शरिरसंस्था व पेशी

शरिररातिल संस्था 
रक्तवहसंस्था 
 रक्त हृदय रोहिनी
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रक्तवहसंस्थेमध्ये हृदय, रक्त, रक्तवाहिन्या यांचा समावेश होतो. रोहिनी रक्तवाहिन्या शुद्ध रक्तवहन करते(अपवाद- फुफ्फुसीय रोहिनी- ही हृदयाकडून फुप्फुसाकडे अशुद्ध रक्त वाहून नेते.) त्या लाल रंगाने दर्शविल्या जातात. नीला रक्तवाहिन्या अशुद्ध रक्तवहन करते(अपवाद-Pulmonary vein- ही फुफ्फुसाकडुन हृदयाकडे शुद्ध रक्त वाहून नेते.) त्या निळ्या रंगाने दर्शविल्या जातात.
**************************************
श्वसनसंस्था 
 फुफ्फुस श्वासनलिका स्वरयंत्र
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्वसनसंस्थेत नाक, गळा, स्वरयंत्र (Larynx), श्वासनलिका व फुफ्फुस यांचा समावेश होतो.
***************************************
*****************************************
नाक मानवी शरीराचा एक अवयव आहे. नाक हे पंचेंद्रियां पैकी एक महात्वाचे इंद्रिय आहे. नाक श्वसन क्रियेत भाग घेते. तसेच नाकामुळे आपल्याला गांधाचीही जाणीव होते.
स्वरयंत्र (English-larynx, Urdu-حنجره) हा एक श्वासनलिकेच्या सुरुवातील असते. स्वरयंत्र श्वासनलिकेतील जाणाऱ्या हवेचे रुपांतर आवाजात करत असते. यात स्वरयंत्रातील स्नायु ताणले वा सैल होउन त्यातुन निघणाऱ्या तरंगांला आवाज म्हणतात.
**********************************
चेतासंस्था 
 चेतापेशी शरीर स्नायू
चेतासंस्था ही प्राण्यांच्या शरीरातील स्नायूंच्या तसेच इंद्रियांच्या क्रियांवर लक्ष ठेवणारी,ज्ञानेंद्रियांना संदेश देणारी आणि विविध क्रिया घडवून आणणारी संस्था आहे. ही संस्था चेतापेशी आणि चेतातंतू यांची बनलेली असते.
वर्गीकरण
चेतासंस्था
चेतासंस्था किंवा मज्जासंस्था हा एक वैशिष्ट्यपूर्ण चेतापेशींचा समूह आहे. चेतापेशींच्या साहाय्याने शरिरातील क्रियांची व्यवस्थित जुळणी होते. शरिरातील सर्व भागांकडे आवश्यक संदेश पाठविणे आणि ज्ञानेंद्रियाकडून आलेले संदेश ग्रहण करणे हे चेतासंस्थेचे कार्य आहे. बहुतेक सर्व प्राण्यांमध्ये चेतासंस्थेचे दोन भाग असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परीघवर्ती चेतासंस्था. मानवासारख्या पृष्ठवंशी प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये मेंदू, मज्जारज्जू, आणि नेत्रपटल (रेटिना) यांचा समावेश आहे. परीघवर्ती मज्जासंस्थेमध्ये संवेदी चेतापेशी, गुच्छिका (चेतापेशींचा समूह ) आणि चेता यांचा समावेश असतो. मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्था परस्परांशी जटिल चेतामार्गाने जोडलेले असतात. चेतापेशींचा आणखी एक भाग अनुकंपी चेता तंत्र (सिंपथॅटिक नर्व्हस सिस्टिम), उदर पोकळीताल अवयवांचे नियंत्रण मस्तिष्क चेतामधील प्राणेशा चेताद्वारे (व्हेगस) स्वतंत्रपणे करते.
चेतापेशी इतर चेतापेशींना विद्युत रासायनिक पद्धतीने संदेश पाठवितात. हे संदेश चेतापेशीच्या अक्षतंतूमधून प्रवास करतात. अक्षतंतूच्या टोकास अक्षीय गुंडी नावाचा फुगीर भाग असतो. असतो दोन चेतापेशी अनुबंधामधून संपर्कात येतात. अनुबंधामध्ये आलेल्या आवेगामुळे चेतापेशी उद्दीपित, अवरोध किंवा संस्करित होतात. संवेदी चेतापेशी प्रत्यक्ष संदेश मिळाल्यानंतर उद्दीपित होतात. संवेदी चेतापेशी मध्यवर्ती चेता संस्थेकडे किंवा स्नायूकडे संदेश पाठवतात. बहुघा हे संदेश शरीराच्या ज्ञानेंद्रियाकडून किंवा बाह्य शरीरबाह्य बदलाशी संबंधित असतात. प्रेरक चेतापेशी मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये आणि गुच्छिकेमध्ये असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि स्नायू किंवा एखाद्या कार्य करणाऱ्या अवयवास अगर ग्रंथीस, प्रेरक चेतापेशी जोडलेल्या असतात. चेतापेशीच्या आणखी एका प्रकारास सहयोगी चेतापेशी असे म्हणतात. पृष्ठवंशी (कशेरुकी) प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतापेशींची संख्या सर्वाधिक असते. मध्यवर्ती चेतापेशींकडे सर्व संवेदी, प्रेरक आणि सहयोगी चेतापेशींचे बंध असतात. या सर्वपेशींच्या परस्पर मेळामुळे बाह्य परिसरातील स्थितीचे ज्ञान प्राण्यास होते. प्राण्याचे वर्तन ज्ञानावर आधारित असते. चेतापेशींशिवाय मज्जासंस्थेमध्ये सहयोगी पेशी (ग्लायल पेशी) असतात. चेतापेशीना आधार देणे आणि चेतापेशीच्या चयापचय गरजा पूर्ण करणे हे सहयोगी पेशींचे कार्य आहे
बहुतेक सर्व बहुपेशीय प्राण्यामध्ये चेतासंस्था आहे. पण त्यांच्या रचनेमध्ये बरीच विविधता आढळते. स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये चेतासंस्था नाही. पण स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये चेतासंस्थेसदृश (होमोलॉग) असणाऱ्या जनुकामध्ये चेतासंस्थेशी संबंधित कार्याचा उगम आढळतो. अगदी प्राथमिक स्वरूपाची शारीरिक हालचाल नियंत्रित करणे हे स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये दिसते. जेलिफिश आणि हायड्रा (जलव्याल) सारख्या आंतरगुही संघातील अरीय सममित प्राण्यामध्ये चेतासंस्था प्राथमिक चेतापेशींच्या विस्कळीत जाळ्याच्या स्वरूपात असते. बहुपेशीय द्विपार्श्वसममित प्राण्यामध्ये पृष्ठवंशी (कशेरुकी ) आणि अपृष्ठवंशी (अकेशेरुकी) प्राण्यांचा समावेश होतो. या सर्वप्राण्यामधील चेतासंस्था एक मध्यवर्ती रज्जू (किंवा दोन समांतर रज्जुका) आणि परीघवर्ती चेता या स्वरूपात असते. द्विपार्श्वसममित सूत्रकृमीसारख्या प्राण्यामधील चेतापेशीं काही शेकड्यापासून मानवी चेतासंस्थेतील पेशींची संख्या शंभर अब्जापर्यंत पोहोचली आहे. चेताशास्त्र म्हणजे चेतासंस्थेचा अभ्यास.
स्पंज संघातील प्राण्याहून प्रगत अशा सर्व प्राण्यामध्ये चेतासंस्था आहे. स्पंज संघातील प्राणी आणि स्लाइम मोल्ड सारख्या प्राणिसृष्टीबाहेरील सजीवांमध्ये सुद्धा पेशीपेशींमध्ये संपर्क यंत्रणा आहे. चेतापेशीपूर्व अशा या यंत्रणेपासून चेतापेशी विकसित झाल्या. जेलिफिश सारख्या अरीय सममित प्राण्यामध्ये चेतापेशींचे विस्कळित जाळे आहे. बहुसंख्येने सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व द्विपार्श्वसममित प्राण्यांमध्ये उत्क्रांत झालेली चेतासंस्था कँब्रियन कालखंडापासून पाचशे दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झाली.
रचना
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.
चेतासंस्था या नावाचा उगम चेता पासून आहे. चेता म्हणजे दंडगोलाकार तंतूंचा जुडगा. हा जुडगा मेंदू आणि मज्जारज्जूमधील दुवा आहे. चेता विभाजित होऊन शरिराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचते. इजिप्शियन, ग्रीक, आणि रोमन संशोधकानी चेता प्रत्यक्ष पाहिलेल्या होत्या. त्यातील सूक्ष्म रचना त्याना ठाऊक नव्हती. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्यानंतर चेता अनेक तंतूनी बनलेली असते हे समजले. हे तंतू चेतापेशींच्या अक्षतंतूंचे होते. अक्षतंतूभोवती गुंडाळलेली पटले आणि पटलामध्ये अधून मधून खंड (फॅसिकल) असतात हे सूक्ष्मदर्शकाखाली दिसत असे. अक्षतंतूंचा उगम पेशीपासून होतो. पण बहुतांश पेशी मेंदू, मज्जारज्जू आणि गुच्छिकेमध्ये स्थित आहेत. मध्यवर्ती चेतासंस्था हा चेतासंस्थेमधील सर्वात मोठा भाग आहे. मेंदू आणि मज्जारज्जू असे त्याचे ढोबळ दोन भाग करता येतात. पाठीच्या कण्यातील मज्जा पोकळीमध्ये मज्जारजू असतो. मेंदू मात्र कवटीमध्ये असतो, मध्यवर्ती मज्जासंस्थेवर तीन आवरणे असतात. त्याना मस्तिष्क पटल असे म्हणतात. चर्ममय बाह्य चिवट आवरणास दृढावरण असे म्हणतात. मेंदूचे संरक्षण कवटीमुळे आणि मज्जारज्जूचे मणक्यामुळे होते.

चेतासंस्था चेतापेशी आणि सहयोगी अशा दोन प्रकारच्या पेशीनी बनलेली असते.
***************************************
चेतापेशी :
चेतापेशी इतर पेशीपासून सहज वेगळ्या ओळखता येतात. त्या परस्परांशी अनुबंधाद्वारे जोडलेल्या असतात. चेतापेशीमधील अनुबंध म्हणजे एका पेशीच्या पेशीपटलामधून दुसऱ्या पेशीमधील पटलामध्ये त्वरित होणारे संदेश वहन. हे वहन रासायनिक किंवा विद्युत भाराच्या स्वरूपात असते. बहुतेक चेतापेशीना एक किंवा अनेक प्रवर्ध (पेशीपासून निघालेला लांब भाग) निघतात. सर्वात लांब प्रवर्धास अक्षतंतू असे म्हणतात. हा प्रवर्ध शरीरामध्ये लांबपर्यंत विस्तारलेला असतो. अक्षतंतू प्रवर्ध इतर हजारो पेशीशी अनुबंधाने जोडलेले असतात. अनेक अक्षतंतू एकत्र येऊन बनलेली चेता(नर्व्ह)च्या स्वरूपात शरीरभर स्नायू किंवा अवयवापर्यंत गेलेली असते.
मानवी चेतासंस्थेमध्ये शेकडो प्रकारच्या चेतापेशी असतात. प्रत्येक पेशीची रचना आणि कार्यांमध्ये विविधता आहे. यांमधील संवेदी चेतापेशी प्रकाश व ध्वनि संवेदना ग्रहण करतात. प्रेरकचेतापेशी स्नायू आणि ग्रंथीना संदेशाद्वारे उत्तेजित करतात. बऱ्याच प्राण्यांमध्ये बहुतेक संवेदी चेतापेशी संदेश ग्रहण करून ते संदेश इतर चेतापेशीकडे पाठवतात.
सहयोगी पेशी:
सहयोगी पेशीमध्ये चेतापेशीचे एकही कार्य होत नाही. सहयोगी पेशी चेतापेशीना आधार देतात, अंतर्गत स्थिरता आणतात आणि संदेश वहन प्रक्रियेमध्ये मदत करतात. चेतापेशीच्या अक्षतंतूवर असणारे मायलिन आवरण सहयोगीपेशीपासून बनलेले आहे. एका अंदाजानुसार मानवी मेंदूमध्ये एकूण सहयोगी पेशींची संख्या चेपापेशींइतकी असावी. त्यांची संख्या मेंदूच्या विविध भागात आवश्यकतेनुसार कमी अधिक आहे. सहयोगी पेशींचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे चेतापेशीना आधार देणे, त्यांचे पोषण करणे, विद्युतरोधी आवरण, परजीवींचा नाश आणि मृत चेतापेशी नष्ट करणे, वगैरे.. अक्षतंतूंच्या मार्गिकेचे कार्य केल्याने अक्षतंतू विविक्षित भागापर्यंत सुलभपणे पोहोचतात. मध्यवर्ती चेतासंस्थेतील ऑलिगोडेंड्राइट आणि परीघवर्ती चेतासंस्थेतील श्वान पेशींच्या मेद पटलाचे आवरण अक्षतंतूभोवती गुंडाळलेले असते. या आवरणास मायलिन असे म्हणतात. अक्षतंतूमधून होणारे विद्युत रासायनिक संवेद वहन सुरळीत व्हावे यासाठी मायलिन हे विद्युत विरोधी आवरण कार्य करते. काहीं आजारात मायलिन आवरण नष्ट झाल्यास अक्षतंतूमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या संवेदामध्ये गंभीर परिणाम होतात. कशेरुकी(पृष्ठवंशी) प्राण्यामधील चेतासंस्था कशेरुकी सजीवांमधील चेतासंस्थेचे दोन भाग होतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परीघवर्ती चेता संस्था.
परीघवर्ती मज्जासंस्था :
परीघवर्ती मज्जासंस्था हे समुदायवाचक नाव आहे. ही मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या बाहेर असते. अक्षतंतूंच्या जुडग्याना चेता असे म्हणतात. चेता हा परीघवर्ती मज्जासंस्थेचा भाग आहे. परीधवर्ती संस्थेचे दोन भाग आहेत. कायिक (सोमॅटिक) आणि आंतरांगिक (व्हिसरल) . कायिक भागामधील चेता त्वचा, सांधे, आणि स्नायू यांच्यापर्यंत गेलेल्या असतात. कायिक संवेदी चेतापेशी मेरुरज्जूमधून निघणाऱ्या मेरुचेतामधील अधर बाजूस असलेल्या गुच्छ्तिकेमध्ये असतात. आंतरांगिक भागापासून रक्तवाहिन्या, आणि उदरपोकळीमधील ग्रंथी पर्यंत चेता गेलेल्या असतात. आंतरांगिक चेता संस्थेचे आणखी दोन सिंपथॅटिक (अनुकंपी तंत्रिका तंत्र) आणि पॅरासिंपथॅटिक असे आणखी दोन भाग असतात. कशेरुकी – पृष्ठवंशी प्राण्यांची चेता संस्था करड्या आणि श्वेत भागामध्ये विभागली जाते. जरी करड्या भागास ‘ग्रे मॅटर’ असे संबोधले जात असले तरी हा करडा रंग फोर्मॅलिनच्या द्रावणात ठेवलेल्या मेंदूचा आहे. प्रत्यक्षात जीवित मेंदूच्या छेदाचा बाह्य भाग गुलाबी किंवा फिकट तपकिरी दिसतो. या भागात चेतापेशीमधील पेशीकाय मोठ्या प्रमाणात असतात. श्वेत भागात मायलिन अक्षतंतूचे प्रामाण अधिक असते. मायलिन आवरणामुळे या भागास श्वेत रंग येतो. श्वेत भागात परिघवर्ती चेता, मेंदूचा अंतर्गत भाग आणि मेरुरज्जूचा अंतर्गत भाग असतो. मेंदू आणि मेरुरज्जूच्या करड्या भागात चेतापेशींचे समूह असतात. मेंदूच्या बाह्यक करडे तर अंतर्भाग श्वेत रंगाचा असतो. शरीरशास्त्राच्या सोयीसाठी चेतापेशींच्या मेंदूतील समूहास ‘केंद्रक’ (न्यूक्लियस) म्हणण्याची पद्धत आहे. मध्यवर्ती चेतासंस्थेबाह्य पेशीसमूहास गुच्छिका म्हणतात. या नियमास काहीं अपवाद केले आहेत.
*************************************
मूत्रपिंड 
 मूत्र रक्त लाल
मूत्रपिंड(kidney) हे गडद लाल, घेवड्याच्या(bean-shaped) आकाराचे असते. ते साधारण १०सेमी.लांब, ५सेमी.रूंद, ४सेमी.जाड असते. उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडापेक्षा खाली असते. ही रक्त गाळून शुद्ध करणाऱ्या गाळण्या आहेत. १३ मार्च हा दिवस जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणून साजरा केला जातो.
कार्य
अशुद्ध झालेले रक्‍त शुद्ध करण्याचे काम मूत्रपिंड देखील करत असतात. उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते मूत्र मार्गातून विसर्जित होतात.[२] या शिबवाय या मध्ये जीवनसत्त्व ‘डी-३‘ आणि एरिथ्रोपोइटिन दोन संप्रेरक मूत्रपिंडात तयार होतात. ड जिवनसत्त्व आपल्या शरीरातल्या कॅल्शियमचे संतुलन ठेवण्यासाठी लागते. एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या लाल पेशी तयार होतात. शरीरातले आम्ल व अल्कली यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्य हे करते.
विकार
मधुमेह, उच्चरक्तदाब, लठ्ठपणा या साऱ्याचा एकत्रित परिणाम मूत्रपिंडांच्या आरोग्यावर होत असते.
मूत्रपिंड रोपण

या अवयवास विकार झाल्यावर रक्तशुद्धीकरण योग्य होत नाही. त्यामुळे मूत्रपिंडरोपण अथवा डायलिसिस या दोहोपैकी एक पर्याय किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी वापरला जाउ शकतो.
मूत्रवहसंस्था
 मूत्रपिंड
संस्थेमध्ये दोन मूत्रपिंड, दोन मूत्रवाहिन्या, मूत्राशय व मूत्रमार्ग यांचा समावेश होतो.
**************************************** 
रक्तवहसंस्था 
 रक्त हृदय रोहिनी
रक्तवहसंस्थेमध्ये हृदय, रक्त, रक्तवाहिन्या यांचा समावेश होतो. रोहिनी रक्तवाहिन्या शुद्ध रक्तवहन करते(अपवाद- फुफ्फुसीय रोहिनी- ही हृदयाकडून फुप्फुसाकडे अशुद्ध रक्त वाहून नेते.) त्या लाल रंगाने दर्शविल्या जातात. नीला रक्तवाहिन्या अशुद्ध रक्तवहन करते(अपवाद-Pulmonary vein- ही फुफ्फुसाकडुन हृदयाकडे शुद्ध रक्त वाहून नेते.) त्या निळ्या रंगाने दर्शविल्या जातात.
************************************
***************************************

No comments:

Post a Comment