गणित / भूमिती

भूमितीची सुञे 
**********************************
👧🏻कोनाचे प्रकार👦🏻

     👦🏻 कोनाच्या मापावारुन कोनाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात👧🏻

1) . लघुकोन  - 
     "  ज्या कोनाचे माप 90 ° पेक्षा कमी असते त्याला लघुकोन असे म्हणतात  "

2) काटकोन -
        "  ज्या कोनाचे माप 90 ° असते त्यास काटकोन असे म्हणतात  "

3) विशालकोन -
      "  ज्या कोनाचे माप 90° पेक्षा जास्त असते त्यास विशालकोन असे म्हणतात  "

👧🏻ञिकोनाचे प्रकार👦🏻
        ञिकोनाचे बाजू वरुन तीन व कोनाच्या मापावरुन तीन असे मुख्य सहा प्रकार आहेत .

👧🏻बाजू वरुन 3 प्रकार👦🏻

1)  समभुज ञिकोण  -
      "  ज्या ञिकोनाची प्रत्येक बाजू समान असते त्यास समभुज ञिकोण असे म्हणतात  "

2) समद्विभुज ञिकोण -
     "  ज्या ञिकोणाच्या फक्त दोनच बाजू समान लांबीच्या असतात त्यास समद्विभुज ञिकोण असे म्हणतात  "

3) विषमभुज ञिकोण -
             "  ज्या ञिकोणाच्या सर्व बाजू असमान असतात त्यांना विषमभुज ञिकोण असे म्हणतात "

👧🏻कोनाच्या मापावरुन प्रकार👦🏻

1) लघुकोन ञिकोण -
       "  ज्या ञिकोणाचे सर्वच कोन लघुकोन असतात त्यांना लघुकोन ञिकोण म्हणतात  "
2) काटकोन ञिकोण -
     "  ज्या ञिकोणाचा एक कोन 90° चा किंवा काटकोन असतो त्या ञिकोणास काटकोन ञिकोण म्हणतात  "
3) विशालकोन  ञिकोण -

     "  ज्या ञिकोणाचा एक कोन विशालकोन असतो त्यास विशाल कोन ञिकोण म्हणतात  "
*********************************
👧🏻संबोध व संकल्पना👦🏻

👦🏻1 ते 100 पर्यत अभ्यास👧🏻

0 अंक                    - 11 वेळा
1 अंक                    - 21 वेळा
2 ते 9 अंक             - 20 वेळा

असतात.
तसेच 1  ते 100 पर्यत एकुण
11  + 21  + 160 = 192 अंक असतात.

👦🏻 सम संख्या 👧🏻
        "   संख्या च्या एकक स्थानी 0 , 2 ,4 ,6 ,8 ,यापैकी अंक असेल तर त्यांना सम संख्या म्हणतात "

👧🏻विषम संख्या👦🏻
     "  ज्या संख्या च्या एकक स्थानी  1, 3, 5, 7, 9 अंक असतील त्यांना विषम संख्या म्हणतात  "

👦🏻संयुक्त संख्या👧🏻
           "  ज्या संख्या ना ती संख्या व 1 सोडून इतर ही संख्या नी भाग जातो त्या संख्या ना संयुक्त संख्या म्हणतात "

सर्वात लहान संयुक्त संख्या  -4
👧🏻 मुळसंख्या  -
     " ज्या संख्या ना फक्त तीच संख्या व 1 इतक्या च संख्या नी भाग जातो त्यांना मुळसंख्या असे
 म्हणतात "

सर्वात लहान मुळसंख्या  -2

👦🏻जोडमुळसंख्या -
     " ज्या दोन मुळ संख्या मध्ये एकच संख्या असते त्यांना जोडमुळ संख्या म्हणतात "
उदा - 5 व 7

1 ते 100 च्या दरम्यान च्या जोडमुळ संख्या
- (3, 5 ) ( 5, 7) ( 11, 13)
( 17, 19 ) ( 29, 31) ( 41, 43) ( 59 , 61) ( 71, 73 )
एकुण  - 8 जोड्या आहेत .

👧🏻सहमुळ संख्या -
        "  एक मुळ संख्या व दुसरी कोणती ही संख्या म्हणजे सहमुळ संख्या होय  "

 👦🏻मुळ संख्या  विशेष👧🏻

👦🏻1 ते 100 च्या दरम्यान एकुण 25 मुळ संख्या आहेत.

👧🏻1 ते 50 पर्यंत 15 मुळ संख्या आहेत.

👦🏻1 ते 100 पर्यंत एकुण -74 संयुक्त संख्या आहेत.

👧🏻1 ही मुळ नाही व संयुक्त पण नाही .

👦🏻 मुळ संख्या -
2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19,
23, 29, 31, 37, 41, 43, 47,
53, 59, 61, 67, 71, 73, 79,
83, 89, 97

एकुण  - 25 संख्या .

  👧🏻घटक- नफा तोटा👦🏻

सुञ 

1) नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत

2) तोटा = खरेदी किंमत - विक्री किंमत
                           नफा 
3) शेकडा नफा = ------------- × 100
                         ख. किंमत

                            तोटा
4) शेकडा तोटा = -------------- × 100
                          ख. किंमत
                                           N•R•Sable                                                      घटक - काम काळ व वेग.

सुञ -
1) अंतर  =  वेग  × वेळ
                   अंतर 
2) वेग     = ----------
                    वेळ
                    अंतर
3) वेळ    = -----------

                     वेग
*********************************
👧🏻गमतीदार गणित व मुळाक्षरे👦🏻

👦🏻गणिती मनोरंजन👧🏻
आपणांस हे माहित आहे का ?
👦🏻1 ते 99 पर्यंत स्पेलिंग मध्ये a, b, c, d वापर होत नाही.
👧🏻d चा वापर प्रथमच  ‘Hundred’ मध्ये होतो.
👦🏻1 ते 999 पर्यंत स्पेलिंगमध्ये कुठेही a, b, c चा वापर होत नाही.
👧🏻a चा वापर प्रथमच ‘Thousand’ मध्ये होतो.
👦🏻1 ते 999,999,999 पर्यंत कुठेही  b, c चा वापर होत नाही.
👧🏻b चा वापर प्रथमच ‘Billion’ मध्ये होतो.
👦🏻c चा वापर इंग्लिश काउंटिंलगमध्ये कुठेही होत नाही
********************************

No comments:

Post a Comment