मराठी संत

मराठी संत 
*********
👦🏻संत मुक्ताबाई👧🏻
महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यात पुरुष बरोबरीने महिला संतांनीही समाज प्रबोधनात खूप मोठा हातभार लावलेला आहे. संत मुक्ताबाई यांचा उल्लेख त्यात करावाच लागेल. संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत-कवयित्री होत्या. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे त्यांचे थोरले भाऊ होते.

संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. परंतु त्यांचे स्वतःचेही स्वतंत्र व्यक्तीमत्व होते. त्यांनी रचिलेले ताटीचे अभंग हे त्यांच्या नावावर नोंदविलेले आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत्या. त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनांती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.

त्यांचा जन्म शके ११९९ किंवा शके १२०१ मध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदेला (घटस्थापना) झाला असा उल्लेख आहे. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, मातापित्यांचा देहत्याग, ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद, विसोबा खेचर यांचे शरण येणे हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग. शुद्धिपत्र मिळविण्यासाठी चौघे भावडं पैठण गावी आले. "ताटी उघडा ज्ञानेश्वरा" अशी आर्जव मुक्ताईने ज्ञानेश्वरांना केली होती. ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती करण्यातही मुक्ताबाईचा मोलाचा वाटा आहे. मुक्ताबाईने चांगदेवाना 'पासष्टी'चा अर्थ सांगितला. त्यानंतर चांगदेव महाराज मुक्ताबाईचे पहिले शिष्य झाले. मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता. त्यानंतर मुक्ताबाईला अमृत संजीवनीची प्राप्ती झाली.

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
*********************************
👦🏻 संत चोखामेळा👧🏻
संत चोखामेळा ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरु होते. सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात ते अडकले. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ . उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, मात्र विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. दैन्य, दारिद्रय, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते परंतु प्रत्यक्ष परमेश्र्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. इतरांप्रमाणे आपणही श्रीविठ्ठलाला उराउरी भेटावे असे खूप वाटत होते परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.

चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ ... असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.
संत चोखोबांचे भावविश्र्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ असा उपरोधिक प्रश्न ते देवालाच विचारतात. ‘का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणा-या आहेत.

‘धाव घाली विठू आता। चालू नको मंद। बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।’
‘जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार। बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।’
‘आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती। जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।’
‘ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।। चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा।।’
‘विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी।’

हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत. या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते संत चोखोबा मंगळवेढयाचे होते. त्यांना उपेक्षित बांधवांच्या उध्दाराची सतत चिंता होती. त्यांना समान हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले. गावगाड्यातील गावकुसाचे काम चालू असताना भिंत पडून सर्व कामगारांचा अंत झाला. चोखोबाही त्यात होते. संत नामदेवांनी जेव्हा सर्व अस्थी गोळा केल्या तेव्हा ज्या अस्थीतून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा नाद ऐकू आला त्या अस्थी चोखोबाच्या होत्या असे म्हणतात. नामदेवांनी मात्र चोखोबांना विठठलाजवळच अढळ स्थान दिले. पंढरपूरच्या देवळाच्या महाद्वारात पायरी जवळ नामदेवांनी संत चोखोबांची समाधी बांधली आहे.
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**********************************
👦🏻संत ज्ञानेश्वर👧🏻
महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे महत्त्व खूपच मोठे. कष्टकरी जनसामान्यांच्या वारकरी संप्रदयात "माऊली" उच्चारताच लगेच संत ज्ञानेश्वर महाराज वारक-यांच्या मनात येतात. वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी आपले सर्व जीवन पांडुरंगाच्या भक्तीत तसेच लोककार्यासाठी वाहून दिले. त्याकाळी ज्ञानोबा व त्यांच्या भावडांना खूप मोठ्या त्रासाला तोंड दयावे लागले. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी व आई रुखमिणी यांनी संन्यास सोडून गृहस्थाश्रम स्विकारल्याचे प्रायश्चित म्हणून गावक-यांनी त्यांना देहांताची शिक्षा दिली. आपल्या मुलांवर समाजाने टाकलेला बहिष्कार परत घ्यावा ह्यासाठी उभयतांनी इंद्रायणीत आपला देहत्याग केला.

संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाचे तेज लहानपणापासूनच जाणवायचे. त्याकाळी संस्कृत भाषेत असलेले ज्ञान केवळ विशिष्ट वर्गातच सिमित होते त्यासाठी वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वरानी भगवतगीतेचे सार सामान्यांसाठी मराठीत लिहिले. त्याव्यतिरिक्त हरिपाठ व पसायदान असे अध्यात्मिक लिखाणही लोकांसाठी केले. लहानपणी आळंदी येथे वास्तव्यास असतांना ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे माधुकरी मागून जीवन कंठीत असत. एके दिवशी भाक-या थापण्यासाठी खापर कोणी दिले नाही. त्यावेळी छोटया मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाकरी थापल्या. योगी चांगदेव वाघावर बसून माउलीकडे निघाले त्यावेळेला ज्ञानेश्वर त्यांचा अहंकार मोडण्यासाठी आपल्या भावंडासह अर्धवट बांधलेल्या भिंतीवर बसून चाल करुन गेले . कर्मठ पंडीतासमोरही ज्ञानेश्वरांनी रेडयाच्या मुखी वेद बोलून दाखवला. असे अनेक प्रसंग ज्ञानेश्वरांचे मोठेपण आणि दिव्यशक्तीचा प्रत्यय देतात. उभ्या महाराष्ट्राच्या ह्या माऊलींनी कवळ 20 व्या वर्षी समाधी घेतली
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**********************************
👦🏻संत नरहरी सोनार👧🏻
वारकरी संप्रदायामध्ये विविध जाती जमातीच्या संतांची एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न अठरा प्रगट जाती जमातीच्या संतानी केला आहे. यात पंढरपूर मधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमठविला होता. संत नरहरी सोनार हे जातीने सोनार असल्याने त्यांचा व्यवसाय हा दागिन्यांचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्धी होती. आपल्या कलेच्या जोरावर व्यवसायाचा पंढरपुरात चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिव भक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांची भगवान शंकरावर एकनिष्ठ भक्ती होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असे. रोज पहाटे जोतिर्लिंगावर ते बेल पत्र वाह असे.

ते शिवभक्त असले तरी दुस-या देवावर त्यांची फारशी श्रध्दा नव्हती यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे. एके दिवशी पांडुरंगाने या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरविले. तेव्हाच गावात एका सावकाराला पुत्र झाला तेव्हा पांडूरंगला कमरेची सोन साखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. विठ्ठलाला नवस केल्यामुळे त्याला पुत्ररत्न झाले होते. संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनविण्यास सांगितले. पण संत नरहरी सोनार ह्यांनी स्पष्टपणे नकार दिला याचे कारण त्यांचा पण होता की शंकाराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख ते बघणार नाहीत. त्यावर निरुपाय म्हणून सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरवले. यावर संत नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला. दुस-या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आनले
 👦🏻संत नरहरी👧🏻
यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकार देखील सोनसाखळी पाहून खुश झाला. मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोन साखळी घातली पण ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाने करून दिले. परंतु विठठलाला साखली घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व सोन साखळी कमरेत घालू लागले तर त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणविले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोधळून गेले. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहे. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडूरंगला म्हणाले

देवा तुझा मी सोनार । तुझ्या नामाचा व्यवहार ।।

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
*********************************
👦🏻संत एकनाथ👧🏻
शांतीब्रह्म, ‘संत’ पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ’ज्ञानाचा एका’ या बिरुदावलीने सा-‍या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ!
आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दात त्यांचे वर्णन करता येईल. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध संत. जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे. यांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे त्यांचे पणजोबा. यांचे कुलदैवत सूर्यनारायण होते. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्म ज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती.

एकनाथांचे गुरू सदगुरु जनार्दन स्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सदगुरु म्हणून संत एकनाथांनी यांना मनोमनी वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली. साक्षात् दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले. आत्मबोध, पूर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तात्रय यांचे दर्शन यांमुळे नाथांचे जीवन धन्य झाले. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. गुरुंकडूनच एकनाथांनी वेदांत, योग,  भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला.
नाथांनी सदगुणी, सुलक्षणी मुलीशी म्हणजेच गिरीजाशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. त्यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा होता. त्यांचा मुलगा हरिपंडित या नावाने प्रसिध्द झाला, परंपरेचा अतिशय अभिमानी होता. कवी मुक्तेश्र्वर हे नाथांचे नातू होत.
संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते ’ऐका जनार्दन’ म्हणून स्वत:चा उल्लेख करत. ऐका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. त्यांनी संत ज्ञानेश्वरांचे आळंदी येथील समाधीस्थळाचा शोध घेतला.
अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन एकनाथांनी केले. ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. ह्यात एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे अतिशय प्रासादिक (व्यासकृत) काव्य आहे.  . नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर अत्यंत लोकप्रिय आहे. नाथांची दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाणा) प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातीभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला व अनंतात विलिन झाले.
👧🏻🌺🌅👦🏻🌅🌺
*********************************
👦🏻संत नामदेव👧🏻
संत नामदेवांचे कुटूंब वारकरी संप्रादयाचे होते. जवळ- जवळ अठरा माणसांचे कुटुंब पांडुरंगाच्या भक्तीत लीन होते. घरच्या या वातावरणाचा प्रभाव संत नामदेवावर झाला. बालपणी झालेले संस्कार आयुष्यभर त्यांच्या सोबत होते. नामदेवांचे वडील दामाशेठी व आई गोणाई हे प्रामाणिक विठ्ठल भक्त होते.
संत नामदेवांची भक्ती सर्वश्रुत होती व ते भगवान विठ्ठलाचे सर्वात लाडके होते. एकदा त्यांचे वडील बाहेर काही कामानिमित बाहेर गेले होते तेव्हा देवाचा नैवेद्य घेऊन नामा गेले तेव्हा त्यांनी स्वतःच्या हातांनी पांडुरंगाला जेऊ घातले यामुळे ते लोकांत प्रसिद्ध झाले. संत नामदेवांनी आपले सगळे जीवन वारकरी सेवेत घालवले त्यांना कधीही अहंकार आला नाही . ते नेहमी देवाच्या गुण नामातच रमले. संत ज्ञानेश्वर, निवृतीनाथ, सोपानदेव, गोरोबा, मुक्ताई, चोखामेळा हे त्यांचे समकालीन संत होते . त्यांचे अध्यात्मिक गुरु विसोबा खेचर होते. आपल्या वारकरी जीवनात अनेक प्रकारचे अभंग, गौळणी अशा अनेक प्रकारचे लिखाण नामदेवरायांनी केले. संत जनाबाईंना त्यांच्या घरी आश्रय दिला गेला व त्यांना देखील अध्यात्मिक ज्ञान दिले. हे सर्व नामदेवरायामुळे झाल्यामुळेच जनाबाईचा उल्लेख नेहमी, ' दासी जनी नामयाची' असाच होतो .
नामदेवरायांचे कीर्तन हे त्यावेळेला चर्चेचा विषय ठरत असे. खुद्ध विठ्ठल भगवान कीर्तनाला हजर राहत असे .
' नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग ।' 
इतकी शक्ती त्यांच्याकडे होती . त्यांचा शुद्ध भाव होता जो देवाला देखील आवडत असे .
भागवत धर्माची पताका त्यांनी महाराष्ट्राबाहेर नेली लोकांना भक्तीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. श्री गोविंद ग्रंथ साहिब या शिख लोकांच्या पवित्र ग्रंथात नामदेवरायांची अभंग व वर्णने केलेली आहेत. पंजाब, राजस्थान, हरियाना या ठिकाणी नामदेवरायांची मंदिरे देखील बांधली

👧🏻🌺🌅👦🏻🌅🌺
*********************************
👦🏻संत तुकाराम👧🏻
महाराष्ट्रीय संतामध्ये जगदगुरू श्री. तुकोबारायांचे स्थान अनन्य आहे. सामान्य कुणबी कुळामध्ये जन्म घेऊन ब्रम्हज्ञान्यांना लाळ घोटविण्यास लावण्याची प्रतिज्ञा करणारे महाराज आपली वाणी भगवत्कृपेने प्रसवली म्हणून सांगतात. महाराजांचा वाणीचा प्रभाव त्यांचे चरित्राइतकाच मोठा आहे आणि वाणीप्रमाणे त्यांचे चरीत्रही दिव्य आहे.
श्रीगुरू विश्वभंरबाबा यांचे सेवाभावाने भगवान श्री पांडुरंग ही देहूस गेले व त्यांची सेवा पुढील पिढीने केली आणि सात पिढयांच्या अव्याहत सेवेनंतर आठव्या पिढीला महाराष्ट्राच्या परमार्थ क्षेत्रावर हरिभजने जग धवल करणारे महाराज अवतरले. पिता श्री बोल्होबा व माता कनकाई यांचे उदरी महाराजांचा अवतार माघ शुध्द पंचमी शके १५३० मध्ये झाला. महाराजांच्या जन्मकाळी बोल्होबांनी श्रीमंती वाखाणण्याजोगी होती.
वयाच्या १२ वर्षापर्यंत महाराज अतिशय लाडात व वैभवात वाढले. वयाच्या ११ व्या वर्षी बोल्होबांनी महाराजांचे लग्न केले. त्यांचे पहिल्या पत्निंचे नाव रखुमाबाई असे होते. पण तिला दम्याचा आजार होता. त्यामुळे घरातील काम होत नसे, म्हणून वयाच्या १३ व्या वर्षी बोल्होबांनी महाराजांचा दुसरा विवाह केला. महाराजांची दुसरी पत्नी सर्वांची आवडती होती म्हणून तिचे नाव आवडी' रुढ झाले.
१७ वर्षे पर्यत महाराजांना प्रापंचिक दू:खाची जाणिव नव्हती पण या दरम्यान थोरले बंधु सावजींची पत्नी वारली व ते विरक्त होऊन निघून गेले. त्यामुळे व्यापाराचा भार महाराजांवर आला. याचकाळात वृध्द बोल्होबा गेले त्यामुळे महाराज पोरके झाले. या दु:खात भर म्हणून त्यांचे १९ वर्षी महाराष्ट्रभर दुष्काळा व तो दोन वर्ष राहिला. या आपत्तीत महाराजाची सावकारकी बसली. पहिली पत्नी, संतोबा नावाचा मुलगा व माता कनकाई हे लागोपाठ गेले व या अकस्मित दू:खाने महाराज खचले व विरक्त होऊन भामचंद्रावर गेले. तिथे विणा अन्नपाण्याचे १५ दिवस चितंन करीत असतांना त्यांना विश्वात्मक देवाचे व्यापक स्वरुपाची जाणिव झाली व तेथून मागे परतल्यावंतर त्यांचे प्रापंचिक जीवन संपूर्ण बदलून ते 'उपकारापुरते' उरले.
दुष्काळ संपल्यानंतर जिजाऊनी महाराजांना प्रपंचात प्रवृत्त करण्याचे प्रयत्न केला पण महाराज 'दिनरजनी हाचि धंदा' करण्यात प्रवृत्त झाले त्यामुळे भौतिक प्रपंचात रमले नाहीत. भंडारा, भामचंद्र व घोराडेश्वर या एकांत वसतीला डोंगरावर भजनात रमू लागले. याच वैफल्यातून जिजाऊ कर्कश बनल्या मात्र मुळात त्यांचा स्वभाव तसा नसावा तेच तारण्यामध्ये वैभव नष्ट झाले.
महाराजांची साधना दृढ झाली व त्यांना चैतन्य मालिकेतील अधिकार संपन्न श्रीगुरू बाबाजी चैतन्यांचा स्वप्नदृष्टयानें अनुग्रह झाला. अशाच प्रसंगाने श्री पंढरीराय व नामदेवरायांची काव्य करण्याची आज्ञा झाली व महाराजांची प्रासादिक वाणी अमृताचा वर्षाव करु लागली. मात्र वैदिक परंपरेतील कर्मठ व दांभीक पक्व अहंकार या काव्याला प्रतीबंध झाला व रामेश्वर शास्त्री यांच्या आज्ञेने महाराजांना सर्व अंभगांच्या वह्या इंद्रायणीत बुडवाव्या लागल्या.
पुर्णत्वाने व सफलते जगून वयाच्या ४१ व्या वर्षी महाराजांनी पांडुरंगास वैकुंठास नेण्याची आळी घातली व ती देवाने पूर्ण केली. फाल्गुन वैद्य द्वितीया शके १५७१ या दिवशी महाराजांचे अदभूत व अद्वितीय असे सदेह वैकुंठगमण झाले. अवघ्या महाराष्ट्रावर त्यांचे ऋण असून संपूर्ण वारकरी संप्रदाय त्यांचा अनुग्रहीत आहे. त्यांनी आपल्या अंभगातून स्पष्ट केले की आपण प्रपंच करतांना सुध्दा भक्ती करु शक्ती. 'संत जाणा जगी दया क्षमा ज्यांचे अंगी' असे हे संत तुकाराम.
तुकोबांचे कवित्व प्रयत्नसाध्य आणि लौकिकासाठी नव्हते. ‘नामदेवे केले स्वप्नामाजी जागे | सवे पांडुरंग येवोनिया || सांगीतले काम करावे कवित्व | वाउगे निमित्य बोलू नये || हि त्यांच्या कवित्वाची मूळ प्रेरणा. आत्मविकासाच्या मार्गात आलेल्या अनुभूती त्यांनी आत्मनिष्ठ भूमिकेतून उस्फुर्तपणे व्यक्त केल्या. ‘नव्हते माझे बोल बोले पांडुरंग’ , ‘ वचनाचा अनुभव हाती |  बोलविती देव मज’, आपुलिया बळे नाही मी बोलत | सखा कृपावंत वाचा त्याची ||’, परी त्या विश्वंभरे बोलविले’ इत्यादी त्यांच्या काव्यनिर्मीती मागील पारमार्थिक प्रेरणा लक्षात येतात.  ‘झाडू संतांचे मार्ग | आडरानी भरले जग’, बुडते हे जग न देखावे डोळा | येतो कळवळा म्हणवूनी | हेही त्यांच्या काव्यनिर्मितीमागील उद्दिष्ट तितकेच महत्वाचे आहे.

आपल्या कवित्वाचे श्रेय ते अशा रीतीने परमेश्वराला देत असले , किवा नामदेवांनी स्वप्नात येऊन कवित्वनिर्मितिचा दृष्ठांत दिला असला, तरी  ‘तुका म्हणे झरा | आहे मुळाचीच खरा’ असाच प्रत्यय त्यांच्या अभंग वाङ्मयाच्या अभ्यासकाला आल्याशिवाय राहत नाही. ‘अणुरणीया थोकडा | तुका आकाशाएवढा |’ अशी सर्वात्मक भावना तुकोबांना ज्या भक्तीतून प्राप्त झाली, त्या भक्तीचे महात्म्य ते परोपरीने गातात.  तुकोबांना ज्या भक्तीतून प्राप्त झाली, त्या भक्तीचे महात्म्य ते परोपरीने गातात. त्यांचा भक्तिमार्ग कर्माप्रधान आहे, त्यात संन्यास्याला थारा नाही. उलट भक्तीतून आत्मसाक्षात्कार हेच वेदांताचे सार त्यांच्या अनुभवला आल्यामुळे ‘वेदांचा अर्थ तो आम्हासी ठावा | येरांनी वाहवा भार माथां | असे तुकोबा आत्मविश्वासाने म्हणतात. या भक्तिमार्गातून त्यांना परंपराप्राप्त उदात्त विचारांचे संगोपन आणि नवीन मूल्यांचे संवर्धन करायचे होते.

👦🏻🌺🌅👧🏻🌅🌺
**********************************
==============================
संत तुकाराम 
संत तुकारामांनी सहज लिहिता लिहिता  किती छान लिहून ठेवलेय बघा...

घासावा शब्द | 
तासावा शब्द|
तोलावा शब्द | 
बोलण्या पूर्वी||

शब्द हेचि कातर | 
शब्द सुईदोरा ।
बेतावेत शब्द |
 शास्त्राधारे ||

बोलावे मोजके | 
नेमके, खमंग, खमके |
ठेवावे भान | 
देश, काळ, पात्राचे।

बोलावे बरे | 
बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | 
पाडू नये चरे ||

कोणाचेही वर्म | 
व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म | 
काढूच नये ||

थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे|
मुद्देसुद बोलणे |
 ही संवाद कला।

शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान, कर्म, भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||

शब्दां मुळे दंगल |
 शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल |
 जागृत राहावं ||

जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी, वाणी, नाणी |

 नासू नये।। 👧🏻🌅🌺👦🏻🌅👦🏻🌺
**********************************
👧🏻कबीर👦🏻
भारतात जन्मलेले संत कबीर यांचा धर्म काय होता याबद्दल कहीही माहिती उपलब्ध नाही. कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातिभेद यापलीकडे कबीर पोहोचले होते. या भारत देशातील यच्चयावत समाज एकमताने चालावा, एकजुटीने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले, सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे आमरण झटले त्यापैकी कबीर हे एक होत. त्यामुळे त्यांना हे हिंदू-मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते. कबीरांनी केलेली राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत. कबीर सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्मस्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालविणारा जो परमेश्वर आहे, या सर्व जगाच्या निर्मितीमागे, या सर्व जगाच्या व्यवहारामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे तो ईश्वर, तो परब्रह्मस्वरूप पांडुरंग निर्गुण, निराकार आहे, हा त्यांचा विश्वास होता. त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही. म्हणूनच कबीरांच्या दृष्टीने सगळे साधुसंत, सगळे देव हे त्या एकाच परब्रह्मस्वरुप पांडुरंगाची लेकरे आहेत.
**********************************
👧🏻समर्थ रामदास स्वामी👦🏻                             
मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर
जन्म एप्रिल, इ.स. १६०८
जांब, जालना जिल्हा, महाराष्ट्र
निर्वाण इ.स. १६८१
सज्जनगड, सातारा जिल्हा, महाराष्ट्र
संप्रदाय समर्थ संप्रदाय
गुरू प्रभू श्रीरामचंद्र
भाषा मराठी
साहित्यरचना दासबोध, मनाचे श्लोक
कार्य भक्ति-शक्तीचा प्रसार, जनजागृती, समर्थ-संप्रदाय व मठांची स्थापना
प्रसिद्ध वचन जय जय रघुवीर समर्थ
संबंधित तीर्थक्षेत्रे सज्जनगड, शिवथर घळ, चाफळ
वडील सूर्याजीपंत
आई राणूबाई

समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (एप्रिल, इ.स. १६०८, जांब, महाराष्ट्र - इ.स. १६८२, सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणार्‍या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते
              Sablesir          👧🏻पूर्वाश्रमीचा परिवार👦🏻

समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर असे होते. ते निस्सीम सूर्योपासक होते. ते रोज 'आदित्यहृदय' या स्तोत्राचा पाठ करीत असत. गंगाधर व नारायण या त्यांच्या दोन पुत्रांचा जन्म सूर्यनारायणाने दिलेल्या वरदानामुळे झाला, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांच्या पत्‍नीचे, म्हणजे गंगाधर-नारायणांच्या आईचे नाव 'राणूबाई ' होते. त्या संत एकनाथ महाराजांच्या नात्यातील होत्या. समर्थ रामदास स्वामींचे ज्येष्ठ बंधू गंगाधरस्वामी यांना सर्वजण त्यांना आदराने 'श्रेष्ठ ' असे म्हणत असत. त्यांचा आध्यात्मिक अधिकार मोठा होता. त्यांनी 'सुगमोपाय' नामक ग्रंथ लिहिला होता. बालपणी समर्थांनी त्यांनाच गुरुमंत्र देण्याचा आग्रह केला होता. भानाजी गोसावी हे समर्थ रामदास स्वामींचे मामा होते. ते उत्तम कीर्तनकार असून संत एकनाथांचे शिष्य होते.
***-*****************************

No comments:

Post a Comment