महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्राचा भूगोल 
**********************************
👧🏻महाराष्ट्र भौगोलिक👦🏻
महाराष्ट्राची निर्मिती - १ मे १९६० (१ मे हा महाराष्ट्र दिन म्हणुन साजरा केला जातो)
१ मे २०१० रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेचा सुवर्णमहोस्तव उस्ताहात संपन्न झाला
महाराष्ट्र हे निर्मितीवेळी देशातील १४ वे राज्य ठरले 
क्षेत्रफळ - ३,०७,७१३ किमी
दक्षिणोत्तर लांबी - ७२० किमी 
पूर्व - पश्चिम लांबी - ८०० किमी 
समुद्र किनारा लांबी - ७२० किमी 
स्थान - भारताच्या पश्चिम भागास अरबी समुद्र लागुन 
शेजारील राज्ये - वाव्यवेस गुजरात राज्य तर दीव दमण, दादरा नगरहवेली हे केंद्रशासित प्रदेश
उत्तरेस - मध्य प्रदेश, पूर्व व इशान्येस - छत्तीसगढ़
आगन्येस - आंध्र प्रदेश, दक्षिणेस - कर्नाटक व गोवा
लोकसंख्या - ९,६८,७८,६२७ (२००१)
२०११ चा अंतरिम निष्कर्ष - ११,२३,७२,९७२ 
भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण - ९.४२% (२००१) आणि ९.२९% (२०११)
राजधानी - मुंबई तर उपराजधानी - नागपुर 
राज्यातील जिल्हे - ३५ 
जिल्हा परिषदा - ३३ (मुंबई व मुंबई उपनगरामध्ये जिल्हा परिषदा नाहीत)
तालुके - ३५५, ग्रामपंचायती - २७,९९३, पचायत समित्या - ३५५
महानगरपालिका - २३, नगरपालिका - २२२, नगरपंचायती - ०४ 
दशलक्षी शहरे - ०७, १ लाखाहून जास्त लोकसंख्येची शहरे - ४० 
प्रशासकीय विभाग - ६ (कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपुर)

👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
**********************************
लोहमार्ग विभाग—मध्य विभाग – मुबंई (सीएसटी)
पूर्व विभाग – कोलकात्ता 
उत्तर विभाग – नवी दिल्ली
उत्तर पूर्व – गोपखपूर
दक्षिण विभाग – चेन्नई
पश्चिम विभाग – चर्चगेट
महाराष्ट्र,गोवा ,कर्नाटक,आणि केरळ ही चार राज्ये आणि रेल्वे मंत्रालय यांच्या सहभागातून कोकण रेल्वे प्रकल्प उभा राहिला आहे.
रोहा ते मंगळूरपर्यंतचा हा लोहमार्ग 760 किमी लांबीचा आहे.
देशात 14500 किमी लांबीचे जलमार्ग आहेत.
भारताला 7517 किमी लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.
पूर्व किनाऱ्यावरील बंदरे—कोलकात्ता, हल्दिया, पराद्वीप, विशाखापट्टणम, चेन्नई, एन्नोर व तुतीकोरीन इ.
पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे – कांडला, मुंबई, न्हावाशेवा, मार्मागोवा, नवे मंगळूर, कोची इ.
मुंबई हे एक उत्तम नैसर्गिक बंदर आहे. या बंदरावरील ताण कमी करण्यासाठी न्हवाशेवा येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट आहे.
मार्मागोवा बंदरातून लोहखनिज, मॅंगनीज, बॉक्साईट यांची निर्यात होते.
चेन्नई हे एक जुने बंदर आहे.
भारताचा 95 % विदेशी व्यापार या बंदरांमधून केला जातो.
भारतातील वायुमार्गाचे व्यवस्थापन व नियमन शासकीय स्वायत्त संस्था करतात.
देशांतर्गत वायुमार्गाचे व्वस्थापन इंडीयनएअरलाईन्स ही संस्था करते.
एअर इंडीया ही संस्था आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक करते.
पवन हंस या शासकीय संस्थेमार्फत भारतात हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध झाला आहे.
भारतात जगातील सर्वात मोठे टपाल सेवा जाळे आहे.
भारतात प्रथम 1927 साली मुंबई आणि कोलकात्ता येथून रेडिओ सेवा सुरू झाली.
1936 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील ऑल इंडीया रेडीओ ही सेवा सुरू झाली.
सन 1957 मध्ये याच सेवेस आकाशवाणी असे नाव देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करण्यासाठी, वाद, तंटे, समस्या सोडवण्यासाठी जागतिक व्यापार संघटना स्थापन केली आहे.
भारताच्या एकूण आयातीत सर्वाधिक वाटा युरोपीय देशांचा आहे.
स्तंभालेख एकमितीय आकृती आहे. 
घटकांचे उपघटक एकाच स्तंभात वेगवेगळ्या छटांनी दाखवितात त्या आकृतीस संयुक्त स्तंभालेख म्हणतात.
महाराष्ट्राचा भूगोल----
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा भारतात तिसरा क्रमांक लागतो.
नगर जिल्हा सर्वात मोठा आहे.
प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश, पठारी प्रदेश असे तीन भाग पडतात.
किनारपट्टीचा प्रदेश—राज्याच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर- दक्षिण दिशेत पसरलेला प्रदेश आहे. या चिंचोळ्या भागास कोकण म्हणतात.
पर्वतीय प्रदेश—
सह्याद्री पर्वत— सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट म्हणतात. महाराष्ट्राच्या किनाऱ्यास समांतर असलेल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे 900 मीटर आहे. या रांगेत कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.
सातपुडा पर्वत—महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांग आहे. सातपुडा पर्वतरांगेत अस्तंभा हे सर्वात उंच शिखर आहे. या पर्वताच्या मध्यभागी रावेर, बऱ्हाणपूर दरम्यान खिंड आहे. या पर्वताच्या पूर्वेकडे गावीलगड डोंगररांग असून ती अमरावती, अकोला जिल्ह्यात पसरली आहे.
पठारी प्रदेश—महाराष्ट्र पठार—सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश हा दख्खनच्या पठाराचा भाग असून, त्याला महाराष्ट्र पठार म्हणतात. याची सर्वसाधारण उंची 600 मीटर आहे.
सह्याद्री पर्वतातून येणाऱ्या सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट व महादेव डोंगररांगांचा समावेश होतो. या रांगांमुळे अनुक्रमे गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. महाराष्ट्र पठाराचा उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे.
महाराष्ट्रातील नद्या—महाराष्ट्रातील काही नद्या पश्चिम वाहिनी आहेत. त्या अरबी समुद्रास जाऊन मिळतात. काही नद्या पू्र्ववहिन्या आहेत, त्या बंगालच्या उपसागरास मिळतात. 
पश्चिम वाहिनी नद्या—
नर्मदा-- ही नदी नंदूरबार जिल्ह्याच्या उत्तर उत्तर सीमेवरून वाहते ती पुढे अरबी समुद्रास मिळते.
तापी—या खोऱ्याने महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापला . या नदीचा उगम मध्यप्रदेशात होतो. पूर्णा, गिरणा, पांझरा या तिच्या महाराष्ट्रातील प्रमुख उपनद्या आहेत. 
वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री व तेरेखोल या कोकणातील प्रमुख नद्या आहेत. या नद्या सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उगम पावतात व अरबी समुद्रास मिळतात. राज्याच्या अतिदक्षिण सीमेवरून तेरेखोल नदी वाहते.
पूर्व वाहिनी नदी—
गोदावरी—हिचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे झाला. प्रवरा, सिंदफणा, दूधना,प्राणहिता, इंद्रावती या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. गोदावरी नदी आंध्रप्रदेशात वाहत जावून पुढे बंगालच्या उपसागरास मिळते.
राज्याच्या पूर्व भागातून वर्धा व वैनगंगा या नद्या वाहतात. वैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे. वर्धा व वैनगंगा या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. या दोन्ही नद्यांच्या एकत्र प्रवाहाला प्राणहिता म्हणतात
अति पूर्वेकडील सीमेवरून इंद्रावती नदी वाहते.
भीमा—हिचा उगम पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे झाला. घोड, नीरा, सीना, माण या तिच्या उपनद्या आहेत. भीमा पुढे कर्नाटक राज्यात कृष्णा नदीस मिळते.
कृष्णा—उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे झाला. कोयना, येरळा, वारणा, पंचगंगा या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. पुढे कृष्णा नदी कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातून वाहत जावून बंगालच्या उपसागरास मिळते.

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**********************************
👦🏻महाराष्ट्र राजकिय👧🏻

सीमा (शेजारील राज्ये)
 उत्तर  - पूर्व - क्षत्तीसगड, मध्यप्रदेश
दक्षिण - कर्नाटक, गोवा
वायव्य - गुजरात, दादरा व नगर हवेली


प्राकृतिक विभाग - 5

1. विदर्भ - 11 जिल्हे
2. मराठवाडा - 8 जिल्हे
3. पश्चिम महाराष्ट्र - 6 जिल्हे
4. कोकण - 6 जिल्हे
5. खानदेश - 4 जिल्हे

प्रशासकिय  विभाग -7


1.औरंगाबाद - 4 जिल्हे
2. नागपूर - 6 जिल्हे
3. मुंबई -6 जिल्हे
4. नाशिक - 5 जिल्हे
5. अमरावती - 5 जिल्हे
6. पुणे - 5 जिल्हे

7. नांदेड - 4 जिल्हे
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
**********-***********************
👧🏻भौगोलिक स्थान👦🏻
साधारणत: भारताच्या मध्यवर्ती भागात

अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार
अक्षांश : 15° 44' ते  22° 6' उत्तर अक्षवृत्त
रेखांश : 72° 36' ते  80° 54' पूर्व रेखावृत्त

क्षेत्रफळ
3 लाख 7 हजार 713 चौ.कि.मी. (3,07,713)

दक्षिण - उत्तर  लांबी  -> 720 कि.मी.
पुर्व -  पश्चिम  लांबी  -> 800 कि.मी.

महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा

पूर्व - चिरोली टेकडया व  भामरागड डोंगर
पश्चिम - अरबी समुद्र
दक्षिण - तेरेखोल खाडी, हिरण्यकेशी  नदी
उत्तर - सातपुडा पर्वत
वायव्य - सातमाळा डोंगररांग (अक्राणी टेकड्या)
ईशान्य - दरकेसा टेकड्या

👧🏻🌺🌅👦🏻🌅🌺
***-******************************
==============================

No comments:

Post a Comment