार करत तो त्या राजहंसाकडे गेला आणि त्याला आपल्या या भावना बोलून दाखवल्या. तो राजहंसही म्हणाला," खरं आहे मित्रा तुझं, मी ही समजत होतो असं, पण एके दिवशी मी एका पोपटाला पाहिलं , मला एक रंग आहे पण त्याला दोन रंग होते, खरच तो माझ्यापेक्षा सुखी असणार रे "
मग हा कावळा पोपटाच्या शोधात निघाला. एका पोपटाला गाठून त्याने सगळी कथा ऐकवली. तो पोपट हसत म्हणाला ," माझा ही समज असाच होता,मी स्वतःला खरच सुखी समजत होतो पण एके दिवशी मी एका मोराला पाहिलं आणि मला जाणवलं कि तोच सगळ्यात सुखी पक्षी आहे पृथ्वीवर , कारण त्याच्या अंगावर अगणित रंग आहेत "
हे ऐकून कावळा अजून संभ्रमित झाला. आणि मोराच्या शोधात निघाला. एका प्राणी संग्रहालयात एका पिंजर्यात त्याला एक मोर दिसला. शेकडो लोकं त्याच्या भोवती गोळा होवून त्याचं गुणगान करत होते. आता कावळ्याला खात्री पटली कि हाच जगातला सर्वात सुखी पक्षी. काही वेळाने सर्व लोक निघून गेल्यावर हा त्याच्या पिंजऱ्याजवळ गेला आणि आत्तापर्यंत झालेला सगळा घटनाक्रम त्याला ऐकवला आणि म्हणाला," मयुरराज, आपण खरच खूप सुंदर आहात, रोज हजारो लोक तुम्हाला पाहायला येतात आणि तुमची स्तुती करतात , मला मात्र कुठं गेलं कि हुसकावून लावतात, आपण सगळ्यात सुखी पक्षी आहात या भूतलावर !!
तो मोर खिन्नपणे हसत म्हणाला," मला ही सगळ्यात सुंदर आणि सुखी पक्षी असल्याचा अभिमान होता मित्रा पण माझ्या या सौंदर्यामुळे मी पिंजर्यात अडकलोय, सगळं प्राणी संग्रहालय फिरून बघ तुला इथे सगळे पक्षी दिसतील पिंजर्यात पण कावळा नाही दिसणार कुठे , आणि त्यामुळे मी असा निष्कर्ष काढतोय सध्या कि कावळा हा सर्वात सुखी पक्षी आहे कारण तो त्याच्या मर्जीने कुठेही उडू शकतो आणि जावू शकतो ….!

आपण नेहेमी समजत असतो कि आपले नातेवाईक , मित्र ,सहकारी , आजूबाजूचे लोक हे जास्त सुखी आहेत आपल्यापेक्षा, पण प्रत्यक्षात काही वेगळाच असतं. "भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी ?" ह्या प्रश्नाचं उत्तर शोधतच आपली जिंदगी चालली आहे.
प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीने दु:खं आहे आणि सुख ही आहे , त्यांच्या नशीबावर आपलं नशीब घासत बसून उपयोग नाही, आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा कारण समर्थ सांगून गेलेत
" जगी सर्व सुखी असा कोण आहे ?

विचारी मना तूच शोधोनी पाहे …!!!"👧🏻👦🏻🌺🌅
**********************************
अलेकझांडर 
🌈🌈 बोधकथा 🌈🌈 

🎯 जगज्जेत्ताअलेक्झांडर🎯 

जवळजवळ संपूर्ण जग जिंकून आपल्या सैन्यासह
माघारी आपल्या देशात परतत होता. 

परत जाताना तो अतिशय गंभीर आजारी झाला.

अनेक उत्कृष्ट उपाय करूनही आजारातून बरे
होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती.

जिंकलेले संपूर्ण साम्राज्ज्य, एवढी मोठी शूर
सेना, आपली जगज्जेती तीक्ष्ण तलवार
आणी अमाप संपत्ती, ह्या सर्वांचा त्याग करून
आपणाला आता मृत्त्युला सामोरे जावे लागणार
ह्याची त्याला जाणीव झाली. आपण
आता कोणत्याही परिस्थितीत जिवंत
आपल्या मायदेशी पोहचू शकत नाही हे
त्याला कळून चुकले.

मृत्त्युच्या शेवटच्या घटका मोजत
असताना त्याने आपल्या सरदाराला पाचारण
केले आणी म्हणाला ” मी आता लवकरच हे जग
सोडून निघून जाणार आहो, माझ्या तीन
इच्छा आहेत आणी त्या पूर्ण
करण्याची तुमची जबाबदारी आहे”

सरदाराला साश्रूपूर्ण होय म्हणण्याशिवाय
गत्त्यंतर नव्हते.

 अलेक्झांदर म्हणाला:
१. माझी पहिली इच्छा “
माझ्या खाजगी डॉक्टरनेच
माझी शवपेटिका एकट्यानेच उचलून न्यावी”
२. माझी दुसरी इच्छा “
माझी शवपेटिका स्मशानभूमीवर
नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत
जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून
ठेवावे”
३. आणि माझी अंतिम इच्छा ” माझे
दोन्ही हात शवपेटिकेच्या बाहेर काढून
लोंबकळत ठेवावे”

आपला राजा आपणाला 
कायमचे सोडून जाणार,
सर्व सेना अतिशय दुखी झाली. सरदाराने
इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले,
तरी देखील हिम्मत करून प्रश्न विचारला
” हे राजन, ह्या कसल्या विचित्र इच्छा”, राजाने
एक दीर्घ श्वास
घेतला आणी म्हणाला “माझ्या आयुष्यात मी जे
काही आता शिकलो ते सर्व जगाला माहित
व्हावे म्हणूनच ह्या तीन इच्छांची पूर्तता करणे
गरजेचे आहे”
माझ्या खाजगी डॉक्टरनेच
माझी शवपेटिका एकट्यानेच उचलून
न्यावी ह्यातून मला जगाला एक संदेश
द्यावयाचा आहे. जगातील कोणीही उत्कृष्ट
डॉक्टर देखील तुम्हाला मरणापासून वाचवू
शकत नाही.मरण हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे
जीवन हे गृहीत न धरता ते चांगल्या प्रकारे
कोणालाही न दुखावता कसे जगता येईल
हा प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे
गरजेचे आहे.
जगज्जेत्ता म्हणून नावलौकिक प्राप्त
करण्यासाठी मी आयुष्यभर सतत लढाया केल्या,
अपार संपत्ती गोळा केली,पण मरताना मात्र
मी काहीच घेवून जाणार नाही,
 म्हणूनच
माझी दुसरी इच्छा 
“माझी शवपेटिका स्मशानभूमीवर
नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत
जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून
ठेवावे” केवळ संपत्ती कोणत्याही प्रकारे
जमविणे म्हणजेच जीवन नाही हा संदेश
लोकांना मिळेल
आणी अशी संपत्ती मिळण्यासाठी केलेली
धावाधाव म्हणजेच जीवनातील अमुल्य
वेळेचा कालापव्य.
जनतेला कळू द्या मी रिकाम्या हातानेच
ह्या जगात आलो आणी रिकाम्या हातानेच हे
जग सोडून जात आहो,म्हणून
माझी तिसरी इच्छा 
” माझे दोन्ही हात
शवपेटिकेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे” हे
सर्व सांगून थोड्याच वेळात त्याचा मृत्त्यू
झाला.

🌈🌈 तात्पर्य🌈🌈 

नको नको मना गुंतू माया जाळी
काळ आला जवळी ग्रासावया
जेव्हा काळाची ऊडी पडेल तेव्हा
कोणीही वाचवू शकत नाही
सगळ ईथेच ठेवुन जायचे आहे.
एक माणुस म्हणुन या संसारात वागा.
🎯"चांगली कर्मे करा"


🌕 वर्तमानपत्रातून संकलन 🌕
**********************************
👦🏻एकीचे बळ सर्वश्रेष्‍ठ👧🏻

एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्‍याने खड्ड्यात पडलेल्‍या जंगली कुत्र्याच्‍या पिलाचा जीव वाचवला तेव्‍हापासून त्‍याला त्‍या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्‍याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्‍याच्‍याजवळ येत असत. परंतु त्‍यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्‍त करून सोडले होते. तो रोज त्‍यांच्‍यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्‍या माथ्‍यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्‍याच्‍यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्‍या कुत्र्याच्‍या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्‍याच्‍यावर धाव घेतली व त्‍याच्‍यावर हल्‍ला करून त्‍याला ठार केले.

तात्‍पर्य :- एकीचे बळ मोठे असते.
*********************************
 N•R•Sable              👧🏻वक्ता आणि श्रोते👦🏻

एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्‍हा श्रोत्‍यांचे आपल्‍या व्‍याख्‍यानाकडे अवधान खेचून आणण्‍यासाठी वक्त्याने एक गोष्‍ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्‍याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्‍ट ऐकू लागले. वक्ता म्‍हणाला,'एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्‍या प्रवासाला निघाले. चालता चालता त्‍यांना वाटेत एक नदी लागली. चि‍मणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्‍यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्‍स इतकेच असे सांगून वक्‍त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्‍याने कशी काय नदी पार केली. त्‍या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्‍त्‍याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्‍हा ती नदी पार करून जाण्‍याचे सामर्थ्‍य त्‍याच्‍याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्‍यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्‍याला बाजूला सारून जाण्‍याचीही 
त्‍याच्‍यात होती पण तो अलिकडच्याच 
तीरावर थांबला.'' श्रोत्‍यांनी मोठ्या उत्‍कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्‍याचे कारण काय. यावर वक्ता म्‍हणाला,'' ज्‍या मूर्खाना महत्‍वाच्‍या विषयावरचे असणारे व्‍याख्‍यान न आवडता मनोरंजक गोष्‍टी आवडतात त्‍या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्‍ही या महत्‍वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्‍यावर काही उपाय केले व आपल्‍या राज्‍याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्‍या तीरावर निघून जाईल'' वक्‍त्‍याचा 
चतुरपणा कामी आला व श्रोत्‍यांनी पुढील व्याख्‍यान शांतपणे ऐकून घेतले.


तात्‍पर्य :- काहीवेळेस आपल्‍या चांगल्या व देशहिताच्‍या योजना लोकांच्‍या गळी उतरविण्‍यासाठी युक्तीप्रयु‍क्तीचा वापर करावाच लागतो.
**********************************
👧🏻सवय👦🏻

एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते 
दार उघडे टाकून निघून गेला असता 
पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व
मरून गेला.
तात्‍पर्य : - जास्‍त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.  
*********************************
 👧🏻स्‍वावलंबन👦🏻

एक माणूस कामासाठी दुस-या शहरात गेला. प्रवासात त्‍याची काही लोकांशी ओळख झाली. तेही कामानिमित्ताने त्‍याच शहरात चालले होते. त्‍यांच्‍यापैकी काहीजण पायी तर काही घोड्यावर स्‍वार होते. बोलत चालले असताना एका घोडेस्‍वाराच्‍या हातून चाबूक खाली पडला. त्‍या व्‍यक्तिने त्‍या घोडेस्‍वारास खाली उतरू न देता, चाबूक देण्‍याची तयारी दर्शविली पण त्‍या सहका-यास नम्रपणे नकार देत स्‍वत: खाली उतरून त्‍या घोडेस्‍वाराने चाबूक स्‍वत:च हातात घेतला. 
खालून मदत करणा-या व्‍यक्तिने याचे कारण घोडेस्‍वारास विचारले असता घोडेस्‍वार उत्तरला,''आपण ज्‍यावेळी घोड्यावर बसतो तेव्‍हा चाबूक आपणच सांभाळावा लागतो. आपण प्रत्‍येक गोष्‍टीत स्‍वयंपूर्ण राहिलो तरच आपल्‍याला यशाची खात्री आहे असे समजावे.''

तात्‍पर्य :- कुणावरही विसंबून न राहता स्‍वावलंबनाचा स्‍वीकार केल्‍याने यश मिळतेच
 N•R•Sable बोधकथा.
**********************************
👧🏻मनाची शुद्धता👦🏻

दोन तरुण साधु उंच डोंगरावर असणाऱ्या आपल्या मठाकडे निघाले होते. रस्त्यामध्ये एक ओढा होता. तो ओढा खूप पाण्याने भरलेला असून खोलही होता. त्या ओढ्याच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार करून पलीकडील बाजूस असणाऱ्या गावात जायचे होते. पण ओढ्याला असणाऱ्या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती. पावसाळ्याचे दिवस होते, पाउस पडत होता, ओढा जोराने खळखळत वाहत होता. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे होते. पाण्याला ओढ जास्त असल्याने ती एकट्याने पाण्यात उतरण्याचे धाडस करत नव्हती. दोन साधुंपैकी एका साधूने हे दृश्य पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही. खूप वेळ घुश्यात चालल्यावर त्या साधूने दुसऱ्या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला,"मित्र! बरेच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही तरी खुपते आहे.तेंव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग." तो दुसरा साधू म्हणाला,"हे मित्रा, आपल्या संप्रदायामध्ये स्त्री स्पर्श सुद्धा वर्ज्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही. स्त्रीकडे बघणे, स्पर्श करणे हे महत्पाप तू केले आहेस. तेंव्हा तू माझ्या मनातून उतरला आहेस." त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला,"असं आहे तुझ्या नाराजीचे कारण! पण मित्रा, ती स्त्री जेंव्हा माझ्या खांद्यावरून उतरली तेंव्हाच मी तिला सोडले, मात्र तू अजूनही तिला मनात बाळगून  आहेस. मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस. संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो. ज्यावेळी त्या स्त्रीला मी उचलून खांद्यावर घेतले तेंव्हाही माझ्या मनात फक्त सेवेची भावना होती मग ती स्त्री आहे का पुरुष याचा मी विचार केला नाही. मनातून सुद्धा विकार जर संपविता आले तरच साधुपण आले असे समजता येईल आणि मग त्यासाठी संन्यास घेण्याचीही आवश्यकता नाही. गृहस्थ राहूनही जर विकारांवर नियंत्रण करता आले तर त्या व्यक्तीला साधुपण मिळेल."

तात्पर्य- मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलेच होते. मनात पाप ठेवून चांगले बनता येत नाही.                *********************************
 N•R•Sable:           👦🏻वेडे सांबर👧🏻

एक सांबर नदीत आपले रूप पाहत होते. पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, ''अहाहा, ही माझी शिंगे किती छानदार आहेत! ही किती शोभिवंत दिसतात! अशी चांगली शिंगे देवाने कोणालाही दिली नाहीत! पण हे पाय बाकी फारच वाईट आहेत! किती रोडके आणि घाणेरडे आहेत! अरेरे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते तर किती बरे झाले असते!'' सांबर असा विचार करीत आहे तोच काही शिकारी तेथे आले! पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पुढे पळू लागले व पारधी मागे पाठलाग करू लागले. पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली. सांबराने बरीच खटपट केली तरी शिंगे काही निघेनात! अखेर शिकारी लोकांनी येऊन सांबराला ठार मारले! मरताना ते बोलले, ''अरेरे, उगीच मी या पायाला नावे ठेवली! तेच बिचारे मला पळताना उपयोगी पडले! पण या शिंगांनी बाकी माझा जीव घेतला!''

तात्पर्य =जे वरून चांगले दिसते तेच चांगले नसते! जे उपयोगी पडते तेच खरोखर चांगले!
*********************************
👧🏻 उंदीर, कोंबडा आणि मांजर👦🏻

एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, "आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.
तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही
*********************************
 N•R•Sable                 👧🏻 संगत👦🏻     
एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!
तात्पर्य : शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.   
**********************************                     N•R•Sable                          एक म्हातारी आजीबाई होती . ती दररोज शिवणकाम करत असे. नेहमी काहीतरी शिवत असे. म्हातारीचे शिवणकाम चालते , हे सर्वाना माहित होते. 
      एका दिवशी संध्याकाळची वेळ होती . सुर्य मावळला होता. संघीप्रकाश कायम होता. घरातले दिसत नसले तरी अंगणातले मात्र दिसत होते . आणि अंगणभर फिरुन ही आजीबाई काहीतरी शोधत होती.
     म्हातार्‍या आजीचे काहीतरी हरवले आहे. ते शोधण्याचा ती प्रयत्न करत होती. हे काही लोकांनी पाहिले . ते आजीजवळ आले आणि त्यांनी तिला विचारले,  “ आजीबाई तुम्ही या अंगणात काय शोधताय ? ” आजीने त्यांना सांगीतले की, ती शिवणकाम करत होती आणि काम करता करता तिच्या हातून सुई पडली . पडलेली सुई शोधण्याचा ती प्रयत्न करत होती.
        लोकांनी सुई शोधायला सुरुवात केली . अंगणभर त्यांनी सुई शोधली पण सुई काही सापड्ली नाही. शेवटी थकुन ते आजीबाई जवळ आले आणि सुई नेमकी कुठे पड्ली ते विचारले .
    म्हातारी म्हणाली, सुई घराच्या आतमध्ये पडली होती. परंतू घरात खुप अंधार आहे . अंधारात सुई शोधणे शक्य नाही . म्हणुन मी अंगणात , उजेडात सुई शोधत होती. लोकांनी कपाळावर हात मारुन घेतला. “ म्हातारीला वेड लागले ” असे म्हणुन तेथून ते लोक निघुन गेले.
      आम्ही माणसे या म्हातारी प्रमाणेच वागत नाही काय ?संत – महात्म्यांनी सांगुन ठेवले. ईश्वर मनुष्याच्या आत आहे . तो मनुष्याच्या हृदयामध्ये बसतो . पण आत शोधणे कठीण . बाहेर – अंगणात शोधणे सोपे . म्हणुन मग आम्ही ईश्वराला , मंदिर , मस्जिद , चर्च, मध्ये शोधतोय . दगड आणि मुर्तीमध्ये शोधतोय . पण म्हातारीची सुई जर घरात पडली असेल, तर ती अंगणामध्ये सापडू शकत नाही , हे आम्हाला पटकन लक्षात येते . परंतू मानवाला हृदयात राहणारा ईश्वर,  मंदिर - मस्जिद - चर्च – दगड मुर्तीमध्ये सापडणे शक्य नाही , हे मानवाला का कळू नये ?  
*********************************              👦🏻 लांडगा आणि ससा 👧🏻
एक लांडगा  जंगलात खुप भुकेला होउन हिंडत होता. पण त्याला शिकार मिळत नव्हती. फिरता फिरता एका झाडाच्या ढोलीत त्याला एक ससा बसलेला दिसला आणि लांडग याला  खुप आनंद झाला. लांडगा आपल्याच दिशेने येतो आहे हे पाहून सावध झालेला ससा ढोलीतुन उडी मारून जोरात पळत सुटला. लांडगाही त्याच्या मागे धावू  लागला. पण शेवटी ससा जोरजोरात पळत खुप पुढे निघून गेला. लांडगा आधीच भुकेलेला आणि आता पळून पळून थकला होता तो एका झाडाखाली विश्रांती साठी बसला. इतकावेळ ससा आणि  लांडग्याची पळापळ झाडावर बसलेला एक कावळा पाहत होता. त्याने खवचटपणे लांडग्याला विचारले, " काय हे , एवढासा ससा तुझ्या हातात सापडला नाही ? असं झाल तर तुझा धाक कसा राहील ?" त्यावर स्वःताची बाजू सावरत लबाड लांडगा म्हणाला," त्याला त्याच्या जीवाची भीती होती म्हणून तो जीवानिशी धावत होता. हे माझ्या लक्षात आल्यावर मी त्याला सोडून दिलं. दुसऱ्याच चांगल होण्यासाठी स्वतःचा थोडा तोटा झाला तरी तो सोसायला हवा. "
तात्पर्य :- 

साधला तर स्वार्थ नाहीतर परमार्थ .
*********************************
👧🏻गर्विष्ठ मेणबत्ती👦🏻

साबळ॓सर👦🏻

एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलाविले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठया मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते, ते पाहून मेणबत्तीला स्वत:चा अभिमान वाटला, आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, "ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही. त्या वेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो, चंद्रसूर्यही माझ्यापुढेही क्षुद्र वाटतात.' तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटविली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, 'अगं वेडे आता तरी प्रकाश दे, एवढयाशा झुळकेने विझतेस, चंद्रसूर्याला क्षुद्र समजतेस त्यांच्यापेक्षा श़ेष्ठ असल्याची मिजास करतेस. चंद्रसूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेने विझून गेले आहेत का?'                     👧🏻तात्पर्य : आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे
**********************************
👧🏻हरिण व कोल्हा👦🏻

साबळ॓ एन आर 


एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'                                  👧🏻 तात्पर्य  'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.'
*********************************
👦🏻कुत्र्याची दूरदृष्टी👧🏻
             साबळ॓ एन आर      
एका डोंगरमाथ्यावर एक शेतकरी राहात होता. कडाक्याची थंडी पडली होती. बरेच दिवस तो शेतकरी बाहेर पडला नव्हता. झोपडीत होते तेवढे धान्य संपले. उपासमार होऊ नये म्हणून त्याने आपल्या एकेक मेंढीला कापून खाल्ले. मेंढया संपल्यानंतर बैल मारले. हे त्याचे कुत्रा रोज पहात होता. त्याने मनाशी विचार केला. 'माणूस किती कृतघ्न असतो? स्वत:चे प्राण वाचविण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन पोहोचतो, धान्य संपले, मग मेंढया, मेंढया संपल्यावर बैल, कदाचित बैल संपल्यावर हा आपल्यालाही मारून खाईल, त्यापेक्षा आपण इथून पळून जाणेच चांगले' असा विचार करून कुत्रा तेथून पळून गेला.

👦🏻तात्पर्य 'अडचणीत सापडलेला मनूष्य स्वत:ची सुटका करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन पोहोचतो.
*********************************
👧🏻पोपटपंची विद्या👦🏻
साबळ॓ एन आर 
एका गावात चार ब्राह्मणपुत्र होते. त्यांची मोठी मैत्री होती. एकदा त्यांनी विचार केला. या गावात राहण्यात काही फायदा नाही. आपण दुसऱ्या देशाला जाऊन काहीतरी विद्या मिळविली पाहिजे. काही पाठांतर केले पाहिजे. मग विद्येच्या बळावर आपल्याला मान सन्मान, पैसा मिळेल.

असा विचार करून ते चौघे प्रवासाला निघाले. एका गावातील पाठशाळेत जाऊन त्यांनी विद्याभ्यास सुरू केला. अनेक मंत्र पाठ केले. अध्ययन संपल्यावर ते आपल्या गावाकडे निघाले. वाटेत त्यांना मेलेल्या प्राण्याचा सांगाडा दिसला. तो पाहताच पहिला पंडित म्हणाला, "मी माझ्या जवळच्या मंत्र सामर्थ्याने या सांगाड्यात रक्त आणि मांस भरतो.' असे बोलून त्याने त्या सांगाड्यात रक्त-मांस भरले. मग दुसरा पंडित म्हणाला, "रक्त मांस भरलेल्या सांगाड्यावर कातडी चढविण्याची विद्या मला येते.' असे सांगून त्याने त्या सांगाड्यावर कातडे चढविले. मग तिसरा पंडित म्हणाला, " मी अशा प्राण्यात इतर अवयव भरण्यास शिकलो आहे. असे बोलून त्याने त्या सांगाड्यात इतर सर्व अवयव भरले. त्याच क्षणी भयंकर अशा सिंहाचे शरीर उभे राहिले. मग चौथा पंडित म्हणाला, "मला या निर्जीव प्राण्यात प्राण निर्माण करण्याची विद्या येते.' असे सांगून त्याने प्राणमंत्र म्हणताच, सिंह जिवंत झाला. त्याने एकाच फटक्यात त्या चौघा मूर्ख पंडितांना ठार मारले.  तात्पर्य :
**********************************
👧🏻दोन कोल्हे👦🏻                             साबळ॓  एन आर 

एकदा दोन कोल्ह्यांनी कोंबड्याच्या खुराड्यात शिरण्याची एक युक्ती योजली व ती लगेच अंमलात आणली. खुराड्यात प्रवेश होताच कोंबड्या व त्यांची पिले यांना मारून खाण्याचा त्यांनी सपाटा चालविला. त्या कोह्यांपैकी एक कोल्हा तरुण व अविचारी होता. त्याचे मत असे झाले, की सगळ्या कोंबड्या लगेच मारून खाव्यात. दुसरा म्हातारा कोल्हा अनुभवी असल्याने त्याने असे ठरविले, की काही कोंबड्या दुसऱ्या दिवसाकरता राखून ठेवाव्यात. तो तरुण कोल्ह्यास म्हणाला, मुला, मी अनुभवाने शहाणा झालो आहे अन्‌ या जगात कितीतरी अकल्पित गोष्टी घडलेल्या पाहिल्या आहेत. तेव्हा आजच हा खाण्याचा साठा न संपवता त्याचा काही भाग शिल्लक ठेवावा हे चांगलं.' त्यावर तरुण कोल्हा म्हणाला, "तू म्हणतोस ते खरे, पण माझा तर असा निश्चय आहे, की पुढल्या आठ दिवसांचं खाणं आजच एकदम खऊन टाकावं. कारण या कोंबड्यांचा मालक इथे आता पहारा करत बसेल अन्‌ आम्हाला पकडून आमचा जीव घेईल. तर अशा वेळी पुन: येथे येण्याच्या भानगडीत पडणं वेडेपणाचं नाही काय?' आपले मत सांगून तो त्याप्रमाने वागू लागला. तरुण कोल्ह्याने इतक्या कोंबड्या खाल्ल्या, की त्याचे पोट फुगून फुटले व तो मरण पावला. म्हाताऱ्या कोह्याने एकदोन कोंबड्या खाऊन दुसऱ्या दिवशी पुन: येण्याचे ठरविले. दुुसऱ्या दिवशी तो त्या ठिकाणी आला असता कोंबड्यांच्या मालकाने त्याला पकडले व ठार केले.          

👧🏻तात्पर्य   तरुण लोक अधाशीपणामुळे तर म्हातारे लोक लोभामुळे दु:ख भोगतात.
*********************************
👦🏻गाढवाचा गैरसमज👧🏻

साबळ॓सर 

एका पाथरवटाने देवाच्या सुंदर मूर्ती बनवल्या. विकण्यासाठी बाजारात न्याव्यात म्हणून त्याने आपल्या गाढवावर त्या मूर्ती लादल्या व तो बाजाराच्या दिशेने निघाला. दगडात कोरलेल्या त्या देवांच्या मूर्ती पाहून येणारे सहजच हात जोडून मूर्तींना नमस्कार करीत. पण नमस्कार त्या देवाच्या मूर्तींना आहे हे त्या मूर्ख गाढवाला कळले नाही. त्याला वाटे जो तो आपल्यालाच नमस्कार करतोय. त्यामुळे स्वत:ला कोणी तरी मोठा समजून गाढव एक पाऊलही पुढे टाकीना. बराच वेळ पाथरवटाच्या लक्षात येईना. गाढव अडलंय का? आणि जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा हातातल्या काठीचा जोरदार फटका हाणत पाथरवटा म्हणाला, "प्रत्येक माणूस तुला नमस्कार करतोय आणि तू कोणी महान आहेस असं तुला वाटतंय. पण मूर्खा, लोक नमस्कार त्या मूर्तींना करताहेत. आता चल नाही तर आणखी मार खाशील.' 👦🏻तात्पर्य : खोट्या अहंकाराने फजितीची वेळ येतेच.
**********************************
👧🏻अन्यायी कुबेर👦🏻
साबळ॓सर

एक संत माणूस मेल्यानंतर स्वर्गात गेला. तेथे सर्व देवांची सभा भरली होती. त्याने सर्व देवांना नमस्कार केला पण कुबेराला मात्र त्याने नमस्कार केला नाही. हे पाहून देवांचा राजा इंद्र याने त्याला विचारले, "हे पुण्यात्मा तू कुबेराला का नमस्कार केला नाहीस? त्यावर तो संत पुरुष म्हणाला, "अहो, देवाधिदेवांनो हा कुबेर मोठा अन्यायी आहे. याने पृथ्वीवर संपत्तीचे वाटप करताना कोणाला भरपूर धन दिले तर कुणाला थोडे, तर कुणाला अजिबात नाही. त्यामुळे पृथ्वीवर होणाऱ्या अनेक पापांना व अपराधांना कुबेरच जबाबदार आहे. संपत्तीच्या असमान वाटपामुळे गोरगरीब दु:खी झाले आहेत.  

👧🏻तात्पर्य : गरिबांसारखीच धनिकांनाही पापे करण्याची वेळ येते.
**********************************
👦🏻प्रेमळ बोल👧🏻           साबळेसर


एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला. त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, "अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत असता, तू असा पळून का जातोस? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो' यावर तो कोंबडा म्हणाला, "अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले असल्याने, त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.' तात्पर्य : प्रेमळ बोलणाऱ्याच्या मनात प्रेम असतेच असे नाही. बऱ्याच वेळा कपटही पण असते
**********************************
👧🏻खेकडा👦🏻
एक खेकडा समुद्र किना-यावर फिरताना स्वत:च्या पायांमुळे होणारी नक्षी पहात होता.
तेव्हढ्यात समुद्राच्या लाटेने ती नक्षी पुसली गेली.
ते पाहुन खेकडा लाटेस म्हणाला, *"मी तर तुला माझी जवळची मैञिण समजत होतो आणी तरीही तू माझी छान नक्षी पुसून टाकलीस."*
त्यावर लाट म्हणाली , *"अरे या नक्षीच्या मागावरच मासेमार तुला शोधुन पकडेल म्हणून मी नक्षी पुसली.."*
🙏मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे.
नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा......!

*👉🏻बोध-आपल्या माणसाला किंमत द्यायला शिका!*
**********************************

No comments:

Post a Comment