समाज सुधारक

राष्ट्रसंत तुकडोजी  महाराज 
**********************************
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
👧🏻 तुकडोजी महाराज👦🏻 

यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांत काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. ख्नंजिरी भजन हे त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
तुकडोजी महाराज आधुनिक काळातील महान संत होऊन गेले. अडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करीत होते. एवढंच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.
अमरावती जिल्ह्यातील यावली हे लहानसं गाव. ह्या गावात ३० एप्रिल १९०९ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. जन्मताज घरावरचे छप्पर सोसाट्यच्या वा-याने उडवून नेले आणि वरचे आकाश हेच घराचे छप्पर बनून राहिले. त्यांच्या आईचे नाव मंजुळामाय व वडिलांचे नाव बंडोजीबुवा होते. घरात अत्यंत गरिबी. माधानच्या अंध संत गुलाबराव महाराजांनी त्यांचे बालपणीचे नाव माणिक असे ठेवले. मराठी शाळेचे दोन चार वर्ग शिकलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरु आडकोजी बाबांच्या कृपा प्रसादाने तुकड्यादास नावाने भजन लिहायचे. त्याचे भजन जनसामान्यांच्या मनाचा ठाव घ्यायचे. त्यांनी मांडलेलं तत्त्वज्ञान फक्त देवभक्ती नव्हती तर समाजातील दुःख , वेदना विषमता , त्यांच्या भजनातून प्रतीत व्हायची. एक सुजलाम्सुफलाम् देशाचे स्वप्न त्यांनी बघितले होते.
 👧🏻१९४२ चे स्वातंत्र्य जनआंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. चिमूर , आष्टी ,यावली , बेनोडा येथील स्वातंत्र्य संग्राम यांच्याच प्रेरणेने घडला. त्यांनी जनजागृतीचे कार्य केले. मग ते चीन युद्ध असो वा पाकिस्तानचे. त्यांच्या लोकपयोगी कामांकडे पाहून महात्मा गांधी आकर्षित झाले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मोठ्या आदरातिथ्याने दिल्लीला बोलावून राष्ट्रपती भवनात त्यांच्या खंजरी भजनाचा कार्यक्रम झाला. त्याभजनाने प्रभावित होऊन राजेंद्रबाबू म्हणाले , आप संत नही , राष्ट्रसंत है. मग सा-या जगाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले. 

महाराजांच्यी खंजरी भजन ही भजन पद्धती एक स्वतंत्र निर्मिती होती. त्यातून उठणारे झंकार थेट हृदयालाच जाऊन भीडत. ही पद्धत एवढी प्रभावी होती की त्यांची खड्या आवाजातील भजने क्षणात जनमनाचा पगडा घेत. त्यांची भजन सर्वसामान्यांपर्यंत विचार पोहोचवण्यात यशस्वी झाली. 

१९५५ ला जपानमध्ये भरलेल्या विश्वशांती व विश्वधर्म परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधित्त्व करण्याचा बहुमान राष्ट्रसंतांना मिळाला. तिथे परिषदेच्या आयोजकांनी त्यांना जपानमधे राहून काम करण्यासाठी मोठी प्रलोभन दाखवली. पण आपल्याला भारतातच काम करायचंय सागून ते परतले. ग्रीन कार्ड आणि एच वन व्हिसा हेच सर्वस्वमानणा-यांसाठी हा मोठाच धडा आहे 

ग्रामीण भागातील अशिक्षित जनतेला धर्माच्या नावाखाली फसविणा-या बुवाबाजीविरुद्ध व अंधश्रद्धेविरुध्द संत तुकडोजी महाराजांनी केलेले कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांनी आपल्या ग्रामगीतेतून लोकांना भोंदु बुवांपासून दूरनेण्याचा प्रयत्न केला. तसेच खुळ्या कल्पनांवर कडक ताशेरेही ओढले आहेत. ग्रामीण , आदिवासी भागात आजही अंधश्रद्धा कमी झालेली नाही. त्यांनी केलेल्या जनजागृती कार्याला गावोगावी पोहचविण्याची आज
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**********************************
👦🏻राजा राममोहन राय👧🏻
**********************************
 (बांग्ला: রাজা রামমোহন রায়) (२२ मई १७७२ - २७ सितंबर १८३३) को भारतीय पुनर्जागरण का अग्रदूत और आधुनिक भारत का जनक कहा जाता है। भारतीय सामाजिक और धार्मिक पुनर्जागरण के क्षेत्र में उनका विशिष्ट स्थान है। वे ब्रह्म समाज के संस्थापक, भारतीय भाषायी प्रेस के प्रवर्तक, जनजागरण और सामाजिक सुधार आंदोलन के प्रणेता तथा बंगाल में नव-जागरण युग के पितामह थे। उन्होंने भारत में स्वतंत्रता आंदोलन और पत्रकारिता के कुशल संयोग से दोनों क्षेत्रों को गति प्रदान की। उनके आन्दोलनों ने जहाँ पत्रकारिता को चमक दी, वहीं उनकी पत्रकारिता ने आन्दोलनों को सही दिशा दिखाने का कार्य किया।

राजा राममोहन राय की दूर‍दर्शिता और वैचारिकता के सैकड़ों उदाहरण इतिहास में दर्ज हैं। हिन्दी के प्रति उनका अगाध स्नेह था। वे रू‍ढ़िवाद और कुरीतियों के विरोधी थे लेकिन संस्कार, परंपरा और राष्ट्र गौरव उनके दिल के करीब थे। वे स्वतंत्रता चाहते थे लेकिन चाहते थे कि इस देश के नागरिक उसकी कीमत पहचानें।॥

 एक नौकरी से लेने का फैसला किया।

वह वर्ष 1814 में आत्मीय समाज की स्थापना करने के लिए समाज में विभिन्न सामाजिक और धार्मिक सुधारों टपकाना. वह सती अधिकारों के साथ महिलाओं के प्रतिपादन के पुनर्विवाह और पैतृक संपत्ति में संपत्ति पकड़ द्वारा पीछा प्रणाली के उन्मूलन के लिए मुश्किल प्रयासरत. वह भी कुछ हद तक बहुविवाह की प्रणाली को दबा दिया.

वह महिलाओं को शिक्षित और अंग्रेजी भाषा की शिक्षा की जरूरत प्रचारित किया गया। उन्होंने यह भी 1822 वर्ष है कि अंग्रेजी शिक्षण पर जोर दिया में एक स्कूल की स्थापना की है और भी करने के लिए स्कूलों में संस्कृत पढ़ाने के लिए सरकार द्वारा उपलब्ध कराए गए धन का विरोध किया।

ब्रह्म समाज उसके द्वारा 1828 में धर्म का घूंघट के तहत किए गए लोगों के पाखंड की जाँच करने के लिए स्थापित किया गया था। अंत में सती प्रणाली वर्ष 1829 में समाप्त कर दिया गया था। मुगल सम्राट ने यूनाइटेड किंगडम के लिए एक राजदूत उनके (सम्राट) पेंशन और भत्ते कि वह प्राप्त करने का हकदार था

👧🏻🌺🌅👦🏻🌅🌺
**********************************
👦🏻गोपाळ गणेश आगरकर👧🏻

जन्म: जुलै १४, १८५६
टेंभू, सातारा जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू: जून १७, १८९५
पुणे, महाराष्ट्र
चळवळ: समाजसुधारणा
पत्रकारिता/ लेखन: केसरी
सुधारक
धर्म: हिंदू
गोपाळ गणेश आगरकर (जुलै १७, १८५६ - १८९५) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक होते
                Sablesir           👦🏻आरंभीचा काळ 👧🏻

आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात, एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी माधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कर्‍हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे.

👧🏻कारकीर्द 👦🏻

आगरकर हे, बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.

पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते व लोकमान्य टिळक एकत्र आले. तोपर्यंत स्वदेशसेवेची प्रेरणा दोघांच्याही मनात जागी झाली होती. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.

पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.

👦🏻उल्लेखनीय कार्य👧🏻


१८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' स्थापली. १८८८ साली त्यांनी 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरू केले.
*********************************
👧🏻चौथा शाहू👦🏻       
👧🏻छत्रपती शाहू महाराज (द्वितीय)
छत्रपती👦🏻

कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळ इ.स.१८८४ - इ.स.१९२२
राज्याभिषेक २ एप्रिल इ.स.१८९४
राज्यव्याप्ती कोल्हापूर जिल्हा
राजधानी कोल्हापूर
पूर्ण नाव यशवंत आप्पासाहेब घाटगे
जन्म २६ जून इ.स.१८७४
कागल, कोल्हापूर
मृत्यू ६ में इ.स.१९२२
मुंबई
पूर्वाधिकारी चौथे शिवाजी
वडील आपासाहेब घाटगे
आई राधाबाई
राजघराणे भोसले
चलन

राजर्षी शाहू महाराज
चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज, (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२) हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.

                Sablesir               👦🏻जीवन👧🏻

शाहू महाराजांचा जन्म जून २६, इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे मे ६, इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.
                    Sablesir               👧🏻कार्य 👦🏻

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाला.

‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.


शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
*********************************
👦🏻 बाबा आमटे👧🏻
सर्वसामान्य  माणूस  दहा  जन्म घेऊनही जेवढे  काम करू शकत  नाही  एवढे - व्याप्ती ,उंची व खोली यांच्या दृष्टिकोनातून  भव्य कार्य उभारणारे एक जेष्ट  समाजसेवक कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा येथे आनंदवन आश्रमातील स्थापना करणारे मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे  बाबांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला.

त्यांचे महाविदयालयीन शिक्षण नागपुर येथे झाले.१९३४ साली बाबांनी बी ए ची पदवी संपादन केली त्यानंतर १९३६ साली त्यांनी एल एल बी ही पदवी संपादन केली १९४९-५० या काळात त्यांनी कुष्टरोगनिदानवरील त्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण केला महात्मा गांधीच्या सेवाग्रम आश्रमात राहत असताना गांधी विचारांनी प्रभावित होऊन त्यात बाबांनी स्वःताला झोकून दिले १९४३ मध्ये वंदे मातरम ची घोषणा दिल्याबद्द्ल त्यांना २१ दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला स्वतंत्र्यप्राप्तीनंतर कुष्टरोग निर्मूलनाच्या कार्या बरोबरच त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गाने आंदोलने केली तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी १९८५ मध्ये 'भारत जोड़ो ' अभियान योजले होते. नर्मदा बचाव या आंदोलनात तब्बल १२ वर्ष नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी या आंदोलनाला पाठबळ दिले होते.

बाबांनी कुष्टरोगासारख्या महाभयंकर रोगने ग्रस्त झालेल्या लोकांची सेवा करण्याचे अतिकठिन व्रत बाबांनी स्वीकारले त्यांच्या  प्रणेतून १९५१ साली आनंदवन ची स्थापना झाली। मरणापेक्षा भयान आणि कबरीपेक्षा भयंकर असे काही असेल तर ते म्हणजे कुष्टरोग्याचे आयुष्य पण बाबांनी या सर्वाना अपलेसे करून  घेतले महारोगी सेवासमिती या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्यचा विस्तार केला म्हणजे कुष्टरोग्याचे आयुष्य पण बाबांनी या सर्वाना अपलेसे करून  घेतले महारोगी सेवासमिती या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्यचा विस्तार केला सर्वांकडे पाहण्याचा समान दृष्टिकोण  बाबांनी ठेवला आणि आज त्यांच्या आश्रमात  सर्व जातिधर्माचे लोक आहेत केवळ कुष्ट रोग्यांसाठीच नाही  तर मूकबधिर व् अंधांसाठी एक शाळा त्यानी उभारली आहे.

कुष्ट  रोग्यांसाठी उपचार  प्रशिक्षण व पुनर्वसन या करीता त्यांनी रुग्णालयाची व् अन्य प्रशिक्षण  केंद्रांची निर्मिति केलि आहे तरुणांसाठी महाविद्यालयाची स्थापना प्रौढ़ व् अपंगांसाठी हातमाग सुतारकाम  असे व्यावसायिक प्रशिक्षण बाबांनी त्याना देऊन  आर्थिक स्वावलम्बनचा मार्ग दाखवला  आहे घनदाट जंगल , दळणवळण , संपर्काची साधने नाहीत प्रचंड पाऊस पावसात मार्ग अडवून टाकणाऱ्या नद्या नाले ,जंगली स्वापदांचा सुळसुळाट अन्न वस्र निवार्याची कमतरता कहीवेळा शासनाचा असहकार असताना त्यात आदिवसींचे अशिक्षितपणा ,अंधश्रद्धा अशी बिकट अवस्था असताना देखील प्रचंड जिद्दीने बाबांनी आपली कामे पूर्णत्वास नेली आहेत
                  Sablesir                       पण ते म्हणतात ना…
''जोची आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला ''

या प्रमाणे नवसंजीवनी देणारे बाबा फेब्रुवारी २००८ मध्ये अनंतात विलीन झाले. अशा या बाबांना त्रिवार मानाचा मुजरा …!
*********************************
👧🏻गाडगे महाराजङ
"देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात धन्यता मानणारे व गावातील तसेच माणसांच्या मेंदूतील घाण साफ करून त्यांचे प्रबोधन करणारे कर्ते समाजसुधारक कृतीशील राष्ट्रसंत गाडगे महाराज."
गाडगे महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे मूळचे नाव डेबूजी होते. पण त्यांच्या विचारांमुळे आणि अतिशय साध्या रहाणीमुळे त्यांना ‘गोधडी महाराज’, ‘चिंधेबुवा’, ‘बट्टीसाधू’ इत्यादी विविध नावांनी ओळखले जायचे. १ फेब्रुवारी १९०५ रोजी बाबांनी सर्वसंग परित्याग केला. तेव्हापासून कमरेला गुंडालेलं एक वस्त्र, वर ठिगळ लावलेला शर्ट आणि बरोबर पाण्यासाठी एक गाडगं याच रूपात बाबा सर्वत्र वावरत असत. तेव्हापासून त्यांना लोक ‘गाडगे बाबा’ म्हणून लागले. सर्वसंग परित्यागानंतर पुढे जवळजवळ बारा वर्षे बाबांनी भारतभ्रमण केले. या भटकंतीतून त्यांच्यात एका समाजक्रांतीकारकाचा जन्म झाला. आणि खेड्यापाड्यातून समाजाची सेवा करत लोकजागृती करणे हेच पुढील आयुष्याचे ध्येय त्यांनी मानले. मला कुणी गुरु नाही आणि मी कोणाचाही गुरु नाही हीच भावना ठेवून त्यांनी समाजाला प्रबोधन केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता या समाजाच्या विरूद्ध गतीतून बहुजन समाज बाहेर पडावा म्हणून त्यांची सतत धडपड असे. त्यासाठी बाबा समज असणार्यांना शब्दाने फटकारित तर कधी कधी हातातल्या काठीचा फटका मारूनही शहाणं करीत आणि हे वागणं फक्त शब्दांपुरतं मर्यादित नव्हतं तर हातात खराटा घेऊन बाबा स्वतः गावाची स्वच्छता करून लोकांना धडा घालून देत असत. लोकांकडून मिळालेला पैसा ते समाजालाच अर्पण करीत. कर्मवीर भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यासाठी बाबांनी अनेकवेळा आपली ओंजळ रिकामी केली होती.
                           Sablesir              समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
*********************************
👦🏻पंजाबराव देशमुख👧🏻

  शेतकऱ्यांचे हक्कांसाठी लढणारे महान नेठतृत्व!

भारताचे माजी कृषिमंत्री! बहुजनांच्या स्वाभिमानासाठी लढणारे स्वाभिमानी काळीज! शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुविधा निर्माण करणारे महान शिक्षणतज्ञ!
         
          पंजाबराव देशमुख यांचा जन्म पापळ या गावचा आणि उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजेअमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये , अभियांत्रिकी पदवी , तसेच पदविका तंत्रनिकेतन , कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठं योगदान देत आहे.
**********************************



No comments:

Post a Comment