सांघिक खेळ मैदाने

हॉकी 
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे.
हॉकीमध्ये पुरूष व महिलांसाठी नियमितपणे भरवल्या जाणार्‍या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. त्यांत ऑलिंपिक, कॉमनवेल्थ खेळ, हॉकी विश्वचषक , चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक या स्पर्धांचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन (एफ आय एच) ही या खेळाची सर्वोच्च संघटना आहे. ही संघटना हॉकी विश्वचषक व महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करते तसेच खेळांची नियमावली ठरवते. हाॅकी खेळात ३५-३५ मिनिटांचे दोन हाफ असतात तर दोन हाफच्यामध्ये १० मिनिटांचा ब्रेक असतो.
अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात फुटबॉल व क्रिकेटनंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी सामने पुरूष आणि महिला खेळतात.
ज्या देशात हिवाळ्यामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ [मराठी शब्द सुचवा] इंडोअर खेळला जातो. इंडोअर फील्ड हॉकीचे नियम नेहमीच्या हॉकीपेक्षा वेगळे आहेत. उदा. एका संघात नियमित ११ ऐवजी फक्त, ६ खेळाडू असतात. मैदानाचा आकार बहुधा ४० मी x २० मीटर असा असतो. [मराठी शब्द सुचवा] शूटिंग सर्कल ९ मीटर आकारमानाचे असते.. मैदानाला सीमांऐवजी [मराठी शब्द सुचवा] बॅरियर्स असतात.
हॉकीचे मैदान १०० यार्ड (९० मीटर्स) लांब आणि ६० यार्डस् (५५ मीटर्स) रुंद असते. हॉकीसाठी वापरल्या जाणा-या बॉलचं वजन १५६ ग्रॅम्स ते १६३ ग्रॅम्स इतकं असतं. बॉलचा व्यास ८.८१ इंच ते ९.२५ इंच इतका असतो. हॉकी स्टीक डाव्या बाजूने सपाट असते आणि वजन साधारणपणे १२ ते २८ पाउंडस् इतकं असतं. हॉकीचा गेम सुरू करण्यापूर्वी दोन्ही संघातील एक एक खेळडू आपापली हॉकी स्टीक जमिनीवर व एकमेकांच्या हॉकीस्टीकवर आदळतात. आणि खेळ सुरू होतो. मैदानाच्या रुंदीकडील भागाला जोडणा-या रेषेला 'गोल लाईन' म्हणतात. संपूर्ण मैदानाचे दोन समान भाग करणाऱ्या आणि गोल लाईनला समांतर जाणा-या मध्यभागातील रेषेला फिफ्टी यार्ड-लाईन किंवा सेंटर लाईन म्हणतात. खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी खेळाडू त्याच्या टीमच्या दिशेने बॉल फेकतो. या कृतीला पास बॅक म्हणतात. या शिवाय कॅरी, कॉर्नर, ड्रिबल, हॅट-ट्रीक, साइड लाईन, स्ट्रायकिंग, सर्कल या संज्ञा हॉकीशी संबंधित आहेत.
****************************************

******************************""********
****************************************
खो - खो 
खो-खो हा एक भारतीय मैदानी खेळ आहे. ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो.[१]खो खो हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे ९च् खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपारिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कब्बड्डी.[२] दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.
खेळाचे नियम
खो-खोमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. परंतु एका वेळेस ९ खेळाडू खेळतात. खेळ दोन भागांमध्ये विभागला जातो. दोन भागांमध्ये ५ मिनिटे विश्रांतीचा कालावधी असतो. प्रत्येक भागात पुन्हा दोन उपभाग असतात. त्यातील पहिल्या उपभागात पहिला संघ पाठलाग करतो व दुसरा संघ बचाव करतो. दुसऱ्या उपभागात पहिला संघ बचाव करतो तर दुसरा पाठलाग करतो. दोन्ही उपभगांमध्ये २ मिनिटे विश्रांतीचा काळ असतो. थोडक्यात, संपूर्ण खेळ साधारणतः ३७ मिनिटे (७+२+७+५+७+२+७) चालतो.खेळाच्या सुरुवातीला पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील आठ चौकोनांत आळीपाळीने विरुद्ध दिशांना तोंड करून बसतात. नववा खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा राहतो.बचाव करणाऱ्या संघाचे तीन खेळाडू मैदानात असतात. खेळ सुरु झाल्यावर पाठलाग करण्याऱ्या संघाचा नववा खेळाडू बचाव करणाऱ्या संघाच्या तीन खेळाडुंना बाद करण्याचा प्रयत्न करतो. पाठलाग करणाऱ्या खेळाडुवर खालील बंधने असतात.
एकदा एका खांबाकडील दिशा पकडल्यावर तो आपली दिशा बदलू शकत नाही (खांबाला स्पर्श करून तो आपली दिशा बदलू शकतो)तो दोन खांबाना जोडणारी रेषा ओलांडू शकत नाही पळ्ण्याची दिशा बदलण्यासाठी पकडणारा खेळाडू इतर खेळाडुंना खो देऊ शकतो. खो देण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे घडते.पळणारा खेळाडू मैदानाच्या ज्या बाजूस असेल, त्या बाजूस tond करून बसलेल्या खेळाडुंनाच तो खो देउ शकतो खो देताना पळणारा खेळाडू खो दिल्या जाणाऱ्या खेळाडुच्या पाठीवर थाप मारुन 'खो' असा आवाज करतो.
खो घेतलेला खेळाडू मग, त्याचे तोंड असलेल्या बाजूस उजव्या किंवा डाव्या दिशेस (पकडण्यासाठी) पळण्यास सुरुवात करतो.ज्याने खो दिलेला आहे तो खेळाडु, खो घेतलेल्या खेळाडुची जागा घेतो.
वरील प्रकारे खो-खोची साखळी सुरु रहाते. बचाव करणाऱ्या खेळाडुवर मैदानात पळताना कोणतेही निर्बंध नसतात. कोणताही बचाव करणारा खेळाडू खालील प्रकारांनी बाद होऊ शकतो पकडणाऱ्या खेळाडुने (बचाव करणाऱ्या खेळाडुस) तळ्हाताने स्पर्श केल्यावर बचाव करणारा खेळाडू मैदानाबाहेर गेल्यास बचाव करणारा खेळाडुने मैदानात उशीरा प्रवेश केल्यास बचाव करणाऱ्या संघाचे तीनही खेळाडू बाद झाल्यावर पुढचे तीन खेळाडू मैदानात प्रवेश करतात. नवीन खेळाडुंनी पुढचा खो देण्याआधी मैदानात उतरणे आवश्यक असते. अन्यथा त्यांना बाद धरण्यात येते.बाद केलेल्या प्रत्येक खेळाडुच्या बदली प्रतिस्पर्धी संघाला एक गुण मिळतो. पहिल्या भागाच्या अखेरीस प्रत्येक संघाचे गुण बघितले जातात. ज्यासंघाचे गुण जास्त, त्या संघाची विरुद्ध संघावर दोन्ही संघांमधील गुणांच्या फरकाइतकी आघाडी धरली जाते. दुसऱ्या भागाच्या अखेरीस, जो संघ आघाडी मिळवितो तो संघ त्या आघाडीने विरुद्ध संघावर मात करतो.
खोखोचे क्रीडांगण १११ फूट (३३.६ मी.) लांब व ५१ फूट (१५.५ मी.) रूंद असते. मध्यपाटीची रूंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४.६८  मी.) असते. खुंटाची ऊंची ४ फूट (१.३६  मी.) व परीघ १३’ ते १६’ (३३.०२ ते ४०.६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८१/२  फूट (२.५४ मी.) असते. बाकी सर्व पाटयांचे मधील अंतर ८ फूट (२.४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५’*५१’  (४.५६  मी. ८१५.५४ मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२.४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुध्द बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळाला प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतो. प्रत्येक संघात दोन राखीव खेळाडू असतात. खेळताना एखादा उतरतो. प्रत्येक संघात दोन राखीव खेळाडू असतात. खेळताना एखादा खेळाडू जबर जखमी झाल्यास सरपंचाच्या परवानगीने राखीव खेळाडू खेळू शकतो; पण प्रतिस्पर्धी संघाच्या कप्तानला ही गोष्ट सांगावी लागते.बसलेल्या खेळाडूला पाठलाग करणा-याने मागून स्पर्श करून 'खो' देणारा त्याची जागा घेतो. खो मिळयावाचून खेळाडूने उठावयाचे नसते. पाठलाग करणाराला दिशा बदलता येत नाही. उठल्याबरोबर त्या खेळाडूची स्कंधरेषा (दोन्ही खांद्यांना जोडणारी कल्पित रेषा) ज्या बाजूला वळलेली असेल, त्या बाजूलाच त्याला वळावे लागते किंवा ती मध्यपाटीस समांतर असेपर्यंत त्याला वळता येते. पाठलाग करणाराला खेळाडूंच्या मधून किंवा खुंटांमधून जाता येत नाही. खुंटाला वळसाच घालावा लागतो किंवा खांबाजवळील रेषेला स्पर्श करून पुन्हा परतता येते. चौकोनात पाठलाग करणाराला कसेही फिरता येते.खेळणा-याने सीमारेषांत राहूनच खेळावयाचे असते. बसलेल्या खेळाडूंना त्याने स्पर्श केल्यास तो बाद होतो. प्रत्येक डाव लहान वयाच्या स्पर्धकांसाठी ५ मिनिटांचा आणि मोठयांसाठी ७ मिनिटांचा असतो. प्रत्येक डावानंतर २१/२ मिनिटे आणि दोन डावानंतर पाच मिनिटे विश्रांती असते. एका डावात जितके खेळाडू बाद होतील, तितके गुण विरूध्द संघाला मिळतात. एखाद्या संघाचे गुण प्रतिस्पर्धी संघापेक्षा १२ गुणांनी जास्त असल्यास हा आघाडीवर असलेला संघ दुस-या संघास पुन्हा बसण्यास म्हणजे पाठलाग करण्यास सांगू शकतो. पाठलाग करताना नियमभंग केला, तर पंच ताबडतोब ती चूक सुधारावयास लावतात. त्यामुळे खेळणा-याच्या पाठलागात खंड पडून त्याला काही वेळ मिळतो. एका सामन्यासाठी प्रत्येक संघाला दोन वेळा खेळावे लागते.
*************************************
*********************************"****
क्रिकेट 
खेळाडू आणि अधिकारी
खेळाडू
प्रत्येक संघात ११ खेळाडू असतात. सर्व खेळाडूंना फलंदाज अथवा गोलंदाज असे म्हणतात. सहसा प्रत्येक संघात पाच ते सहा फलंदाज व पाच ते सहा गोलंदाज असतात. जो खेळाडू व्यवस्थित फलंदाजी व गोलंदाजी करतो त्याला अष्टपैलू म्हणले जाते. मैदानावर सर्व प्रमुख निर्णय संघाचा कर्णधार घेत असतो. एका वेळेस एका संघातील दोन खेळाङू फलंदाजी करतात व धावा काढतात, तर दुसऱ्या संघातील एक खेळाङू गोलंदाजी करतो व इतर खेळाङू क्षेत्ररक्षण करतात.
पंच
मैदानावर दोन पंच असतात. एक पंच गोलंदाज ज्या यष्टी जवळून गोलंदाजी करत असतो तेथे उभा असतो तर दुसरा पंच क्षेत्ररक्षणाची जागा स्क्वेअर लेगला उभा असतो. तिसऱ्या पंचाला टी. व्ही. अम्पायर म्हणतात तर सामना अधिकारी सामना क्रिकेटच्या नियमांप्रमाणे खेळवला जातोय याची खात्री करतो.
मैदान
मैदान हे सहसा गोल अथवा अंडाकृती असते. सहसा मैदानाचा व्यास १३७ मी (६५ यार्ड) ते १५० मी (८५ यार्ड) पर्यंत असतो. एका दोरीच्या सहाय्याने मैदानाची सीमा आखली जाते.
खेळपट्टी
खेळपट्टी म्हणजे मैदानाच्या मध्यभागी असलेली मुख्य खेळाची जागा. खेळपट्टी ची लांबी २०.१२ मी (२२ यार्ड) आणि रुंदी ३ मी (३.२ यार्ड) असते .
नाणेफेक
सामना सुरू होण्यापुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करतात. नाणेफेक जिंकणारा कर्णधार सुरवातीला फलंदाजी अथवा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो.
डावाचा अंत
जेव्हा एक डाव संपतो तेव्हा,
दहा फलंदाज बाद होतात
फक्त एकच फलंदाज बाकी आहे जो फलंदाजी करु शकत नाही.
दुसऱ्या संघाने पहिल्या संघापेक्षा जास्त धावा केल्या.ठरवलेले षटके टाकून झाली.कर्णधाराने आपला डाव घोषित केला.सामन्याचा कालावधी संपादन करा
२०-२० क्रिकेटमधे नावाप्रमाणे दोन्ही डावात २० षटकांचा खेळ होतो. एकदिवसीय सामना ५० + ५० षटकांचा असतो. सहसा कसोटी सामने ५ दिवस खेळवले जातात. दररोज कमीत कमी सहा तास किंवा ९० षटकांचा खेळ होतो. कसोटी सामन्यामधे फलंदाजी करणारा संघ जोपर्यंत सर्वबाद होत नाही, अथवा डाव घोषित करत नाही, तोवर फलंदाजी करू शकतो. खेळ चालू राहण्यासाठी पुरेसा प्रकाश असणे आवश्यक आहे. प्रकाश अपुरा असल्यास सामना काही काळ स्थगित होऊ शकतो. दीर्घ काळ प्रकाश अपुरा राहिला तर सामना रद्द झाल्याचे घोषित केले जाते.
फलंदाजी व धावा , फलंदाजी
फलंदाज आपल्या बॅटने चेंडू फटकाऊन धावा काढतात. जेव्हा फलंदाज बॅटने चेंडू मारतो तेव्हा त्याला फटका (शॉट / स्ट्रोक) म्हणतात. फटक्यांना ते ज्या दिशेने खेळले गेले आहेत त्या प्रमाणे नाव दिले गेले आहे. फलंदाज संघाच्या नीतीनुसार आक्रमक अथवा सावध फलंदाजी करतो. फलंदाज सहसा क्रमाने फलंदाजीस येतात. प्रथम येणाऱ्या दोन फलंदाजांना ओपनर म्हणतात.
क्रिकेट खेळासंबंधीचे प्राथमिक नियम असे आहेत क्रिकेटचा सामना हा दोन संघांमध्ये होतो. प्रत्येक संघाचा एक कप्तान व एक उपकप्तान असून एकंदर ११ खेळाडूंचा असा हा संघ असतो. खेळताना एखाद्या खेळाडूस इजा झाल्यास पर्यायी खेळाडू असावा, यासाठी दोन ते तीन जास्त खेळाडूंचा मिळून संघ बनतो. बदली खेळाडू हा क्षेत्ररक्षण करू शकतो, किंवा फलंदाजाऐवजी पळू शकतो. बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येत नाही. बदली खेळाडू निवडताना, विरूध्द संघाच्या कप्तानाची हरकत नाही ना, याची खात्री करावी लागते. खेळाबाबत निर्णय देणारे दोन पंच असतात व ते प्रत्येकी एकेक बाजू सांभाळतात. दोन्ही संघाच्या कप्तानांच्या परवानगीशिवाय सामन्यासाठी निश्चित केलेले पंच बदलता येत नाहीत. पंचांनी केलेले इशारे व खुणा समजून घेऊन गुणलेखक हा धावांची नोंद करतो.
क्रिकेटची साधने व पटांगण
चेंडू - वजन  १५५ ग्रॅम्स, परिघ  २३ सें.मी., चेंडू बदलण्याविषयी - ७५ षटकांनंतर चेंडू बदलता येतो. बॅट - रूंदी - ११ सेंमी, लांबी - ९५ सें. मी.
विकेटस् - तीन स्टंप्स व त्यावरील दोन बेल्स मिळून विकेट तयार होते. दोन विरूध्द बाजूच्या विकेटस् मधील अंतर २२ यार्ड (साधारणपणे २० मीटर) असते. एकमेकांच्या समोर व समांतर अशा विकेटस् असतात. विकेटची रूंदी २२.५० सें. मी. असते. विकेटस् मधील स्टंप्स समान असतात. व त्यांची जमिनीपासून उंची ७० सें. मी. असते. ४ बेल्स हया ११ सें. मी. लांबीच्या असतात.
पिच् - दोन विकेटस् मधील अंतरास पिच् म्हणतात. चेंडू फेकणे व फलंदाजाने तो फटकावणे हया क्रिया सारख्या पिच् वर होत असल्याने, पिच् चांगले असणे महत्त्वाचे. पावसापाण्यामुळे अनपेक्षित रित्या पिच् फारच खराब झाल्यास दोन्ही संघांच्या कप्तांनांची हरकत नसल्यास, सामना सुरू असताना ते बदलता येते.
*************************""************
***********"**************************
कबड्डी 
कबड्डी हा मुळात दक्षिण आशियातला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.
महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जायचा. इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.
मैदाने
पुरुष, महिलांसाठी वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी., तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी. असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे.
***************************************
***********************"***************
**************************************"***
फुटबॉल 
फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात अकरा खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियम बाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू पोहोचवेल(गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.२१ मे १९०४ रोजी पॅरीस येथे फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड(हाॅलंड), डेन्मार्क, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांनी फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना स्थापन केली. इ.स. १८६३ साली फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबध्द केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा फुटबॉल विश्वचषक होय.१९६२ च्या विश्वचषक स्पर्धेत चिली व इटली यांच्यातील सामन्यात पंच म्हणून काम बघणारे इंग्लिश पंच केन ॲस्टन हे रेड व यलो कार्डाचे जनक आहेत. त्यानंतर १९७०च्या विश्वचषक स्पर्धेत या कार्ड्सची सुरवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण जगभरात याला मान्यता मिळाली. केवळ फुटबाॅलच नव्हे तर इतर अनेक खेळांमध्ये याचा वापर केला जातो.
खेळाचे स्वरूप

हा खेळ एका गोलाकृती चेंडूने खेळला जातो. यात ११ जणांचे दोन संघ असतात. नव्वद मिनिटांचा एक सामना असतो. सामन्यात ४५ मिनिटांनंतर १५ मिनिटे कालावधीचा मध्यंतर होतो.
***************************************
**************************************
बास्केटबॉल 
बास्केटबॉल हा एक सांघिक खेळ आहे. ५ खेळाडूंचे दोन संघ चेंडू बास्केटबॉल जाळीमधे टाकून अधिकाधीक गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. बास्केटबॉल जगातील एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे.[१]
सर्वसाधारण बास्केटबॉल जाळीचा व्यास १८ इंच (४५.७ সেमी) असतो व जाळी १० फूट (३.०५ मी) उंचीवर बॅकबोर्डला लावलेली असते. संघाला गुण मिळवण्यासाठी चेंडू जाळीत टाकावा लागतो. चेंडू जाळीत टाकणारा खेळाडू जर थ्री पॉइंट लाईन च्या आत असेल तर २ गुण मिळतात अथवा ३ गुण मिळतात. जास्तीत जास्त गुण मिळवणारा संघ विजेता घोषित केला जातो. गुण संख्या समसमान झाल्यास अतिरिक्त वेळ वापरल्या जातो. चेंडू पुढे नेण्यासाठी चेंडू टप्पे देउन चालतांना नेता येतो अथवा पळून किंवा संघ खेळाडूला पास करता येतो. चेंडू चालतांना दोन वेळा बाउंस  केल्यास किंवा हातात धरून चालल्यास नियमांची पायमल्ली होते.नियमांची पायमल्लीला फाउल असे म्हणले जाते. धोकादायक शारीरिक कॉन्टॅक्ट साठी पेनाल्टी लावल्या जाते.

बास्केटबॉल मध्ये सहसा वापरले जाणारे शब्द शूटींग, पासिंग अणि ड्रिब्लिंग आहेत. सहसा संघातील सर्वात उंच खेळाडू सेंटर, स्मॉल फोरवर्ड किंवा पॉवर फॉरवर्ड मध्ये खेळतो व सर्वात छोटा खेळाडू किंवा चेंडू सक्षमपणे हाताळणारे खेळाडू पॉईंट गार्ड असतात.
**************************************
****"""****************************"*
*************************************

2 comments: