आपले राष्ट्रिय सन

१५ ऑगस्ट स्वातंञ्य दिन 
भारतीय स्वातंत्र्यदिवस प्रतिवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरणूवका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
इतिहास -१७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १८ व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजान्ने आपल्या सैन्याच्या मदतीने ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमारानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली.१८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना झाली. २० व्या शतकात मोहनदास करमचंद गांधी ह्यांनी अहिंसा बाळगत चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली.महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात काँग्रेस ने संपूर्ण स्वराज्य ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी हि तारीख भारताचा स्वातंत्र्यदिवस म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली काँग्रेस ने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्य साठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे हिंदूंपासून वेगळे झाले व त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीग ची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्ध नंतर ब्रिटिशांना लक्षात आले कि आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकार्यांचा जोर वाढत होता. हि गोष्ट कळल्यानंतर ब्रिटन च्या प्रधानमंत्र्यांनी जून १९४८ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली.अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण जाताजाता त्यांनी भारतावर अजून एक घाव घालत भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडे पाडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक शिख माणसांना त्यांचे घरदार,पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीर चा प्रश्न हि पुढे आला.
स्वतंत्र भारत -स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताचे संविधान तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाट होता. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू , पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून संबोधण्यात आले.
स्वतान्त्र्यादिवासाचा उत्सव -
भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिवसाची सुट्टी दिली जाते. सर्व गृहराचानांमध्ये,शाळांमध्ये,महाविद्यालये-कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. राजधानी दिल्ली मध्ये राजपथावर सैन्यदले परेड करतात. त्यादिवशी बहुतांश रेडीओ चैनल तसेच दूरदर्शन वर देशभक्ती विषयी गाणी,कार्यक्रम,चित्रपट लागतात.
***************************"*
******************************
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन 
भारतीय प्रजासत्ताक दिन
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना घटना समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिवस: ऑगस्ट १५ व गांधी जयंती: ऑक्टोबर २). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.
भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.
या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो.
नवी दिल्ली येथे होणार्‍या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.
इतिहास
४ नोव्हेंबर, इ.स. १९४७ रोजी भारताच्या घटनाकारांच्या मसुदा समितीने कच्चा मसुदा तयार केला, व त्यानंतर तो सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात मांडण्यात आला. २ वर्षे, ११ महिने व १८ दिवस या मसुद्यावर खुली चर्चा करण्यात आली, व त्यानंतर तो २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला..

उत्सव
दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच पंतप्रधान ध्वजारोहण करतात व २१ बंदुकांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.

प्रमुख अतिथी -सन १९५० पासून भारत प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसर्‍या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.
*****************************
****************************
१७ सप्टेबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन -१
दिवस १५ ऑगस्ट १९४७ चा साऱ्या भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरु झाले. परंतु हैद्राबाद संस्थान मात्र अजूनही भारतात विलीन झाले नवते. त्यामुळे हैद्राबाद संस्थानात असलेला मराठवाडा पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्याचे सुख अनुभवणाऱ्या भारताच्या हृदयावर मराठवाड्याच्या पारतंत्र्याची बोचरी जखम होतीच. परकीय सत्तेविरुद्ध एकत्र येताना भारतीयांनी केलेला नेटाचा प्रयत्न  हा कौतुकाचा खराच; पण स्वातंत्र्या नंतरही आणखी एका स्वातंत्र्यासाठी लढा देणं किती क्लेशदायक असेल?. हैद्राबाद हे भारतातील एक मोठे संस्थान होते. स्वतंत्र भारतात सामील न होण्याचा निजामाचा अट्टाहास  होता. तेलगु, मराठी, कानड भाषिक लोकांचा मोठा वर्ग या संस्थानात होता. जामाच्या जुलुमी अधिपत्याखाली या प्रांतातील लोकांना कोणतेही राजकीय व नागरी अधिकार नव्हते; म्हणून निजामाविरुद्ध जनमत तयार होऊ लागले. त्यातच  निजामाचे  पाठबळ असलेला कासीम रजवी याने आपल्या 'रझाकार' या संघटनेच्या माध्यमातून निष्पाप जनतेवर अमानुष अत्याचार सुरु केले.
जनमताचा प्रक्षोभ उसळला . खेडी, शहर, निजामाविरुद्ध खदखदू लागली; आणि याला संघटनात्मक व वैचारिक आव्हान दिल, स्वामी रामानंद तीर्थ यांनी.१९३८  मध्ये स्थापन झालेल्या हैद्राबाद स्टेट कोग्रेसकडे याचे नेतृत्व आले. लढा घराघरात पोहोचला आणि प्रत्येक स्तरातून मुक्तिसंग्रामाचे सेनानी उभे राहिले. गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, पुरषोत्तम चपळगावकर, रामलिंग स्वामी, श्रीनिवासराव बोरीकर, किशोरभाऊ शहाणे यांनी हे स्फुलिंग चेतवले. या लढ्यात स्त्रियाही काही मागे नव्हत्या .आशाताई वाघमारे, करुनाबेन चौधरी, सुशीलाबेन दिवान यांची नावे आपल्याला घेता येतील. वेदप्रकाश श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक यासारख्या कित्येक र्थ्यांनी 'वंदे मातरम' चालवली अंतर्गत निजाम सरकारविरुद्ध आपला रोष व्यक्त केला.
भारत सरकारमध्ये सामील होण्याची तेथील लोकांची तीव्र इच्छा , त्याचे उठणारे तीव्र पडसाद, लोकांवर होणारा अमानुष अत्याचार या सगळ्याविरुद्ध 13 सप्टेंबर १९४८   रोजी भारत सरकारने हैद्राबाद संस्थाना विरुद्ध कारवाई केली .इ.स.१२९४ मध्ये मराठवाडा इस्लामी राजवटीचा आरंभ झाला. 17 सप्टेंबर १९४८   ला या संस्थानाच्या वीलीनीकरणाने त्या राजवटीचा अंत झाला. समान संस्कृती व समान भाषा बोलणाऱ्या आप्तांना लोकशाही राज्यात म्हणजे महाराष्ट्रात मराठवाडा विलीन झाला त्यासाठी 1 नोव्हेंबर 1956  या दिवसाची वाट पहावी लागली.
****************************
***************************
मराठवाडा मुक्ती संग्राम -२
मराठवाडा मुक्ती संग्राम -
हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.
हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला .
या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही.निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगाव कडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.
*******************************
******************************
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव 
भारत माता की जय….इन्कलाब जिंदाबाद.

   सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
   देखना है जोर कितना बाजू -ए-कातील में है

   वक्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमाँ
   हम अभीसे क्यां बतायें, क्या हमारे दिल में है….

या क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांच्या  वरील ओळी शहिद भगतसिंग,शहिद राजगुरु, शहिद सुखदेव यांच्या कार्याचा गौरवच दर्शवतात.
क्रांतीकारकांचा मृत्यू अपरिहार्य असतो .कारण बलिदानामुळे त्यांच्या ध्येयाला शक्ती मिळते; न्यायालयात अपील केल्यामुळे नव्हे .आपल्याला जे करायचं होतं त्यातला हजारावा भागही आपल्याला पूर्ण करता आला नाही.अस शहिद भगतसिंग एका पञात सांगतात.

     तो काळा दिवस आजही  भारतमातेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक पुञाला वेदना देऊन जातो….हिवाळ्याचे दिवस संपत आले होते…तशी उत्तर भारतात प्रचंड थंडी पडलेली होती , मार्च महिना तसा उन्हाळ्याचा परंतु सकाळची कडाक्याची थंडी आणि दिवसभर कडक उन्हाच्या झळा…..त्यातच याच महिन्याच्या अखेरीस म्हणजे २३मार्च १९३१ याच दिवशी या तिघा क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली.हाच तो काळा दिवस .तेव्हा ही आणि आज आठ दशकानंतरही संबंध भारतासाठी दुःखद असाच ठरला….स्वातंत्र्य वीर सावरकर एके ठिकाणी म्हणतात , “प्रेयसीच्या केसातुन फिरणारी बोटे जेव्हा बंदुकीच्या चापावरून फिरतील, तेव्हा आणि तेव्हांच ह्या देशास स्वातंत्र्य प्राप्त होईल…..आणि तसेच युवक हे तिघे क्रांतिकारक ठरले.या तिघांच वय तस ऐण उमेदीच कुणाच २२तर कुणाच २३ ,या कोवळ्या वयात या भारतमातेच्या नव्या स्वातंत्र्य पहाटेसाठी आणि प्रिय अशा भारतमातेला ब्रिटिशांच्या जोखडातुन , त्यांच्या गुलामगिरीतुन ,त्यांच्या असह्य अशा यातनेतुन भारतीयांना मुक्त करण्यासाठी  तसेच लाला लजपतराय यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी शहिद भगतसिंग ,शहिद राजगुरू , शहिद सुखदेव , इन्कलाब जिंदाबाद म्हणत हसत हसत फासावर गेले आणि ज्यांच्या नावाला ‘शहिद’ हा शब्द सहजपणे जोडला जातो असे शूरवीर हुतात्मा पुञ शहिद भगतसिंग ,शहिद राजगुरू , शहिद सुखदेव यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा या लेखातुन आणि त्यामार्फत त्यांना विनम्र अभिवादन !
*********************
**********************


                 

No comments:

Post a Comment