ह्रदय विकार

ह्रदय
🌺 हृदयविकार🌺

🌺हृदय🌺
धमन्यांमध्ये अडथळे तयार होण्याची कारणं, कोलेस्टेरॉल,हृदयधमनीची दुखापत आणि रक्तातील गुठळ्या, बेताल हृदयस्पंदन, हृदयधमनीला आकुंचनाचा झटका म्हणजे हृदयधमन्यांच्या विकारामुळे होणारा हृदयविकार.

आपलं हृदय हे छातीच्या पिंज-यात , मध्यभागी किंचित डाव्या बाजूला सरकलेलं असतं हे आता बहुतेक सर्वांना माहिती आहे. शरीरासाठी रक्त पुरवण्याचं म्हणजेच रक्त ‘पंप’ करण्याचं काम हृदय करतं. तसंच, स्वत:च्या पोषणासाठीही हृदय रक्त पंप करत असतं. प्राणवायू हे हृदयाचं अन्न आहे आणि ते रक्तातून पुरवलं जातं. जोपर्यंत पुरेसं रक्त हृदयाकडं जात असतं तोपर्यंत हृदयाचं काम सुरळीत चालू असतं. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या असं म्हणतात. या हृदय धमन्यांच काम सुरळीत चालू असतं. तोपर्यंत त्यातून रक्ताचा पुरेसा पुरवठा होत राहतो आणि हृदयाचं कामही सुरळीत चालू राहतं. काही कारणानं हा रक्तपुरवठा अपुरा पडू लागला तर छाती, मान, पाठ, हात यापैकी एका किंवा अनेक ठिकाणी वेदना होऊ लागतात आणि त्याल अंजायना पेक्टोरीस (Angina Pectoris) असं म्हणतात.

जर काही कारणानं हृदयाला होणारा रक्तपुरवठा पूर्ण बंद पडला किंवा फार मोठ्या प्रमाणात बंद पडला तर झटक्यानं हृदय बंद पडतं. त्याला हृदयविकाराचा झटका असं म्हणतात.

तीन प्रमुख धमन्यांमधून हृदयाला रक्त पुरवल जातं. उजव्या हृदयधमनीतून हृदयाच्या उजव्या बाजूला रक्तपुरवठा होतो, तर डाव्या बाजूला रक्तपुरवठा करण्यासाठी दोन धमन्या असतात. पुढची डावी उतरती धमनी ही हृदयाच्या पुढच्या बाजूला रक्त पुरवते आणि वळसा घेऊन पाठीमागे जाणारी हृदयधमनी ही हृदयाच्या मागच्या बाजूला रक्तपुरवठा करते. या प्रमुख हृदयधमन्यांना पुढे अनेक फाटे फुटतात आणि ते सर्व हृदयाला रक्तपुरवठा करतात. यापैकी एखाद्या धमनीत काही अडथळा निर्माण झाला तर                                  
 N•R•Sable                    या धमन्यांमधून होणा-या रक्तपुरवठ्यात अडथळा कशामुळे येऊ शकतो?
हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची शवचिकित्सा केल्यावर त्यांच्यापैकी बहुतेकांच्या हृदयधमन्यांमध्ये अडथळे असल्याचं आढळून येतं. (या अडथळ्यांना प्लाक - Plaque, ऍथेरोस्क्लेरॉसिस - Athero Sclerosis, किंवा आर्टिरिओ स्क्लेरॉसिस - Arteri Osclerosis असं म्हणतात) हे अडथळे हे छातीत दुखण्याचं. हृदयाला रक्त कमी पडण्याचं आणि हृदयविकाराच्या झटक्याचं मुख्य कारण असलं पाहिजे असा निष्कर्ष यावरून काढला गेला. गेल्या ५०-६० वर्षांपूर्वीपर्यंत हृदयाविषयीचं वैद्यकीय क्षेत्राचं ज्ञान हे शवविच्छेदनातून मिळालेलं होतं. कारण जिवंतपणी हृदयाचं निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी आवश्यक ती साधनं त्या काळापर्यंत उपलब्ध नव्हती.
                       N•R•Sable             जीवनशैलीत बदल करताना पाळायची पथ्ये
व्यायाम: स्नायू शिथिलीकरणाचे काही व्यायाम हृदय-आसन, श्वसनाचे व्यायाम, मानसिक ताणाची सुयोग्य हाताळणी, ध्यान, कल्पनाचित्र. योग्य-अयोग्य गोष्टी दाखवणारी चित्र, तक्ते इ.

आहार: आहाराबाबत डॉ. डीन ऑर्निश यांनी सांगितलेली पथ्यं. भारतीय संदर्भात लक्षात घेण्याच्या विषेश बाबी: स्निग्धांशाविरहित आहार, आहाराबाबत काही सूचना, उंची, वजन याचं प्रमाण रोजच्या आहारातून मिळणारे उष्मांक व स्निग्धांश याचा हिशेब, स्निग्धांशविरहित पाकक्रिया भारतीय पदार्थांमधील पोषक घटकांच प्रमाण दाखवणारे तक्ते.

आपल्या हृदयाला हितकर असा बदल आपल्या जीवनशैलीत करणं आणि त्यानुरूप दिनक्रम आखणे ही गोष्ट आपल्या स्वतःच्या घरी राहूनही करता येण्याजोगी आहे. हृदयविकार निवारणाचा हा कार्यक्रम अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नसल्यामुळे तो ज्याचा त्याला पार पाडता येईल.
                  N•R•Sable: हृदयविकाराखेरीज इतर काही दुखणी असल्यास आणि त्याबाबत आहार-विहाराचं काही पथ्यं असल्यास पाळावं. त्याबाबतही तज्ञ वैद्यकीय सल्ला घेत राहावा.
डॉक्टरांनी सुचवलेल्या तपासण्या वेळच्यावेळी करून घ्याव्या.
कार्यक्रमाप्रमाणे दिनक्रम सुरू केल्यानंतर स्वतःच्या प्रकृतीत काही फरक पडत असल्याचं आढळल्यास लगेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या आवश्यक अशा सावधगिरीप्रमाणे आणखीही काही गोष्टी हृदयरूग्णांनी करणं जरूरीच आहे असं वाटतं. हृदयविकार निवारण कार्यक्रमाचा तो भाग नसला तरी या गोष्टी तत्वाच्या असल्यामुळे इथे त्यांचा उल्लेख करत आहे.

हृदयविकार असणाऱ्या रूग्णाला छातीत, पाठीत, खांद्यात, मानेत अशा वेदना होऊ लागल्या (ज्या अँजायनाच्या हृदयझटक्याच्या असू शकतात) तर अशा वेळी घेण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना काही गोळ्या दिलेल्या असतात. (सॉरबिट्रेट किंवा तत्सम) या गोळ्या अशा रूग्णांनी सतत स्वतःबरोबर बाळगाव्या असं त्यांना सांगितलेलं असतं. जर काही त्रास होऊ लागला तर त्यातली अर्धी ते एक गोळी ताबडतोब जिभेखाली ठेवायची असते. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे बहूतेक रूग्ण या गोळ्या आपल्या खिशात, पाकिटात अशा ठिकाणी ठेवतात.


पण पुष्कळदा या गोळ्या आपण कुठे ठेवल्या आहेत ते आपल्या जवळच्या किंवा नेहमी बरोबर असलेल्या व्यक्तीला मात्र त्यांनी सांगितलेले नसतं. त्यामुळे त्रास होऊ लागला किंवा हृदयविकाराचा झटका आला तर बरोबर असलेल्या किंवा घरात असलेल्या व्यक्ती डॉक्टरांशी संपर्क साधण्याची, रूग्णाला हॉस्पीटलमध्ये नेण्याची धावपळ करू लागतात आणि तातडीनं जे औषध द्यायला हवं ते मात्र दिलं जात नाही. हे औषध द्यायला हवं हे पुष्कळांना माहीत नसतं. तर ते कुठे ठेवलेलं आहे हे कित्येकांना माहीत नसतं. हृदयविकाराचा झटका आलेला रुग्ण काही वेळा पूर्ण बेशुध्द होतो तर काही वेळा बेशुध्द 
@@@@@@@@@@@#@@@@@@@@@@

No comments:

Post a Comment