भविष्य निर्वाह निधी

भविष्य निर्वाह निधी नियम
*****************"*""

**********************
***********************
*************************
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम - प्रफुल्ल छाजेड, सी. ए.
* मी नोव्हेंबर २०१३ मध्ये एका खासगी कंपनीतून सेवानिवृत्त होत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडन्ट फंड), उपदान ('ग्रॅच्युइटी') इत्यादी मिळून मला निवृत्तीनंतर सुमारे ५० लाख रु. मिळतील. या रकमेवर मला काही कर लागू होईल का? असल्यास तो वाचविण्यासाठी मला काय करता येईल? निवृत्तीनंतरच्या दरमहा खर्चाच्या तरतुदींसाठी कशी गुंतवणूक करणे योग्य ठरेल? 
- दिलीप पिंपळे, ठाणे. 
>> खासगी कंपनीतून निवृत्त झाल्यावर आपण सदर कंपनीत पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी नोकरी केली असेल तर कलम १० (१२) खाली कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही करमुक्त असते. तसेच 'ग्रॅच्युइटी'ची रक्कमही दहा लाख रु. किंवा नोकरी केलेल्या प्रत्येक वर्षासाठी अर्ध्या महिन्याचा पगार किंवा मिळालेली रक्कम या तिनींपैकी जी रक्कम कमी असेल ती करमाफ होईल. उरलेली रक्कम करपात्र असते. 
* मी एक सेवानिवृत्त अविवाहित ज्येष्ठ नागरिक असून, निवृत्तीनंतर मिळालेले सर्व एकत्रित पैसे मी बँकेत मुदत ठेवींत (फिक्स्ड डिपॉजिट-'एफडी') ठेवले आहेत. या 'एफडीं'वर दुसरे नाव माझ्या लहान अविवाहित बहिणीचे असून, ती माझ्याजवळच राहते. माझ्या 'एफडीं'वरील वार्षिक व्याज चार लाख रु.च्या थोडे वरच जाते व मला आयकर भरावा लागतो. मला कर वाचवायचा असेल व त्यासाठी समजा मी दहा लाखांच्या 'एफडी'चे नूतनीकरण (रिन्युअल) करताना बहिणीचे नाव प्रथम टाकले तर तिला आयकर लागू होईल का? तिचे स्वतःचे उत्पन्नाचे काही साधन नाही. तिला आयकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) भरावे लागेल का? 
- डी. जी. साकळकर, नागपूर. 
>> आपण योग्य ते दस्तऐवज करून बहिणीला रक्कम देऊन करनियोजन करू शकता. त्यांचे उत्पन्न करपात्र नसेल तर 'रिटर्न' भरण्याची गरज नाही. 
* मी एक ५९ वर्षे वयाचा सेवानिवृत्त गृहस्थ आहे. माझ्या आईवडिलानी १९७८ ते १९९५ या काळात अनेक 'ब्लु चिप' कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली व बोनस, राइट्स शेअर्स आणि नवीन खरेदी यामुळे ही गुंतवणूक बरीच वाढली आहे. या शेअर्सवरील लाभांश (डिव्हिडंड) हा माझ्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत आहे. लाभांश उत्पन्न करमुक्त असल्यामुळे मला आयकर भरावा लागत नाही व मी आयकर विवरणपत्र सादर केलेले नाही. वर्षाकाठी एखाद्या कंपनीच्या शेअर्सची विक्री करून १०-१५ हजार रु. येतात. बँकेतील मुदत ठेवीवरील व्याज एक लाख रु.पेक्षा कमी येते. माझ्या नावावर एक जुनी वडिलोपार्जित वास्तू (राहते घर) वारसाहक्काने आलेले असून एक नवा मालकी हक्काचा ६०० चौरस फूट आकाराचा फ्लॅट माझ्या व पत्नीच्या नावावर खरेदी केला आहे. अलीकडेच मी 'नॅशनल स्पॉट एक्स्चेंज'वर 'ई गोल्ड', 'ई सिल्व्हर', 'ई कॉपर', 'ई प्लॅटिनम'मध्ये गुंतवणूक केली आहे. प्रश्न असेः शेअर्स गुंतवणुकीची १९७८ ते १९९५ या काळातील जुनी कागदपत्रे खरेदी देयके, वाटपपत्रे (अॅलॉटमेन्ट लेटर्स), बोनस, 'आयपीओ/राइट्स' शेअर्सबाबतची पत्रे संदर्भासाठी म्हणून बाळगणे आवश्यक आहे का? वरीलपैकी कोणत्या मिळकतीवर संपत्ती कर (वेल्थ टॅक्स) भरावा लागेल? त्याची करमुक्त मर्यादा किती? 'नॅशनल स्पॉट एक्स्चेंज'वरील 'ई सीरिज' मेटल्स गुंतवणुकीवर भांडवली लाभ कर (कॅपिटल गेन्स टॅक्स), वेल्थ टॅक्स, बक्षीस कर (गिफ्ट टॅक्स) यांची आकारणी कशी होते? नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर खरेदी केलेल्या 'गोल्ड ईटीएफ'मधील गुंतवणुकीवर वेल्थ टॅक्स भरावा लागतो का? मी आयकर विवरणपत्र भरत नाही. हे योग्य आणि कायदेशीर आहे का? 
>> मार्च २०१३ अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी तीस लाखांपर्यंतच्या संपत्तीवर 'वेल्थ टॅक्स' म्हणजेच संपत्ती कर भरावा लागत नाही. 'वेल्थ टॅक्स' कायद्याच्या कलम ५ अनुसार एक घर करमुक्त असते. तसेच शेअर्सवर देखील संपत्ती कर लागत नाही. 'गोल्ड ईटीएफ'वर संपत्ती कर लागत नाही. मात्र 'ई गोल्ड'वर संपत्ती कर द्यावा लागतो. शेअर्स व इतर गुंतवणुकीची कागदपत्रे हिशेबासाठी सांभाळणे गरजेचे आहे. उत्पन्न आयकर मर्यादेपेक्षा जास्त असल्यास कर व 'रिटर्न' भरणे आवश्यक आहे. 
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ.) ही १९५२ मध्ये नोकरदारांसाठी भारत सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. वीसहून अधिक कर्मचारी किंवा कामगार काम करीत असलेल्या आस्थापनांमध्ये निवृत्ती पश्चात कालावधीची तरतूद म्हणून या योजनेकडे पाहीले जाते. कर्मचारी आणि त्याची मालक आस्थापना दरमहा मूळवेतनाच्या बारा टक्के रक्कम या निधीत प्रत्येकी जमा करतात. या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे सेवानिवृत्तीसमयी एक रकमी लाभ देण्याबरोबरच दोन अतिरिक्त लाभही आहेत.
कर्मचारी निवृत्तिवेतन योजना (Employees Pension Scheme)
कर्मचारी ठेवीशी निगडित विमा योजना (Employees Deposit Linked Insurance Scheme)
कर्मचा-यांच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अवलंबित व्यक्तीस पेन्शनचा लाभ या योजनेंतर्गत दिला जातो.
************************

No comments:

Post a Comment