बैठे व इतर खेळ

👧🏻बुध्दिबळ👦🏻
**********************************
बुध्दिबळ : बुध्दिबळ बुध्दिबळ खेळणारे यांना बुध्दिबळपटू म्हणतात.
काळे व पांधरे घर असतात ३२ बत्तीस पांढरे घर व ३२ बत्तीस काळे घर असे असतात.
काळे पांढरे घर दोन्ही मिळून ६४ चौंसष्ठ घर असतात.
पांढरा राजा काळा काळ्या घरात असतो. काळा राजा पांढरा पांढऱ्या घरात असतो.
राजाच्या उजवा हात ला घरात वजीर असतो वझीर असतो. उंट एक काळा घरात व पांढऱ्या घरात असतो.
एक राजाच्या शेजारी व वझीर च्या शेजारी घरात उंट असतो उंट च्या शेजारी काळा व पांढऱ्या घरात घोडा असतो.
पांढऱ्या घरात व काळ्या घरात हत्ती असतो. प्यादी ८ आठ असतात.पांढऱ्या व काळ्या घरात असतात.
बुद्धिबळ पट लावतांना उजवा हात याला पांढरे घर असते.
राजा तिरपा सरळ एक घर चालतो. वझीर सरळ कितीही घर चालतो. उंट तिरपा एक घर चालतो.घोडा अडीच घर चालतो.
हत्ती सरळ किती ही घर चालतो.पाद पादी एक घर सरळ चालते.
अशा प्रकारे बुद्धिबळ खेळ आहे.
तसेच वाघ शेळी चा एक खेळ आहे.चार ४ वाघ (चार उंट ) एकत्र मधल्या घरात असतात. व शेळी म्हणजे सर्व प्यादी
कडेच्या घरात असतात.वाघ एक घर चालतो. व प्यादी एक घर चालतात.शेळी वाघांना बांधून अडकवून ठेवतात .
वाघ अडकत नाही असा हा बुद्धिबळ चा दुसरा खेळ आहे.
मी लहान पाणी माझा भाऊ डॉ शरद यांच्या बरोबर खेळत असे..आता आमची मूलांनी कॉलेज मध्ये असतांना
घरात बुध्दिबळ पट सोंगट्या आणल्या तेवेळेला मी मुलां च्या बरोबर राजा वझीर हा खेळ खेळले आहे.

मला थोडीफार बुध्दिबळ याची माहिती आहे.जुना पट व सोंगट्या आज ही घरात आहे. याच मला खूप चांगल वाटत आहे.
*********************************
* कॅरम * 
👦🏻कॅरम👧🏻 हा जगातील (विशेषत: भारतातील) एक लोकप्रिय बैठा खेळ आहे. ह्या खेळात एकावेळी कमाल ४ खेळाडू भाग घेऊ शकतात. कॅरम बोर्ड हा लाकडापासुन बनवलेला चौरसाकृती पृष्ठभाग असतो, ज्याच्या ४ कोनाड्यांजवळ मोठी गोल छिद्रे असतात. स्ट्रायकर नावाची जड सोंगटी वापरुन इतर हलक्या गोल सोंगट्या ह्या गोल छिद्रांमध्ये ढकलणे हे ह्या खेळाचे उद्दिष्ट आहे.

कॅरममधील सोंगट्या
कॅरम खेळात ९ पांढऱ्या, ९ काळ्या व १ गुलाबी (राणी वा क्वीन) अशा १९ सोंगट्या असतात. ह्या सोंगट्या व स्ट्रायकरचे कॅरम बोर्डवर होणारे घर्षण कमी करण्याकरिता पातळ बोरिक पावडर वापरली जाते
 Sablesir

चौकोनात खेळला जाणारा कॅरम आता केवळ चार बोर्डापर्यंतच मर्यादित ठेवून क्रिकेटच्या ‘ट्वेण्टी-२०’प्रमाणे हा खेळ जलद व लोकप्रिय करण्याचा धाडसी निर्णय २ मार्च २००९ रोजी अखिल भारतीय कॅरम संघटनेने घेतला. कॅरम या खेळाला जास्तीत जास्त लोकप्रियता मिळावी, खेळात आक्रमकता आणावी व खेळाचे आयोजन नियोजित वेळेत करून निरनिराळ्या प्रसारमाध्यमांद्वारे खेळाचे चित्रीकरण लोकांना दाखविण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.

आतापर्यंत कॅरम सामने उपउपान्त्यपूर्व फेरीपर्यंत आठ बोर्डाचे, तीन गेम व त्यानंतर २५ गुणांचे तीन गेम या पद्धतीने खेळविले जात होते. परंतु १ एप्रिल २००९ पासून नवीन नियमांप्रमाणे हे सर्व सामने चार बोर्डाचे तीन सेट म्हणून खेळविले जाणार असून, पहिल्या व दुसऱ्या सेटनंतर दोन मिनिटांचा अवधी खेळाडूस त्याच्या प्रशिक्षकाशी सल्लामसलत करण्यासाठी दिला जाणार आहे. यापूर्वी खेळाडूस त्याच्या मॅचच्या वेळेनंतर पंधरा मिनिटे अतिरिक्त वेळ मॅच रिपोर्टिगकरिता देण्यात येत होता. शिवाय दोन बोर्ड सरावाकरिता / कॅरमची लेव्हल स्ट्रोक व गुळगुळीतपणा तपासण्याकरिता दिले जात होते. यापुढे खेळाडूंना मॅचच्या नियोजित वेळेपूर्वी पाच मिनिटे अगोदर आपल्या कॅरमवर उपस्थितीची नोंद करावी लागेल व त्यास केवळ तीन मिनिटे सरावासाठी म्हणजे कॅरम टेस्ट करण्यासाठी दिली जाणार आहेत. कोणतीही अनाऊंसमेण्ट व पुकार न देता वेळेवर बोर्डावर उपस्थित न राहणाऱ्या खेळाडूस बाद केले जाऊन उपस्थित सर्व खेळाडूंचे सामने एकाच वेळी दिलेल्या नियोजित वेळेवर सुरू करण्यात येतील. कॅडेट, सबज्युनिअर व ज्युनिअर गटांसाठी प्रत्येक सेटकरिता २२ मिनिटांचा अवधी ठेवण्यात आला आहे. यामुळे सर्व सामने आखलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू करून वेळेवरच संपतील व स्पर्धेचे निटनेटके आयोजन
*********************************
👦🏻मल्लखांब👧🏻
*********************************
मल्लखांब अथवा मलखांब हा एक व्यायाम प्रकार आहे. हा एक कसरतींचा खेळ प्रकारही आहे. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यास मल्लखांब वापरला जातो. हा कुस्तीला पूरक व्यायामप्रकार आहे.
कसरतींचा खेळ
कमीतकमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार असे मल्लखांब खेळाचे वर्णन केले जाते.
 Sablesir👧🏻स्वरूप👦🏻

लाकडी स्तंभ

मल्लखांब हा लाकडाचा एक स्तंभ असतो. याची उंची सुमारे आठ फूट असते. हा सरळ, गुळगुळीत, वर निमुळता होत जाणारा असतो. या प्रकाराला पुरलेला मल्लखांब म्हणतात. तो जमिनीच्या आत पक्का बसवलेला असतो. त्याच्या जमिनीवरील भागाचा आकार वर गोल , मग अरुंद भाग खाली भक्कम खांब असा असतो.

दोरी

हा हलता मलखांबाचा प्रकार टांगलेल्या दोरखंडावर केला जातो. हा दोर वीस फूट लांब असतो.

वेताचा मल्लखांब

वेतावर केला जाणारा प्रकार.

टांगता मल्लखांब

प्रसिद्ध मलखांब पटू व प्रचारक


बाळंभटदादा देवधर - बाजीराव पेशवेकाल (पहिला ‘आखाडा’ वाराणसी येथे स्थापन केला.) कोंडभटनाना गोडबोले
********************************
* कुस्ती * 
********************************
👧🏻कुस्ती👦🏻                 हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९००चा अववाद वगळता प्रत्येक वेळा खेळवण्यात आला आहे. तसेच प्राचीन ग्रीसमधील ऑलिंपियाड स्पर्धांमध्ये देखील कुस्तीचा समावेश केला जात असे. महिलांची कुस्ती २००० सालापासून घेण्यास सुरूवात झाली.

प्रकार
 Sablesir 👧🏻कोल्हापुरी कुस्ती👦🏻
‘कुस्ती’, मर्दानी कुस्ती हा कोल्हापूरातील लोकप्रिय खेळ आहे. काही राजे हे स्वत: एक चांगले पैलवान आहेत. जवळजवळ प्रत्येक आठवड्याला येथे जंगी कुस्त्यांचे नियोजन केले जाते.अशावेळी खुल्या मैदानात कुस्त्या खेळवल्या जातात.येथील राजे शाहु महाराज हे एक पैलवान होते आणि त्यांनी स्वत: खासबाग मैदानाची कुस्ती खेळासाठी बांधणी केली.जेंव्हा ते युरोप सहलीला गेले होते त्यावेळी त्यांनी तेथे रोम येथील प्रसिध्द ‘कॅलोशिअम’ मैदान पाहिले आणि त्यावेळी त्यांनी अशा प्रकारचे मैदान कोल्हापूरात ऊभारायचे ठरवले. आणि त्यांनी सहलीवरून परत आल्यानंतर ‘कॅलोशिओ’ सारखे खासबाग मैदान ऊभारले. खासबाग हे एकमेवच भारतातील कुस्तीचे मैदान आहे. मैदानाच्या मध्यभागी असलेल्या हौद्यातील कुस्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय जवळजवळ 60,000 लोक पाहू शकतात. राजकीय लोकांकरीता एक वेगळा भाग ईशान्य बाजुला ऊभारला आहे.
👧🏻कुस्ती👦🏻
कुस्ती हा मराठी शब्द 'कुश्ती' या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ मलयुध्द, अंगयुध्द किंवा बाहुयुध्द असा आहे. प्राचीन काळी इराण देशात द्वंद्वयुध्द खेळताना कमरेला जो पट्टा किंवा जी दोरी बांधत, त्याला कुश्ती हे नाव होते. त्यांना धरून जे द्वंद्व खेळले जाई, त्यास कुश्ती हे नाव प्राप्त झाले. फार्सी भाषेत कुश्त म्हणजे ठार मारणे किंवा कत्तल करणे. लक्षणेने प्रतिस्पर्धावर शक्तीने वा युक्तीने मात करुन त्याला नामोहरम करणे, हा कुस्ती ह्या शब्दाचा अर्थ आहे. कुस्तीचा प्रधान हेतू तोच असतो.
आदिमानवापासून आत्मसंरक्षणासाठी मानव ज्या लढया चढया करीत आला, त्यांतूनच कुस्तीच्या द्वंद्वाचा उगम झाला. छोटे प्राणी माठया प्राण्यांवर युक्तीने कशी मात करतात व स्वत:चा बचाव करू शकतात हे पाहून, मानवाने मल्लविद्येची उपासना व जोपासना सुरू केली. पुढे मानवामानवांमधील द्वंद्व स्वत:चे श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी मल्ल विद्या उपयुक्त ठरली. कालांतराने या प्राथमिक द्वंद्वास जागतिक स्वरूप प्राप्त झाले व त्याचे स्वतंत्र असे शास्त्र बनत गेले. देशोदेशी त्यामध्ये विविधता निर्माण झाली असली, तरी त्यातील मुलभूत तत्वे कायमच आहेत.

कुस्तीची वा मल्लयुध्दाची पूर्वपीठिका फार प्राचीन आहे. भरतात वैदिक वाङ्मयात तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथातील मल्लविद्येचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किशकिंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुध्द होऊन सुग्रीवने वालीचा पाडाव केला. महाभारतातील वर्णनुसार कृष्ण, बलीराम व भीम हे मल्लविद्येत प्रविण होते, हे त्यांनी केलेल्या महायुध्दांतील पराक्रमावरून दिसून येते.          👧🏻उद्देश👦🏻
मल्लयुध्दाचा मुख्य उद्देश प्रतिस्पर्धास नामोहरम करणे हा आहे. त्यासाठी शरीरास योग्य त्या व्यायामाने बलवान करून त्या बलाचा युक्तीने वापर करावा लागतो. मल्लयुध्दासाठी पुर्वतयारी म्हणून विविध प्रकारच्या व्यायाम साधनांचा वापर करून शरीर सुदृढ, काटक व बलवान करून आत्मविश्वास वाढविणे जरूर आहे. बलसंर्वधनासाठी व्यायाम, युक्ताहार, ब्रह्मचर्य, सदाचार यांचे पालन करावे लागते.

विविध पध्दती
मल्लयुध्दाची वाढ व तिचा जागतिक प्रसार गेल्या दीड-दोन शतकांत फार झपाटयाने होऊन ते एक स्वतंत्र शस्त्रच बनत चालले आहे. मल्लविद्येच्या विविध पध्दती अनेक राष्ट्रांत प्रचलित असल्या, तरी त्यांतील मूलभूत तत्त्वे सामान्यत: एकसारखीच आहे. अर्वाचीन काळात प्राचीन ऑलिंपिक क्रीडासामन्यांचे पुनरूज्जीवन झाल्यामुळे व त्यातही मल्लयुध्दाला विशेष प्राधान्य दिले गेल्यामुळे मल्लविद्येला जागतीक मान्यता मानली. आपापल्या राष्ट्रांतील नामांकित मल्ल म्हणून घेण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय मल्ल किंबहुन जगज्जेता होण्याची ईर्षा निर्माण होऊ लागली. विविध पध्दती प्रचलित आहेत.
 भारतीय कुस्त्यांचे चार प्रमुख प्रकार पडतात ते असे:-
👧🏻हनुमंती कुस्ती 👦🏻
बुध्दीच्या जोरावर प्रतिपक्षावर मात करण्याचे डावपेच असलेला प्रकार. पौराणिक कल्पनेनुसार या कुस्तीच्या प्रकाराचा कर्ता रामायण काळातील हनुमान असून त्याने बुध्दिच्या जोरावर शक्तीवर मात करता येईल असे डावपेच निर्माण केले आहेत. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तत्त्व या प्रकारच्या कुस्तीत प्रमुख्याने आढळते त्यामुळे प्रतिस्पर्धी शरीराने व बलाने मोठा असला तरी त्यावर मात करता येते. या वरून या कुस्ती प्रकारास हनुमंती कुस्ती हे नाव पडले.
 Sablesir: भीमसेनी कुस्ती
शरीर सामर्थ्यावर प्रतिस्पर्ध्याला चीत करण्याचे डावपेच असलेला प्रकार. या प्रकाराच्या कुस्तीत केवळ शरीरबलावर आधारित असे अनेक डावपेच आहेत. महाभातात पांडवापैकी भीम हा मल्लविद्येत प्रविण होता, तसेच तो अत्यंत बलवानही होता. त्याने आपल्या प्रचंड सामर्थ्यावर जीमूत, कीचक, बकासुर, जरासंघ यांचा नि:पात केला होता. यावरून या कुस्तीप्रकारास भीमसेनी कुस्ती हे नाव पडले.
जांबुवती कुस्ती
विविध डावपेचांनी प्रतिस्पर्ध्याला बांधून शरण यावयास लावणारा प्रकार. यात प्रतिस्पर्ध्याला चीत न करता विविध डावपेचांनी त्याचे हातपाय बांधून त्याला ताब्यात घेऊन शरणागती पत्कारवयास लावणे, या गोष्टीवर प्रामुख्याने भर दिला जातो. याच एका दृष्टीकोणातून यातील डाव, पेच व पकडा बसविलेल्या आहेत.
जरासंधी कुस्ती
प्रतिस्पर्ध्याचा संपूर्ण नि:पात करण्याचे डावपेच असलेला प्रकार. महाभारतात भीम व जरासंध यांच्या मल्लयुध्दाचे वर्णन आहे. भीमाला जरासंधावर बराचवेळ मात करता येईना: तेव्हा श्रीकृष्णाने भीमाला एक गवताची काडी चिरून तिचे दोन भाग उलट सुलट टाकून सूचना केली व त्या सुचनेचा अवलंब केल्यामुळे भीमाने जरासंधाला दोन्ही पाय ताणून चिरून ठार केले. तेव्हा या प्रकारच्या कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला जायबंदी करण्याच्या किंवा जीव घेण्याच्या दृष्टी डावपेच बसवलेले आहेत. प्रतिस्पर्ध्याला कोणत्याही प्रकाराने कायमचा नेस्तनाबूद करण्याच्या प्रमुख तत्त्वावर हे डावपेच आधारित आहेत.
वरील चार प्रकारांतील शरीरास इजा हाणा-या डावपेचास कालांतराने मनाई होत गेली आणि कुस्तीला खेळाचे स्वरूप आले. अलीकडे भारतात हनुमंती, भीमसेनी, जांबुवती या प्रकारांतील नीरूपद्रवी डावपेचांचे मिश्रण असलेला कुस्तीप्रकार प्रचारात आहे.
कुस्तीची साधने, पोशाख व आखाडा
भारतीय पध्दतीत ५*५ मी. लांबीरूंदीचा व १ मी. खोलीचा आखाडा लागतो. त्यांत ५० सेंमी. जाडीची तांबडी माती, काव व राख घालतात. तीवर प्रथम पाणी, लिंबाचा रस, ताक, तेल यांचा वापर करून तो मऊ व निर्जंतुक करून घेतात. वारंवार पाणी मारून ती खो-याने दररोज तोडून भुसभुशीत ठेवावी लागते. विदेशी पध्दतीच्या सर्व प्रकारच्या कुस्त्यांना ६*६ मी. लांबीरूंदीचा उंचावलेला आखाडा असतो. त्यावर जाड काथ्याची चटई पसरतात, त्यामुळे खेळाडू फेकले वा आपटले गेल्यास इजा होत नाही. या आखाडयासभोवती खेळाडू बाहेर जाऊ नये म्हणून जाड दोरखंडे बांधतात.
देशी पध्दतीत लंगोट व त्यावर जाड, घट्ट बसणारा असा जांघिया (किश्तक) घालतात. खेळाडूस सामन्याच्या वेळी अंगास तेल लावण्यास मनाई आहे. विदेशी पध्दतीत थंड हवामानामुळे, बनियन व चड्डी व पायात बूट घालून कुस्ती खेळतात.
कुस्तीचे नियम
प्रत्येक कुस्ती पध्दतीचे स्वतंत्र असे नियम असतात व ते कटाक्षाने पाळणे खेळाडूंचे कर्तव्य आहे. ते तसे पाळले जातात किंवा नाही हे पाहण्याचे काम पंचांचे असते. पंच व सरपंच हे कुस्ती चालू असतांना देखरेख ठेऊन, शेवटी कुस्ती निकाली न झाल्यास, चांगल्या कुस्तीगीरास त्याच्या डाव-पेच-पकडी यांवर गुण देऊन त्याला विजयी ठरवितात. कुस्ती होण्यापूर्वी कुस्तीगारांची वजने घेऊन वजनाप्रमाणे त्या त्या वजनांच्या गटात त्यांना खेळावे लागते. ऑलिंपिक सारख्या जागतिक सामन्यांत कुस्तीगारांच्या वजनांचे आठ गट आहेत. काही सामन्यात प्रत्येक गटात दाखल असलेल्या सर्व खेळाडूंना आळीपाळीने त्या गटातील प्रत्येकाशी खेळावे लागते व त्यात शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाशी खेळलेल्या कुस्तीत मिळालेल्या गुणांची बेरीज करुन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देण्यात येतात. काही पध्दतींत जोडया पाडून शेवटपर्यंत सर्व फे-या जिंकत जाऊन शेवटी जिंकणारा विजेता व हरणारा उपविजेता ठरवितात. का
*********************************

No comments:

Post a Comment