मैदानी खेळ

टेनिस 
**********************************
👧🏻टेनिस👦🏻
: कोर्टची लांबी-रुंदी १८मी. X ९मी. असते. तर टेबलची लांबी-रुंदी २.७४ मी. X १.५२५मी. असते. टेबलची उंची जमिनीपासून ७६ सेमी. असते. टेबलच्या मधोमध असलेले १५.२५सेमी. उंचीचे जाळे टेबलची दोन भागात विभागणी करते.
टेबल टेनिस या खेळाचा पाया मुळात टेनिस या खेळावर आधारलेला असला, तरी तो गुण मोजणीच्या फरकामुळे मजेशीर बनला आहे.
👧🏻एकेरी पद्धतीत सर्विस करताना चेंडू जाळ्याच्या अलिकडे आणि पलिकडेही अश्या पद्धतीने मारला जातो जेणेकरून तो प्रतिस्पर्ध्याला परतवता येणार नाही. सर्विसनंतर केवळ प्रतिस्पर्ध्याच्याच टेबलवर चेंडूचा टप्पा पडेल अश्या पद्धतीने खेळावे लागते.
दुहेरी पद्धतीत सर्विस करताना चेंडू समोरील प्रतिस्पर्ध्याकडे न मारता समोरील डावीकडील प्रतिस्पर्ध्याकडे (म्हणजे तिरकी सर्विस) मारला जातो.
 टेनिसप्रमाणे इथे जोडीदाराला कोणताही चेंडू परतवण्याची मुभा नसते. सर्विस केल्यानंतर आपल्या जोडीदाराला प्रतिस्पर्ध्याचा चेंडू टोलवण्यासाठी जागा करुन द्यावी लागते. म्हणजेच एकच खेळाडू लागोपाठ चेंडू परवू शकत नाही, तर प्रत्येकाने आलटून पालटून चेंडू परतवायचे असतात. 👧🏻आपण मारलेल्या चुकीच्या फटक्यांमुळे जाणारे गुण : १. सर्विसचा पहिला टप्पा आपल्या व दुसरा टप्पा प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टात मारला नाही तर. २. बॉल जाळ्यात अडकला तर. २. बॉल टेबलच्या बाहेर पडला तर.
- पॉईंट मोजण्याची पद्धत १. एकेरी मॅचमधील गेम प्रत्येकी ११ पॉईंटचा (जिंकण्यासाठी दोन गुणांचा फरक आवश्यक) असतो. मॅचचा निकाल Best of Seven गेम वर लागतो.

२. एकेरीच्या सामन्यात प्रत्येक दोन गुणांनंतर सर्विस बदलते. तसेच जर गेम मधे १०-१०ची बरोबरी झाली, तर प्रत्येक गुण घेतल्यानंतर सर्विस बदलते. दुहेरीच्या सामन्यात जर बरोबरी झाली, तर प्रत्येक गुणांनतर प्रत्येक खेळाडूला सर्विस कारावी लागते.

👧🏻🌺🌅👦🏻🌅🌺
********************************
गोळा फेक 
********************************
👦🏻गोळा फेक👧🏻
७ फूट व्यासाचे वर्तुळ असते. वर्तुळमध्याजवळ फेकीच्या दिशेने ४० अंशाचा कोन असतो. सर्व रेषा ५ सेंटीमीटर जाडीच्या व व्यासाची रेषा ५.५ सेंटीमीटर वर्तुळाच्या बाहेरून असते.
साहित्य
 गोळा- लोखंडी किंवा पितळी असतो.
पुरूषांसाठी- वजन- ७.२६ किलोग्रॅम, परिघ- ११० ते १३० मिलीमीटर.
स्त्रियांसाठी- वजन- ४ किलोग्रॅम, परिघ- ९५ ते ११० मिलीमीटर.
👧🏻🌺👦🏻🌅👦🏻🌺
********************************
अडथळा शर्यत 
**--*******************************
👧🏻अडथळ्यांच्या शर्यती👦🏻
 सामान्यत: पुरुषांसाठी अडथळ्यांची शर्यत ११० मी. व ४०० मी. अंतराची ठेवण्यात येते. महिलांसाठी अडथळ्यांची शर्यत १०० मी. आणि ४०० मी. अंतराची ठेवण्यात येते. प्रत्येक धावमार्गावर अडथळ्यांच्या पट्ट्यांच्या (हर्डल्स) दहा रांगा असतात. त्यांची उंची व परस्परांतील अंतर हे शर्यतीच्या अंतरावर अवलंबून असते. प्रत्येक अडथळा आयताकृती असून त्याची वरील आडवी पट्टी लाकडाची असते. अडथळ्यांच्या पट्ट्या धक्का लागून पडल्या, तरी स्पर्धक बाद होत नाही. मात्र त्याची गुणसंख्या कमी होते. स्पर्धकाला प्रत्येक अडथळापट्टीवरून उडी मारावीच लागते. उडी मारताना आणि पट्टी ओलांडताना दोन्ही पाय (एका वेळी नव्हे) पट्टीवरूनच पलीकडे न्यावे लागतात. अडथळापट्टीच्या बाजूने पाय नेल्यास स्पर्धक बाद होतो.

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**********************************
भालाफेक 
**********************************
👦🏻भाला फेक👧🏻
स्क्रॅच लाइन’ असून, तिच्यामागून भालाफेक करावी, असा नियम आहे. ही रेषा ओलांडली, तर फेक बाद ठरते. भाला पकडण्याच्या दोन पद्धती आहेत : (१) अमेरिकन पकड व (२) फिनिश पकड. अमेरिकन पकडीत अंगठा व तर्जनी यांच्या विळख्यात भाला धरला जातो. फिनिश पकडीत मध्यभागी तोल रहावा, म्हणून दोरीने गुंडाळलेल्या जागेचा खालचा भाग हा अंगठा व मधले बोट यांनी मजबूत पकडून, तिरकस तळव्याच्या पोकळीत भाला धरला जातो. तर्जनी ताठ असून दोरीवर असते. भाल्याची पकड, धावत येणे व फेकणे व त्याचबरोबर पायांची अदलाबदल करणे, हे भालाफेकीतील कृतींचे प्रमुख टप्पे आहेत.

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
*********************************
थाळी फेक 
********************************
👦🏻थाळी फेक👧🏻
डिस्क-थ्रो). थाळीच्या कडेचा भाग धातूचा असून मध्यभाग लाकडी असतो. थाळीचा व्यास २१ सेंमी. (८ ५/८’’) असून मध्यभागी जाडी ४·४ सेंमी (१ ३/४’’) असते. टोकाची जाडी १·२ सेंमी. (१/२’’) असते. थाळीचे वजन पुरुषांकरिता २ किग्रॅ., तर स्त्रियांकरिता असलेल्या थाळीचे वजन १ किग्रॅ. एवढे असते. ज्या वर्तुळातून थाळी फेकली जाते, त्याचा व्यास २·५ मी. (८’-२’’) असतो. थाळीफेकीत थाळीची पकड, वळणे (पिव्हट) आणि फेकण (हर्लिंग) या क्रिया महत्त्वाच्या असतात. युरोपमध्ये प्रचलित असलेल्या थाळीफेक पद्धतीत वळण्याची क्रिया वेगाने होते, तर अमेरिकन थाळीफेक तंत्रात शरीराच्या हालचाली जास्त नैसर्गिक व तालबद्ध होतात.
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
********************************
हातोडा फेक 
**-*-***************************
👧🏻हातोडा फेक👦🏻
हॅमर-थ्रो). यातील गोळा शिशाचा अथवा पितळी असून शिसे व ओतीव लोखंडाने भरलेला असतो. त्याची मूठ पोलादी तारेची असून तार ३ मिमी. (१’’ १०) व्यासाची असते. मुठीची पकड व गोळा यांतील लांबी सर्वसामान्यपणे १.२१ मी. (४’) असते. साखळी-मुठीसहित गोळ्याचे वजन कमीत कमी ७.२५७ किग्रॅ. (१६ पौंड) असावे, असा नियम आहे. शालेय स्पर्धांमध्ये मुलांनी वापरावयाच्या उपकरणाचे वजन कमीत कमी १२ पौंड असावे लागते. या गोळ्याची फेक सुरक्षित असावी, म्हणून ८·२२ मी. (२७’) व्यासाचा एक सुरक्षा पिंजरा असतो. तो तीन बाजूंनी बंद असून फक्त फेकीच्या दिशेने उघडा असतो. खुली बाजू ७ मी. (२३’) असते. पिंजरा २ १/४’’  ४ १/२’’ अशा तारेच्या जाळीच्या पडद्याप्रमाणे असतो. उभे राहणे (पवित्रा), गोळा फिरवणे, गिरक्या घेणे व गोळा फेकणे हे हातोडाफेकीतील कृतींचे चार टप्पे आहेत.
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**--******************************
गोळा फेक 
********************************
👦🏻गोळाफेक👧🏻
ऑलिंपिक सामन्यात पुरुष खेळाडूंसाठी ७·२५७ किग्रॅ. (१६ पौंड), तर स्त्री खेळाडूंसाठी ४ किग्रॅ. (८ पौंड १३ औंस) एवढा गोळा वापरला जातो. शालेय स्पर्धांमध्ये मुलांसाठी ५.४४३ किग्रॅ. (१२ पौंड) गोळा वापरला जातो. स्पर्धेसाठी वापरला जाणारा गोळा लोखंडी वा पितळी असून, त्यात शिशासारखा वजनदार धातू भरलेला असतो. २·१३ मी. (७’) व्यासाच्या वर्तुळातून गोळ्याची फेक करायची असते. गोळा फेकण्याच्या बाजूस एक बाकदार फळी असते, तिची लांबी १·२१ मी. (४’), रुंदी ११ सेंमी. (४ १/२’’) व उंची १० सेंमी. (४″) असते. वर्तुळातून केलेल्या फेकी वाटेल त्या बाजूस न जाता समोरच्या मर्यादित क्षेत्रातच पडाव्या लागतात. गोळ्याची पकड, पायांची विशिष्ट हालचाल व गोळाफेक आणि पायांची अदलाबदल असे तीन टप्पे गोळाफेकीत असतात. पायांच्या हालचालींतही दोन प्रकार आहेत : घसरण्याची (ग्लायडिंग) क्रिया व लंगडण्याची (हॉपिंग) क्रिया

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**********************************
ट्रिपल जंप 
***************************-*****
👧🏻तिहेरीउडी👦🏻

(ट्रिपल जंप). या उडी प्रकारात धावत येणे, फळीवरून लंगड घेणे (हॉप), झाप टाकणे (स्टेप) व लांब उडी मारणे (जंप) या क्रमाने केल्या जाणाऱ्याआ क्रियांचा समावेश होतो, म्हणून त्यास ‘लंगडझाप उडी’ (हॉप-स्टेप-जंप) म्हणतात. उड्यांच्या प्रकारात ही अतिशय अवघड उडी आहे. या उडीत खेळाडू ज्या पायावर उडी घेतो, तोच पाय प्रथम जमिनीवर टेकवतो. त्यानंतर दुसऱ्या पायावरची उडी व शेवटी दोन्ही पायांनी जास्तीत जास्त दूरवर लांब उडी मारतो. तिहेरी उडीत हे तीन टप्पे खेळाडूस सलगपणे पार करावे लागतात.

👧🏻🌺🌅👦🏻🌅🌺
*********************************
लांब उडी 
***-*****************************
👦🏻लांबउडी👧🏻

सुमारे २० मी. अंतरावरून धावत येऊन फळीवर एक पाय रोवून हौद्यात लांबवर दोन्ही पायांनी उडी मारणे, म्हणजे लांब उडी होय. ही लाकडाची फळी १·२१ मी. (४’) लांब व २० सेंमी. (८’) रुंद असते, तिला उड्डाण फळी (टेकऑफ बोर्ड) म्हणतात. स्पर्धकाचा पाय वा पायाचा काही भाग या फळीपलीकडे गेल्यास ती उडी बाद ठरवतात. स्पर्धकाने उडी मारल्यानंतर शरीराच्या सर्वांत मागच्या भागाचा हौद्यातील जमिनीस वा गादीस स्पर्श होईल, त्या ठिकाणापासून फळीपर्यंतचे अंतर मोजले जाते. लांब उडी मारण्याच्या दोन प्रमुख पद्धती आहेत : (१) नी टेक्, (२) हिच किक्.
‘नी टेक्’ मध्ये फळीवरून उडी घेतल्यावर गुडघे छातीजवळ आणले जातात आणि उडी घेतल्यावर विरुद्ध बाजूचा हात व पाय उंच व समोर धरला जातो. ‘हिच किक्’ पद्धती आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वमान्य झाली आहे. या उडीत स्पर्धक हवेत गेल्यावर धावगती तशीच पुढे चालू ठेवतो. या उडीत धावत येणे (ऍप्रोच रन), फळीवर पाय टेकून उडी घेणे (टेकऑफ), हवेतील उड्डाण (फ्लाइट) 

👧🏻🌅🌅👦🏻🌅🌺
*********************************
बांबू उडी 
********************************
👧🏻बांबू उडी👦🏻
(पोल व्हॉल्ट). या उडीत बांबूच्या आधाराने खेळाडूला अधिकाधिक उंच उडी मारावयाची असते. बांबू रोवण्यासाठी जी पेटी (व्हॉल्टिंग बॉक्स) बनवलेली असते, ती १ मी. (३’-४’’) लांब, पुढील बाजूस ६० सेंमी. (२’) रुंद व जिथे बांबू रोवला जातो त्या बाजूकडे १५ सेंमी. (६’’) रुंद असते. ह्या ठिकाणाची खोली २० सेंमी. (८’’) असते. या पेटीचा तळ ८० सेंमी. (२’-८’’) लांबीपर्यंत लोखंडी पत्र्याने मढवलेला असतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धांत या उडीची सुरुवात सु. ३.०४ मीटर पासून (सु.१०’) होते. या उडीत पुढील तीन प्रमुख क्रिया असतात : (अ) दांडीच्या दिशेने एका लयीत धावत येणे, (आ) आडव्या दांडीच्या (क्रॉसबार) वर उंच व योग्य दिशेने उडी मारणे आणि (इ) दांडीच्या वर गेल्यावर बांबू हातातून सोडणे. बांबू हा कळक, ऍल्युमिनियम, प्लॅस्टिक, तंतुकाच यांपैकी कोणत्याही माध्यमातील चालू शकतो. तंतुकाचेचा बांबू वजनाला हलका व जास्त लवचीक असल्याने जागतिक खेळाडू त्या प्राधान्य देतात.

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
**-******************************
==============================
उंच उडी 
***-*****************************
👧🏻उंच उडी👦🏻
 अंतर ३·६६ ते ४ मी. (१२’ ते १३’-२ १/४’’) असते. या आधारभूत खांबांवर आडवी दांडी (क्रॉसबार) बसवलेली असते. दोन्ही बाजूंच्या आधारभूत खांबांना प्रत्येकी अर्ध्या इंचावर आरपार भोके असून, त्यांत खिट्ट्या घालून त्यांवर आडवी दांडी ठेवली जाते आणि त्यावरून पलीकडे स्पर्धक उडी मारतात. स्पर्धेच्या प्रारंभी आडवी दांडी टप्प्याटप्प्याने वरवर सरकवली जाते. याबाबत घोषणा करून स्पर्धकांना कल्पना दिली जाते. आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सामान्यत: १·६० ते १·६७ मी. (५‘-३’’ ते ५’-६’’) एवढ्या उंचीपासून उडीला प्रारंभ करतात. स्पर्धकाला तीन संधी मिळतात. उडी मारताना स्पर्धकाचा दांडीला स्पर्श झाला तरी चालतो.
उंच उडी मारण्याच्या तीन पद्धती रूढ आहेत : (१) स्ट्रॅडल, (२) वेस्टर्न रोल व (३) सीझर्स. ‘स्ट्रॅडल’ पद्धतीने उडी मारताना प्रथम उजवा पाय पलीकडे जाणे आवश्यक असते. त्याच वेळी तोंडाची व शरीराची दिशा जमिनीकडे करून शेवटी डावा पाय दांडीपलीकडे न्यायचा असतो. या पद्धतीत शरीर दांडीला समांतर आडव्या स्थितीत पलीकडे नेले जाते. ही पद्धती जास्त प्रचलित आहे.
‘वेस्टर्न रोल’ पद्धतीने उडी मारताना सगळे शरीर डाव्या पायावर उसळी घेऊन, हवेत एकदम उचलून, आडव्या दांडीवर किंचित तिरके करून व दोन्ही पाय छातीजवळ घेऊन पलीकडे जाणे आवश्यक असते. अमेरिकेच्या जॉर्ज होराईन याने ही पद्धती शोधून काढली. आंतरराष्ट्रीय स्पर्धांत ती प्रमाणितही धरली जाते

👧🏻🌺🌅👦🏻🌅🌺.
*********************************

No comments:

Post a Comment