ई लर्निंग / डिजिटल शाळा

ई लर्निंग म्हणजे काय ?
 ई लर्निंग म्हणजे वर्गअध्यापणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वापरण्यात येणारी आधुनिक शिक्षणपद्धती..... (Electronic Educational learning)                                                                                                                          शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवणारी व 
विध्यार्थाना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे नवीन माहिती देणारी ही आनंददायी शिक्षणपद्धती आहे. ई- 
लर्निंग साधनातसंगणक,प्रोजेक्टर,मोबईल,रेडीओ,दूरदर्शन,डीव्हिडी,एलसीडी माॅनिटर यांचा 
समावेश होतो. ई-लर्निंग साहित्य म्हणून आपण ध्वनिचित्रफिती, animation clips ,Educational 
Software, 3D मॉडेल,PPT Slides,इंटरनेटवरील साहित्य (विशेषतः You Tube ,Google Play Store) , 
वेबसाईटस, ब्लॉग, यांचा समावेश होतो.  ई-लर्निंग मध्ये interactive multimedia video lessons ,व 
Touch Screen pen चा वापर करून प्रोजेक्टर पडद्यावर अध्यापन करता येते.शिक्षक स्वतः पाठाचे 
प्रेझेंनटेशन तयार करून अध्यापन करू शकतात. 
ई-लर्निंग तंत्रज्ञान शिक्षक व विध्यार्थी यांना हाताळण्यास सोपे आहे.
              N. R. Sable
 ई लर्निंग
ई-लर्निंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक अथवा इंटरनेट च्या माध्यमातून ऑनलाइन लर्निंग. ई लर्निंगमध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रदान करण्यात येउ शकते.
ई लर्निंग शासकीय शिक्षण क्षेत्रात वापर
शासनाच्या उपक्रम व योजनांचे प्रसारनाचे ई लर्निंग माध्यमातून थेट प्रसारण उपलब्ध केले जाते. त्यांचे धेय्यवाक्य " time is lost everything lost" आहे[ संदर्भ हवा ] .
या प्रकल्पात एकूण २२ प्रपत्र व २० अध्यापन पद्धती समाविष्ट आहेत , काळानुसार व बदलत्या परिस्थिनुसार प्रपत्रात व अध्यापन पद्धतीत, तज्ञाच्या व जनमत प्रणालीतून बदल करण्याची लवचिकता ठेवली असते .

वैशिष्ट्ये :-हा प्रोजेक्ट पूर्णपणे online असल्यामुळे हा प्रोजेक्ट राबवितांना शिक्षकाजवळ प्रोजेक्ट मध्ये दिलेल्या साधनापैकी किमान दोन साधनाचा वापर केला जातो . मर्यादा :-संगणकाचे ज्ञान पूर्णपणे English, java ,banary system या भाषेमध्ये आहे ते मराठीत रुपांतर करतांना काही चुका झाल्या असू शकतात . त्यासाठी अभिप्राय प्रमाणे चूकांची दुरस्ती करून तसा बदल केला जातो .[ संदर्भ हवा ] प्रकल्पा मध्ये सर्व शासकीय नियमाचे पालन करून व शासनाच्या सर्व जी.आर .चे वाचन करून नियमबद्ध व सूत्रबद्ध नियोजन केले जाते.[ संदर्भ हवा ] प्रोजेक्ट राबवण्यासाठी पुढील पैकी दोन साधने आवश्यक असतात. १.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांचे ई- मेल असणे आवश्यक असते. २.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांकडे संगणक असणे आवश्यक असते.३.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांकडे २ जी.बी. क्षमतेचा पेन drive असणे आवश्यक आहे . ४.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांकडे mobail असणे आवश्यक असते त्यात इंटरनेट असणे आवश्यक असते ज्या शाळेवर इंटरनेट सुविधा उपल्ध नाही त्यांच्या जवळ nokia malimedia mobail आवश्यक असते. ५.सर्व शासकीय सेवेतील शिक्षकांचा M.S.C.I.T पर्यंत संगणकाचे ज्ञान या प्रोजेक्टसाठी पुरेसे असते.
शाळा Digital करुया
  आपल्या मराठी शाळा ऒस पडत असतांनाच त्यांमध्ये जीवंतपणा आणण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवे...आज सर्व जग Digitalization प्रक्रियेकडे ऒढला जात आहे..त्यामुळे आपण मागे राहता कामा नये...लहान शाळांपासून ते मॊठ्या शाळांपर्यंत आपण सर्वांनीच आपल्या शाळा Ditital कशा करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे...
ई लर्निंग म्हणजे काय ?
@ई लर्निंग म्हणजे वर्गअध्यापणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वापरण्यात येणारी आधुनिक शिक्षणपद्धती..... (ELECTRONIC EDUCATIONAL LEARNING)                                                                                       @शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवणारी व विध्यार्थाना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे नवीन माहिती देणारी ही आनंददायी शिक्षणपद्धतीआहे.
@ई- लर्निंग साधनातसंगणक,प्रोजेक्टर,मोबईल,रेडीओ,दूरदर्शन,डीव्हिडी,एलसीडी माॅनिटर यांचा समावेश होतो. ई-लर्निंग साहित्य म्हणून आपण ध्वनिचित्रफिती,ANIMATION CLIPS ,EDUCATIONAL SOFTWARE, 3D मॉडेल,PPT SLIDES,इंटरनेटवरील साहित्य (विशेषतः YOU TUBE ,GOOGLE PLAY STORE) , वेबसाईटस, ब्लॉग, यांचा समावेश होतो.
        N. R. Sable
 @ई-लर्निंग मध्ये INTERACTIVE MULTIMEDIA VIDEO LESSONS ,व TOUCH SCREEN PEN चा वापर करून प्रोजेक्टर पडद्यावर अध्यापन करता येते.शिक्षक स्वतः पाठाचे प्रेझेंनटेशन तयार करून अध्यापन करू शकतात. ई-लर्निंग तंत्रज्ञान शिक्षक व विध्यार्थी यांना हाताळण्यास सोपे आहे.  
        N. R. Sable
डीजीटल शाळा म्हणजे काय रे दादा?
“जेथे शिक्षणात तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम होतो, ते डीजीटल स्कूल होय.”
आता हे काय आणखीन?
थांबा सोपं करू या...
     शाळा म्हटलं की तेथे चालणाऱ्या कामकाजाचे तीन बाबीत वर्गीकरण करता येत. अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन व शालेय व्यवस्थापन. जर कोणतीही शाळा या तिन्हीही बाबी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आधारे करत असेल तर त्या शाळेला डीजीटल शाळा असं म्हणता येईल. या बाबी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आधारे कशा होणं अपेक्षित आहे याची आपण थोडक्यात माहिती घेवू या.

प्रथम : संगणक व इतर तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण (ई-लर्निंग)
द्वितीय : संगणकाद्वारे मूल्यमापन (ऑनलाईन एक्झामिनेशन)
तृतीय : शाळा व्यवस्थापन प्रणाली. (स्कूल मॅनेजमेंट)

 प्रथम : संगणक व इतर तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण (ई-लर्निंग)
     “विद्यार्थ्यांना पाठ्यांशाचे आकलन होईल व विद्यार्थी स्वत: यात सहभागी होऊन अध्ययन करतील या पद्धतीने पाठ्यक्रमाच्या गरजेनुसार संगणक, मोबाईल, रेडिओ, टीवी, इंटरनेट, प्रोजेक्टर, इंटरअॅक्टीव बोर्ड इत्यादी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर शाळेत करणे तसेच विविध संकल्पनांचे मॉडेल बनवून अॅनिमेशन, प्रेझेंटेशन अथवा विडीओ माध्यमातून प्रभावी सादरीकरण करणे म्हणजे ई-लर्निंग.” 
         N. R. Sable
संकल्पना अधिक स्पष्ट करून घेऊ. भूगोल विषयातील नकाशा वाचन. आज पारंपरिक पद्धतीने नकाशा वाचन शिकविताना विद्यार्थ्यांना छापील नकाशा दाखविला जातो. अनेक विद्यार्थी त्या दाटीवाटीने अत्यंत बारीक अक्षरात छापलेल्या नावांमुळे थोड्याच वेळात कंटाळतात. त्याएवजी “गुगल अर्थ” या सेवेचा वापर केल्यास मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना जगाची सैर घडविता येबू शकते. यात विविध ठिकाणेच काय? तर सबंधित विद्यार्थी स्वत:चं घर, शेती, शाळा सगळ्या गोष्टी बघू शकतो. यातून शिकण्याचा उत्साह अधिक वाढतो. आनंददायी पद्धतीने शिकविण्याचा हेतू साध्य होतो. ग्रह, तारे यासंबंधी अनेक फोटोज, व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन असताना या गोष्टी इंटरनेटवरून डाऊनलोड करून शाळेत इंटरनेट नसतानाही दाखविता येऊ शकतात. तसेच गुगल अर्थही ऑफलाईन वापरता येऊ शकते. गणित विषयात अंक मोजणे, बेरीज, वजाबाकी इत्यादी क्रिया आनंददायी पद्धतीने शिकविणे शक्य आहे. यासाठी आपल्या गरजेनुसार पॉवरपॉईंटमध्ये ट्रिगर वापरून फ्लॅश कार्ड्स तयार केली तर कमी वेळात अधिक आकर्षक, मनोरंजक व माहितीपूर्ण शो बनविणे शक्य आहे. असेच विज्ञान, भाषा, समाजशास्र इत्यादी विषयही मनोरंजक पद्धतीने व कल्पकतेने शिकवून विद्यार्थ्यांना उस्फूर्तपणे सहभागी करून घेता येईल. यासर्व बाबींची पूर्वतयारी करून वर्गात गेलं तर नक्कीच गुणवत्तेत अपेक्षित सुधारणा घडवून आणता येतील. 
     मात्र आजची वस्तुस्थिती बरीचशी उलट झालीय. अनेक शाळा कॉलेजात ई-लर्निंग म्हणून बाजारात मिळणाऱ्या विविध कंपन्यांनी आकर्षक जाहिरातबाजी करून अव्वाच्या सव्वा किंमतीला विकलेल्या सीडी/डीव्हीडी मुलांसमोर सुरु ठेवल्या जातात. परंतु यात मुलांचा सहभाग शून्य असल्यामुळे ई-लर्निंग संकल्पनेलाच सुरुंग लागतो. मुले सुरुवातीला अत्यंत उत्सुकतेने पाहतात... हरकून जातात.... पण थोड्याच दिवसात हा उत्साह मावळतो. भरीस भर म्हणून एखादा बेसिक कोर्स करून फक्त तंत्रज्ञानाची तोंडओळख झालेल्या शिक्षकांना कोणत्याही योग्य प्रशिक्षणाशिवाय हे सर्व हाताळावे लागते. परिणामी तंत्रज्ञानातील येणाऱ्या अडचणीमुळे एक नवीनच व्याप व्यवस्थापनाच्या म्हणजे पर्यायाने शिक्षकांच्या गळ्यात येऊन पडतो. शिक्षकही आपले पहिलेच चांगले होते असा सूर आळवीत गप्प होतात. आणि मग हा संगणक रूपी पांढरा हत्ती शाळेच्या गळ्यात येऊन पडतो तो अगदी निर्लेखित होई पर्यंत.
     मित्रानो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नक्कीच त्रासदायक ठरू शकतो. तसंच काही इथेही आहे. गरजेपुरते हे साधन एक माध्यम म्हणून वापरले... विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी.... संकल्पना सोप्या करण्यासाठी... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षकांचा मदतनीस म्हणून वापरले तर हे तंत्रज्ञान वरदान ठरेल. परंतु याचा अतिरेक झाल्यास त्याचे दुष्परिणामही जाणवू शकतात. इंटरनेटचा वापर लहान मुलांना शक्यतो कमीत कमी करू द्यावा. तोही शिक्षकांच्या किंवा जाणकार व्यक्तीच्या उपस्थितीत केल्यास अधिक योग्य ठरेल. इंटरनेटच्या काळ्या बाजू रोखण्यासाठी अनेक मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग करून इंटरनेटचा दुरुपयोग टाळता येऊ शकेल. लहान वयात मुलांनी सतत टॅब, मोबाईल अथवा मॉनिटरच्या स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांचा कमकुवतपणा वाढू शकतो. सतत कंप्युटरमध्ये व्यस्त राहिल्याने मैदानावर खेळणे, दंगा मस्ती करणेही कमी होईल त्याचा परिणाम त्यांच्या निकोप शारीरिक वाढीवर होऊ शकतो. कंप्युटरच्या अतिवापराने जे काही आजार होतात त्यांना कंम्प्युटर सिंड्रोम म्हणतात. मुलांना संगणकाच्या आहारी जाऊ देणे म्हणजे कंम्प्युटर सिंड्रोम्जला निमंत्रण ठरू शकते. म्हणून शिक्षकानी सजग राहणेही अत्यावश्यक आहे.
            N. R. Sable
 द्वितीय : संगणकाद्वारे मूल्यमापन (ऑनलाईन एक्झामिनेशन) 
“ई-लर्निंग पद्धतीने एखादा पाठ्यांश शिकवून झाल्यानंतर त्याचे विद्यार्थ्यांना कितपत आकलन झाले आहे हे तपासण्यासाठी संगणकाद्वारे मूल्यमापन करणे. पुन्हा त्यात अप्रगत विद्यार्थी शोधून त्यांची सबंधित घटकावर पुन्हा तयारी करून घेणे व परत त्यांचा स्तर तपासणे. सोबत विशिष्ट कालावधीत वर्गाची व प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीची नोंद सॉफ्टवेअरद्वारे ठेवून त्याचे वेळोवेळी निरीक्षण करून त्याप्रमाने पुढील नियोजन करणे. या पद्धतीत अपेक्षित असते. ऑनलाईन एक्झामिनेशनमुळे शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो. व कमी कालावधीत नियोजन करणे सोपे जाते.
प्लीकर्स सारख्या अॅंड्रॉईड अप्लिकेशनद्वारे काही प्रमाणात असे मूल्यमापन करणे शक्य आहे. परंतु त्यालाही बऱ्याच  मर्यादा आहेत. काही अधिक चांगली अप्लिकेशनही मार्केटमध्ये आहेत पण त्यांच्या किमती बऱ्याच जास्त आहेत. 
वस्तूस्थितीवर नजर फिरविल्यास सहज लक्षात येते की अशा पद्धतीचे मूल्यमापन क्वचितच उपलब्ध आहे. अशा प्रकारचे महागडे सॉफ्टवेअर विकत घेणे अनेक मोठ्या शाळांनाही शक्य नाही. तसेच बाजारात मिळणाऱ्या सीडी / डीव्हीडी या अशी इंटरअॅक्टीव सुविधा पुरवत नाहीत त्यामुळे ई-लर्निंग नंतरचा हा अत्यंत महत्वाचा टप्पा आजतरी सर्वत्र पूर्णपणे दुर्लक्षित राहिलाय. स्वत: शाळांना अशा पद्धतीचे सॉफ्टवेअर डेव्हलप करणे आजतरी शक्य दिसत नाही. पण शिक्षण विभागाने असा सार्वत्रिक प्रयोग करण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेतल्यास तो नक्कीच क्रांतिकारी ठरेल यात शंका नाही.
          N. R. Sable
तृतीय : शाळा व्यवस्थापन प्रणाली. (स्कूल मॅनेजमेंट)
     शालेय कामकाजातील एक महत्वपूर्ण भाग म्हणजे शाळा व्यवस्थापन. विविध रजिस्टर द्वारे पारंपरिक पद्धतीने माहिती जतन करण्याची प्रथा सगळीकडे आढळते. हीच माहिती डीजीटल स्वरुपात साठवली तर अनेक समस्या सुटू शकतात. उदा.अमुक तारखेपर्यंत तमुक इतके वय पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी हाताने तयार करायची म्हटली तर जन्मतारखेवरून वय काढणे आणि लिहिणे यातच मोठा वेळ खर्च होतो. हेच काम संगणकाद्वारे चुटकीसरशी होऊ शकते. वर्ष अखेर निकाल तयार करताना होणारी तारांबळ तर अनेक जण अनुभवतात. हीच माहिती संगणकावर संकलित असल्यास निकाल किती लवकर तयार होतो हे एखादा तंत्रस्नेही शिक्षक आनंदाने सांगेन. अनेक शाळा या शतकाचा उंबरठा गाठण्याच्या जवळपास पोहचल्या आहेत. या शाळामधील दस्ताऐवज जीर्ण होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी तर कायमस्वरूपी नष्टही झाला आहे. असे दस्तावेज जर स्कॅनिंगच्या सहाय्याने संगणकीकृत करून ठेवले तर एक अमुल्य ठेवा कायमस्वरूपी जतन करता येऊ शकेल.
     राज्यभरातील प्रशासनासंदर्भातील माहिती शाळा निहाय एकाच केंद्रीय सर्व्हरवर संकलित करून या माहितीचा शिक्षण विभागातील विविध विभागातील अधिकाऱ्यांना इंटरनेटद्वारे अॅक्सेस उपलब्ध करून दिल्यास एका क्लिकवर राज्यभरातील कोणतीही माहिती संकलित होऊ शकेल. यामुळे शिक्षकांपासून ते विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत संपूर्ण यंत्रणेचा अमुल्य वेळ वाचू शकतो. अशैक्षणिक कामांचा बोजा यामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या खांद्यावरून उतरला तर तो वेळ विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी व विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी व्यतीत करता येवू शकतो. 
     हल्ली मोबाईलद्वारे अॅंड्रॉईड अप्लिकेशनचा वापर करूनही वरीलपैकी अनेक गोष्टी कमीत कमी खर्चात करता येतात. परंतु योग्य निवड करता येणेही गरजेचे आहे. योग्य प्रशिक्षण, पुरेशी संसाधने व सकारात्मक पाठबळ मिळाल्यास राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक परिपूर्ण होऊ शकेल हे निर्विवाद सत्य आहे. अर्थात हे सर्व साध्य होण्यासाठी सर्वोच्च सकारात्मक मानसिकतेची गरज आहे हेही तितकेच खरे.

(यात अनेक गोष्टी अपूर्ण असतील याची जाणीव आहे. आपल्या सहभागाने व चर्चेने वरील संकल्पना अधिक स्पष्ट होतील म्हणून आपणा सर्वाना चर्चेचे, सूचना देण्याचे आणि चुका दाखविण्याचे मनापासून निमंत्रण. कृपया सहभागी व्हा आणि इतरांकडेही प्रसारित करा.
***************************************

No comments:

Post a Comment