मराठी संस्कृती

मराठी संस्कृती 
मराठी महिने 
मराठी महीने (marathi mahine)
चैत्र
वैशाख
ज्येष्ठ
आषाढ
श्रावण
भाद्रपद
अश्विन
कार्तिक
मार्गशीर्ष
पौष
माघ
फाल्गुन
प्रत्येक मराठी महिन्याचे दिवस = ३०
पहिला पंधरवडा = १५ दिवस = शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष
दुसरा पंधरवडा = १५ दिवस = वद्य पक्ष किंवा कृष्ण पक्ष
***************************************
तिथी
तिथी हे हिंदू कालगणनेचे एक परिमाण आहे. एका चांद्रमासात ३० तिथी येतात. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष होय आणि पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत कृष्ण पक्ष होय. अशा या दोन पक्षांच्या एकत्रीकरणाला एक मास म्हणतात.
तिथीचे मापन
एका विशिष्ठ वेळी चंद्र आणि सूर्य एकत्र आले की अमावस्या होते.चंद्र व सूर्य एकत्र आल्यानंतर चंद्र जलद गतीने सूर्याच्या पुढे जातो. सूर्य व चंद्र यांच्यात १२ अंशाचे अंतर झाले की प्रतिपदा होते. अशाप्रकारे दर १२ अंशापासून नवीन तिथी चालू होते.
तिथींची नावे
१.प्रतिपदा, २.द्वितीया, ३.तृतीया, ४.चतुर्थी, ५.पंचमी, ६.षष्ठी, ७.सप्तमी, ८.अष्टमी, ९.नवमी, १०.दशमी, ११.एकादशी, १२.द्वादशी, १३.त्रयोदशी, १४.चतुर्दशी, १५.पोर्णिमा किंवा अमावस्या.
पंचांगा नुसार महिने 
भारतीय राष्टीय पंचांगातील महिने
हे हिंदू पंचांगांतील महिन्यांपेक्षा वेगळ्या दिवशी सुरू होतात. महिना सुरू होण्याचा दिवस :-
१) चैत्र ३०/३१ दिवस २२ मार्च; लीप वर्ष असताना २१ मार्च. ज्या इसवी सनाला ४ने भाग जातो, ते लीप वर्ष.
२) वैशाख ३१ दिवस
३) ज्येष्ठ ३१ दिवस
४) आषाढ ३१ दिवस
५) श्रावण ३१ दिवस
६) भाद्रपद ३१ दिवस
७) आश्विन ३० दिवस
८) कार्तिक ३० दिवस
९) मार्गशीर्ष ३० दिवस
१०) पौष ३० दिवस
११) माघ ३० दिवस
१२) फाल्गुन ३० दिवस
राफेल’चे एफेमेरीज हे खर्‍या अर्थाचे सायन पंचांग असते. पाश्चात्त्य ज्योतिष हे सायनाधारित आहे.
कालनिर्णय हे निरयन पंचांग आहे.
**************************"***********
नक्षत्र -तारकासमूह
१.अश्विनी -मेष
२.भरणी -मेष
३.कृत्तिका -वृषभ
४.रोहिणी -वृषभ
५.मृगशीर्ष -मृग
६.आर्द्रा -मिथुन
७.पुनर्वसू -मिथुन
८.पुष्य -कर्क
९.आश्लेषा -वासुकी
१०.मघा -सिंह
११.पूर्वा फाल्गुनी-सिंह
१२.उत्तरा फाल्गुनी -सिंह
१३.हस्त -हस्त
१४.चित्रा -कन्या
१५.स्वाती -भूतप
१६.विशाखा -तूळ
१७.अनुराधा -वृश्चिक
१८.ज्येष्ठा -वृश्चिक
१९.मूळ -वृश्चिक
२०.पूर्वाषाढा -धनू
२१.उत्तराषाढा -धनू
२२.श्रवण -गरूड
२३.धनिष्ठा -धनिष्ठा
२४.शततारका -कुंभ
२५.पूर्वा भाद्रपदा -महाश्व
२६.उत्तरा भाद्रपदा -महाश्व

२७.रेवती
****************************

No comments:

Post a Comment