बोधकथा २

🌺सत्य व सौंदर्य🌺
   एक राजा होता.एका लढाईत त्याचा एक डोळा गेला होता.स्वतःचे चांगले चित्र काढून घ्यावे,अशी त्याला इच्छा झाली. 
         आपले चांगले  चित्र काढून देणाऱ्यास  त्याने एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले.अनेक चित्रकारांनी त्या स्पर्धेत भाग घेतला.परीक्षकांनी तीन उत्तम निवडून त्यातील सर्वोत्कृष्ट चित्र ठरविण्याचे व निवडण्याचे काम राजावरच सोपवले.
        पहिल्या चित्रात राजाचे दोन्ही डोळे दाखविले होते. चित्र फारच आकर्षक होते.दुसऱ्या चित्रात  वास्तवता होती.  राजा एका डोळ्याने त्या चित्रात अंध दाखविला होता.
     तिसऱ्या  चित्रात राजा धनुष्याने बाण मारीत आहे  व त्याचा एक डोळा बंद आहे, असे दाखवले होते. राजाने तिसऱ्या चित्राची पुरस्कारासाठी निवड केली. राजाने आपला अभिप्राय व्यक्त केला.
         पहिले चित्र आकर्षक आहे,पण सत्याला सोडून आहे.दुसरे चित्र सत्य आहे, पण सुंदर नाही.तिसऱ्या चित्रात मात्र सत्य व सौदर्य या दोहोंचा मिलाप आहे.राजाला एक डोळा नाही, हे सत्य त्यात आहे.
        जीवनातील समस्या सोडवितांना सत्य व सौंदर्य यांचा सुरेख  संगम साधने हा समाधानाचा मार्ग असतो.
🌺अहंकार आला की, दुःख आले !🌺
एका गावात रथोत्सव चालू असतो. भाविक तो रथ एका गावातून दुसर्या गावात वाजत-गाजत नेत असतात. मध्येच रथाचे एक चाक तुटून जाते, त्यामुळे भाविक चिंतित होतात.
 त्यांना प्रश्‍न पडतो, रथातील देवाला दुसर्‍या गावाला कसे पोहोचवायचे ? 
भाविक पर्याय म्हणून बैलगाडी, घोडागाडी शोधतात; पण काहीही उपलब्ध होत नाही.
मार्गात मध्येच भाविकांना एक बैल दिसतोे. 
सर्व जण त्याला चंदनतैलादी लावून आंघोळ घालतात. रेशमी वस्त्र घालून सजवतात आणि त्यावर देवाला बसवतात. उत्सव पुन्हा चालू होतो अन् सर्व जण दुसर्‍या गावाकडे प्रयाण करतात. काही भाविक देवाला हार घालू लागतात. काही वेळाने देवाला हार घालायला जागा रहात नाही; म्हणून लोक बैलालाही भक्ती-भावाने हार घालू लागतात.
मार्गाने जातांना बैल विचार करतो आतापर्यंत कधी मिळाले नाही, ते राजवैभव मला आज कसे काय मिळत आहे ?
 भाविक देवाला ओवाळत असलेली आरती आपल्यासाठी आहे, असे बैल मानू लागला आणि त्यामुळे तो अधिकच आनंदी झाला. काही क्षणांनंतर त्याच्या मनात विचार आला,
 मला हे राजवैभव मान्य आहे; पण माझ्या पाठीवर काहीतरी ओझे आहे. हा विचार आल्यावर तो स्वतःचे अंग झाडतो. 
त्यामुळे त्याच्या पाठीवरील देव खाली पडतो. हे पाहून भाविक भडकतात आणि बैलाला धोपटतात.
तात्पर्य :
ज्या क्षणी अहंकार बळावतो आणि हे सर्व माझ्यामुळे आहे, माझ्यासाठी आहे, असे विचार येऊ लागतात, त्या वेळी आपली स्थिती अहंकारमय झालेली असते त्यावेळी आपल्याला सर्व जग आपल्यापेक्षा लहान वाटायला लागते इतराना आपन कमी लेखायला लागतो आणि एक दिवस  आपली गत कथेमधील बैलासारखी होते म्हणून आपण अहकाररहित रहावे.
*************************************
प्रसिद्ध  चिनी  तत्वज्ञ   कंफ्यूशियस म्हातारा  झाला. त्यांचे सर्व दात पडून गेले.
          एके दिवशी त्याने शिष्यांना आपले तोंड उघडून आता दात आहेत का, असा प्रश्न विचारला.
शिष्यांनी उत्तर दिले,नाही'. त्याने शिष्यांना परत तोंडात बघावयास सांगितले व प्रश्न विचारला, 'जीभ आहे का ?'सर्वांनी 'होय असे उत्तर दिले. ' जीभ आहे,पण दात मात्र पडले आहेत, याचे कारण कोणी सांगू शकेल का?' त्याने  शिष्यांना विचारले. कुणीच  शिष्य   उत्तर देऊ शकला नाही.
तेव्हा  कंफ्यूशियस म्हणाला, ' जीभ  तिच्या मृदुतेमुळे टिकून आहे;  तर दात त्यांच्या  कठोरतेमुळे पडले आहेत.
ऋजुता किंवा मृदू स्वभाव जीवन सुदंर बनवतो, तर  कठोरता,  उद्धतपणा जीवनाला कुरूप बनवतो.
एकीचे बळ
एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्‍याने खड्ड्यात पडलेल्‍या जंगली कुत्र्याच्‍या पिलाचा जीव वाचवला तेव्‍हापासून त्‍याला त्‍या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्‍याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्‍याच्‍याजवळ येत असत. परंतु त्‍यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्‍त करून सोडले होते. तो रोज त्‍यांच्‍यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्‍या माथ्‍यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्‍याच्‍यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्‍या कुत्र्याच्‍या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्‍याच्‍यावर धाव घेतली व त्‍याच्‍यावर हल्‍ला करून त्‍याला ठार केले.
*प्रगतीतील अडसर-
    *एका सहलीसाठी दहा माणसे निघाली. मुक्कामावर  पोहचताच एकूण दहा कामांची वाटणी दहा जणांमध्ये करण्यासाठी जेव्हा माणसांची गणती सुरु झाली, तेव्हा संख्या  नऊच भरू लागली; त्यामुळे प्रत्येकाला एकेक काम देता येत नव्हते व कामांना सुरवात करता येईना.
         *"असे का  होते?" या विचारात ते पडले असता जवळून जाणाऱ्या एका पांथस्थांच्या लक्षात खरे कारण आले.
         *तो त्यांना म्हणाला,  "कामाचे वाटप करताना तुमच्यापैकी स्वतःला वगळतो व त्यामुळे काम सुरु करण्यात  अडसर  उत्पन्न होतो.
      *एखादे काम सहकार्याने करतेवेळी प्रत्येकाने जर स्वतःलाही त्यात झोकून दिले तरच ते काम चांगले होईल व त्यायोगे समाजाची व देशाची प्रगती होईल.
*
एका राजाने दोन गरुड आणले आणि त्यांना शिकविण्यासाठी माणूस
ठेवला .
काही दिवस गेले . एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, अगदी बघत रहावे असे .
दुसरा मात्र उडेचना.
राजा काळजीत पडला ,
अगदी सारखे दोन पक्षी एक
भरारी घेतोय दुसरा थंड.
काय करावे.. काय करावे..?
राजाने दवंडी पिटविली,
गरुडाला कोणी उडवून दाखवावे म्हणून .
दुसऱ्या दिवशी पहाटेस
राजा बागेत आला, 
बघतो तो दुसरा गरुड
पहिल्या पेक्षाही उंच
गेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत होता .
     राजाच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. 
हे अजब घडले कसे ? 
आणि केले तरी कोणी !
     एक सामान्यसा दिसणारा शेतकरी अदबीने पुढ्यात आला आणि म्हणाला, "महाराज मी केले."
राजा : अरे पण कसे ?
शेतकरी : मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी कापली,
     दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला. बाकी तुम्ही बघत आहातच.
तात्पर्य :
         आपली फांदी कधीतरी सोडून बघा.
सतत सुखद मर्यादित कवचांमध्ये स्वतःला गुरफटवून ठेवू नका.
कदाचित बाहेर अधिक सुंदर
खुले समृद्ध आकाश तुमची वाट बघत असेल.
Change ur thought.....
May change ur life....
"विचार बदला, आयुष्य बदलेल !!!"
🌺स्वामी  विवेकानंद अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले. त्यांचे  गुरु रामकृष्ण यांचे निधन झाले होते. म्हणून ते त्यांच्या पत्नीची  शारदादेवीची परवानगी घेण्यास गेले.
         *"आई,आशीर्वाद द्या." असे म्हणून त्यांच्यासमोर उभे राहिले. "ठीक आहे; पण जरा थांब.
          *आशीर्वाद देण्यापूर्वी ती पलीकडची  सुरी मला आणून दे." शारदादेवींनी सांगितले. विवेकानंदांना थोडे आश्चर्य वाटले; पण त्यांनी लगेच सुरी आणून दिली.
       *सुरी हातात  घेतल्यानंतर देवीजी म्हणाल्या " जा तुझ्याकडून सर्वांचे कल्याण होईल
      *मघाशी दाबून ठेवलेले  आश्चर्य व्यक्त करीत वेवेकानंद म्हणाले,
    *"माताजी, सुरी आणून देण्याचा व आशिर्वादाचा काही  संबंध होता का?" शारदादेवी  म्हणाल्या, "हो होता. तू सुरी कशी आणून देतोस ते मला पहायचे होते.
         *स्वतःच्या हातात पाते धरून तू मूठ माझ्या हातात दिलीस. माझ्या  सुरक्षिततेची काळजी घेतलीस.'

        *स्वतःचा विचार न करता जो  अगोदर दुसऱ्याचा विचार करतो, दुसऱ्याची काळजी घेतो, तोच खऱ्या अर्थाने मानवधर्म पाळत असतो."
*अहंकाराचा त्याग करा* 
    श्री रामकृष्ण परमहंसाकडे एके दिवशी एक मोठा व्यापारी आला.
       परमहंसांनी विचारले, " आता कसे काय आलात?"व्यापारी म्हणाला, "आपल्याला कदाचित माहित नसेल, मी माझी सर्व संपत्ती दान म्हणून दिली. माझ्या इतके दान कोणीही केलेले नाही.
      परमहंस: आपण हे करण्यास योग्य असेच कार्य केले आहे. व्यापाऱ्याने आपल्याला दानाचे पुराण चालू ठेवले .गर्वाने मान उंच करून तो म्हणाला, "एवढा मोठा त्याग करूनही मला ईश्वराचा साक्षात्कार का होत नाही?"
     "तुम्हाला साक्षात्कार होणार नाही" परमहंस म्हणाले
 त्यावर व्यापारी म्हणाला,"माझ्यासारख्या महान दान करणाऱ्या व्यक्तीला ईश्वराचा साक्षात्कार होणार नाही, हे तुम्ही कशावरून सांगता?"     
       परमहंस म्हणाले, "तुम्ही संपत्तीचा त्याग केला, हे खरे आहे;पण त्याग करण्यासाठी जे आवश्यक आहे, त्याचा त्याग तुम्ही केलेला नाही .मग तुम्हाला ईश्वराचा साक्षात्कार कसा होणार? अहंकाराचा नाश झाल्याशिवाय आपणास आत्मसाक्षात्कार होणार नाही.
     संपत्ती, सत्ता, उच्च पदवी इत्यादींचा  अहंकार नष्ट झाला पाहिजे. त्याचप्रमाणे  त्याग केल्याचा अहंकार, गर्व सोडण्याची गरज आहे.

       तुम्ही त्यागाचा गर्व बाळगता! सर्व अहंकार नाश झाल्याशिवाय  साक्षात्कार होत  नाही.
🌺बोधकथा🌺
    +विजयाचे सर्व श्रेष्ठ साधन +
 एकदा अकबर बादशहाने विचारले, " बिरबल, लढाईत विजय मिळविण्याचे सर्वात श्रेष्ठ  साधन
 कोणते,? " बिरबलाने उत्तर दिले, "खाविंद, सेनापती व सैनिक यांच्या ठिकाणी असलेले अभंग धैर्य, हेच लढाईत विजय मिळविण्याचे सर्वात श्रेष्ठ साधन आहे."
           अकबराने पुन्हा प्रश्न केला."बिरबल,लढाईत विजय मिळविण्याच्या दृष्टीने तलवारी,बंदुका,धनुष्यबाण, तोफा आदी शस्रांना काहीच महत्त्व नाही का?" बिरबल म्हणाला, "खाविंद, शस्रांना महत्त्व नाही असे कोण म्हणेल?परंतु ती शस्रेही धैर्यशाली योध्यांच्या हाती गेली,तरच ती विजय मिळवून देण्यात  साहाय्यकारी होतात,परंतु ज्यांच्या ठिकाणी धैर्याचा लवलेशही नाही, अशा मुर्दाडांच्या हाती गेली.तर त्यांचे धैर्यशाली शत्रू ती शस्रे त्यांच्या हातून हिसकावून घेतात आणि त्याच शस्रांनी त्यांना पराभूत करतात. म्हणून *🌺:-धैर्य* हेच लढाईतील विजयाचे सर्वांत श्रेष्ठ साधन आहे."

       बिरबलाच्या या उत्तराने समाधान झाल्याने बादशहाने अकबराचे म्हणणे मान्य केले.

No comments:

Post a Comment