स्काऊट / गाईड

स्काऊट आणि गाईड 
**********************************
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांनी इंग्लंडमध्ये सुरू केलेल्या या चळवळीला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले असून, २०१० साली याचा शताब्दी सोहळा लंडनजवळील ब्राऊन्सी येथे संपन्न झाला. विश्वबंधुत्वाचा संस्कार घेऊन बहुसंख्य राष्ट्रातील स्काऊट गाईड तेथे मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या चळवळीचे सदस्य असणाऱ्या मुलामुलींच्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या स्काऊट गाईडच्या अनेक उपक्रमांमध्ये आहे तरी काय? मुलामुलींच्या वयोगटानुसार कब-बुलबुल, स्काऊट गाईड व रोव्हर्स रेंजर्स असे तीन गट असून, प्रत्येक गटासाठी निरनिराळा अभ्यासक्रम जागतिक स्तरावर योजलेला आहे. शीलसंवर्धन, आरोग्यसंवर्धन, हस्तव्यवसाय व सेवा या चार मूलभूत सूत्रांवर कार्यक्रमांची आखणी केलेली आहे. शिक्षणाचा मूळ हेतू हा की विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करणे, त्याच्यातील सूक्ष्म गुणांचे प्रकटन व विकास होण्यासाठी त्याला विविध संधी उपलब्ध करून देणे. त्याचा शारीरिक व मानसिक विकास होऊन त्याच्या जीवनाला योग्य दिशा मिळणे, त्याच्यातील सृजनशीलतेला प्रेरणा देणे, त्याच्या मनावर सुसंस्कार होऊन तो एक उत्तम माणूस बनणे व सामाजिक जाणीव असणारा जबाबदार नागरिक बनणे. हा सर्व हेतू साध्य होण्याच्या दृष्टीने स्काऊट गाईड हा एक उत्तम खेळ आहे. ‘स्काऊटिंग इज आऊटिंग’ यानुसार चार भिंतींच्या आत हा खेळ न खेळता बाहेर, मैदानावर,

👧🏻🌺🌅👦🏻🌅🌺
**********************************
.👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
‘संघपद्धती’ हे स्काऊट गाईड चळवळीचे फार मोठे वैशिष्टय़ आहे. यातूनच नेतृत्व या गुणाची जोपासना होते. ‘मुलांनी मुलांकरिता चालविलेली, मुलांची चळवळ व फक्त मोठय़ा व्यक्तींचे जरूर तेव्हा साहाय्य व मार्गदर्शन’ असे या चळवळीचे वर्णन करता येईल. लहान वयात केलेले संस्कार व सामाजिक जाणीव ही मुलामुलींना पुढील आयुष्यात योग्य कार्य करण्यास उद्युक्त करते. स्काऊट गाईड शिक्षणात रोज एक सत्कृत्य करणे व सेवा करणे ही चांगली शिकवण आहे. त्यातूनच इतरांना मदत करणे व शेजारधर्म पाळणे ही भावना दृढ होत जाते. त्यासाठी अनेक कार्यक्रम केले जातात. देवळे, चर्च, प्रार्थना मंदिरे स्वच्छ करणे, घर, शाळा यांचा परिसर स्वच्छ करणे, हॉस्पिटलमधील रुग्णांची विचारपूस करणे, वृद्धाश्रमांना भेट देऊन काही कार्यक्रम करणे, अंधशाळा, मतिमंदांची शाळा यांना भेट देऊन सहकार्य करणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, संकटप्रसंगी साहाय्य करणे इत्यादी. अशा कार्यक्रमातून सामाजिक जाणीव होते व समाजासाठी उपयुक्त काम करण्याची भावना निर्माण होते. सुदृढ समाज निर्माण करण्याचे काम या स्काऊट गाईड शिक्षणातून खात्रीने होते. जगातील सर्व देशांतील स्काऊट गाईड अशा उपक्रमातून चांगल्या प्रकारे घडत आहेत. हेच या चळवळीचे यश आहे.
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
**********************************
👧🏻🌅🌺👦🏻💐🌺
रॉबर्ट स्टीफन्सन स्माइथ बेडन पॉवेल हे त्यांचे संपूर्ण नाव त्यांचा जन्म इंग्लडमध्ये लंडन येथे 22 फेब्रुवारी 1857 रोजी झाला. गाईड चळवळीच्या जनक लेडी ओलेव्ह बेडन पॉवेल यांचा जन्म 22 फेब्रु. 1889 मध्ये झाला. कु.अँजनीज बेडन पॉवेल या गाईड चळवळीच्या पहिल्या अध्यक्षा झाल्या. त्यांचे वडील रेव्हरंड (धर्मगुरु) एच.जी बेडन पॉवेल हे ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते. तर आई ब्रिटीश डमिरल (दर्यासारंग) डब्लू टी.स्माइथ यांची कन्या होती. पणजोबा जोसेफ ब्रअर स्माइथ हे अमेरिकेत न्यू जर्सी येथे वसाहतवाले म्हणून गेले होते. इंग्लडंच्या निरनिराळया भागात आपल्या आई व चार भावंडासह भ्रमंती करून रॉबर्टने बालपणीच मोकळ्या हवेतील निसर्गनिवास व उघडया वातावरणातील दिव्य जीवनाचा लाभदायक आनंद मिळवला होता. 

लंडनमधील चार्टर हाऊस स्कूल या शाळेत शिष्यवृत्तीव्दारे 1870 मध्ये बी.पी.नी प्रवेश केला. ते काही विशेष लक्ष वेधून घेतील असे हुशार नव्हते परंतु अतिशय तरतरीत आणि उत्साही विद्यार्थी होते. शाळेत चार भिंतीबाहेर घडणार्‍या गोष्टीत मात्र ते अगदी मनापासून उत्साहाने भाग घेत. फुटबॉल संघाचे उत्तम गोलकीपर म्हणून त्यांची ख्याती होती. अभिनय कौशल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांचे ते आवडते होते. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी चार्टर हाऊस शाळेतील अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर बी.पी.ना लगेच भारतात सब लेफ्टनंट पदावर नोकरीवर जाण्याची संधी स्विकारली.त्यांनी सैनिक सेवा उत्तम तर्‍हेने बजावली. त्यामुळे 26 व्या वर्षी कॅप्टन पदावर पोहचले. सन 1887 मध्ये अफ्रिकेतील झूलू व अशांती लोकांशी रानटी,हिंसक माताबेली योध्यांच्या चकमकीत भाग घेतला.अफ्रिकेतील आदिवासी त्यांना इतके भीत की,त्यांचे इम्पीसा हे नाव ठेवले

👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
*********************************
झेंडा गीत 
**********************************
👧🏻🇮🇳भारत स्काउट एवं गाइड झंडा गीत🇮🇳👦🏻

भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा 
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा 
नीला रंग गगन सा विस्तृत भात्र भाव फैलाता 
त्रिदल कमल नित तीन प्रतिज्ञाओं की याद दिलाता 
और चक्र कहता है प्रतिपल आगे कदम बढ़ेगा 
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा
भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा 
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा

👧🏻🇮🇳🌅🌺👦🏻🇮🇳🌅🌺
*****--**--************************
स्कॉऊट नियम / प्रतिन्या 
********************************
👦🏻स्काउट प्रतिज्ञा👧🏻

मैं मर्यादा पूर्वक प्रतिज्ञा करता हूँ कि मैं यथा शक्ति ईश्वर और अपने देश के प्रति अपने कर्तव्य का पालन करूँगा.
दूसरो की सहायता करूँगा.
स्काउट नियम का पालन करूँगा.

👧🏻स्काउट नियम👦🏻

१. स्काउट विश्वसनीय होता है.
२.स्काउट वफादार होता है.
३.स्काउट सबका मित्र और प्रत्येक दूसरे स्काउट का भाई होता है.
४.स्काउट विनम्र होता है.
५.स्काउट पशु पक्षियों का मित्र और प्रकृति प्रेमी होता है.
६.स्काउट अनुशासन शील होता है और सार्वजनिक संपत्ति की रक्षा करने में सहायता प्रदान करता है.
७.स्काउट साहसी होता है.
८.स्काउट मितव्ययी होता है.
९.स्काउट मन,वचन और कर्म से शुद्ध होता है.

👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
*********************************
स्काउटची प्रार्थना 
**********************************
👧🏻भारत स्काउट एवं गाइड प्रार्थना👦🏻

दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना 
दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना 
हमारे ध्यान में आओ, प्रभु आँखों में बस जाओ 
अँधेरे दिल में आकर के, परम ज्योति जगा देना
बहा दो प्रेम की गंगा, दिलों में प्रेम का सागर
हमेँ आपस में मिलजुल कर, प्रभु रहना सिखा देना
हमारा कर्म हो सेवा, हमारा धर्म हो सेवा 
सदा ईमान हो सेवा व सेवक चर बना देना 
वतन के वास्ते जीना वतन के वास्ते मरना
वतन पर जां फ़िदा करने प्रभु हमको सिखा देना
दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना 
दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना

👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
********************************

1 comment: