पर्यटन / सहल


 🌺👧कोल्हापूर👦🌺
कोल्हापूर 
🌺राधानगरी
कोल्हापूरपासून ६0 किलोमीटर अंतरावर राधानगरी शहर आहे. येथे जाण्यास एस. टी बसेसची भरपूर सुविधा आहे. प्रवासाला १ तास वेळ लागतो. धरणाचा तालुका अशी राधानगरीची ओळख आहे. तालुक्यात राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी जलाशय आहेत. राऊतवाडी धबाधब्याबरोबर, रामणवाडी, हसणे, सोळांकूर, गैबी दरम्यान असणाऱ्या छोट्या-छोट्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी असते. हिरवाईने नटलेले डोंगर आणि पावसाच्या धारा अंगावर झेलण्याचा मनमुराद आनंद घेता येता. घनदाट दाजीपूर अभयारण्याचा परिसर देखील हिरवाईने नटलेला आहे. राधानगरी ते दाजीपूर या मार्गावरील पदभ्रमंती करताना जंगली प्राण्यांचे हमखास दर्शन होते. साप, कीटक व विविध प्रकारची फुलपाखरे, दुर्मीळ, फुले, आदी पर्यटकांचे लक्ष वेधित आहेत. दाजीपूर अभयारण्यावरील कोकण पॉर्इंटवरून दिसणारे सौंदर्य, दाट धुके, ढग जमिनीवर उतरल्याचा भास होणारे दृश्य पर्यटकांना भुरळ पाडते. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या भोजनाची, निवासस्थानाची व्यवस्था आहे. राधानगरीत शासकीय विश्रामगृह आहे. तसेच खासगी हॉटेल्सही आहेत.
🌺 'बर्की' 'बर्की' हे ठिकाण कोल्हापूरपासून ६0 किलोमीटर अंतरावर आहे. कळे-बाजारभोगाव, करंजफेण मार्गे या ठिकाणी जाता येते. तर मलकापूर-येळवणजुगाई मार्गेही जाता येते. गावाच्या सर्व बाजूंनी उंचच्या उंच पर्वतरांगा असून, पावसाळ्यात हिरवाईचा शालू नेसतात. धबधब्याकडे जाण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर पुढे पायपीट करावी लागते. धबधबक्याकडे जाताना हिरवे डोंगर, जलाशय, खळखळणारे ओढे, डोलणारी झाडे, फुले, पक्षी, डोंगरातून कोसळणारे प्रवाह अशी निसर्गाची उधळण अनुभवायास मिळते. इथल्या सुंगधी वातावरणाची भूल प्रत्येकाला मोहविते. धबधब्याच्या मार्गावरच आता जलाशय बांधला असून, याठिकाणी बोटिंगची सोय करण्यात आली आहे. २० फूट रुंदीच्या पात्रातून सुमारे ४०० फुटांवरून कोसळतो. मुख्य धबधब्याच्या आजूबाजूला आणखी चार धबधबे आहेत. इथे मुक्कामासाठी सोय नसल्याने एका दिवसाचीच ही सहल करावी. जेवणाची आणि नाष्ट्याची चांगली सोय होते. येथे घरगुती पद्धतीचे चांगले जेवण मिळते. धबधब्याकडे जातानाच एखाद्या घरात जेवणाची आर्डर दिली, तर धबधब्यातून भिजून आल्यावर नाचण्याची भाकरी, झणझणीत भोजनावर ताव मारता येतो.
🌺स्वप्नवेल पॉर्इंट म्हणजे प्रति महाबळेश्वर
महाराष्ट्र-कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर वसलेला चंदगड तालुक्यातील तिलारीनगरनजीक असलेला स्वप्नवेल पॉर्इंट म्हणजेच गरिबांचे प्रती महाबळेश्वरच आहे. कोल्हापूरहून जाण्यासाठी १४0 किलोमीटर अंतर आहे. तीन तास वेळ जातो. परिसरात राहण्याची सोय आहे. येथे स्वप्नवेल पॉर्इंटसह पारगड, रातोबा पॉर्इंट, ग्रीन व्हॅली रिसॉर्ट, सर्च पॉर्इंट, मोर्लेचा दुर्गोबा धबधबा आणि तिलारीचा तुडुंब भरलेला जलविद्युत प्रकल्प पर्यटकांना भुरळ घालतोय. पारगडच्या पायथ्यापासून नागमोडी वळणे घेत जाताना जंगली प्राणी, निरनिराळे खेकडे, देवाच्या गायी, थुई-थुई नाचणारे मोर, वानरं, ससे, हत्ती, रानडुकरे, सांबर, गवे व निरनिराळे पक्षी व प्राण्यांचे दर्शन होते. चुकून एखादेवेळी झालेले सूर्यदर्शन, मध्येच येणारे धुके मनाला अल्हाददायक वाटते. येथून दिसणारा गोव्याचा अथांग महासागर व विलोभनीय दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते.
पारगडबरोबरच तालुक्यातील कलानंदीगड, गंधर्वगड, महिपाळगड, आदी गड पाहिल्यानंतर शिवकालीन इतिहासाची आठवण होते. स्वप्नवेल पॉर्इंट म्हणजे तर महाबळेश्वर आणि आंबोलीतही सृष्टी सौंंदर्य नाही असा निसर्गाचा अद्वितीय खजिना येथे पाहावयास मिळतो. धुक्यांचे पांघरूण व धो-धो कोसळणारा पाऊस आणि रोरावणारा वारा, तिलारी प्रकल्पाच्या कॅनॉलच्या पुलाखालील प्रचंड उंचीवरून कोसळणारा धबधबा, भन्नाट वारा, आठवडा-आठवडा जमिनीवर राहणारं धुकं आणि फेसाळणारे शुभ्र धबधबे येथील निसर्गाचे सोबती आहेत. रस्ते आणि पर्यटनाचा विकास झाल्याने पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. तिलारीनगर आणि बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील हॉटेलमध्ये सहकुटुंब गावरान जेवणाचा आस्वाद पर्यटकांना मिळत आहे.
🌺पन्हाळा या पिकनिक पॉइंटला यायचे असे : कोल्हापूर शहरातील टाऊन हॉल उद्यानापासून २२ किलोमीटर इतके पन्हाळगडाचे अंतर आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा बसस्थानकातून दर ४५ मिनिटांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा आहे. त्यासाठी प्रतिमाणसी २६ रुपये तिकीट आहे. शहरातून खासगी वाहन करून गेल्यास एक ते दीड हजार रुपये खर्च येईल. कोल्हापूरमधून अंतर : २३ किलोमीटर व जाण्यासाठी लागणारा वेळ ४० मिनिटे. राहण्याची सोय आहे. गडावर राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासह हॉटेल्सदेखील उपलब्ध आहेत. याठिकाणी जेवण, नाष्ट्याची सुविधा आहे. तसेच खाद्यपदार्थ, जेवण घेऊनदेखील जाता येते. एक दिवसात या गडाची सहल करून कोल्हापूर शहरात राहण्यासाठी येणे शक्य आहे.
गडाबद्दलची माहिती : पन्हाळगडावरील तबक उद्यान, वीर बाजीप्रभू यांचा पुतळा, अंबारखाना, धर्मकोठी, नायकिणीचा सज्जा, ताराराणी राजवाडा, सज्जाकोठी, वाघ दरवाजा, तीन दरवाजा, पांडवदरा, सोमेश्वर तलाव, आदी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. पन्हाळ्याचा माथा थंडगार वृक्षराजीने बहरलेला असून येथील वातावरण आल्हाददायक असते. सह्णाद्री पर्वताच्या कुशीत माथ्यावर असणाऱ्या गडांपैकी हा एक महत्त्वाचा दुर्ग आहे. कोल्हापूरची गादी स्थापन करणाऱ्या महाराणी ताराराणी यांनी आपली राजधानी काही वर्षे येथेच ठेवली होती.
🌺 रामतीर्थ मृत्युंजय'कार शिवाजीराव सावंत यांच्या अनेक साहित्यकृतींत उल्लेख आलेल्या आजऱ्यापासून दोन कि़मी. अंतरावर असणाऱ्या रामतीर्थ या सुप्रसिद्ध 'क' वर्ग पर्यटनस्थळी नैसर्गिक सौंदर्याची मुक्त उधळण पाहावयास मिळते. कोल्हापूरपासून १00 किमी, दोन तास प्रवास, एस. टी. महामंडळाच्या बसेस जातात. राहण्याची सोय आहे. हॉटेलची संख्याही मोठी आहे. निधी अपुरा पडल्याने महादेव मंदिरासमोरील बांधकाम, पर्यटकांसाठी रॅम्प व किरकोळ कामे झाली. काही स्थानिक मंडळी लोकवर्गणी जमा करून इतर कामे करीत आहेत.येथे पर्यटकांमध्ये वाढ होत असली, तरीही प्राथमिक सुविधांचा अभावच आहे. यात्री निवासामध्ये पर्यटकांना थांबण्याची सोय करण्यात आली असली, तरी यात्री निवास बंद अवस्थेतच असल्याने अडचणीचे होत आहे. स्वच्छतागृहे वापराअभावी पडून आहेत. येथून पुढे आंबोली/ गोव्याला जाता येते.
🌺केर्ले धबधबा : शाहूवाडीपासून केर्ले अठरा किलोमीटरवर. गावच्या दऱ्यामधील खरब्याचा ओढा दोनशे फुटांवरून कोसळत पुढे तीन टप्प्याने खळाळत झाडीत विसावतो. घनदाट जंगलातून झेपावणारा धबधबा किर्र जंगलाचा थरार उभा करतो. महामागार्पासून अडीच किलोमीटरचा रस्ता केर्ले प्राथमिक शाळेजवळून धबधब्याकडे वळतो. त्यापुढे अर्धाकिलोमीटरची माळरान वाट धबधब्याला भिडते.
मानोली धरण व सांडवा धबधबा :
आंबा बस थांब्यापासून दोन किलोमीटरवरील विशाळगड मार्गावरून हे धरण नजरेत येते. तिन्ही बाजूच्या वनराजीतून धडाडणारे निर्झर जलाशयाला मिळतात. जलाशय दोन टप्प्यात सांडव्याच्या रूपाने धबधबा बनतो. सांडव्याच्या सुरुवातीला तीनशे फूट सिमेंटच्या कठड्यावरून समांतर फेसाळणारे पाणी काळ्या खडकातून पुढे सरकते. पुढे तो प्रवाह सव्वाशे फूट उंचीच्या चरीतून प्रशस्त डोहात धडकतो. पुढे कडवी नदीचे रूप घेतो.
हाकेच्या अंतरावर गावाची वस्ती व लगत हॉटेल सुविधा आहे.
आंबाघाट : आंब्यापासून तीन किलोमीटरवरील खिंडीचा प्रवेश विस्तीर्ण कोकण दर्शन घडवितो. मात्र, खिंड व हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या वाटेजवळ दरड पडण्याची भीती राहत असल्याने गायमुख,विसावा पॉर्इंट व चक्रीवळण ही ठिकाणे दरीतून धुक्याची सोबत पुरविणारे पावसाचे तुषार अंगावर घेण्यास वाहनांची रीघ लागते.
🌺विशाळगड जंगल सफर : आंबा ते केंबुणेर्वाडी हा दहा किलोमीटरचा जंगलमय घाट प्रवास साहसी थ्रील देतो. कोल्हापूरपासून अंतर ७0 किलोमीटर असून प्रवासाला २ तास लागतात. निवास व जेवणाची चांगली सोय आहे. झाडीतील पाणथळे, वाट अडवणारे गवे, वाऱ्यासोबत पाठशिवण खेळणारे धुके अंगावर घेत कोकण पॉर्इंट व वाघझऱ्यावरचा पाऊस नीरव शांतता व भयान एकांत देतो. या मार्गावर दोन ठिकाणी ओढ्याचे पाणी येते.
🌺 गगनबावडा ,गगनबावडा तालुका म्हटले की, पावसाचे माहेरघर म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. कोल्हापूरमधून ६0 किलोमीटर हे अंतर असून एस. टी. बसेस भरपूर सुविधा आहे. जाण्यासाठी एक तास लागतो. राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासह हॉटेल्सदेखील उपलब्ध आहेत. याठिकाणी जेवण, नाष्ट्याची सुविधा आहे. तसेच खाद्यपदार्थ, जेवण घेऊनदेखील जाता येते. येथून करूळ व भुईबावडा हे दोन घाट कोकणात मार्गक्रमण करतात. या घाटाचे सृष्टीसौंदर्य तर पावसाळ्यात भुरळ घातल्याशिवाय राहत नाहीत. हिरवीगार शाल पांघरूण लांबच लांब पसरलेल्या लहान मोठ्या टेकड्या कोकणातील जीवनाचे दर्शन घडवितात. करूळ व भुईबावडा घाटात पावसाळ्यात उगम पावणारे लहान मोठे धबधबे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची हौस भागविण्यास पुरेसे ठरतात. नागमोडी वळणे घेत जाणारे घाटरस्ते व घाटातून झुळझूळ वाहत नदीत पडणारे पाण्याचे प्रवाह पाहून पर्यटक क्षणभर थक्क होतो. येथील गगनगड न पाहिले तर नवलच.
साहसी पर्यटनाचा वर्षा बाज म्हणजे आंबा घाट
कोल्हापूर-रत्नागिरीच्या जिल्ह्यांची सीमा सजवलेला तेरा किलोमीटरचा नागमोडी आंबाघाट, आंबा-विशाळगड व केंबुणेर्वाडी ते पावनखिंड हा जंगल नि इतिहासाची साद घालणारी वनराई, केर्लेचा धबधबा, मानोली धरणाच्या सांडव्याने घेतलेले प्रशस्त धबधब्याचे रूप, गेळवडे धरणाचा झाडीत विसावलेला बारा किलोमीटरचा बॅक वॉटर व्हू, बर्की, पांढरेपाणी ही वर्षा पर्यटनाला हाकणारी स्थळे सर्वांनाच भुरळ घालतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून कोल्हापूर,कोकण व पुणे, मुंबई भागातील हौशी मंडळी येथील शहारणारा पाऊस एन्जॉय करण्यास गर्दी करीत आहेत. भर पावसातील पावनखिंडीची वारी तर राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे.
***************************************
🌺👦अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळे👧🌺
🌺भंडारदरा धरण- या धरणाचा परिसर चारही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला आह़े भंडारदरा धरणाच्या उजवीकडून घाटघर-साम्रद-रतनगडमार्गे पुन्हा भंडारदरा अशी परिक्रमा केल्यास फेसाळणारे धबधबे मनाला लुब्ध करतात.
साम्रद - घाटघरपासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेली सांदणदरी़ या दरीत जाण्याऐवजी दूरुनच पावसाचा आनंद घ्यावा़ 
🌺रतनगड - 
साम्रदपासून आठ किलोमीटरवर रतनगड हा प्राचीन किल्ला आहे. 🌺कळसुबाई - 
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखऱ हे शिखर आणि कळसुबाईच्या रांगेतच अलंग, मलंग, कुलंग आणि मदनगड हे किल्ले साहसी पर्यटकांना ट्रेकिंगसाठी आकर्षित करतात. 
🌺रंधा धबधबा - भंडारद-यापासून 10 किलोमीटरवर असलेला हा धबधबा 17 फूट उंचीवरुन खाली कोसळताना पाहणो डोळ्याचे पारणो फेडणारे ठरते. याशिवाय अंब्रेला, नेकलेस धबधबेही पाहण्यासारखीच आहेत.
🌺हरिश्चंद्रगड - 
साहसी पर्यटकांना आव्हान देत हा गड उभा आहे. सुमारे सोळाशे वर्षापूर्वीचे हेमाडपंथी मंदिर, दहा गुहा आणि अनेक औषधी व दुर्मीळ वनस्पतींनी बहरलेली वनराई हे हरिश्चंद्रगडाचे वैशिष्टय़ सांगता येईल़ गडावरील कोकणकडा आणि त्याच रांगेत कुंतलगड आहे. काय पहाल ? जूनमध्ये काजवा महोत्सव, यानंतर धो-धो कोसळणारा पाऊस आणि फेसाळणारे प्रचंड धबधबे, हिरवागार निसर्ग
घाटघरचा कोकणकडा- सांम्रद, येथील सांदणदरी, रतनवाडी, प्राचीन हेमाडपंथी अमृतेश्वराचे मंदिर, रतनगड
गिर्यारोहणासाठी- अलंग, मलंग, कुलंग हे दुर्ग
🌺भंडारदरा- निळाशार जलाशय, बोटिंगचा मनमुराद आनंद लुटण्याची व्यवस्था, मनाला भुरळ घालणारे आकर्षक उद्यान
रंधा- पर्यटन विकासातून केलेले विलोभनीय काम, रंधा धबधबा हरिश्चंद्रगड परिसर- पावसाळ्यात जलोत्सव, ऑक्टोबरनंतर फुलोत्सव, महाकाय कोकणकडा, हरिश्चंद्रगड
अकोले येथे महामुनी अगस्ती महाराजांचे मंदिर
टाकाहारी येथे प्राचीन देवीचे मंदिर
विश्रमगड-शिवाजी महाराजांचे विश्रंतीस्थान आणि येथे अवतरत असलेली शिवसृष्टी / कसे जाल?मुंबईहून कसारा-इगतपुरी-घोटी-वारंघुशी-भंडारदरा एकूण अंतर 180 किलोमीटर पुण्याहून संगमनेर-अकोले-राजूर-भंडारदराएकूण अंतर 170 किलोमीटर नाशिकहून घोटी-बारी-वारंघुशी-भंडारदराएकूण अंतर 80 किलोमीटरशिर्डीहून संगमनेर-अकोले-राजूर-भंडारदराएकूण अंतर 90 किलोमीटर
🌺निवास व्यवस्था भंडारदरा येथे पर्यटन विकास महामंडळाने निवासी खोल्या बांधलेल्या आहेत़ वन्यजीवमार्फत तीन क्लासवन सूट, 2 जनरल सूट आहेत़ घाटघर येथे वन्यजीवमार्फत सहा खोल्या पर्यटकांसाठी उपलब्ध होऊ शकतात़  गृहपर्यटनमधून रतनवाडी, घाटघर, सांम्रद येथे 18 खोल्या उपलब्ध आहेत़ याशिवाय खासगी रिसोर्टमध्येही निवासाची व्यवस्था होऊ शकत़े पर्यटकांना टेंटमध्ये रहायचे असल्यास टेंटही उपलब्ध करुन दिले जातात ऑक्टोबरमधील पुष्पोत्सव हरिश्चंद्रगड परिसरात असंख्य आणि विविध रंगी फुलांचा पुष्पोत्सव ऑक्टोबरमध्ये बहरतो़ हिमालयातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ची अनुभूती देणारा हा फुलोत्सव पावसाळा संपत आल्यानंतर सुरु होतो़ दर सात वर्षानी फुलणारी ‘कारवी’ हेही इथले खास आकर्षण. निळ्या रंगाची कारवी फुलते तेव्हा हरिश्चंद्रगडावर निळी शाल पांघरल्याचे दिसते. आता 2017 ला ही कारवी फुलणार असल्याचे सांगितले जाते.
🌺काजवा महोत्सव घाटघर आणि रतनवाडी परिसरात जूनच्या पंधरवाडय़ात रात्रीच्या वेळी झाडांवर प्रकाशमान झालेली फुले अवतरलेली पहायला मिळतात़ ही फुले म्हणजे असंख्य काजव्यांचे पुंजक़े यालाच या परिसरात काजवा महोत्सव म्हणतात़ हा काजवा महोत्सव पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य हौशी घाटघर परिसरात टेंट उभारुन राहतात.औरंगाबादपासून अवघ्या ३६ किलोमीटरवर असलेले 🌺म्हैसमाळ म्हणजे मराठवाड्याचे ‘महाबळेश्वरच’ म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हैसमाळ म्हणजे निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा सुंदर मिलाफ... वनस्पतिशास्त्राची येथे जणू प्रयोगशाळाच वसलेली आहे. तुम्हाला येथे विविध प्रकारच्या वनस्पती, फुलांचे प्रकार पहायाला मिळतील. पावसाळा अन् हिवाळ्यात तर जणू स्वर्गच धर्तीवर उतरल्याचा अनुभव येतो. मान्सूनमध्ये तर येथील डोंगर- दऱ्यांमध्ये पसरलेला हिरवा गालिचा अन् पायाशी लोळणारे ढग हे डोळ्याचे पारणे फेडतात...म्हैसमाळ सह्याद्री पर्वतरांगाचा सर्वात पूर्वेकडचा भाग आहे. या परिसराला सुंदर, विलक्षण पर्वतरांग लाभलेली आहे. मराठवाड्यातील हे मिनी महाबळेश्वर एका उंच पठारावर चहूकडे सर्वदूर पसरलेले आहे. या पठाराच्या मधून जाणारी डांबरी सडक पठार विभागून उत्तरेकडच्या टोकापर्यंत जाते. पावसाळ्यात अधून- मधून सतत कोसळणाऱ्या मुसळधार, रिमझिम पावसाच्या सरी, हिरव्यागार खोल दऱ्या, प्रसन्न करणारी हवा, मनमोहक व्ह्यू- पॉर्इंट, घनदाट झाडी, जागोजागी चढ- उतारांच्या पाऊलवाटा... त्यातच मधोमध असलेला गिरजा तलाव, हे चित्र डोळ्याचे पारणे फेडते. येथील व्ह्यू- पॉर्इंटस्वरून जवळजवळ ३० किलोमीटर इतका दिसणारा आसमंत एखाद्या चित्रासारखा भासतो. दऱ्या- खोऱ्यातील रेखीव शेती, मध्ये असलेली छोटी घरे, जागोजागी दिसणारे जंगलांचे पुंजके आपल्या मनात घर करून जातात. पावसाळ्यात तर जणू स्वर्गच धरतीवर उतरला आहे की काय, अशी अनुभुती येथे मिळते. येथील समशीतोष्ण हवामान आपल्याला हवेहवेचे वाटते. आकडेवारीनुसार येथील तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते, तर किमान तापमान साधारणपणे ७ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे वर्षभरात कधीही यावे, असे हे पर्यटनस्थळ आहे. वनविभागाने पूर्वीपासूनच वनपर्यटनाचा हेतू डोळ्यासमोर ठेऊन येथे सुनियोजित विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे म्हैसमाळच्या आजूबाजूला अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणी उदयास आली आहे, जी पर्यटकांचे आकर्षण ठरली आहेत. येथील दूरदर्शनच्या मनोऱ्याजवळून दिसणारा अप्रतिम देखावा अजिबात चूकवू नये, असाच आहे. छोटछोटे तलाव, जंगल, दऱ्यांनी नटलेले हे विस्तीर्ण पठार एकदा तरी नक्कीच भेट देण्यासारखे आहे. धार्मिक स्थळही म्हैसमाळ हे शिवाच्या एका जुन्या मंदिराच्या अवशेषाचेही ठिकाण आहे. त्यामुळे भागाचे मुळ नाव महेशमाळ होते. अपभ्रंश होऊन कालांतराने महेशमाळचे म्हैसमाळ नाव पडले. या परिसराच्या मधोमध गिरजा देवीचे मंदीर आहे. हे मंदीर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. याच पठारावर आता एक बालाजी मंदीरही वसविण्यात आले आहे. हे मंदीरही पाहण्यासारखेच आहे. म्हैसमाळपासून अवघ्या बारा किलोमीटरवर असलेले खुलताबादेत देशविदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रा मारोतीचे विशाल मंदीर आहे. याच खुलताबादेत मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या महमंद पैगंबरांच्या मिशीचा केस ठेवलेला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांसाठीही हे एक पवित्रस्थान मानल्या जाते. शिवाय जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या, बारा जोर्तीलिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वरचे मंदीर आणि दौलताबादचा किल्लाही येथून अवघ्या १४ ते १५ किलोमीटर अंतरावरच आहे. येण्या- जाण्याची व्यवस्था
-औरंगाबादपर्यंत येण्यासाठी विमान, रेल्वे आणि बसची व्यवस्था आहे. औरंगाबादेतून म्हैसमाळचे अंतर सुमारे ३६ किलोमीटर आहे. त्यासाठी औरंगाबादेतून आधी खुलताबाद यावे लागते. तेथून १२ किलोमीटर अंतरावर म्हैसमाळ आहे. येथे जाण्यासाठी बस, खासगी टॅक्सी उपलब्ध आहेत. 
- वाहनाने हे अंतर जास्तीत जास्त एक तासाचे आहे. 
 जवळची पर्यटन,🌺 धार्मिकस्थळे -येथून वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदीर १४ किलोमीटर आहे.
- प्रसिद्ध खुलताबादेतील भद्रा मारोती मंदीर १२ किलोमीटरवर आहे. औरंगाबाद- म्हैसमाळ मार्गावरच दौलताबाद किल्ला आहे. तोही या प्रवासात पाहता येतो.
🌺निवासाची व्यवस्था
- म्हैसमाळला आता वनविभागाच्या वतीने जंगलातच एसी तंबू उभारण्यात आले आहेत. मात्र, ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत. लवकरच राहण्यासाठी हे तंबू उपलब्द होतील.
- म्हैसमाळच्या पठारावर निवासासाठी हॉटेल आहेत.
- किंवा एक दिवसाचे पर्यटन करून खुलताबाद, औरंगाबादला मुक्कामाला येता येते.
******************************************
शहानूर संकुल
अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यात नरनाळा किल्याचे पायथ्याशी शहानूर निसर्ग पर्यटन केंद्र आहे. अकोट पासुन १७ किलोमीटर अंतरावर हा पिकनिक स्पॉट म्हणून प्रसिध्द आहे.शहानूर येथे जाण्याकरिता आकोट येथून एस.टी.महामंडळाची सकाळी ७.३० ला तर परत येण्याकरीता सांयकाळी ५.३० ची बस आहे. तसेच खासगी वाहने जाता येते.आकोट येथुन पोपटखेड धरण पाहल्यानंतर शहानूर या रस्त्यामध्ये छोटे-छोटे नदीनाले लागतात. नरनाळा अभयारण्याचा परिसर असल्याने येथील आठवणींना क्लिक करण्यासाठी व्हिडिओ कॅमेरा किंवा स्मार्ट फोन सोबत असावा. शहानूर निसर्ग संकुल येथे वनविभागाने खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली आहे. पंरतु बुंकीग सुरू असली तर मिळेल. त्यामुळे खाण्यापिण्याचे साहित्य सोबत असणे आवश्यक आहे. शिवाय जंगल फिरण्याकरीता वनविभागाची सफारी उपलब्ध असल्यास मिळु शकते. गाईड सुध्दा मिळतात. लहान मुलांना खेळण्याकरीता साहीत्य आहे. तसेच वन्यप्राणी,वनविभागाची माहीतीसह आदीवाशी बांधवाच्या संस्कृतीचा ठेवा या संकुलात पाहावयास मिळतो.शहानूर पासुन उंचावर नरनाळा किल्ला आहे. या किल्लावर जाण्याकरीता वनविभागाचे अटी व शर्ती लागु करण्यात आल्या आहेत. खाजगी वाहनाने गेल्यास एकाच दिवशी शहानूर पर्यटन केंद्र व सुरई धबधबाचा आनंद लुटता येतो.
सुरई धबधबा - अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यानजीक सातपुडा जंगलातील धारगड मार्गावर सुरई धबधबा हा पर्यटकाकरीता पर्वणी आहे. मात्र सुरई धबधबा येथे जाण्याकरिता एस.टी.महामंडळाची बस सेवा नाही.आकोट येथून २२ किलोमीटर अंंतरावर धारगड मार्गावर हा धबधबा आहे. या ठिकाणी जाण्याकरीता खासगी वाहनाने जावे लागते. २०० फुट उंचावरुन पाणी पडत असल्याने धबधबा पासुन रस्त्यापर्यंत नदी वाहते. धबधब्याचे पाणी कोसळत असलेल्या ठिकाणी खोलगट भाग आहे. हा भाग धोकादायक आहे. त्यामुळे केवळ धबधबा पाहण्याचा व नंतर नदीमध्ये आनंद घेता येईल. नदीमधुन धबधबापर्यंत जावे लागते.दूचाकी वाहनाने जाण्याची मजा वेगळीच आहे.
पोपटखेडचे गेट पार केल्यानंतर रस्त्यामध्ये अनेक नदीनाले लागतात. सर्वत्र निसर्ग वातावरण आहे.
मेळघाट अभयारण्याचा परिसर असल्याने येथील आठवणींना क्लिक करण्यासाठी व्हिडिओ कॅमेरा किंवा स्मार्ट फोन सोबत असावा. खाण्यापिण्याची व राहण्याची सोय नाही.त्यामुळे खाण्यापिण्याचे साहित्य सोबत न्यावे.

आदिवासीबहुल तसेच जंगलाचा भाग असल्याने सायंकाळपर्यंत परिसरातून बाहेर यावे लागते. सुरई धबधबा समोर धारगड येथे महादेवाचे प्राचीन शिवलिंग आहे. मात्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे येथे जाण्यास प्रतिबंध केला आहे.श्रावण (आॅगस्ट) महिन्यात कावडधारी जलाभिषेक करण्यासाठी प्रवेश दिला जातो.
****************************************
उन्हाच्या रणरणत्या तडाख्यातून दिलासा देण्यासाठी मान्सूनचे आगमन झाले असून वातावरणातील गारव्यामुळे सर्वजण सुखावले आहेत. अशा या चिंब पावसात भिजण्यासाठी लहानथोर सर्वजण नेहमीच तयार असतात. पावसाळी वातावरणात मित्र-मैत्रिणी वा कुटुंबियासह ट्रेक व पिकनिकला जाऊन पावसाळ्याचा आनंद लुटणं कोणाला नाही आवडणार? मुंबईतील अशाच काही ठिकाणांची माहिती तुमच्यासाठी...
1) कोंडेश्वर धबधबा-  बदलापूर
मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकापासून पूर्वेला साधारण १५ किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा अतिशय लोकप्रिय पिकनिक पॉईंट आहे. तिथे शंकर व गणपतीचे मंदिरही असून शंकराच्या मंदिरामुळचे त्या धबधब्याला कोंडेश्वर हे नाव पडल आहे. पंधरा फुटांवरून अधिक उंचीवरून कोसळणा-या या धबधब्याखाली भिजण्याची मजा लुटण्यासाठी फक्त स्थानिकच नव्हे तर मुंबई व बाहेरूनही अनेक पर्यटक येत असतात.
कसे जाल : तेथे जाण्यासाठी तुमची स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच अन्यथा बदलापूरला उतरून टमटमही मिळू शकते.
2) माळशेज घाट-  कल्याण-मुरबाड मार्ग
मुंबईतील ट्रेकर्स व पिकनकिसाठी जाणा-या तरूणांमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेला हा माळशेज घाट पावसाळ्यात हिरवाईने अक्षरश: नटलेला असतो.  या घाटातील मनोरम दृश्यं, कड्यांवरून कोसळणारा पाऊस आणि तेथील धबधबे यामुळे पर्यटकांची इथे खूप गर्दी असते. तसेच पावसाळ्यात येथील जलाशयात येणारे फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी जमते. तसेच घाटाच्या पायथ्याशी अनके चांगली रिसोर्ट्स असून उत्तम जेवण मिळते.
3) पळस दरी - 
मध्य रेल्वेच्या खोपोली रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेले हे गाव पावसाळी पिकनिकसाठी एक उत्तम ठिकाण असून पर्यटकांचा आवडता स्पॉट आहे. येथून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, डोंगरांवर पसरलेली हिरवाईची झालर, जवळच असलेला सोनगिरी किल्ला यामुळे हा स्पॉट पिकनिक व ट्रेकर्ससाठी एकदम चर्चेत असतो. 
४) कान्हेरी - बोरीवली
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातही काही निवांत ठिकाणे असून उपनगरातील आवडता पावसाळी पिकनिक स्पॉट म्हणजे कान्हेरी.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी परिसरात अनेक धबधबे असून कॉलेज तरुणांचे सर्वात आवडते ठिकाण आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गेटवरून कान्हेरी गुंफेकडे जाण्यासाठी अनेक बस उबलब्ध आहेत. 
५) भिवपुरी धबधबा- भिवपुरी
मध्य रेल्वेच्या भिवपुरी स्थानकाहून शेतातून जाणारी पाउलवाट अवघ्या अर्ध्या तासात भिवपुरी धबधब्याकडे नेते. माथेरानच्या पठारावरून येणारं हे पाणी धबधब्याच्या रुपाने खाली येतं आणि त्याचमुळे हा धबधबा सेफ असून वीकेंड्सना येथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसते. स्थानकाजवळ काही हॉटेल्स असून तेथे चांगले जेवळ मिळते.
६)  माथेरान -
भर पावसात माथेरानला जाऊन भिजण्याची मजा काही औरच. नेरळ स्टेशनला उतरून मिनी ट्रेनद्वारे माथेरानला जाताना खूप मजा येते. तसेच नेरळ ते माथेरान या ट्रेनप्रवासादरम्यान अनेक धबधबेही लागतात. अनेक पर्यटक तेथे उतरून धबधब्यांखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात. 
७)  तुंगारेश्वर -  मुंबई-अहमदाबाद हायवेलगत, वसई.

मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर असलेले हे ठिकाण धार्मिकही आहे आणि एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट. वसईजवळील हा प्रसिद्ध धबधबा असून तेथे प्रसिद्ध शिवमंदिरही आहे. तेथे नदी आणि धबधबा अशा दोन्हींचा आनंद घेता येतो. वसई रोड स्थानकावरून एसटीने तुंगारेश्वरला जाता येते. डोंगरावर खाण्यापिण्याची सोय नसली तरी तुंगारेश्वर मंदिराजवळ खाण्या-पिण्याची सर्व सोय उपलब्ध असते.
**************************************

No comments:

Post a Comment