वि विज्ञान विषय

सा • वि • माहिति 
************** 
************** 
🌺🌅👦🏻🌺🌅👧🏻🌺

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी (भाग 4)

1 Joule = 107 अर्ग
 फटक्यामध्ये रासायनिक ऊर्जा साठविलेली असते.
 ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो की, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ठही करता येत नाही. केवळ तिचे एका प्रकारातून दुसर्यार प्रकारात रूपांतर करता येते.
 कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती होय. तसेच एकक कालात केलेले कार्य म्हणजे शक्ती होय.
 SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.
 १ वॅट = १ ज्युल/से = 1 N – m/s तसेच 1 HP = 746 वॅट
 माध्यमातून प्रक्षोभाचा जो आकृतीबंध प्रवास घडतो त्या आकृतिबंधास ‘तरंग’ असे म्हणतात.
 यांत्रिक तरंग दोन प्रकारचे असतात. १) अनुतरंग (longitudinal wave), २) अवतरंग (transverse wave)
 ध्वनीचा कोरड्या हवेतील वेग 00से तापमानाला 332 मी/से. आहे.
 ज्या ध्वनी तरंगाची वारंवारता २० Hz पेक्षा कमी किंवा २०,००० Hz पेक्षा जास्त असते असे ध्वनी माणसाला ऐकू येत नाहीत. त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात.
 प्रकाशाचा वेग 3 x 108 m/s आणि ध्वनीचा वेग ३४० m/s आहे.
 ध्वनीलहरींचे परावर्तन होऊन 1/10 सेकंदानंतर त्या आपल्या कानावर पडल्यास मूळ आवाज पुन्हा ऐकू येतो. हाच प्रतिध्वनी होय.
 प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान १७ मी. अंतर असणे आवश्यक आहे.
 वटवाघूळ उच्च वारंवारतेचा ध्वनी निर्माण करतात. या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी असे म्हणतात.
 प्रतिध्वनीचे तत्व SONAR पद्धतीत वापरतात.
 SONAR- Sound Navigation And Ranging System
 पाण्यामध्ये ध्वनीचा वेग १४१० m/s आहे तर समुद्राच्या पाण्यात हाच वेग १५५० m/s आहे. लोखंडामध्ये ध्वनीचा वेग सुमारे ५१०० m/s आहे.
 ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डेसिबल (decibel) हे आहे. लघुरूपात डेसिबल हे dB असे लिहितात.
 नकोसा वाटणारा ध्वनी म्हणजे कुरव होय.
 पाण्याचे तापमान ४०से. पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्टपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखविते.
 ४०से. या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम होते आणि ४०से. पुढे गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते. अशा रीतीने पाण्याचे 00 से ते ४० से. या तापमाना दरम्यान होणार्या  आचरणास पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात.
 बर्फाखलील पाण्याचे तापमान ४०से. च राहते.
 ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते, त्या तापमानास दवबिंदू तापमान म्हणतात.
 ज्या राशीच्या सहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे शेकडा प्रमाण मोजले जाते तिला निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात.
 दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता १००% असते.
 जर सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते.
 एक किलोग्रॅम पाण्याचे तापमान १४.५०ते १५.५०से. पर्यंत १०से. वाढविण्यासाठी लागणार्याय उष्णतेस एक किलोकॅलरी उष्णता असे म्हणतात.
 एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान १०से. ने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय.
 एका माध्यमातून दुसर्या् पारदर्शक माध्यमात तिरकस जाताना, प्रकाश किरणांच्या प्रसारणाच्या दिशेत बदल होतो यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात.
 कोणत्याही पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात.
 प्रिझम मधून अभिक्रमण करताना प्रकाश किरणांचे झालेले विचलन प्रिझमच्या पदार्थाच्या अपवर्तनांकावर अवलंबून असते. जांभळ्या रंगाचा प्रकाशकिरण सर्वात जास्त विचलित होतो तर तांबड्या रंगाचा प्रकाश किरण सर्वात कमी विचलीत होतो.
 नेत्रोद आणि काचाभ द्रव दोघांचा अपवर्तनांक साधारणपणे १.३३६ म्हणजे पाण्याच्या अपवर्तनांकाएवढा असतो. तर नेत्रभिंगाचा अपवर्तनांक १.४३७ असतो.
 आपल्याला प्रकाशाच्या तीव्रतेचे ज्ञान दंडामुळे तर रंगांचे ज्ञान शंकूमुळे होते.

🌺👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺 
****************************** 
****************************** 
👦🏻 विज्ञान👧🏻
   
* ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.

* ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.

* ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’
शरीरातील
प्रतिकारशक्ती वाढविते.

* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.

*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के
घनपदार्थ
असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश,
३.५ ते
३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व
०.६ ते
०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात,
म्हणून
दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.

* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम
दुधाची आवश्यकता असते.

* ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग
होतो.

* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित
आहे.

* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश
सेल्शिअस
असते.

* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात
केला जातो.

* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.

* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.

* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते.
रक्तामध्ये
मँगेनिज हे द्रव्य असते.

* ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर
कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास
‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.

* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक
जास्त
प्रमाणात असते.

* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.

* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग
करतात.

* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये
कॅफीन हे
अपायकारक द्रव्य असते.

* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ
झाल्यास
ब्लड कॅन्सर होतो.

* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर

कावीळ.

* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व
इन्फ्लुएंझा

* मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे
होतो.

* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व
लॅप्सो स्पायरसी

* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण
दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.

*नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.

* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.

* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.

* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.

* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त
आहे.

* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने
हृदयविकाराचा झटका येतो.

* रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे
कोलेस्टेरॉल
रक्तातून वाहते.

* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे
मोजले
जाते.

* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’
हा घटक

करतो.
*********************************
*शास्त्रीय उपकरणे*
                   *व* 
          *त्यांचा वापर* 

*डायनामोमीटर—* इंजिनाची विशिष्ट शक्ती मोजण्याचे उपकरणे

*हॉट एअर ओव्हम —*अधिक तापमान वाढविणारे उपकरण

*कॉम्युटर—*
क्षणात प्रचंड आकडेमोड करणारे यंत्र

*रेफ्रीजरेटर—* तापमान 4 से. पेक्षा कमी राखणारे उपकरण

*स्पिडोमीटर—* गोलकार चाके असलेल्या वाहनाने काटलेले अंतर मोजण्याचे उपकरण

*हायड्रोफोन—* पाण्याखाली ध्वनीचे आंदोलन मोजणारे उपकरण

*टेलेस्टार—* तारांच्या सहाय्याशिवाय अवकाशातून ध्वनीलहरी प्रक्षेपीत करणारे उपकरण.

*टाईपराईटर—* टंकलेखनाच्या सहाय्याने कागदावर मजकूर लिहणारे उपकरण

*टेलीग्राफ —*सूर्य किरणांच्या आरशातील प्रतिबिंबाच्या सहाय्याने संदेश वाहनासाठी वापरले जाणारे उपकरण.

*अल्टीमीटर—* समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

*ऑक्टोक्लेव्ह—* दाब देऊन वस्तू निर्जंतुक करण्याचे उपकरण.

*सिस्मोग्राफ—* भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र

*अॅमीटर—* अॅम्पीयरमध्ये विद्युतप्रवाह मोजण्यासाठी.

*अॅनिमोमीटर—* वार्‍याचा वेग व दाब मोजण्यासाठी

*गायग्रोस्कोप—*वर्तुळाकार भ्रमण करणार्‍या वस्तूची गती मोजणारे उपकरण.

*पायरोमीटर—* उच्च तापमान मोजण्यासाठीचे उपकरण

*बॅरोमीटर—* हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण

*टेलिप्रिंटर—* तारायंत्राने पाठविलेला मजकूर आपोआप छापणारे उपकरण.

*मायक्रोस्कोप—*सुक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

*क्रोनीमीटर—* जहाजात वापरण्यात येणारे अचूक मापनाचे घडयाळ.

*लॅक्टोमीटर—* दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण.

*कार्डिओग्राफ—* हृदयाची स्पंदने मोजण्यासाठीचे उपकरण.

*सायक्लोस्टायलिंग—* छापील कागदाच्या अनेक प्रती काढण्याचे उपकरण.

*कार्बोरेटर—* पेट्रोल आणि हवा अंतर्गत ज्वलन इंजिनात सोडण्यासाठी.

*मॅनोमीटर—* वायुचा दाब मोजणारे उपकरण

*ऑडिओमीटर—* ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी

*मायक्रोफोन—* ध्वनीलहरीचे विद्युतलहरीत रूपांतर करणारे उपकरण.

*रडार—*रेडिओ सुक्ष्म लहरीच्या साह्याने अवकाशातील वस्तूचे स्थान, दिशा व वेग दाखविणारे उपकरण.

*हायड्रोमीटर—* द्रव्य पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

*मायक्रोमीटर—* अतिशय सुक्ष्ममाप मोजण्यासाठी 

*बी.ओ.डी. इंक्यूबेटर —* 20° सेंटीग्रेड तापमान राखणारे उपकरण


*थर्मोस्टेट—* ठराविक तापमानपर्यंत नियंत्रण करू शकणारे उपकरण.


*थिअडोलाईट—* उभ्या आणि आडव्या पातळीतील कोन मोजण्यासाठी व मोजणी करण्यासाठी.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

No comments:

Post a Comment