आजार

🌺सामान्य आजार🌺

सामान्य आजार म्हणजे वरचे वर होणारे, फार गंभीर नसलेले परंतु लगेच उपचार घ्यावेत असे आजार. नाक वहाणे, सर्दी होणे, खोकला होणे, कफ होणे, ताप येणे हे प्रामुख्याने होणारे सर्वसामान्य आजार. तसेच पाठदुखी, पाठीवर येणारा ताण, डोकेदुखी, पोट बिघडून जुलाब होणे, ऍसिडिटी, एखाद्या अवयवावर येणारा ताण हे सुद्धा सर्वसामान्य आजार आहेत.

आपल्याकडे अशा प्रकारचा एखादा आजार झाला की त्याकडे सुरवातीला हमखास दुर्लक्ष केले जाते. परंतु असे दुर्लक्ष केल्यास हे आजार वाढू शकतात आणि ते अंगावर काढल्याने त्याचे एखाद्या गंभीर आजारात रुपांतर होऊ शकते. 

त्यामुळेच आपल्या सर्वांनाच सर्वसामान्य आजारांविषयी आणि त्यावरील उपचारांविषयी माहिती असणे गरजेचे आहे.
        N•R•Sable        🌺व्यायाम महत्व🌺


व्यायाम म्हणजे काय ?
शरीराला स्थिरता प्राप्त करण्यासाठी, शरीर मजबुत बनवण्यासाठी, बल वाढवण्यासाठी केल्या जाणाऱया क्रियेस व्यायाम असे म्हणतात.

व्यायाम महत्व –
● व्यायामामुळे शारीरीक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमिना वाढतो,
● शरीर मजबूत होते, बलाची वाढ होते पर्यायाने रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते,
● शरीर आकर्षक, बांधेसुद बनते,
● व्यायामामुळे शरीरातील मेदाचे प्रमाण कमी होते त्यामुळे शरीराला हलकेपणा येतो. वजन आटोक्यात राहते, स्थुलता होत नाही,
● स्थुलतेमुळे होणाऱया गंभीर विकारांपासून दूर राहण्यास मदत होते. जसे हृद्रोग, उच्चरक्तदाब, मधुमेह, धमनीकाठिन्यता, संधिवात, पक्षाघात आणि विविध प्रकारचे कैन्सरपासून दूर राहण्यास नियमित व्यायामामुळे मदत होते,
● जाठराग्नी प्रदिप्त होतो, अन्नाचे योग्य पचन होते, मल, मुत्र आणि स्वेदाचे योग्य प्रकारे निसरण होते,
● व्यायामामुळे आळस नष्ट होतो,
● झोप व्यवस्थित लागते,
● मानसिक तणावापासून मुक्ति मिळते,

● शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. यासारखे विविध लाभ नियमित व्यायामामुळे होत असतात.
@@@@@@@@@@@@@@@#@@@@@
🌺पाठ दुखी🌺                  एकाच अवस्थेत दीर्घकाळ बसल्यामुळे पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. विशेषत: संगणकासमोर बसून काम करणार्‍या लोकांना हा त्रास अधिक संभवतो. त्यांना तर हात, खांदे, मान, पाठ यामध्ये काही ना काही तरी त्रास होण्याची शक्यता असते. विशेषत: पाठीच्या कण्याला आधार देणारे स्नायू दुखावले जाऊन किंवा आखडले जाऊन नव्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी मानेपासून माकड हाडापर्यंत सगळे स्नायू लवचिक असण्याची गरज आहे. त्यासाठी खालील व्यायाम करावेत.

१) पाठ वाकवणे – हात डोक्यापर्यंत वर करून पाठीला बाक देणे आणि हात मागे नेणे. हा व्यायाम दोन-तीन वेळा करावा. काम करताना सलगपणे एकाच अवस्थेत न बसता थोडेसे मधेच उठून शरीराला या दिशेने ताण द्यावा, त्यामुळे पाठ वाकली जाते आणि स्नायू लवचिक होतात. अशा प्रकारचा व्यायाम अधूनमधून करावा. त्याचा फायदा रक्ताच्या प्रवाहावर सुद्धा होत असतो.

२) केवळ तुमचे पाठीचेच स्नायू लवचिक असणे आवश्यक आहे असे नाही तर कमरेचे विशेषत: कटी म्हणजे पोटाच्या दोन बाजूंचे स्नायूही लवचिक असावे लागतात. त्यासाठी अर्धचक्रासन करावे. अर्धचक्रासन म्हणजे डाव्या कमरेवर डावा हात ठेवून उजवा हात कानाकडून डावीकडे वळवणे. असाच व्यायाम उजवा हात उजव्या कमरेवर ठेवून डावा हात कानाजवळून वर करून तो उजवीकडे वळवावा म्हणजे दोन्ही बाजूंनी कमरेला बाक मिळतो.


३) ताडासन – हात सरळ वर करावे आणि हातासहीत सगळ्या शरीराला वरच्या दिशेने ताण द्यावा. अशावेळी टाचावर उभे रहावे आणि जणू आपले शरीर कोणी तरी वर ओढत आहे इतका शरीराला मिळावा. त्यामुळे एका जागी बसून आखडलेले स्नायू मोकळे होतात. आपण झोपेतून उठल्याबरोबर आळस देतो. आळस देण्याच्या या क्रियेमध्ये सगळे शरीर आखडून पुन्हा सोडून देतो. आपण या आळस देण्याच्या क्रियेकडे व्यायाम म्हणून पहात नाही. परंतु त्यामुळे आपले आळसावलेले शरीर मोकळे
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
🌺सर्दीपुढे आता 'नाक' टेकू नका🌺

WD
एवढीशी ती सर्दी पण पार माणसाचे 'पाणी पाणी' करून टाकते. पण थांबा आता अमेरिकेत झालेल्या नव्या संशोधनात एका फुलाद्वारे सर्दी, खोकला ५८ टक्के कमी करता येतो, असा शोध लागला आहे. थोडक्यात काय तर एलोपॅथिक उपचारांवर भर देणार्‍या अमेरिकी शास्त्रज्ञांनाही आता उपचारासाठी निसर्गाकडे वळावे लागले आहे.


इचिनेशिया असे या फुलाचे नाव असून ते उत्तर अमेरिकेत सापडते. या फुलापासून बनविलेल्या औषधाच्या चौदा वेळा चाचण्या घेतल्या. त्यानंतरच शास्त्रज्ञ या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले आहेत.


जीवनसत्वाबरोबरच हे फूल सेवन केल्यास त्याचे अधिक फायदे आहेत. यात असणारे विषाणू सर्दीला रोखतात. यासंदर्भात संशोधन करणारे डॉ. वॉकर यांनी जे सांगितले ते फार महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, घरगुती उपचारांवर जगभरात डॉक्टरमंडळींकडून टीका केली जाते. पण विज्ञानाला हळू हळू त्याचे महत्त्व समजू लागले आहे. या शोधाची सर्व माहिती 'द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज' या नियतकालिकात प्रकाशित झाली आहे.
                          N•R•Sable                  🌺 लहान मुलांना आकडी येते त्यावेळी🌺

लहान मुलांना आकडी येते त्यावेळी कांदा ठेचून त्यांच्या नाकाशी धरावा. कांद्याचा दर्प नाकात जाताच आकडी थांबते.

                      N•R•Sable          आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
🌺जल प्रदूषण आणि आरोग्य🌺
जगण्यासाठी सजीवांना पाण्याची अत्यंत गरज असते. फक्त 1 ते 1.5 % च पाणी पिण्यायोशग्य आहे. कारण पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी जवळजवळ 98 % पाणी हे समुद्र आणि बर्फाच्या स्वरुपात आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी जपुन वापरणे गरजेचे तर आहेच त्याशिवाय पिण्यायोग्य पाण्यात प्रदुषके मिसळण्यापासून थांबवणेसुद्धा गरजेचे आहे.

जलप्रदुषणाची सामान्य कारणे –
अनेक कारणांद्वारे जल प्रदुषण होत असते,
● औद्योगिक रासायनिक पदार्थ पाण्यात सोडणे,
● सांडपाणी मैलापाणी जलाशयात सोडल्याणे,
● रासायनिक खते, किटकनाशके पाण्यात मिसळल्याने,
● पाण्यातील जीव मृत होऊन कुजल्याने,
● कचरा किंवा तत्सम पदार्थ पाण्यात टाकल्याने,
● जनावरे, कपडे, भांडी नदीच्या ठिकाणी धुतल्याने, मृत जनावरे नदीत टाकल्याने,
● रासायनिक रंगकाम केलेल्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या मुर्त्यांच्या विसर्जनामुळे,
पाण्याचे प्रदूषण होते.

जलप्रदुषणाने होणारे दुष्परिणाम –
● जलप्रदुषणामुळे पाण्यामध्ये जीवाणूंची उत्पत्ती होते असे जीवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये अतिसार (हगवण), उलटी, काविळ, विविध ताप, विसूचिका (Cholera), मलेरिया, खोकला, सर्दि यासरखे रोग उत्पन्न होतात.
● रासायनिक पदार्थ युक्त पाणी सेवन केल्यास त्यांचा अत्यंत वाईट परिणाम आपल्या किडन्यांवर होतो. किडन्या निकामी होणे यासारखे गंभीर व्याधी उत्पन्न होतात.

उपाययोजना –
● जल प्रदुषण थांबवणे,
● औद्योगिक घटकांना मार्गदर्शक सुचना करणे, रासायनिक पदार्थ पाण्यात टाकण्यापासून अटकाव करणे.
● सेंद्रिय शेतीचा वापर करणे. रासायनिक खते, किटकनाशके मर्यादित वापरणे.
● शेडूमातीच्या मुर्ती आणि नैसर्गीक रंग वापरुन सणांचा सात्विक आनंद लुटणे, जलप्रदुषण करणे टाळणे,

● पाणी उकळवून पिणे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

No comments:

Post a Comment